नवी आशा जगण्याची... भाग 31

निशा आज तू येते का माझ्या घरी अग आदित्यच्या घरचे येणार आहेत इकडे, मला फार भीती वाटते आहे, माझ्या सोबत ये ग, वाटल तर तुझ्या सासुबाई शी मी बोलते


नवी आशा जगण्याची... भाग 31

©️®️शिल्पा सुतार
........

आदित्य सचिन ऑफिस मध्ये बोलत होते

"उद्या कोर्टाची डेट आहे हे लक्षात आहे ना? ",... सचिन

"हो लक्षात आहे, यावेळी काही विशेष काम नाही, कोर्टात जाऊन पुढची तारीख घ्यायची आहे, बहुतेक आबा जातील, नवीन वकील अपॉईंट केला आहे, ते जुन्या वकीलाला माहिती नाही, बहुतेक जुना वकील आपली सगळी माहिती समोरच्या व्यक्तीला देतो आहे",.... आदित्य

" हो बरोबर आहे, आज सकाळी आला आहे तो इकडे , पेपर्स मागतो आहे त्याच्या जवळ काही पेपर नाही वाटत ",.... सचिन

" झोडपले पाहिजे अश्यांना, थोड्या पैशासाठी दुसर्‍याच किती नुकसान करतात हे, आबांनी त्याच्याकडून महत्वाचे पेपर काढून घेतले",.. आदित्य

बर झाल

जरा वेळाने वकील आत मध्ये आले,.. "उद्या कोर्टाची तारीख आहे तरी माझ्या हातात पेपर नाहीत, काय करायच उद्या कोर्टात काही डिसकस केल नाही आपण ",

"पेपर आबांकडे आहे, उद्या ते परस्पर कोर्टात घेऊन येतील, तुम्ही काळजी करू नका",.. आदित्य

" ठीक आहे मग उद्या सकाळी कोर्टात भेटू",.. वकील

ठीक आहे..

सीमा शाळेत आली, निशा आली नव्हती अजून, सीमाला प्रिन्सिपल मॅडमने बोलवलं, सिमाला माहितीच होतं की आज तिला प्रिन्सिपल मॅडम बोलवतील, सीमा आत मध्ये गेली

" बस सीमा.. कसा सुरू आहे तुझा वर्ग, पाहिल्यांदा तू टीचर म्हणून जॉईन झाली ना ",... मॅडम

"हो मॅडम खूप छान आहेत मुल, हुशार आहेत, काही प्रॉब्लेम नाही, सुरू आहे व्यवस्थित ",... सीमा

"तू आदित्य साहेबांना आधीपासून ओळखतेस का?, निशा पण ओळखते का त्यांना?",... मॅडम

"नाही मॅडम शाळेत जॉईन झाल्या नंतर आमची ओळख झाली आहे ",.. सीमा

"कशी काय",.. मॅडम

सीमा काहीच म्हटली नाही, प्रिन्सिपल मॅडमने जे समजायचे ते समजून घेतल,.." लग्न कधी करत आहात तुम्ही? ",..

सीमा गडबडली... मॅडम हसत होत्या,.." समजत आम्हाला ही थोड फार, खूप छान पण सीमा, खूप चांगले आहेत देशमुख कुटुंब",.

"अजून तसं काहीच ठरलं नाही मॅडम, मी जाऊ का? ",... सीमा

हो..

सीमा स्टाफरूममध्ये आली

" कुठे गेली होती सीमा?",... निशा आली होती तोपर्यंत

" प्रिन्सिपल मॅडम ने बोलवलं होतं ",.. सीमा

" वाटलंच होतं प्रिन्सिपल मॅडम बोलवतील, खूप चौकशी करतात त्या प्रत्येक गोष्टीची ",... निशा

" हो ना, त्या काल कश्या बघत होत्या आपल्याकडे ",.. सीमा

"हो ना त्यांना बघायचं असेल की तुझ आणि आदित्यचं काय सुरू आहे? बाय द वे काय झालं काल बोलणं? दिला का होकार जिजुंना? काय म्हटले जिजु, की अजून काही ",... निशा

" काहीही काय ग निशा तुझ, अजून लग्नाबद्दल बोलण झाल नाही आमचं ",.. सीमा

" मग काल काय बोलले? ",... निशा

"असच इकडे तिकडेच्या गप्पा ",... सीमा

" हो का त्या ही फार्म हाऊसवर जावून, हो ना, किती साधे तुम्ही, लग्नाचा विषय झालाच असेल तूच सांगत नाही आम्हाला काही , आणि नसेल बोलला आदित्य तर त्याला काय उशीर लागतो आज संध्याकाळी तुझ्याशी बोलेल तो त्या बाबतीत, बहुतेक बोलणं झालेला दिसत आहे आणि तू माझ्यापासून सगळी माहिती लपवते आहेस ",... निशा

" नाही असं काहीही झालेले नाही निशा तू उगाच अंदाज बांधू नकोस ",.. सीमा

" सांग ना खरोखर काय म्हटले आदित्य घेऊन जिजू, एक मिनिट हातात काय आहे तुझ्या? सोन्याच्या बांगड्या?, कुठून आल्या या आता मॅडम, नवीन दिसता आहेत",.. निशा

सीमा लाजली होती,..." आदित्य ने दिल्या काल, परफ्यूम ही दिला ",..

" मजा आहे बाबा, तू काय दिल त्याला या बदल्यात ",.. निशा चिडवत होती

" होकार दिला लग्नाला ",... सीमा

" तुझ्या चेहऱ्यावरुन अस वाटत आहे की काहीतरी लपवते आहेस तू? काहीतरी झालेलं दिसतं आहे",.... निशा

"निशा तु इम्पॉसिबल आहे, स्वतःच्या मनाने तू आमच्यात काहीतरी झाला आहे असे इमॅजिनेशन करते आहे, पण खरच काहीही झाल नाही",... सीमा

निशा हसत होती

" दोन-तीन दिवसापासून सांगायचं राहील की आईने तुला घरी बोलावलं आहे जेवायला, तुला वेळ आहे तेव्हा चल माझ्याकडे",.. सीमा

" हो येईन मी नक्की, घरी विचाराव लागेल आधी ",... निशा

" कसे आहेत घरचे तुझ्या आता? सासुबाई वगैरे ठीक आहेत का? ",... सीमा

"हो काही प्रॉब्लेम नाही, थोड फार चालत घरात",... निशा

" चल मी जाते आता क्लास सुरू होईल",.. सीमा

आज कोर्टाची केस होती, सकाळी आबा तयार होऊन कोर्टात गेले, नवीन वकील सोबत होते, ते दोघ कोर्टात जाण्याच्या आधी पोलिस स्टेशनला गेले, पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्या ओळखीचे होते,

आबांनी ओळख करून दिली,.." यांना आपल्या जमिनी बाबत थोडी माहिती हवी आहे",

" चालेल ना मी देईन त्यांना सगळी माहिती, जमिनीचे ओरिजनल कागदपत्र कोणाकडे आहेत,.. इंस्पेक्टर

" माझ्याकडे ते मी दाखवेल त्यांना, फक्त काही जुने फोटो वगैरे काही मिळत आहेत का ते बघा कोणाकडे, कधी झाल बांधकाम वगैरे ती माहिती हवी आहे त्यांना ",... आबा

" ठीक आहे तुम्ही या नंतर मी आपण बोलु सविस्तर",... इंस्पेक्टर

ठीक आहे..

दोघं कोर्टात गेले आणि केसांची पुढची तारीख मिळवून घेतली, यावेळी केस दरम्यान काहीही झालं नाही, नवीन जज साहेब आलेले होते त्यांच्याशी पण आबांनी ओळख करून घेतली, आबांनी घरी येता येता आधी आदित्यला फोन केला कोर्टाची पुढची तारीख मिळाली आहे, मी आता घरी जातो आहे

ठीक आहे आबा...

विक्रम घाईघाईने ऑफिस मधुन घरी आला, सरळ तो त्याच्या वडिलांच्या खोलीत निघून गेला,.." बाबा त्या लोकांनी वकील बदलला वाटतं, आज कोर्टाची तारीख होती तर तिथे नवीनच वकील आला होता आणि तो जुना वकील कुठेच दिसला नाही",...

"असं कसं काय केलं त्या लोकांनी? आपल्याला तर काहीच माहिती नाही? कागदपत्रांची झेरॉक्स वगैरे घेतली होती का?",.. काका

" आहे ती झेरॉक्स वगैरे, पण काय करणार आहे त्याच, त्या पेपर मला काही व्हॅल्यू नाही",.. विक्रम

"मग आता पुढे काय? ",... काका

"पुढची तारीख मिळाली आहे कोर्टाची तोपर्यंत आदित्य आणि आबा चांगले पुरावे गोळा करतील आणि ते कोर्टात जाण्याच्या आधी पोलीस स्टेशनला ही गेले होते असा ऐकलं मी",.. विक्रम

" करू दे त्यांना काय करा करायचं ते, जरी केस आबा जिंकले तरी आपलं नाव नाही येणार आहे ना कशात",.. काका

" नाही आपलं नाव नाही येणार",.. विक्रम

" मग चिंता नको करूस जे व्हायचं ते होऊ दे इथे फक्त आपण या मागे होतं हे कळता कामा नये ",.. काका

" हो बरोबर आहे बाबा, आपल्याला मिळेल का वाटा त्या जमिनीत ",.. विक्रम

" नाही ती त्यांची जमीन आहे स्वतः विकत घेतलेली",.. काका

" आजोबांची नाही का ती जमीन ",.. विक्रम

नाही...


ऑफिस संपला आदित्य घरी गेला, आज तो सीमाला भेटायला गेला नव्हता, घरी आबा आक्का बोलत बसले होते, आदित्य फ्रेश होऊन आला,

" आपण उद्या सीमा कडे जाऊ तिघे ",... आबा

"अनघा ताई कधी येणार आहे? ",.. आदित्य

" हो येणार आहे ती पण ती बोलते आहे की तुमचं सगळं ठरलं तर सांगा सारखं सारखं येता येणार नाही, सुमितची शाळा असते, बहुतेक ती लग्नाला येईल ",.... आक्का

"ठीक आहे मग आपण जायचं आहे का ",.. आदित्य

हो

" विक्रम आणि काका-काकूंना यापासून लांब ठेवलेलं बरं",.. आबा

"हो माझंही तेच मत आहे ",.. आदित्य

आदित्य खूप खुश होता तो सीमाला फोन करायला गेला

सीमा ही नुकतीच घरी आली होती, आवरलं होती, सीमाचा फोन वाजत होता, सीमाने फोन उचलला,

" झाली का ट्युशन मुलांची? कि मी डिस्टर्ब केल? ",.. आदित्य

"झाली आहे ट्यूशन बोल ना आदित्य",.. सीमा

" आम्ही उद्या तुमच्याकडे येणार आहोत, तुझ्या घरच्यांना भेटायला, उद्या हाफ डे आहे नाहीतरी ऑफिस, शाळेलाही हाफडे असेल",.. आदित्य

" चालेल ना या, कोण कोण येत आहात तुम्ही? ",.. सीमा

" मी आबा आक्का ",... आदित्य

"ठीक आहे",.. सीमा

"उद्या आपण लग्नाची पुढची बोलणी करून घेऊ, चालेल ना ",.. आदित्य

चालेल.... सीमा शांत होती

" बोल ना सीमा शांत का आहेस? ",.. आदित्य

" मला सुचत नाही काही, मला धडकी भरली आहे, इंटरव्यू असल्यासारखं वाटत आहे",... सीमा

"अजिबात टेन्शन घेऊ नको आबा आक्का खूप चांगले आहेत ",.. आदित्य

"अरे पण आमचं घर खूप साधं आहे",.. सीमा

" हे बघ सीमा अजिबात घराची आणि आणि कुठल्याही गोष्टीची काळजी करायची नाही, घरातले माणसं महत्त्वाचे आहेत, आणि आम्ही चहापाण्याला येऊ तेव्हा जास्त स्वयंपाक वगैरे करू नका, घर घ्यायचं का तुला मोठ, घेवून टाकू आपण, आई राजा साठी आपल्या गावत ",.. आदित्य

" नको घर वगैरे, आई इकडे खुश आहे, ओळखीचे आहेत इथे ",... सीमा

" सांग तस काही हव असेल तर ",.. आदित्य

"ठीक आहे तुम्ही लोक निघाले की मला मेसेज कर",.. सीमा

" ठीक आहे ",.. आदित्य

" मी फोन ठेवते, मला खूप काम आहे",.. सीमा

" अरे काय काम आहे",.. आदित्य

" उद्याच्या क्लासच्या नोट्स काढायच्या आहेत घरचे पण काम असतात",.. सीमा

ठीक आहे भेटू उद्या..

सीमा ने फोन ठेवला, ती पटकन आत मध्ये गेली,

"काय झाला आहे सीमा टेन्शन मध्ये दिसते आहे",.. मीना ताई

"आई उद्या आपल्याकडे आदित्य आणि त्याचे आई बाबा येणार आहेत भेटायला, बहुतेक पुढे लग्नाच ठरवायला येत असतिल",.. सीमा

" केव्हा समजलं हे? ",.. मीना ताई

" आत्ता एवढ्यातच, आता आदित्यचा फोन आला होता, त्याने सांगितलं",.. सीमा

"बापरे मग आता काय काय तयारी करावी लागेल? स्वयंपाक काय करूया हे ठरवून घेऊ पटकन, म्हणजे तस सामान आणता येईल ",... मीना ताई

" नाही आई ते फक्त चहा पाण्याला येणार आहे, पोहे करू आपण",.. सीमा

"फक्त पोहे कसं वाटत आहे सीमा",.. मीना ताई

" भजी आणि शिरा करू, सगळं घरच करू, बाहेरच नको काही आणि चहा करू",.. सीमा

" तुझ्या सासूबाईंना साडी घ्यावी लागेल, आता राजा आला की मी पटकन जाऊन येते दुकानात, तोपर्यंत तू स्वयंपाक करून ठेव",. मीना ताई

" हो चालेल",.. सीमाला टेन्शन आलं होतं खरचं कसं होणार आहे, राजाचं एकट्याच्या पगारावर घर चालत होत, एवढा माझा लहान भाऊ केवढं सगळं करतो सगळ्यांचं, मी उद्या बँकेतुन पैसे काढून आणते आणि आईला देते,

राजा आला, सीमाने राजाला सांगितलं की उद्या आदित्य ईकडे येणार आहेत, आबा आक्का ही येणार आहेत,

राजा खूप खुश होता,.. सीमा ताई आज आपण घर आवरु",..

हो...

मीनाताई राजा साडी घ्यायला गेले, तोपर्यंत सिमाने स्वयंपाक केला, पुढची खोली आवरायला घेतली, ते दोघे येईपर्यंत बरंच काम झालं होत तिचं, राजा आत आला,

" आई कुठे आहे? ",... सीमा

" ती शेजारच्या वहिनीं कडे गेली ",.. राजा

का?,..

" थोड सामान घ्यायला",.. राजा

तिथून मीना ताई चांगल्या डिश काचेचे ग्लास घेवून आल्या

"आई अग तुला या वस्तू हव्या होत्या तर सांगायच ना आता आणल्या असत्या येतांना",... राजा

"हो ना, कस वाटत हे अस? वापस कर बर आई, आपण जस आहोत तस राहू आपली भांडी वापरू",.. सीमा

मीना ताई भांडी वापस करायला गेल्या, त्या आल्या पाच मिनिटात

"राजा तू उद्या मला डिश कप आणि ग्लास चमचे आणून दे ",.. मीना ताई

हो आणेन

"आई मी उद्या काय घालू? साडी का ड्रेस?",.. सीमा

"ड्रेस घाल, हा घे तुझ्यासाठी कॉटनचा ड्रेस आणला आहे",.. मीना ताई

" कशाला खर्च करत बसली आई? भरपूर ड्रेस आहेत ना माझ्याकडे",.. सीमा

" ते सगळे साधे आहे ग, हा ड्रेस छान आहे",... मीना ताई

खूपच सुंदर ड्रेस आणला होता आईने,.." आई आता असा मध्ये मध्ये खर्च करत जाऊ नको, राजाचा एकट्याचा पगार आहे ",

"तू काळजी करू नको येवढी सीमा, होईल बरोबर ऍडजेस्ट",.. राजा

सीमा विचार करत होती कि हे श्रीमंत लोक, आपण काय करायचं दरवेळी हे लोक आले की? आपल्याला खर्च झेपेल का? ट्युशनचे पैसे अजून आले नाहीत, अर्धे मूल तर ट्युशनची फी देत नाहीत आणि मी ही मागत नाही, शाळेचा पगार पाच तारखेला होईल वाटतं, बघू आता जे होईल ते होईल

सकाळी मीना ताई बाजारात जावून सगळ सामान घेवून आल्या, तो पर्यंत सीमाने स्वयंपाक केला, राजा घर आवरत होता,

"राजा जा भांडी घेवून ये",.. मीना ताई

"दुकान तर उघडू दे आई, मी ऑफिस हून येतांना आणेन",.. राजा

"आई तू एवढ टेंशन घेवू नकोस",.. राजा

हो ना... सीमा राजा हसत होते

सीमा शाळेत आली, निशा आलेली होती, निशा इकडे ये महत्वाच आहे

बोल...

"निशा आज तू येते का माझ्या घरी अग आदित्यच्या घरचे येणार आहेत इकडे, मला फार भीती वाटते आहे, माझ्या सोबत ये ग, वाटल तर तुझ्या सासुबाईंशी मी बोलते ",... सीमा

"काही प्रॉब्लेम नाही मी येईन",... निशा

सीमाला खूप बर वाटल

"अशी घाबरते का आहेस तू सीमा? आदित्य काय आजच तुला उचलून नेणार आहे का त्याच्या घरी ",.. निशा

" गप्प बस ग, तुला सारख गम्मत सुचते",... सीमा

निशा हसत होती...

" अग ते श्रीमंत लोक आम्ही सर्व साधारण, घर आवरल आज, टेंशन येत ग ",... सीमा

"काळजी करू नको, निघू मग आपण शाळा सुटल्यावर",... निशा

हो,.. सीमाच्या मनात धडकी भरली होती, आदित्यचा विचार करून हात पाय गार पडले होते, माझ्या कडून नाही होणार हे लग्न वगैरे, तिने मोठा श्वास घेतला, पाणी पिल

सीमा क्लास मध्ये आली तीच मन लागत नव्हत शिकवण्यात

🎭 Series Post

View all