नवी आशा जगण्याची... भाग 30

पण तिसरी अट मान्य करण म्हणजे आदित्यला लगेच होकार द्यायचा, माझं मन अजुन तयार होत नाही, फार भीती वाटते मला त्याच्यासोबत, आत्ताच भेटलो आम्ही एवढी काय घाई आहे



नवी आशा जगण्याची... भाग 30

©️®️शिल्पा सुतार
........

सीमा विचारात होती काय करता येईल? , राजाची नोकरी महत्त्वाची आहे, आता कुठे आईला आराम मिळाला आहे, मला पण नोकरी करायची आहे, शाळेसाठी खूप काम करायचं आहे, जस्ट आताच सुरुवात केली मी शाळेत जायला, अजून खूप काम बाकी आहे, अनाथ मुलांसाठी कार्य करायच आहे,

पण तिसरी अट मान्य करण म्हणजे आदित्यला लगेच होकार द्यायचा, माझं मन अजुन तयार होत नाही, फार भीती वाटते मला त्याच्यासोबत, आत्ताच भेटलो आम्ही एवढी काय घाई आहे, थोडे दिवस जर मी त्याच्या सोबत राहिली तर थोडी सवय होईल त्याची, पण आता हे कोण सांगेल त्याला, काय करू? ठीक आहे, पहिल्या दोन अटी मान्य करू, माझ जे होईल ते होईल

"मग काय विचार केला तू सीमा? ",.. आदित्य मुद्दामच तिला चिडवत होता

आदित्य प्लीज ऐक ना...

"नाही.... अजिबात अटी अटी करू नको, कोणत्या दोन अटी मी मान्य करू ते सांग?",... आदित्य

सीमा विचार करत होती, पूर्ण अडकले मी यात आता काही सुटका नाही,.... "ठीक आहे मला राजाची आणि माझी नौकरी वाली अट हवी आहे",..

आदित्य छान हसत होता.... बर झाल चला, आता काही प्रॉब्लेम नाही

सीमाला आदित्य कडे बघायची हिम्मत होत नव्हती, आदित्य तिच्या जवळ आला, ती पटकन तिथून पर्स घ्यायला बाजूच्या खोलीत गेली,

सीमा माझ्या पासून दूर दूर रहाते, घाबरते, असू दे मी एक दिवस तीच मन जिंकेल... उगीच बळजबरी नको करायला

आदित्य हॉल मध्ये आला, सीमा एक मिनिट,.. हे घे आदित्यने तिला गिफ्ट दिल

"काय आहे हे?",.. सीमा

"बघ उघडून",.. आदित्य

सुंदर अश्या बॅग मध्ये चॉकलेट आणि दोन बॉक्स होते... सीमाला सुचल नाही काय कराव? ... "मला नको गिफ्ट",..

"पुरे झाली नौटंकी सीमा, गुपचुप उघडून बघ काय आहे आत ते",... आदित्य

सीमाने गिफ्ट उघडले आत परफ्युम होता, अजून एक बॉक्स होता, त्यात दोन सोन्याच्या बांगड्या होत्या, खूप सुंदर डिझाईन होतं, बापरे महाग असतिल या बांगड्या, ती आदित्य कडे बघत होती,

"घाल ना बांगड्या सीमा, की मी घालून देवु ",... आदित्य

" नाही मी नंतर वापरेन",... सीमा

" मला बघायच्या आहेत तुला कश्या दिसतात त्या बांगड्या",.. आदित्य

सीमाने बांगड्या घातल्या, खूप छान दिसत होत्या तिच्या हातावर , आज पासून रोज वापर या, सीमाने परफ्यूम बांगड्यांचा बॉक्स पर्स मध्ये ठेवला, ते दोघ घरी यायला निघाले,

"मी खूप खुश आहे आज सीमा थंक्यु डियर",... आदित्य

सीमा काही बोलली नाही, कुठल्या तरी चिंतेत होती ती..

"चल घरी सोडून देतो तुला, मोकळ रहात जा ग माझ्या सोबत सीमा, अशी घाबरून जाऊ नको" ,... आदित्य

कार मध्ये सीमा शांत होती..

आदित्य तिला घरच्यांन बद्दल सांगत होता,.. "तू भेटली आहेस ना आबांना कसे वाटले ते? ",..

" हो त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता, खूप छान आहेत ते, मी खूप इम्प्रेस झाले होते, पर्सनॅलिटी खूप छान आहे त्यांची प्रेमळ आहेत ",.. सीमा

"ही शाळा त्यांनी सुरू केली आहे आणि पूर्वी पासून त्यांनी खूप मेहनत घेतली आहे अजून सुरू असत त्यांच काम ",.. आदित्य

"तुझी आई त्या कश्या आहेत",.. सीमा

" माझी आई खूप शांत छान आहे, खूप समजून घेते मला, तिला मी सांगितल तुझ्या बद्दल ",.. आदित्य

सीमा आश्चर्याने बघत होती

" हो आबांना ही सांगितल आहे मी, त्यांचा होकार आहे, हेच सांगायला मी फोन केला होता त्या दिवशी, पण तुला बर नव्हत, तू झोपली होती विक्रमने गडबड केली होती",...आदित्य

सीमा सगळ ऐकत होती

"तुझ्या बद्दल सांग ना सीमा थोड",... आदित्य

"आजी, आई, नाना, राजा मी सुखी कुटुंब होत आमच, वयामानाने आजी वारली, खूप लाड केले आमचे नानांनी, पण नंतर ते खूप आजारी पडले, त्यातून उठले नाहीत, माझी आई त्या नंतर घर चालविण्यासाठी स्वौपाकच काम करायची, मी आणि राजाने पार्ट टाईम जॉब करून शिक्षण केल, स्कॉलरशिप ही मिळायची, मी त्या घरात दत्तक घेतलेली मुलगी आहे हे कोणी मला जाणवू दिल नाही, उलट माझा डिसिझन अंतिम असायचा आणि अजून असतो , राजा खूप प्रेम करतो माझ्यावर आणि मी ही ",... खूप भरभरून बोलत होती सीमा

आदित्यला मनातून खूप वाईट वाटत होत,.." परिस्थितीची जाणीव आहे या सीमाला, किती कष्ट केले आहेत तिने आणि मी काय केल? एवढ स्वतः च्या हिमतीवर त्यांनी मिळवलेल्या जॉबला केवळ मालक आहे म्हणून पैशाच्या जोरावर काढून घेत होतो, पण मी हे केवळ सीमा तुझ्या साठी मुद्दाम करत होतो, आता नाही सीमा.. मला तुला तुझ्या कुटुंबाला सुखात बघायला आहे, तुम्हाला कधी कोणत्या गोष्टीची कमी होवू देणार नाही",..

घरा जवळ कार आली,... " मला तुझ्या आईला भेटायचा आहे सीमा, मी आई आबांना घेवून येईन नंतर",..

हो नक्की ये..

सीमा घरी आली,

ट्युशनला मुल आले होते, ट्यूशन झाली थोड्या वेळाने राजा आला, सीमाने मीना ताई राजाला बोलवलं.... " आई राजा मला महत्वाच बोलायच आहे तुमच्या दोघांशी",..

ते दोघ येवून बसले,

" मी आज आदित्यला लग्नाला होकार दिला आहे, आणि ते लोक लवकर आपल्या घरी येणार आहे आई तुला राजाला भेटायला",... सीमा

मीना ताई भारावून गेल्या होत्या, खूप दिवसा पासुन त्यांना वाटत होतं सीमाच लग्न जमल पाहिजे, आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे,

राजा खूप खुश होता,.. "ताई खूप चांगला निर्णय घेतला आहेस तू, मी खूप खुश आहे ",

" मला खूप काळजी वाटते आहे राजा, एवढे श्रीमंत लोक आहेत ते, कस होणार राजा? आपल्याला पैसे लागतील, सीमाला आपल्या बाजूने थोडे दागिने साड्या घ्याव्या लागतील",... मीना ताई

"आई तू आता पासून देण्या घेण्याची काळजी करू नकोस होईल सगळ नीट, मला नको दागिने ",.. सीमा

"हो ना आम्ही दोघ आहोत",.. राजा

" तस माझा अजून एकही पगार झाला नाही, पण आधीचे पैसे आहेत साठवलेले ते वापरू त्यात नक्की भरपूर शॉपिंग होईल ",... सीमा

" हातात काय तुझ्या",.. मीना ताई

" आई बांगड्या दिल्या आदित्यने",.. सीमा

मीना ताई राजा कौतुकाने बांगड्या बघत होते

" किती छान आहेत, सोन्याच्या आहेत का? ",... मीना ताई

" हो बहुतेक सोन्याच्या असतिल, आदित्य ने आज परफ्यूम ही दिला",... सीमाने पर्स मधुन परफ्युम दाखवला

" बरेच चांगले दिसता आहेत हे लोक",.... मीना ताई

राजा सीमा मीना ताईंना हसत होते, मीना ताईंना काय माहिती ते लोक किती श्रीमंत आहेत

" आता का हसता आहात तुम्ही लोक मला? ",.. मीना ताई

" आई किती भोळी आहेस तू, आपण जाऊ त्यांच्या कडे तेव्हा बघ सगळ, शाळा, फॅक्टरी, त्यांच घर ",... राजा

" ताई तू चांगल केलस होकार देवून, खूप चांगले आहेत आदित्य साहेब",.. राजा

सीमा खुश होती, तरी टेंशन होत तिला की आदित्य सोबत रहाव लागणार आहे लगेच, आदित्य ऐकत नाही माझ
.......

आदित्य आनंदाने घरी आला, आबा आक्का समोर बसले होते,...." सीमाने मला होकार दिला लग्ना साठी ",

" चांगल आहे चला तुझ अभिनंदन, आता पुढे काय, पुढचे कार्यक्रम ठरवा, लवकर करायच ना लग्न आदित्य?",... आबा

"हो... सीमाचा विचार बदलायच्या आत",.. आदित्य

आबा आक्का दोघ हसत होते, आदित्य गडबडला,.... फार घाईत उत्तर दिल की काय मी?.... मी येतो फ्रेश होवुन, तो रूम मध्ये निघून गेला

" अनघाला सांगाव लागेल",... आक्का

" हो तिला इकडे यायला जमत का ते विचारून बघ, यावच लागेल म्हणा ",... आबा

" आई ला, भाऊ वहिनीला बोलवून घेते",... आक्का

"हो बोलवून घे, आदित्य आणि त्याच्या आजीच खूप पटत तस ही",... आबा

आदित्यने रात्री सीमा ला फोन केला,... "सांगितल का घरी? ",..

"हो.. आई राजा खूप खुश आहेत ",.. सीमा

" मी पण सांगितल घरी बहुतेक उद्या मी माझ्या बहिणीला फोन करेन ",... आदित्य

" कुठे असतात त्या, कोण कोण असत त्याच्यां कडे? ",.. सीमा

" तिच्या लग्नाला पाच वर्ष झाले एक मुलगा आहे तिला सुमित , आता होईल भेट, येईल ती आपल्या लग्नाला",... आदित्य

सीमा काही बोलली नाही पण तिला टेंशन आल होत लगेच लग्न, आता काही बोलायची चोरी आहे इकडे,

"सीमा मला माहिती आहे तू मी दिलेल्या धमकी मुळे मला होकार दिला आहेस, पण जेव्हा तू खरोखर मनापासून होकार देशील त्याची मी वाट बघेन, पण तरी खूप थॅंक्स तुला माहिती नाही माझ्या साठी तू खूप महत्वाची आहेस",... सीमा

सीमा काही बोलली नाही,.... खूपच चांगला आहे हा, वागतो ही नीट, फक्त थोडा चिडका आहे, होईल तो ही नीट
.....

सकाळी आदित्य उठून खाली आला तर आक्का अनघाशी फोन वर बोलत होत्या

"ताईचा फोन आहे का मला दे, तू बोलली का ताई शी?, सांगितल का सगळं ",.. आदित्य

"हो मी सांगितलं आहे तिला",.. आक्का

आदित्यने फोन घेतला,... "ताई मला बोलायचं आहे तुझ्याशी",..

"तुझा सगळा रिपोर्ट आला आहे पुढे, आईने सांगितलं आहे मला, तुझ खूप अभिनंदन, छुपा रुस्तम, हे असे उद्योग करतो का तिकडे? , म्हणून सांगितलेल्या स्थळाला नकार देत होता का तेव्हा? स्पष्ट सांगायचं ना मग, ते स्थळ सुचवण्या पेक्षा मी सीमा कडे गेली असती भेटायला, कशी आहे रे वहिनी? अरे सांग? फोटो पाठव तिचा ",.. अनघा खुश होती

" ताई आता तू लवकर ये",.. आदित्य

" तुझं परत एकदा खूप खूप अभिनंदन आदित्य कशी आहे तुझी सीमा",.. अनघा

"आता तूच प्रत्यक्ष देऊन बघ",.. आदित्य

" नाही रे थोडं सांग ",.. अनघा

"खूप साधी आहे ती मला नाही सांगता येत असं",.. आदित्य

" बर ठीक आहे",.. अनघा

" तू कधी येते आहे ते सांग मला",.. आदित्य

" आता आबा आक्का ठरवत आहेत पुढचे कार्यक्रम तसं मग ते मला सांगतील",.. अनघा

"जिजू आहे का ",.. आदित्य

" हो घे त्यांच्याशी बोल, आदित्यने मुलगी पसंत केली आहे बोल त्याच्याशी",.. अनघा

जिजूंनी फोन घेतला,... "बापरे आदित्य काय ऐकतो आहे हे मी? काय प्रकार आहे हा? तुला सुखाने जगायचं नाहीये वाटतं? एकदम लग्नाचा घाट घातला, माझा सल्ला ऐकशील का? अस काही करू नको, अजून वेळ गेली नाही, सुखी प्राणी आहेस तू, सुरुवातीला असच छान वाटतं की कधी लग्न करू, नंतर समजत खरी काय गंमत आहे ",... शरद

आदित्य खूप हसत होता...

" काहीही काय बोलतो आहे शरद तू त्याच्याशी",... आदित्य

" काय अस बोलू दे आम्हाला, बघितल का आदित्य हे अस असत नंतर मनाप्रमाणे बोलता ही येत नाही, मी खरं सांगतो आहे आदित्य अजून वेळ गेलेला नाही, नीट विचार कर या गोष्टीवर, हे बघ हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत, तसं काही वाटलं तर इकडे निघून ये, माझा पूर्ण सपोर्ट आहे तुला",... शरद

" पुरे झाल माझ्याकडे दे बर फोन, सिरियस बोलत नाहीस कधी तू ",.. अनघा

" जिजू पण खरच सांगा तुम्हाला पसंत आहे ना मी जे करतोय ते",.. शरद

" अरे आदित्य नो प्रॉब्लेम, आगे बढो हम तुम्हारे साथ है ",.. शरद

" आदित्य तू शरद कडे लक्ष देवू नकोस, आबा आक्का आता काय पण असे कार्यक्रम ठरवतात तसं मला सांग आणि मला आधीच सीमाचा फोटो पाठवून दे ",.. अनघा

" ताई खरं सांग तुला काही प्रॉब्लेम नाही ना? तुझी काय अपेक्षा आहे ",... आदित्य

" आदित्य मी आक्षेप का घ्यावा? टिपिकल नणंद असल्यासारखं सीमाला नापसंत कराव का? तिचा छळ करावा का?, काहीही काय ",... अनघा

" नाही ग ताई पण मला वाटत नव्हतं की तुम्ही सगळे एवढ हसत खेळत मला होकार द्याल, अगदी भारावून गेलो आहे मी ",... आदित्य

" तुला आमच्या कडून नकार अपेक्षीत होता का? ",.. अनघा

" नाही ताई मला सुचत नाही खरं काही",.. आदित्य

" तुला माहिती आहे ना आदित्य माझंही लव मॅरेज आहे, मला शरद कॉलेजमध्ये भेटला होता, आपल्या घरी काही नाही रे असं, खूप मोकळं वातावरण आहे आहे, फक्त आपल्यालाच नीट वागायचं आहे एकमेकांशी",.... अनघा

" एकदम बरोबर बोलते आहेस ताई तू, घरी पण आई आबा यांनी काहीही आक्षेप घेतला नाही, मी कळवतो तुला पुढचा काय प्लॅन आहे ते, हे बघ आबा आले त्यांच्याशी बोल",... आदित्य

आबा आणि अनघा फोनवर बोलत होते, आदित्यने नाश्ता केला, आक्का खुश होत्या एकदम, आदित्य ऑफिसला निघून गेला ,

सचिन त्याची वाट बघत होता,..." झालं का काल बोलणं सीमा वहिनी शी? दिला का तिने होकार? ",..

" हो झाला बोलण, होकार मनापासून अजूनही दिला नाही, पण ठीक आहे मी वळवेन तीच मन आणि आज सकाळी अनघा ताईला हे सगळं सांगितलं",... आदित्य

"बरं झालं, चला म्हणजे लगेच लग्न करणार तू ",... सचिन

"तुझ काय ठरलं लग्नाच",... आदित्य

\"नाही अजून काही नाही तस",... सचिन

"ठरव लवकर मग ",... आदित्य

सचिन छान हसत होता, मी वकीलांना आत पाठवतो



🎭 Series Post

View all