नवी आशा जगण्याची... भाग 29

नाही मी तुझ्या दोन अटी मान्य करु शकतो, तुला पण माझं थोडं ऐकावा लागेल सीमा, मी ऐकत आहे ना तुझ सुरुवाती पासूननवी आशा जगण्याची... भाग 29

©️®️शिल्पा सुतार
........

निशा स्टाफ रूम मध्ये आली, तिने तिचा फोन बघितला त्यावर आदित्यचा फोन येऊन गेलेला होता, तिने त्याला फोन लावला,

"झालं का तुझं बोलण सीमाशी? तिचा मूड ठीक आहे का?",.. आदित्य

"हो झालं आहे आत्ताच बोलण झाल आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आदित्य साहेब",... निशा

" काय आहे ती बातमी",... आदित्य खुष होता

"असं नाही मला काय मिळेल ते सांगा? मगच मी सांगेन",.. निशा

"निशा तू म्हणशील, ते लवकर सांग काय म्हंटली सीमा",.. निशा

" तुम्हाला जे उत्तर अपेक्षित होतं तेच आहे, सीमा तुम्हाला होकार देणार आहे उद्या",.. निशा

आदित्य प्रचंड खुष होता, त्याला ही अपेक्षा होतीच की सीमा स्वतःसाठी नाही पण राजासाठी तरी मला होकार देईल, बरं झालं ते राजाच्या नोकरीचा विषय काढला मी, म्हणजे सीमा खूप सगळ्यांना सांभाळून चालणारी मुलगी आहे, भावा वर खूप प्रेम आहे तीच,

" पार्टी बाकी आहे बरका आदित्य साहेब ",.. निशा

" नक्की मिळेल पण काय हे साहेब साहेब",.. आदित्य

"मग आता काय म्हणू जिजू का?",.. निशा

आता आदित्य लाजला होता

"मी ठेवतो फोन करू या आपण पार्टी नंतर ",... आदित्य

ओके..

आदित्य ऑफिस मध्ये होता

सचिन केबिन मध्ये आला,..." विक्रम आणि त्याच्या मित्रांनी सगळे पैसे भरले आहेत आपले",.

" बर झालं चला एक प्रॉब्लेम सुटला, आता शाळेमागच्या जमिनीचा प्रॉब्लेम तसाच आहे",.. आदित्य

"हो त्या मागे हेच लोक असतिल, कारण तुमच्या बद्दल जास्त माहिती तुझ्या काकांना आहे",... सचिन

"हो एकदम बरोबर, आपण करू चौकशी ",... आदित्य

" दोन वर्षांपूर्वी स्क्रॅप विकला गेला, तो पण एक मोठा फ्रॉड आहे, त्याचे सगळे पैसे खाल्ले विक्रमने",... सचिन

"हो त्याची पण चौकशी करायची आहे, किती बदमाश मुल आहेत हे ",.. आदित्य

"तुझा मिटलं का ते विक्रम प्रकरण",.. सचिन

" हो काल आला होता तो शाळेजवळ, माफी मागितली त्याने, पण विशेष सिरियस नव्हता तो विक्रम, उगीच वर वर मी चिडलो होतो म्हणून माफी मागितली त्याने, नुसता माझ्याकडे सीमा कडे बघत होता ",.. आदित्य

" तुमच दोघंच काय ठरलं? दिला का होकार सीमा वहिनी ने",.. सचिन

" नाही अजून ",.. आदित्य

सचिन हसत होता... काय आता

" अरे हसतो काय मी किती त्रासात आहे इथे ",... आदित्य

" कोणी मुलगी चक्क तुला नकार देवू शकते म्हणजे काय? अस वाटल नव्हत कधी ",... सचिन

"पण प्रत्यक्षात झाल आहे तस, काय करतो आता, तुझ्या मित्राचे हाल आहेत, आज मी जाणार आहे सीमाला भेटायला बहुतेक ती होकार देईल मला",... आदित्य

"अरे वा कस काय झालं हे आश्चर्य",.. सचिन

"झालं नाही घडवून आणावा लागलं",.. आदित्य

"म्हणजे काय?",.. सचिन

"अरे मी सीमाला धमकी दिली की तिने मला होकार नाही दिला तर राजाची आणि तिची नोकरीचा जाईल",.. आदित्य

" काहीही काय आदित्य, राजा किती महत्त्वाचं काम करतो आहे आपल्या कंपनीच, आणि तो किती हुशार आहे, त्याला कशाला काढशील तू, किती भोळी ती सीमा वहिनी ",... सचिन

" हो पण हे तुला माहिती आहे, सीमाला माहिती आहे का? मुद्दामच मी असं करतो आहे, होकार मिळवण्यासाठी",.. आदित्य

" चांगल्या चांगल्या आयडिया आहे तुझ्याकडे, मला जर कधी फ्यूचर मध्ये लागल्या तर वापरता येतील",... सचिन हसत हसत बाहेर निघून गेला

आदित्य सीमाच्या विचारात होता, मी खूपच वाईट वागतो आहे का सीमा बरोबर? पण मला हा डिसीजन घ्यावाच लागेल, आमच्या दोघांसाठी, एकदा लग्न झालं तर मी तिचं मन वळविल, आज भेटूया का तिला? नको उद्या जाऊ ठरल्याप्रमाणे, उगाच तिला मी खूप उतावळा असल्यासारखं नको वाटायला, आज जरा राग आला आहे असे दाखवू,

संध्याकाळी आदित्यला करमत नव्हतं, तो लवकर घरी आला

"अरे आदित्य आज तू लवकर कसा आला? सीमा भेटली नाही का तुला?",.. आक्का

"नाही आई उद्या जाणार आहे मी सीमाला भेटायला",.. आदित्य

"तुझे आबा बोलवता आहेत बघ तुला",.. आक्का

"कुठे आहेत ते",.. आदित्य

"ते काय बाहेर वकील साहेब आले आहेत तिकडे बोलत आहेत",.. आक्का

आदित्य बाहेर गेला, नवीन वकील आले होते कदम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, बर्‍याच गोष्टींबद्दल चर्चा करत होते,

" प्रॉब्लेम मोठा आहे का आमचा?",.. आबा

" नाही काही विशेष नाही, ओरिजनल मालक तुम्हीच आहात या जमिनीचे, त्या घराचे बांधकाम कोणी केले आहे ते शोधत आहे मी, त्या लोकांना गाठून त्याचे पेपर्स बघायला मिळाले तर बरे होतील" ,.. वकील

" ठीक आहे माझे इथले पोलीस ओळखीचे आहेत त्यांच्या मदत तुम्ही घेऊ शकता",.. आबा

"ठीक आहे आपण ठरवू काहीतरी",.. वकील

" पण तुमच्या कडे आहेत का आमचे केस पेपर ",.. आदित्य

" हो त्या जुन्या वकीला कडुन काढून घेतले सगळे पेपर, अजून त्याला सांगितल नाही मी की ही केस यांना दिली आहे ",... आबा

" बर झाल, खूप महत्वाची आहे आमच्या साठी ही केस",.. आदित्य

" हो आपण करू पुर्ण प्रयत्न, खूप ओळखी आहेत माझ्या, काहीही करू तुमच्यासाठी",... वकील गेले

आबा आदित्य समाधानी होते...

शाळा सुटली सीमा घरी आली तिच्या अपेक्षेप्रमाणे आदित्य तिला भेटायला आला नाही, आदित्य मुद्दामूनच दाखवत होता की त्याला राग आलेला आहे, ट्युशनला मूल आली होती, आज बर्‍याच दिवसानी मुलांसोबत सीमा खुश होती, ट्युशन झाली, स्वयंपाक झाला, राजा अजून आलेला नव्हता

मीनाताई सीमा जवळ येऊन बसल्या,... "सीमा अगं काय आहे तुझ्या मनात जरा मोकळं बोलशील का माझ्याशी?, मला काळजी लागून राहिली आहे ",..

तशी सीमा मीनाताई जवळ बसली,... "आई तुझ्या मनाप्रमाणे होईल सगळ, अगं मी आदित्य ला होकार देणार आहे उद्या",..

" खूप चांगलं करते आहेस तू बेटा, राजा सांगतो त्याप्रमाणे मुलगा तर चांगला दिसतो आहे, तू भेटली आहेस ना त्यांना",.. मीना ताई

" हो आई मी रोज भेटते आणि आदित्य खरच चांगला आहे, आई तू अजिबात काळजी करू नको आता सगळं तुझ्या मना प्रमाणे होईल , मी तुझा आणि राजाचा मन दुखेल आणि तुम्हाला त्रास होईल असं काहीही करणार नाही",... सीमा

मीनाताई खूप खुश होत्या,.." खूप काळजी करायची नाही बेटा, आयुष्य बिनधास्त जगायचं, पुढे काय होईल याचा अति विचार करायचा नाही, बघ तू खूप सुखी आनंदी राहशील, सासरचे लोकांना घाबरून तू त्या चांगल्या आदित्य पासून उगीच दुर जात होती, प्रत्यक्षात ते लोक खूप चांगले असतिल काय माहिती आपल्याला? तुझी आजी पण माझी सासुबाई होत्या, किती चांगल्या होत्या त्या",

" हो आई बरोबर बोलते आहेस तू, मी अजून भेटले नाही त्या लोकांना आता जे होईल ते ",.. सीमा

त्या दोघी बोलत असतानाच राजा ऑफिसहून आला, राजा मीनाताईं कडे बघत होता, मीनाताईंनी डोळ्यांनीच खुणावलं की सगळ ठीक आहे

जेवण झालं सीमा, राजा जवळ येऊन बसली

"बर वाटतय का ताई आता तुला",.. राजा

"हो ठीक आहे मी",.. सीमा

"मला एक सांग राजा आदित्य कसा वागतो ऑफिस मध्ये? चिडतो का तो फार?",.. सीमा

"नाही खूप समजूतदार आहेत आदित्य साहेब , मी त्यांना एकदा ही चिडलेल बघितल नाही, काय झालं ग? ",... राजा

काही नाही... आता हा आदित्य काय माझ्या एकटी वर चिडतो का मग? , धमकी दिली मला, माझ काही ऐकुन घेत नाही , बाकीच्या साठी किती चांगला वागतो तो, ह्याला काय अर्थ आहे,..... सीमा विचार करत होती

काल कसा काय एवढा चिडला तो आदित्य, कंटाळला असेल बहुतेक, सगळ्या बाजूने प्रॉब्लेम झाला होता, मी पण नकार देत होती, उद्या येईल तो भेटायला, काय बोलणार आहे मी त्याच्याशी? खरच एवढ प्रेम करतो का तो माझ्यावर?

मला का नाही काही अस फिलिंग येत , तो चांगला आहे इथे पर्यंत ठीक आहे, मला भिती वाटते आहे लग्नाची, असही आदित्य माझ्याशी बोलतो तेव्हा मला धड धड होत, नंतर आम्ही दोघ एकत्र एका खोलीत, मला नाही जमणार, काय करू उद्या सांगू का आदित्यला की मला वेळ हवा आहे, तो चिडेल परत, कस पण कस बोलणार हा विषय? , वेगळ टेंशन आहे, कोणाला सांगता येणार नाही, काही तरी करायला पाहिजे

आदित्य खूप खुश होता, सीमा होकार देणार आहे, लवकरात लवकर मुहूर्त काढू, अति झाल हो नाही बोलण, उद्या काहीतरी गिफ्ट घ्यायच का आपण सीमा साठी? , काय घेवू पण, मी एकटाच एक्साईटेड आहे, ती बिचारी मी दिलेल्या धमकी मूळे मला होकार देणार आहे हे तितकेच खर आहे, पण सीमा मी तुला वचन देतो की मी तुला खूप सुखात ठेवेन, तू तुझा घेतलेला डिसिजन बरोबर आहे असं तुला वाटेल

दुसर्‍या दिवशी आदित्य ऑफिस मध्ये आला त्याच मन लागत नव्हत कामात कधी संध्याकाळ होते कधी सीमा भेटते अस झाल होत त्याला

सीमा दिवस भर शाळेत बिझी होती, पण तिचं तसं विशेष लक्ष नव्हतं, डबा ही व्यवस्थित खाल्ला नाही तिने, वेगळीच धडधड होत होती, काय होतं हे? पुढे कसं होणार आहे माझं? सीमाने आदित्यचा विचार बंद करून शाळेत शिकवण्यावर लक्ष दिल

संध्याकाळी शाळा सुटली सीमा बाहेर आली तिला माहितीच होतं की आज आदित्य तिला भेटायला येणार आहे,

बाहेर आदित्य उभा होता प्रिन्सिपल मॅडमशी बोलत, बापरे आता काय कराव? ति त्या दोघांपासून थोडी लांब उभी राहिली

आदित्यच लक्ष सीमा कडे होतं, आदित्यने सिमाला बोलवलं, ती गेली

" तुम्ही दोघ ओळखतात का एकमेकांना? ",.. मॅडमने विचारलं

"हो आम्ही दोघं मित्र आहोत",.. आदित्य

निशा आली तेवढ्यात मागून, ती पण त्यांच्याशी बोलायला लागली

"अरे इथे सगळे एकमेकांना ओळखतात का? ",.. मॅडम

हो...

"चला मी निघते उशीर होतं आहे",.. प्रिन्सिपल मॅडम जायला निघाल्या,

चला मी ही निघते, निशा आदित्य कडे हसुन बघत होती,

निशा थांब तुला सोडतो घरा पर्यंत, आम्ही तिकडे जात आहोत, आदित्य सीमा कार कडे गेले, प्रिन्सिपल मॅडम बघत होत्या, आदित्यने पुढे जाऊन सीमासाठी कारचा दरवाजा उघडला

" हे बघ आदित्य दर वेळी माझ्यासाठी कारचा दरवाजा उघडायची गरज नाही, मी उघडत जाईन दरवाजा या पुढे माझा माझा" ,.. सीमा

आदित्य हसत होता,.. यापुढे म्हणजे सीमा?

सीमा काही बोलली नाही ,निशा ऐकते का ती बघत होती

निशा मागे बसली होती, आदित्य तिला तिच्या घरच्यांनी बद्दल विचारत होता, निशाच घर आल, आदित्यने गाडी बाजूला घेतली, खाली उतरून निशा साठी दार उघडल... थंक्यु आदित्य साहेब

"निशा काल काय सांगितल मी साहेब वगैरे नको",.. आदित्य

"ठीक आहे मग.... जिजु बोलु का? ",.. निशा हळूच बोलली

"हळु.... आज मूड जरा बर आहे आज मॅडमचा, चिडायला नको",... आदित्य कार मध्ये बसायला गेला

"सीमा मी निघते, नीट हो बोल जिजु ला",... निशा हसत होती

गप ग.....

निशा निघाली,

"एखाद्या शांत ठिकाणी जाऊया का जिथे आपल्याला व्यवस्थित बोलता येईल, परवा गेलेलो तिथेच फार्महाउसला जाऊया का?,.. आदित्य

" हो चालेल",.. दोघ फार्म हाऊस वर आले

" चल मी तुला फिरून आमची बाग दाखवतो ",. आदित्य

आज जरा काल पेक्षा सीमा ठीक वाटत होती त्यामुळे आदित्य त्याला जरा बरं वाटत होतं,

छान बाग होती, सगळीकडे हिरव गार सुबत्ता होती, आत मध्ये भाज्या लावलेल्या होत्या, मधोमध विहीरही होती खुपच छान वाटत होतं असं वाटत होतं की पिकनिकला आली आहे, पहिल्यांदा सीमा अस शेत बघत होती, खूप छान वाटत होत,

दोघं आत मध्ये जाऊन बसले,

"सीमा मी तुला परवा विचारल होतं, तू विचार केला का? तुझं काय उत्तर आहे",.. आदित्य

"माझ्या लग्नाला होकार आहे पण माझ्या काही अटी आहेत",.. सीमा

" बापरे काय आहे त्या अटी?",.. आदित्य

"तू न चिडता शांत पणे ऐकणार असशील तर सांगते",.. सीमा

"सॉरी सीमा मी एवढा चिडका नाही आहे, तू काळजी करू नकोस ",.. आदित्य

" पहिली अट.. राजाला नौकरीत परमनंट कर, काहीही झाल तरी त्याला ऑफिस मधुन... नोकरीवरून काढायचं नाही, दुसरी म्हणजे मी लग्न झाल्यावरही शाळेत टीचरची नोकरी करेन, माझे काही स्वप्न आहेत, ते मला पूर्ण करायचे आहेत, त्या साठी मला वेळ हवा आहे , तुम्ही लोक जरी श्रीमंत असले तरी मला हा जॉब महत्वाचा आहे, आणि तिसरी म्हणजे मला लग्नानंतर मॅरीड लाइफ सुरू करायला थोडा वेळ हवा आहे",... सीमा

म्हणजे....?

" म्हणजे.... मला लग्न झाल्यानंतर सुद्धा मॅरीड लाईफ सुरू करायला थोडा हवा आहे, आदित्य प्लीज समजून घे मी काय म्हणते ते ",... सीमाला समजत नव्हत काय बोलू

आदित्यला समजत होतो ती काय म्हणते आहे, पण तो मुद्दामुन अस दाखवत होता की काही समजल नाही,... म्हणजे काय सीमा स्पष्ट बोल?

सिमाला आता समजत नव्हतं कसं बोलावं.... कसं काय सांगाव याला? त्याला समजत आहे वाटत आणि हा मुद्दामुन करतो आहे अस

त्यात आदित्य तिच्या कडे सारख एक टक बघत होता

"मला लग्न झाल्यानंतर तुला थोडं समजून घ्यायला वेळ हवा आहे आदित्य, त्यानंतरच आपण पती-पत्नी प्रमाणे एकत्र राहूया का?, म्हणजे मी तशी रिक्वेस्ट करते" ,... सीमा

"झाल्या का अटी सगळ्या? , हेच मनात होत ना तुझ्या, माझ्या पासून कस लांब राहायच, अजिबात मान्य नाही मला या अटी ",.. आदित्य

" आदित्य प्लीज ऐकुन तरी घे",.. .. सीमा

" मला तुझ्या पासून लांब रहाण शक्य नाही",.. आदित्य

" मला थोडा वेळ दे, प्लीज ",.. सीमा

"हे बघ सीमा तुझ्या तीन अटी आहेत, त्यापैकी कुठल्या तरी दोनच मी मान्य करू शकतो, त्या कुठल्या ते तु ठरव? राजाची नोकरी... तुझी नोकरी.. की आपलं मॅरीड लाईफ",.. आदित्य

सीमा विचार करत होती, तिला बरोबर समजला आदित्य काय म्हणतो आहे ते, फार डेंजर आहे हा

"हे बघ आदित्य असं करू नकोस, मला खरंच गरज आहे नोकरीची, राजाही परमनंट झाला पाहिजे",... सीमा

" ठीक आहे मग या दोन अटी मी मान्य करतो, तू आपल्या मॅरीड लाईफची अट ठेवू नको, नाही तर तुझ्या नौकरी वर पाणी सोड",.. आदित्य

"का पण असं? तिघी अटी मान्य कर ना आदित्य प्लीज",... सीमा

" नाही मी तुझ्या दोन अटी मान्य करु शकतो, तुला पण माझं थोडं ऐकावा लागेल सीमा, मी ऐकत आहे ना तुझ सुरुवाती पासून ",... आदित्य

" आदित्य मी तुझ्याशी लग्न करते आहे ना आता, मी ऐकते आहे ना मी तुझ",.. सीमा

" नुसतं नावाला लग्न करते आहेस तू, तुझी अट हीच आहे की आपल्याला लगेच मॅरीड लाईफ सुरू करता येणार नाही, हे मला चालणार नाही, माझ खूप प्रेम आहे तुझ्यावर अस तुझ्या पासुन दूर नाही राहता येणार मला, तीन अटी पैकी कुठल्याही दोन अटी मी मान्य करेल तू विचार कर यावर",... आदित्य

आदित्यला खूप हसू येत होतं, बरं झालं वेळेवर आपल्याला हे दोन अटींचे आयडिया सुचली, नाही तर काही खरं नव्हतं माझं, सीमाला किती टेंशन आल आहे, मी आता मुद्दाम तिला त्रास देईन तिला , गोड दिसते ती टेंशन मध्ये.

🎭 Series Post

View all