नवी आशा जगण्याची... भाग 26

तो फार मोठा प्रॉब्लेम आहे, आता मी कसा तरी तिला मनवल होतं, तुला माहितीये का मी घरी पण सगळं सांगितलं, घरच्यांना ही सीमा पसंत आहे, मी उद्या सकाळी येऊन सीमाशी बोलणार होतो की तुला आमच्या घरी यावे लागणार आहे,



नवी आशा जगण्याची... भाग 26

©️®️शिल्पा सुतार
........

शाळा सुटली सीमा शाळेतून बाहेर आली आज निशा सोबत नव्हती कारण सीमाला निशाचा राग आला होता मुद्दामच सीमा आज थोडी उशिरा वर्गातुन निघाली तोपर्यंत निशा तिची वाट बघून पुढे चालली गेली होती

सीमा बस स्टॉप वर आली, एक कार पुढे जाऊन थांबली, दोन तीन मुलं खाली उतरले, ते सीमा जवळ येऊन थांबले, सीमा थोडी घाबरली होती, पण बस स्टॉप वर त्या बाजूला अजून दोन तीन लोक होते त्यामुळे बरं होतं,

"तुझं नाव सीमा आहे का?",.. विक्रम

"हो काय हव आहे तुम्हाला?",.. सीमा

"तू आदित्यला ओळखते का आदित्य देशमुख",.. विक्रम

"हो मी ओळखते",.. सीमा

"तू त्याला जाळ्यात अडकवल आहे असं ऐकलं आहे आम्ही, श्रीमंत मुलगा बघून अस करतेस का तू, तो माझा भाऊ आहे, लांब थांबायचं त्याच्या पासून ",... विक्रम धमकी देत होता मुद्दाम सीमा घाबरेल अस तिच्या जवळ जात होता

" काहीही काय बोलताय तुम्ही? जाळ्यात ओढल वैगैरे",... सीमा घाबरली होती, तस न दाखवता ती बोलली, बाजूला जावून उभी राहिली

"मी काय सांगतो ते ऐक, आदित्य पासून लांब थांबायचं काय, त्याचं लग्न जमल आहे माझ्या मामाच्या मुलीशी, तुझ्या मुळे प्रॉब्लेम नको यायला ",... विक्रम

सिमाला आता धक्का बसला होता, नाही म्हटलं तरी ती सकाळपासून आदित्य बरोबर लग्नाचे स्वप्न बघत होती, तिला आदित्य आवडला होता,

" पण मला आदित्यने असं सांगितलं नाही",..सीमा

"तो कशाला सांगेल अस त्याच्या तोंडाने, दोन-दोन मुलीं बरोबर प्रकरण करायला मिळत आहे त्याला",... विक्रम

सीमाला खूपच धक्का बसला होता, ती विचार करत होती बापरे खरं आहे का हे? पण मला अस वाटत नाही आदित्य अस करेल, त्याच्या नजरेत माझ्या साठी प्रेम आहे, असू दे पण बरं झालं हे लवकर समजल नाही तरी मी त्याला लग्नाला नकारच देणार आहे, नको हे अस, डेंजर लोक दिसतात हे, त्याच्या घरच्यांना मी पसंत नसेल आणि त्यांनी माझा छळ केला तर, बापरे

" आदित्यचं लग्न माझ्या बहिणीची होईल आमच्यासारख्या तोलामोलाच्या श्रीमंत घराण्यात तुझ्यासारख्या गरीब मुलीशी नाही होणार तेव्हा आपल्या पायरीत राहायचं समजलं का",... विक्रम अजून धमकी देत होता

" तुम्ही काळजी करू नका मला नाही करायचं आहे लग्न आदित्यशी",... सीमा

विक्रमला हे ऐकून आश्चर्य वाटलं, आदित्य सारख्या मुलाला या मुलीने नकार दिला,..." हे बघ ऐकून घे, तू तुझा निर्णय पक्का ठेव, आदित्य तुला बरच समजवण्याचा प्रयत्न करेल पण आदित्यशी लग्न केलंस आमच्या हून कोणी वाईट नाही",...

" हो मला नाहीच लग्न करायच आहे आदित्यशी तुम्ही काळजी करू नका आणि आम्ही जरी गरीब असलो तरी आमच्या घरी आहोत, तुम्हाला मला असं बोलायचं काही कारण नाही, तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते मी नाही आदित्य रोज माझ्या मागे येतो, तुम्ही या पुढे मला भेटायला येवू नका, मला तुमच्या कोणाशी संबंध ठेवायचे नाहीत ",... सीमा

बस आली सीमा बस मध्ये बसली

विक्रम त्याचे मित्र बस कडे बघत होते, मुलगी चांगली आहे, एवढी गरीब असूनही तिला तिचे विचार आहेत, वेगळच इम्प्रेशन पडत हीच, एकदम डॅशिंग आहे, अजिबात विक्रम आणि त्याच्या मित्रांना घाबरली नाही ती

मी पण आता तोच विचार करतो आहे, आदित्याची पसंत चांगली आहे, पण आपल्याला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही हिच्याशी , आपल्याला आदित्यच माझ्या मामेबहिणीशी लग्न व्हायला हवं, पप्पांना फोन करायला पाहिजे की संध्याकाळी त्यांच्या घरी जा, आबांशी बोलून घ्या लगेच
.....

बस मध्ये सीमाच्या डोळ्यात पाणी होतं, हे असंच होतं दर वेळी, लग्नाला होकार दिला की अडचण येते, म्हणून माझा नकार असतो नेहमी, माझं लग्न जमणार असलं की काही ना काही होतं, मी कधीची हेच सांगते आहे सगळ्यांना , आदित्यला ही सांगू की तू तुझ्या घरचे सांगतील तिकडेच लग्न कर, माझ्या मागे येवू नको आणि खरं असेल हे तर, आदित्यच लग्न खरच ठरलं असेल तर तो अस का करतो आहे, बापरे माझ खूप डोक दुखत आहे आता,

आता हा आदित्य जर हट्टाने माझ्याशी लग्न करणार असला तर किती भांडण होतील त्यांच्या घरी आणि तो मुलगा आदित्यचा भाऊ डेंजर दिसतो आहे, उगीच मला राजाला काही करायचा हा, श्रीमंत लोकांच्या नादी मला यापुढे लागायच नाही, लग्नाची स्वप्नच बघायचे नाहीत, मला लग्नच करायचं नाही आणि मी आता माझ्या मतावर ठाम आहे

सीमा घरी आली ती वेगळी शांत झाली होती, ट्युशन झाली, आज राजा लवकर घरी आला होता, त्याने आणि मीनाताईंनी ठरवलं की आज काहीही झालं तरी सीमाशी बोलायचं, जेवण झाल

"सीमा इकडे ये आम्हाला दोघांना तुझ्याशी बोलायचं आहे",... राजा

सीमा जाऊन समोर बसली, ती तिच्या विचारात होती

"काय झालं आहे ग सीमा तू रडली का आज",... मीनाताईंनी बरोबर ओळखलं

"नाही आई काही प्रॉब्लेम नाही, बोल राजा काय सांगतो आहेस",.. सीमा

"माझं आज ऑफिस मध्ये आदित्य साहेबांशी बोलणं झालं त्याला तुझ्याशीच लग्न करायचं आहे ",... राजा

"मला या विषयावर काहीही बोलायचं नाही राजा",.. सीमा

"काय झालं आहे सीमाताई तुला स्पष्टच सांगावं लागेल",.. राजा

" अरे मी जेव्हा लग्नाला होकार देते ना त्याच्या दुसर्‍या क्षणी माझं लग्न मोडत",.. सीमा

" ही भीती तू कधी मनातुन काढून टाकणार आहेस?, तेच तेच सुरू आहे तुझ ",.. राजा

" ही भिती नाही हे सत्य आहे राजा, आज सकाळीच मला आदित्य भेटला होता आणि त्याने मला लग्नाचं विचारलं होत, मी मन केलं होतं की मी त्याला होकार देणार आहे, पण आत्ता मला संध्याकाळी त्याचा भाऊ भेटला आणि त्याने सांगितले की आदित्यचं लग्न त्याच्या मामे बहिणीशी आधीच ठरलेला आहे, आणि मी उगीच आदित्यला जाळ्यात ओढते आहे, मला त्याने आदित्य पासून लांब थांबायला सांगितल, खूप डांबरट मुलगा होता तो",.... सीमा

" काय बोलते आहेस तु? ",... राजा

" हो बरोबरच बोलते आहे मी, आता अश्या प्रसंगात मी काय करू तूच सांग ",... सीमा

" लग्न ठरलं तरी आदित्यसाहेब तुझ्या मागे का फिरत आहेत",... राजा

" तेच मला वाटत आहे की या श्रीमंत लोकांच्या नादी न लागलेलं बरं काय आहे",... सीमा

" नक्की काय आहे हे प्रकरण ",.. राजा

"माहिती नाही मला त्या लोकांनी मला धमकी दिली आहे की मी आदित्यला नकार द्यायला पाहिजे, हेच मी तुला कधीपासून सांगते आहे.. आई आणि राजा की सगळे मुलं माझ्याशी व्यवस्थित बोलतात, पण त्यांच्या घरच्यांना मी पसंत नसते, आता ही हे असंच झालेलं आहे त्यामुळे मी यापुढे लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझ्या या निर्णयात जर कोणी मध्येमध्ये केलं तर मी घर सोडून जाईल, आमच्या शाळेचे होस्टेल आहे तिथेच राहीन मी",... सीमा चिडली होती

"एक मिनिट ताई काही तरी गैरसमज झालेला दिसतो आहे, आपण बोलू त्यांच्याशी, तु थांब असा लगेच निर्णय घेवू नको",.. राजा

मीनाताई रडत होत्या

" आई तू कशाला रडते आहेस आता माझं नशीबच असा आहे ग",.. सीमा

"खरं सांग सीमाताई कोण होते ते मुलं? असा धिप्पाड मुलगा होता का थोडासा गोलसर चेहऱ्याचा ",... राजा

हो..

" म्हणजे तो नक्की विक्रम असेल, तो अतिशय गुंड मुलगा आहे, तू त्या मुलाच बोलणं एवढं मनाला का लावून घेते आहेस, त्या विक्रमची पहिल्यापासून आदित्य साहेबांशी दुष्मनी आहे, आदित्य साहेबांच्या मनात काही नसेल असं, तो विक्रम मुद्दामून तुमचं नातं तोडायला असं खोटं बोलत असेल ",... राजा

" हे कशावरून बोलतो आहेस तू राजा? कोण कशाला दुसऱ्याबद्दल असं खोटं सांगेल की त्याचं लग्न जमलं आहे, मी सांगेल का तुझ्याबद्दल खोटं की राजाच लग्न जमलं आहे, मला तू काहीही सांगू नकोस, समजवून सांगू नकोस ",... सीमा

"तू आदित्य साहेबांनी फोन केला होता का?",.. राजा

"नाही मला नाही बोलायच आता त्यांच्याशी, या घरात यापुढे लग्न हा विषय नको आहे माझं खूप डोकं दुखत आहे केव्हापासून, या शाळेत जॉईन झाल्या पासून नुसत लग्न लग्न सुरू आहे सगळ्यांच, मी झोपायला जाते आहे",... सीमाने फोन बंद स्विच ऑफ केला आणि ती झोपायला जात होती, तिला अति ताणाने चक्कर आली, ती पटकन खाली बसली रडायला लागली

राजा मीना ताई पळत आल्या, राजाने तिला आत नेल, मीना ताई सरबत करून घेवून आल्या, सीमाने सरबत पिल, ती फॅन खाली शांत झोपली, मीना ताई तिच्या केसातून हात फिरवत होत्या, जरा वेळाने सीमा झोपली

राजा मीना ताई पुढे येवून बसले,... "आता काय रे राजा? मला खूप काळजी वाटते आहे सीमाची",

"आपण आता सीमा समोर सारख लग्नाचा विषय नको काढायला, त्रास होतोय तिला ",... राजा

"हो बरोबर आहे",.. मीना ताई

राजा आई जवळ गेला

"वाटेल बर उद्या ताईला आई, मी उद्या बोलतो साहेबांशी, तू अजिबात काळजी करू नकोस",.... राजा

आदित्य आबा घरी पोहोचले, उशीर झाला होता त्यांना आज घरी यायला, दोघ खुश होते, जेवण झाल, आक्का सगळी माहिती विचारत होत्या त्या साखर कारखान्या बद्दल, आदित्य आबा सगळी माहिती सांगत होते,

जेवण सुरु होतो तेवढ्यात काका आले,..." मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आबा",

"हे बघ आता मी खूप दमलो आहे आपण उद्या सकाळी बोलूया का?, मी सकाळपासून बाहेर गेलो होतो आत्ताच घरी आलो आहे",.. आबा

"चालेल मी नंतर येतो",... काका

" झालं का जेवण? नाही तर चल जेवायला",.. आबा

"झाला आहे जेवण, मी येतो",.. काका

" यांचं काय काम आहे आपल्याकडे? ते सारखे का येत आहेत आपल्याकडे? ",.. आक्का

" काय माहिती काय काम आहे? उद्या स्पष्टच बोलून बघतो मी त्याच्याशी",.. आबा

आदित्य रूम मध्ये गेला, सीमाला ही बातमी सांगायला पाहिजे की मी आज बाबांशी आपल्या बद्दल बोललो, त्यांने मला सीमाला फोन लावला, सीमाचा फोन स्विच ऑफ येत होता, परत एकदा फोन लावला परत फोन बंद होता, काय झालं आहे आज सीमाचा फोन बंद का आहे? एवढा वेळ ही झाला नाही, झोपली असेल का ती?

थोड्या वेळाने राजाच्या फोनवर आदित्यचा फोन आला,... "सीमाचा फोन स्विच ऑफ का येतो आहे? कुठे आहे ती?, झोपली का ? ",..

" आदित्य साहेब इकडे खूप मोठी अडचण आलेली आहे, सीमाताईच खूप डोकं दुखत आहे, बरं नाही वाटत आहे, तिला चक्कर आली, टेन्शन घेतला आहे तिने खूप, ती झोपलेली आहे",.. राजा

" काय झालं आहे सीमाला? मी येऊ का डॉक्टरांना घेऊन",... आदित्य

" नाही शुगर लो झाली असेल बहुतेक, आईने सरबत दिल आहे सकाळी वाटेल बर ",.. राजा

" बरं काय झालं काय आहे पण नक्की ",... आदित्य

" विक्रम आणि त्याचे मित्र आज शाळा सुटल्यानंतर सीमाताईला जाऊन भेटले, त्यांनी सीमाताईला सांगितलं की तुमचं आधीच लग्न विक्रमच्या मामे बहिणीशी ठरलं आहे, खूप बोलले ते मुलं तिला की आदित्यच लग्न आमच्या बरोबरीच्या लोकांबरोबर होईल तुमच्यासारख्या गरीब लोकांबरोबर नाही, तू आदित्यला जाळ्यात ओढु नकोस, त्यामुळे सीमाताई खूप अपसेट आहे आणि तिने परत लग्नाला नकार दिला आणि तिने आता अशी धमकी दिली आहे की यापुढे जर लग्नाचा विषय कोणी काढला तर ती घर सोडून चालली जाईल",... राजा

" बापरे हे काय नवीन? आणि माझ्या लग्नाशी विक्रमचा काय संबंध? , कोण आहे त्याची मामे बहीण मला खरच काही माहिती नाही, मी आता तिकडे येवू का राजा? ",... आदित्य

" सर आपण सकाळी बोलू, सीमा ताई झोपली आहे, आई ही टेंशन मध्ये आहे ",... राजा

" हे बघा तुम्ही कोणीच टेन्शन घेऊ नका, तुला माहिती आहे ना राजा विक्रम कसे उद्योग करतो, मी उद्या पर्यंत सगळे प्रॉब्लेम नीट करतो, तू फक्त एक काम कर सीमा उठली की तिला सगळं सांग की रात्री आदित्यचा फोन आला होता आणि हे सगळं खोटं आहे आणि तो लगेच विक्रम शी बोलतो आहे आणि विक्रम तुझी माफी मागेल",... आदित्य

" हो मला माहिती आहे विक्रमच कारस्थान, तुम्ही काळजी करू नका आदित्य साहेब, मी बोलतो सीमाशी, पण तिचा राग किती शांत होईल याची हमी मी देऊ शकत नाही",... राजा

" तो फार मोठा प्रॉब्लेम आहे, आता मी कसा तरी तिला मनवल होतं, तुला माहितीये का मी घरी पण सगळं सांगितलं, घरच्यांना ही सीमा पसंत आहे, मी उद्या सकाळी येऊन सीमाशी बोलणार होतो की तुला आमच्या घरी यावे लागणार आहे, हा मोठा प्रॉब्लेम तयार झाला आता ",.... आदित्य

"तुम्ही काळजी करू नका आदित्य साहेब, होईल ठीक सगळ",.. राजा

आदित्यने फोन ठेवला

" काय रे काय म्हटले ते ",... मीना ताई

" आई ते म्हणत आहे की काही असा प्रॉब्लेम नाही, ते त्या विक्रमने केला आहे हा सगळा प्रकार, या लोकांचे प्रॉपर्टीचा मॅटर आहे, आदित्य साहेब खूप श्रीमंत आहे त्यामुळे विक्रमला असं वाटत आहे की त्यांची बहीणीच आदित्य साहेबांनी लग्न करावं, आदित्य साहेब नाही बोलत आहेत, तिकडे गोंधळ दिसतो आहे हा ",... राजा

"पण आता परत या सीमाला कोण समजवणार, तेच मोठा टेन्शन आहे आपल्या दोघांचं",... मीना ताई

हो ना... राजा काळजीत होता

🎭 Series Post

View all