नवी आशा जगण्याची... भाग 19

"तसं नाही ग निशा मी तुला मागे पण माझा प्रॉब्लेम सांगितला होता ना, माझं लग्न व्यवस्थित ठरत नाही, ठरलं की लगेच मोडत त्यामुळे मी असा विचार केला आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचा नाही",..



नवी आशा जगण्याची... भाग 19

©️®️शिल्पा सुतार
........

सीमा बस मध्ये चढली, तिला वाटल बर झाल पिछा सुटला, काय मुलगा आहे हा, मला एकटीला बघून लगेच बोलायला येतो, राजाला करू का मेसेज? , जाऊ दे आता आपण निघालो शाळेत जायला,

आदित्य ही बस मध्ये चढला, सीमा मागच्या सीट वर बसली, आदित्य जावून तिच्या बाजूला बसला,

"काय प्रकार आहे हा?" ,.... सीमा

काय?....

"तु इथे नाही बसू शकत",.. सीमा

"का ही बस तुझी आहे का स्वतःची?, काय हो कंडक्टर ",... आदित्य

नाही...

"मग मी कुठेही बसू शकतो",... आदित्य

सीमा उठली दुसरी कडे जायला, आदित्य बाजूला सरकला नाही, तिचा नाईलाज झाला ती त्याच्या जवळ बसली, आदित्य छान हसत होता,.. मस्त वाटत बस मध्ये नाही... सीमा काही बोलली नाही

आदित्यच्या फोन वर ड्रायवरचा फोन आला,.... बस स्टँड वर या...

"काय प्रकार आहे हा? ",... सीमा चिडली होती ती रागाने आदित्य कडे बघत होती,..." तु माझा पिछा करतो आहेस का?",

हो...

म्हणजे??

"हो मी तुझ्या मागे येतो आहे, मला बोलायच आहे तुझ्याशी सीमा, तू थांबायला तयार नाहीस मग काय करणार मी? ",... आदित्य

तिकिट कंडक्टर आला, आदित्य सीमा कडे बघत होता... माझा पास आहे

" तिकीट बोला साहेब",...

"एक शाळेजवळच तिकीट द्या",... सीमा

आदित्य कडे पाचशे रुपये होते,

" सुट्टे द्या साहेब ",..

" पैसे नाहीत माझ्या कडे ",... आदित्य

" ओ मॅडम तुम्ही द्या पैसे",...

सीमाने सुट्टे पैसे दिले तिकीट काढल ,... "चांगल आहे आमच्याच मागे यायचा आणि आम्हीच तिकीट काढायचं",

थॅंक्स...

" थॅंक्स नाही नंतर वापस कर माझे पैसे, समजल का? ",.. सीमा

हो

तू जसा पैशाचा व्यवहार बघतो ना तसं मी पण बघणार,.. सीमा

" ठीक आहे पैसे वापस करायला भेटू आपण परत ",.. आदित्य

सीमा बाजूला सरकून बसली, खिडकी बाहेर बघत होती ती, वार्‍याने तिचे केस छान उडत होते, आदित्य तिच्या जवळ बसुन या सगळ्या गोष्टीचा आनंद घेत होता,

"सीमा मला तू खूप आवडते ",... आदित्य

सीमा बघत राहिली आदित्य कडे,...

" मी पहिल्यांदा बघितल तुला आणि तुझ्या प्रेमात पडलो, मला तुझ्या सोबत रहायच आहे सीमा",... आदित्य

सीमा आजूबाजूच्या बघत होती कोणी ऐकत तर नाही ना हे बोलण

"तू अस किती ओळखतोस मला? काय चालल आहे हे?, दोन दा तर भेटलो आपण ",.. सीमा घाबरली

"मी खर बोलतो आहे हे सीमा ",... आदित्य

" काय नाव आहे तुझ?",.. सीमा

आदित्य..

"कुठे राहतोस? ",.. सीमा

" याच गावत ",.. आदित्य

" जॉब करतोस का? ",.. सीमा

हो...

कुठे?

"देशमुख यांच्या फॅक्टरीत",... आदित्य

अरे राजा ही तिथे काम करतो.. त्याला सांगते नंतर याच नाव

"हे बघ आदित्य असा विचार करू नकोस, मला हे शक्य नाही, माझ्या मागे येवु नकोस, नाही तर मी तुझी कंप्लेंट करेन ",.. सीमा

" कोणाकडे करणार कंप्लेंट ",.. आदित्य मुद्दाम चिडवत होता

सीमा ला काही सुचलं नाही काय बोलाव ते, ती गप्प बसली

" कोणी आहे का तुझ्या आयुष्यात? ",.. आदित्य

नाही...

"लग्न जमल का तुझ? ",.. आदित्य

नाही..

"मग काय प्रॉब्लेम आहे? ",... आदित्य

"मला लग्न करायच नाही, मला माझ्या आई भाऊ सोबत राहायच आहे",.. सीमा

"एवढच ना... मला वाटल खूप मोठा प्रॉब्लेम आहे की काय?",... आदित्य

"आता गाव आल तू स्टँड वर उतर, की शाळेत येणार? ",..सीमा

"आल ही गाव, माझ्या बद्दल काय विचार आहे तुझा ते सांग",.. आदित्य

"मला नाही जमणार हे आदित्य ,तू चांगला मुलगा दिसतोय उगीच माझ्या मागे मागे करू नकोस ",...सीमा

"हे शक्य नाही, मला या आधी कोणतीही मुलगी आवडली नव्हती, तू पहिली आणि शेवटची,.. मी लग्न करेन तर तुझ्याशी", ...आदित्य सीमा कडे बघत होता, तो काय बोलतोय हे तिला समजल, तिने एकदम खाली बघितल, हसत आदित्य बस खाली उतरला

मागून कार आली होती आदित्य कार मध्ये बसला, ऑफिसला निघून गेला

तो गेला तिकडे सीमा बघत होती, अगदी अशक्य आहे हा मुलगा, आपल्याला जे वाटल होत ते खर निघाल, पण आता मी हे कोणाला सांगणार नाही, निशा प्रश्न विचारून हैराण करेल, नाही तरी लग्न करायचंच नाहीये त्याच्याशी, मग उगाच कशाला सगळ्यांना बोलत बसा, असा किती दिवस मागे येईल हा, एक दिवस तर समजेल त्याला की मला इंटरेस्ट नाहीये, पण हा माझ्याशी बोलल्या नंतर खूप धड धड होते आहे, परत नको भेटायला हा,

काय करू, खोट तरी सांगितल असत की माझ लग्न जमल अस, पण त्याने चौकशी केली असती, तसा हुशार वाटतो आहे हा, सुरेशच्या बाबतीत माझ मन गुंतल होत पण काय झालं शेवटी, हे मूल माझ्या समोर प्रेमाने छान बोलतात त्यांच्या घरचे समोर आले की खूप घाबरतात माझी बाजू घेत नाही, काहीही झाल तरी माझा नकार आहे आता, उगीच ते गुंतण नको या मुलात

सीमा शाळेत आली, निशा आलेली होती

ट्रेनिंग संपल होत, उद्या पासून शाळा सुरू होणार होती, वर्गाची स्वच्छता सुरू होती, विद्यार्थ्यांची लिस्ट बनवायचं काम सुरू होतं, कोणाला कोणत्या वर्गात टाकायचं क्लास टीचर कोण हे सगळं सुरू होतं, काही टीचर टाईम टेबल तयार करत होत्या, खूप गडबड सुरू होती, निशा सीमा दोघी बिझी झाल्या, मध्ये मध्ये सीमाला आदित्य आठवत होता, तिला हसू येत होत

दुपारी हॉल मध्ये सगळ्यांना बोलवलं होतं, मोठी मिटींग होती, सगळे टीचर्स हॉलमध्ये जमले, प्रिन्सिपल सर आणि कॉर्डिनेटर टीचर स्टेजवर होते,

आबा देशमुख आले, सगळे उठून उभे राहिले, ते स्टेज वर गेले, प्रिन्सिपल सरांशी ते बोलत होते, उद्यापासून आपली शाळा सुरू होते आहे सगळी तयारी झाली आहे का?

"हो सगळी तयारी झाली आहे छान",.. प्रिन्सिपल

"शाळा स्वच्छ दिसते आहे छान, वर्गांत बसणार्‍या मुलांची लिस्ट वगैरे सगळ्या तयार आहेत का? ",.. आबा

हो सर..

"तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट हे पुढचं येणारं वर्ष आपल्या शाळेसाठी छान जावो",... आबा

सगळ्या टीचर्स आनंदात होत्या, आबा देशमुख यांचं बोलणं इतकं छान होत, अगदी इम्प्रेशन पडत होत त्यांच, पण हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे असं सारखं सीमाला वाटत होतं, सकाळी भेटलेला आदित्य असाच दिसतो का? काय माहिती... एवढं नीट बघितलं नाही, पण मला आज दिवसभर तोच का आठवतो आहे,

जेवणाची सुट्टी झाली, निशा सीमा जेवायला बसल्या, निशाने विषय काढलाच,... "आणले का गं तू पैसे त्या मुलाला द्यायला?",..

"हो आणले आहेत, राजाने दिले मला काय पाच हजार रुपये",.... सीमा

"नीट ठेवली ना ग तुझी पर्स जास्तीचे पैसे आहेत ",... निशा

"पर्स कपाटात आहे",.. सीमा

"आज तो मुलगा भेटला तर देऊन टाका त्याला पैसे",.. निशा

हो....

" काय झालं आहे सीमा तू काही जास्त बोलत नाही",..निशा

"काही नाही ग मी उद्या पासून सुरू होणार्‍या शाळेचा विचार करते आहे",... सीमाच्या मनात आदित्यचा विचार येत होता, काय करावं निशाला सांगावं का की सकाळी आदित्यशी बोलणं झालं, तो बोलतो आहे की मला तू आवडते, काय करू? सांगू का निशाला?

" बोल ना ग सीमा? काय झालं आहे? एवढी गप्प गप्प, काही झाल का? ",.. निशा

" आज मला सकाळीच तो मुलगा भेटला होता ",.. सीमा

"बापरे, बघ मी म्हटलं होतं ना जेव्हा कोणी नसतं तेव्हाच भेटतो तुला, काय म्हणत होता, पैसे मागत होता का मग? का नाही दिले तू त्याला सकाळी हे पैसे?, आणि मी केव्हाची विचारते आहे तेव्हा का नाही सांगितल मला हे? ",... निशा

" अगं मी विचारात होती कस सांगू तुला",.. सीमा

" काय झाल? ",... निशा

" तो मुलगा मला बोलतो आहे कि त्याला मी आवडते, तो बोलतोय तुझ्या शी लग्न करेन मी ",.. सीमा

निशा आश्चर्यचकित होऊन सीमा कडे बघत होती,..." एवढी हिम्मत दुसर्‍या दिवशी लग्नाची मागणी घातली तुला, खूपच प्रेमात दिसतो तो तुझ्या? मग तू काय म्हटलीस",.. निशा

" मी काही नाही बोलली, अग मला असं वाटलं होतं की त्याला हो बोलायचं नाही तर कशाला सगळ्यांना सांगत बसा",... सीमा

" त्याला का नाही हो बोलायचं आहे तुला? तुझं काही ठरत आहे का कुठे? का तुला आवडत नाही तो",.. निशा

"तसं नाही ग निशा मी तुला मागे पण माझा प्रॉब्लेम सांगितला होता ना, माझं लग्न व्यवस्थित ठरत नाही, ठरलं की लगेच मोडत त्यामुळे मी असा विचार केला आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचा नाही",.. सीमा

" असं काही नसतं सीमा, आता गोष्ट वेगळी आहे, तो स्वतःहून पुढाकार घेतो आहे ना, मग तू ही कर की विचार एकदा, कसा दिसतो तो मुलगा? कोण आहे? ",.. निशा

"कोण आहे ते मला नाही माहिती, पण दिसायला तर चांगला आहे",.. सीमा

"कुठे राहतो",.. निशा

"याच गावात राहतो म्हणे फॅक्टरीत आहे कामाला",.. सीमा

" काय नाव",.. निशा

आदित्य

"बरच बोलण झालेल दिसत तुमच",.. निशा

"काय ग निशा",.. सीमा

"बर आहे म्हणजे मग तू त्याला हो म्हटल तर तु या गावात राहशील ",.. निशा चिडवत होती

" बरं आहे ना तुझं निशा, मी तुला काय सांगते आहे आणि तु आमच दोघांचं लग्न जुळायला बसली आहे आहेस, मी नकार देणार आहे त्याला, आज तस बोलली मी त्याला ",... सीमा

" अगं मग काय तू कधीच लग्न नाही करणार का? ",.. निशा

" तसं नाही ग, अजून मी विचार केला नाही तसा",... सीमा
...........

आदित्य ऑफिस मध्ये आला, तो त्याच्या विचारात होता गोड हसत होता, मस्त मूड मध्ये होता

सचिन आत आला,.." काय आज एकदम खुश आदित्य ",...

"मी आज भेटलो सीमाला आणि मी तिला सांगितल मला तू आवडते अस",... आदित्य

" मग पुढे ",... सचिन

" ती चिडली तिने मला नकार दिला",... आदित्य

"तरी तू एवढा गोड हसतो आहेस",.. सचिन

"अरे रागात होती ती, मग काय लगेच हो बोलेल का ती, मी बदलेल तिचा नकार होकारात, तिने माझ तिकीट काढल आज",.. आदित्य

"म्हणजे? कसल तिकीट",.. सचिन

" बसच... मी तिच्या सोबत बसने गेलो तिच्या शेजारी बसुन",... आदित्य

" बरच डेअरींग आहे तुझ, पुढे काय आता ",.. सचिन

" काही नाही अस अचानक भेटाव लागेल तिला, तिकीटाचे पैसे परत मागितले तिने ",..आदित्य

बापरे ..

"ती बोलली तू कसे पैसे घेतो माझ्या कडून तसे मी पण घेईन ",..आदित्य

" बरोबर आहे तीच किती आहेत पैसे ",.. सचिन

" दहा की पंधरा माहिती नाही",... आदित्य

पवार साहेब आत आले, दोघ गप्प बसले, कामाला सुरुवात झाली,

आबा ऑफिसमध्ये आले, सगळ्यांना भेटत भेटत आदित्यच्या केबिनमध्ये आले, आदित्य सचिन सगळे जमलेले होते, पवार साहेब होते, राजा होता

" कसे आहात साहेब तुम्ही, आज बर्‍याच दिवसांनी भेट झाली ",... पवार साहेबांची आबांची पूर्वी पासून ओळख होती, ते दोघ बोलत बसले, आबा त्यांना साखर कारखानाच्या इलेक्शन बदल सांगत होते

"योग्य निर्णय आहे हा",... पवार

"अकरावी बारावी साठी कॉलेज, पुढे जावून इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करायच आहे, खूप काम आहेत ",... आबा

राजा त्यांच्या गप्पा भारावून जावून ऐकत होता

" आदित्य सचिन माझ्यासाठी तुम्ही एक असिस्टंट आणी मॅनेजर देणार होतात ना?",... आबा

"हो काका आहेत दोन हुशार लोक नजरेत",.. सचिन

"लवकरात लवकर काम सुरू करायच आहे मला",... आबा

"एका तासात भेट घालून देतो तुमची ",... सचिन

" सचिन खूप हुशार झाला आहे ना आदित्य ",...आबा

हो ना

" हा मुलगा कोण आहे ",... आबा

" आबा हा राजा, खूप हुशार आहे हिशोबाला",... आदित्य

राजाने पुढे येवून पाया पडल्या

" अरे पाया कश्याला पडतो माझ्या ",.. आबा

"साहेब तुम्ही अगदी माझ्या वडलांसारखे वाटले मला",... राजा

पवार साहेब राजा गेले

" मुलगा खरच प्रामाणिक आहे साधा आहे याला वरती घ्या",... आबा

"हो वाढवणार आहे याचा पगार मी वरची पोस्ट देणार आहे",... आदित्य

"काय म्हणताय विक्रम आणि मित्र मंडळी? ",... आबा

" चिडले आहेत ते मुल खूप",.... आदित्य

"चोरी करून भारी भरतात का ते",... आबा

" हो तसच आहे",... सचिन

"मी शाळेत गेलो होतो आता ",.. आबा

सचिन आदित्य कडे बघत होता, आदित्य उठून नीट बसला

" उद्या पासून शाळा सुरू होते आहे ना, बघितल कुठे पर्यंत आली तयारी ",.. आबा

" झाली का मग तयारी त्यांची ",.. सचिन

" सुरू आहे.. बराच नवीन स्टाफ आहे या वर्षी, तुम्ही दोघ जात जा अधून मधून शाळेत, काय जाता ना त्या बाजूला?" ,... आबा

तसे आदित्य सचिन चपापले...

" बघत जा तिकडे ही, लक्ष ठेवा, कोण नवीन आल, कोण नाही ",... आबा

सचिन आदित्य काही बोलले नाहीत

आबा हसत बाहेर निघून गेले....

" बापरे माहिती आहे का आबांना, मला तर घाम फुटला ",... आदित्य

" काय माहिती, डेंजर आहेत साहेब ",.. सचिन

"कोणी सांगितल असेल त्यांना, की अस कामा साठी बोलले फक्त ",.. आदित्य

" काय माहिती, काकूंनी नसेल ना सांगितल",.. सचिन

"नाही आई नाही सांगणार, तिने मला प्रॉमीस केल आहे, तरी मी तिला विचारून बघतो ",.. आदित्य

"त्यांच्या ओळखी खूप आहेत, कोणी तरी बोलल असेल आपल्याला बघितल असेल शाळे जवळ, खूप सावध राहाव लागेल आता ",... सचिन

हो ना....



🎭 Series Post

View all