नवी आशा जगण्याची... भाग 20

अस काही नाही तुला माहिती आहे ना माझ लग्न सुरुवातीला ठरत नंतर जेव्हा त्यांना समजत की दत्तक घेतलेली मुलगी आहे, तेव्हा मोडत, आणि हुंडा ही प्रॉब्लेम आहे, माझा विरोध आहे हुंडा द्यायला घ्यायला


नवी आशा जगण्याची... भाग 20

©️®️शिल्पा सुतार
........

आदित्य घरी आला, जेवायला बसले ते, आबा समोर होते म्हणून विशेष बोलणं झालं नाही, आबा एकटेच खूप बोलत होते, शाळेबद्दल, इलेक्शन बद्दल काय करायच आहे पुढे ते सांगत होते, खूप उत्साह होता त्यांच्या बोलण्यात,

आदित्य आणि आक्का कौतुकाने त्यांचं सगळं ऐकत होते, आबांना फोन आला ते बाहेर उठून गेले

" आई आबा किती खुश आहेत ना, असे छान रहा म्हणा, आज आबा ऑफिस मध्ये आले होते, ते शाळेत गेले होते वाटत आज दुपारी , तुमच्या दोघांचं काही बोलणं झालं का माझ्या बाबतीत?, म्हणजे तू त्यांना काही सांगितल नाहीस ना ",... आदित्य

"नाही सांगितल, काय झालं?",.. आक्का

"आबा बोलत होते की शाळेकडे चक्कर टाकत जा जरा म्हणून मला असं वाटलं त्यांना काही समजलं का?",... आदित्य

"अरे हो, काय चालू आहे तुझं? बोलणं झालं का त्या मुलीशी ? कोण आहे ती?, काय नाव आहे तीच? ",... आक्का

" हो तसं बोललो आहे मी तिच्याशी, तिच नाव सीमा आहे",.. आदित्य

" अरे वा बरीच माहिती झालेली दिसते तिची ",.. आक्का

" नाही ग अजून कशात काही नाही",.. आदित्य

" कुठे राहते ती? ",.. आक्का

"बाजूच्या गावात, खूप मध्यमवर्गीय लोक आहेत ते, पण मला खरच खूप आवडली आहे सीमा, तिला बघून अस वाटल हीच ती जिच्या सोबत मी राहू शकतो, आई तुला काही अडचण नाही ना ",.... आदित्य

" नाही मला कशाला असेल काही प्रॉब्लेम, तू खुश हवा मला फक्त , काही हरकत नाही, कधी जावू या आपण तिला भेटायला" ,... आक्का

"आई अजून ती मला हो सुध्दा म्हटलेली नाही, अनघा ताई ला काही बोलू नकोस तू अजून ",.. आदित्य

" मी कोणाला काही सांगणार नाही",.. आक्का

आबांचा फोन झाला, ते वापस आले तसे आक्का आणि आदित्य गप्प बसले,

काका-काकू विक्रम आले,...

" चला जेवायला ",... आबा आग्रह करत होते

" आमच झाल जेवण ",.. काका

आबा आक्का उठून पुढे गेले, आदित्यला तर कंटाळाच आला होता त्या लोकांना बघून, मी छान बोलत होतं आई आबांशी तर हे आले, आदित्य अजून जेवत होता, विक्रमच सगळं लक्ष आदित्यकडे होतं नाही, तो त्याच्या आई-वडिलांना आदित्यशी बोलायला घेऊन आला होता, आदित्य येईपर्यंत ते इकडच्या-तिकडच्या विषयावर बोलत होते,

आदित्य समोर येऊन बसला, काका-काकू विक्रम त्याच्याकडे बघत होते

" झालं का जेवण आदित्य",... काका

"हो झालं",.. आदित्य

" आजकाल उशीर होतो तुला घरी यायला",.. काका

" हो ना खूप काम वाढलाय",.. आदित्य

" काही लागल तर विक्रमला घेत जा मदतीला",.. काका

हो... सांगेन मी

" इतर लोकांना इतक महत्व देण्यापेक्षा तुझा भाऊ आहे, तोच येईल तुला कामाला, त्याला देत चल महत्वाच काम",.. काका

" काय काम काढल इकडे आज काका ",.. आदित्य

"तुझ्याशी महत्वाचं बोलायला आलो होतो आम्ही",.. काका

"बोला ना",.. आदित्य

"काय चाललं आहे कंपनीत? , तुम्ही लोकानी विक्रमला चक्क नोटिस पाठवली? का पण?, हे असे घरचे मॅटर बाहेर जाता आहेत आता आबा",.. काका

"हे बघा काका काकू तुम्ही मला आबा आक्कांन सारखेच आहात, नको ना ऑफिसचा विषय इथे, ऑफिस आणि घर जरा वेगळे राहू दे, आपण दुसर्‍या विषयावर बोलू या ",... आदित्य

काका विक्रम कडे बघत होते, विक्रमने त्यांना डोळ्यांनी खुणावलं की बोला

" हे बघ आदित्य आबा आक्का मला माझ्या आई वडिलांसारखे आहे, आम्ही पुर्वीपासून एकत्र आहोत, आबा आक्कांनी खूप केल आहे माझं, आम्ही जसे भाऊ भाऊ एकत्र आहोत असे तुम्ही दोघ भाऊ का नाही एकत्र काम करत, छोट्या छोट्या गोष्टींवरून का बर आहे तुमच्या दोघांमध्ये तक्रार असते? विक्रमच काही चुकलं असेल तर तू त्याचे कान धर, त्याला रागव, पण हे असं नोटीसा पाठवण वगैरे असं चांगलं नाही, तुम्हाला तरी पटतय का आबा ",... काका

"मी तुम्हाला सांगितलं आहे ना काका हा ऑफिसचा निर्णय माझा एकट्याचा नाही, तिथे एक कमिटी आहे कमिटी मिळून निर्णय घेते ",... आदित्य

"तू मालक आहे ना तिथला, मग अशावेळी तू विक्रमची बाजू घ्यायची ना",.. काका

"त्याची बाजू घ्यायचा प्रश्नच येत नाही, जो जे करेल ते त्याच्या अकाउंटमध्ये दिसतं, विक्रमने आबांकडून घेतलेल्या पैशाचा तर कधी हिशोब लावलाच नाही आम्ही कधी, बँकेच्या अकाउंट मध्ये स्पष्ट दिसत आहे की सात आठ कंपन्यांनी जास्तीचे पैसे घेतले आहेत, आमच्या कंपनीकडे जसा अकाउंट कडे रिपोर्ट आहे, त्या प्रमाणे त्या कंपनीला ते पैसे वापस करावीच लागतील, ते काही माझ्या एकट्याचा निर्णय नाही आणि माझे ही पैसे नाहीत, ते कंपनीचे पैसे आहेत मला असं वाटतं की आपण या विषयावर इथे नको बोलायला, विक्रम तुला काय बोलायचं आहे ते उद्या ऑफिसला येऊन बोल, मी तुला सकाळी बोललो होतो की जसा मी रिपोर्ट तयार केला तसं तुही रिपोर्ट तयार कर आणि कोणत्या बिल विरुद्ध किती पेमेंट तुला मिळाला आहे ते सगळं बँकेत स्पष्ट दिसत आहेच की, तसे पेपर घेऊन ये, काका तुम्हालाही यायचं विक्रम सोबत तुम्हीही या ऑफिसमध्ये, आपण तिथे व्यवस्थित बसून कम्प्युटरसमोर याचा हिशोब बघून घेऊ, जर नसेल काही हिशोबात प्रॉब्लेम तर काही मला काही अडचण नाही, काही पण जर जास्तीचे पैसे घेतले असतील तर ते वापस करावेच लागतील आणि आबा आक्कांना यातलं काही माहिती नाही नाही त्यामुळे त्यांच्याशी बोलून उपयोग नाही",... म्हणजे आदित्यने इनडायरेक्टली आबा आक्कांना सांगितलं की तुम्ही या विषयावर बोलू नका

विक्रमला खुप राग आला होता आता तो काकांकडे रागारागाने बघत होता, आबांनी दुसऱ्या विषयावर बोलायला सुरुवात केली, आता मात्र त्यांचा नाईलाज झाला, थोड्या थोड्या वेळ बसून ते तिघे चालले गेले

" बघितलं का आबा आक्का किती बदमाश आहे तो विक्रम, फ्रॉड तर केला आहे आणि आता काका-काकूंना पाठीशी घालून इकडे घेऊन येतो, काका खूप खूप चांगले आहे, त्यांनी विक्रमचा ऐकायला नाही पाहिजे",... आदित्य

"हो ना कसा बोलत होता तो की आदित्य तू विक्रमची बाजू घ्यायला पाहिजे होती, एवढंच वाटतं तर मग गैरव्यवहार कशाला करावा ",.. आबा

तेच तर...

"मी दमलो आहे झोपतो जरा",.. आदित्य

ठीक आहे...

आदित्य रूम मध्ये निघून गेला

"काय हो हे काय आहे पैशाचं मॅटर? जास्त गडबड आहे का काही? विक्रम बघितलं की किती चिडचिड करतो आहे, मला भीती वाटते काही नको व्हायला, त्यात त्याचे उनाड मित्र ",... आक्का

"काही होणार नाही ग, या लोकांना असं दाबलं पाहिजे नाहीतर ते पुढे जाऊन अजून गैरव्यवहार करतील, आदित्य बरोबर करतो आहे, तू अजिबात घाबरू नको, आता बॉडीगार्ड आहे ना त्याच्या सोबत, मी उद्या स्वतः इन्स्पेक्टर साहेबांशी बोलून घेतो, त्यांना सांगतो जरा लक्ष असू द्या",.. आबा

" आज तुम्ही गेले होते ना ऑफिस मध्ये? कसा आहे वातावरण तिथलं? ",.. आक्का

" काही नाही नॉर्मल आहे सगळं काम व्यवस्थित सुरू आहे, सचिनही असतो की आदित्य सोबत, तो खूप हुशार आहे आणि चांगला आहे, तू अजिबात काळजी करू नको कुठल्या गोष्टीची, ऑफिस म्हटलं की हे असेच भांडण आले",.. आबा
........

मीनाताई, सिमा, राजा यांचे जेवणं झाली, मीनाताई जरा वेळ बाजूच्या ताईंशी बोलत होत्या

" राजा मला तुला काहीतरी सांगायचं आहे ",.. सीमा

" बोल ना सीमा ताई ",.. राजा

हळू..

" काय झालं?",. राजा

" आईला समजता कामा नये ",...सीमा

" काही झालं आहे का? ",... राजा

हो...

"तू दाराकडे लक्ष ठेव आई आली तर आपण गप्प बसू",... सीमा

"का पण असं?",.. राजा

"सांगते मी थांब जरा",... सीमा

सीमाने पर्समधून पाच हजार रुपये काढले आणि राजाला वापस दिले

" हे काय, राहू दे ना तुझ्याजवळ पैसे, उद्या जर तो मुलगा आला तर तुला त्याला देता येईल",.. राजा

"आज आला होता तो मुलगा मला भेटायला, त्याने नाही घेतले पैसे ",... सीमा

" का आता? अस केल त्याने? , काल खुप घाई करत होता तो पैशाची ",... राजा

" हो ना आज बोलला नको पैसे, राजा ऐक ना... त्या मुलाने मला लग्नासाठी विचारलं आहे",.. सीमा

"काय? कोण आहे तो मुलगा? त्याची एवढी हिंमत, अजून एक दोन दा भेटले आहेत ना तुम्ही? , त्याचं काय उद्देश आहे नक्की? ",... राजा

"हो ना मला पण खूप राग आला होता त्याचा, तो बोलला की त्याला पैसे नको आहे",... सीमा

" कोण आहे तो कुठे राहतो",.. राजा

" तो तुझ्या ऑफिस मध्येच कामाला आहे, त्याच गावात राहतो ",.. सीमा

" कोण? काय नाव?", ... राजा

" आदित्य नाव आहे त्याचं ",... सीमा

"काय बोलतेस आदित्य... नक्की कसा आहे दिसायला? ",... राजा

" मी एवढं बघितलं नाही पण त्याची कार मोठी आहे",... सीमा

" तो नक्कीच देशमुख इंडस्ट्रीज मध्येच कामाला आहे का?",... राजा

"हो त्याने सांगितलं मला",.. सीमा

"नक्की का? ",... राजा

" हो काय झालं",... सीमा

"कारण आमच्या साहेबांचं नाव पण आदित्य आहे आणि त्यांच्याकडे पण मोठी कार आहे, कोण होतं सोबत अजून",.. राजा

"कोणी नाही तो मुलगा एकटाच होतं आणि तो माझ्यासोबत बसने शाळेपर्यंत आला, बहुतेक श्रीमंत असेल तो कारण त्याच्याकडे पाचशे रुपये होते तिकीट काढायला पैसे नव्हते",.. सीमा

"नक्की काय प्रकरण आहे हे आदित्य साहेब असतील तर फारच चांगला आहे",.. राजा

" काहीही काय बोलतोस तू राजा, मला अजिबात लग्न करायचं नाही, म्हणूनच तर मी म्हटल आईसमोर बोलू नको, जर आईला समजलं त्या मुलाने मला लग्नासाठी विचारलं तर ती उद्या डायरेक्ट साखरपुड्याच्या तयारीने त्या मुलाकडे जाईल ",.. सीमा

" कोण आहे पण तो",... राजा

"मी इथे तुला मी काय सांगते आहे राजा आणि तुझं काय चाललं आहे ",... सीमा

"अगं पण ते आदित्य साहेब आहेत, विचार कर पागल, शिकायला वगैरे कुठे होता तो मुलगा तू विचारलं का नाही",... राजा

" मी नाही विचारलं पण जेव्हा शाळेत आबा देशमुख आले होते तेव्हा मला असं वाटलं की त्यांचा चेहरा आदित्यशी मिळतो ",.. सीमा

" बापरे मग ते नक्की आदित्यसाहेब असशील",... राजा

" कोण रे आदित्य साहेब ",... सीमा

" अगं देशमुख इंडस्ट्रीचे मालक आबा देशमुख यांचा मुलगा आदित्य सर माझे बॉस, तु ज्या शाळेत काम करते त्या शाळेचा मालक ",... राजा

" एवढा मोठा मनुष्य कशाला माझ्यामागे येईल आणि त्यांचं परदेशात पण शिक्षण झालं आहे ना, ते त्यांच्या तोलामोलाच्या घराण्यात लग्न करतील, माझ्यासारख्या अतिसामान्य मुलीच्या मागे कशाला येतील? हा दुसरा आदित्य असेल, राजा तू उगीच खुश होतो आहेस ",.. सीमा

" आता कशी काय माहिती काढायची की नक्की कोण आहे हा आदित्य? कुठे भेटला होता तो नक्की तुला आज? कुठे भेटला तो नेहमी ",... राजा

" तो आदित्य स्टॅंडवर भेटला होता आज ",.. सीमा

राजा विचार करत होता नक्की काय प्रकरण आहे हे? सीमा व्यतिरिक्त अजून कोणीही त्या मुलाला बघितलं नाही, नक्की आदित्य साहेब आहेत का ते? असले तरी कसं विचारणार आपण? काय करता येईल नक्की? उद्या थोडस आडून आडून बोलून बघू का? नको सीमाला सांगू तपास करायला

मीनाताई आत मध्ये आल्या, सीमा आणि राजा गप्प बसले, सीमा विचारात होती एवढा श्रीमंत मुलगा कसा काय माझ्या मागे आला? काय करुया नक्की? त्याला विचारू का तूच आदित्य देशमुख आहेस का?

राजा विचार करत होता खरंच आदित्य साहेबांनी सीमाला विचारलं का लग्नासाठी? बापरे हे जर खरंच झालं तर किती छान होईल, ते साहेब खूपच चांगले आहेत त्यांच कधीच काही प्रकरण मी ऐकलं नाही, किती श्रीमंत लोक आहेत ते, आबा देशमुखांची पर्सनॅलिटी किती इम्प्रेसिव आहे, जर हे खरं असेल तर सीमाने नशीबच काढलं, यासाठी तीच आधीच लग्न कॅन्सल होत असेल, तिच्या नशिबात एवढ चांगल स्थळ असेल, खूप चांगलं होईल ताईचं तिकडे, मलाही सपोर्ट होईल, आई आम्ही सगळे खुश राहू, पण अजून एवढा पुढचा विचार करायची गरज नाही, नक्की माहिती नाही तो मुलगा आदित्य साहेब आहे का? काय करू, समजेल लवकर नक्की कोण आहे ते,

मीना ताई झोपल्या...

"ताई उद्या जर तो आदित्य तुला भेटायला आल तर त्याचा गुपचूप फोटो घेशील का?",... राजा

"अरे राजा अस कस घेणार फोटो त्याचा, त्याला समजल तर? मी नाही अस करु शकत",... सीमा

"मग कस समजणार कोण आहे तो ते ",.. राजा

"पण तो कोणीही असो काय फरक पडतो, मला लग्न करायच नाही त्याच्याशी ",... सीमा

" का? तो जर आदित्य देशमुख असेल तर? ",... राजा

" तो कोणीही असेना, मला आई सोबत तुझ्या सोबत रहायच आहे ",... सीमा

" अग अस करु नको ताई, काय झाल नक्की, परत विचार कर, तुझ्या नशिबात एवढा चांगला मुलगा येणार असेल म्हणून आधीचे स्थळ कॅन्सल झाले ",.. राजा

"अस काही नाही तुला माहिती आहे ना माझ लग्न सुरुवातीला ठरत नंतर जेव्हा त्यांना समजत की दत्तक घेतलेली मुलगी आहे, तेव्हा मोडत, आणि हुंडा ही प्रॉब्लेम आहे, माझा विरोध आहे हुंडा द्यायला घ्यायला",.... सीमा

" पण या वेळी ही अस होईल अस कशावरून? अग ते श्रीमंत लोक कशाला घेतील हुंडा तुझ्या कडून ",... राजा

" अरे पण कश्या वरुन तो मुलगा तोच आदित्य आहे, गाडी दुरुस्ती साठी पैसे मागत होता ना तो पाच हजार रुपये ",.. सीमा

" अग तो मुद्दाम चिडवत असेल तुला, बघु काय होतय पुढे ते",.. राजा

" तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस राजा? माझ्या का त्या आदित्यच्या? ",... सीमा

मीना ताई उठल्या..." काय खुपपुस चालली आहे, झोपा आता, उद्या जायच नाही का दोघांना, सीमा आराम कर उद्या शाळेचा पहिला दिवस ना", ...

हो आई...

🎭 Series Post

View all