©️®️शिल्पा सुतार
........
........
मीना ताई, राजा हॉस्पिटल मध्ये आले, सीमाच्या हाताला पट्टी बघून ते दोघ घाबरून गेले होते , राजा पटकन तिच्या जवळ येवून बसला, मीना ताई अति काळजी करत होत्या, सीमा आई भाऊला बघुन एकदम इमोशनल झाली होती,..." आई राजा ठीक आहे मी एकदम, अजिबात काळजी करू नका ",
"हो सीमा ठीक आहे, थोडा हात मुरगळला आहे, आता सीमाला आराम दोन तीन दिवस, मला काम पुरणार आहे",.. आदित्य मुद्दाम लाइट वातावरण निर्माण करत होता
"हे झाल कस? तुम्ही लोक आम्हाला काही सांगत नाही ",.. मीना ताई चिडल्या होत्या
"तो विक्रम गुंड आहे आई, दुर्दैव आपल, त्याला नाती गोती समजत नाही",... आदित्य
" तुम्ही ठीक आहात का? ",.. मीना ताई
" हो एकदम ओके आहे मी ",.. आदित्य
" आबा कुठे आहेत?",.. मीना ताई
आबा आत बसलेले होते रूम मध्ये, आक्का बाजूच्या सोफ्यावर होत्या, मीना ताई राजा त्यांना जावून भेटले, आक्का लगेच उठून त्यांना भेटल्या, मीना ताई त्यांना धीर देत होत्या
" आम्हाला माफ करा ताई विक्रमने बघितल ना काय केल आज, सीमाला खूप त्रास झाला",.. आबा
"तुम्ही सगळे आहात सीमाच्या पाठीशी, त्यामुळे काळजी नाही आम्हाला, तुम्हाला किती लागल, काय म्हटले डॉक्टर, कसे काय पडले तुम्ही? ",... मीना ताई
"विक्रमने ठकलल... टेस्ट सुरू आहेत, काहीही झाल नाही मला, पण मुल ऐकत नाहीत म्हणून अॅडमिट केल",.. आबा
आक्का नक्की काय झालं ते सांगत होत्या,
" बापरे कठीण दिसतोय विक्रम, निदान आबांच्या वयाचा तरी विचार करायचा ",.. मीना ताई
सीमा आदित्य आत आले,..
" कसा आहे हात? काय म्हटले डॉक्टर?",.. आक्का
"ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही ",.. सीमा
" पट्टी का एवढी मोठी लावली मग, फॅक्चर आहे का हात ",.. आबा
" नाही सपोर्ट साठी दिली एक दोन दिवस",.. सीमा
" आम्ही चहा घेवून येतो, तुम्ही येताय का दोघी आई, आबा तुमचा चहा पाठवतो आत ",.. आदित्य
आबांनी आग्रह केला, ते सगळे कॅन्टीन कडे गेले
आक्का मीना ताई एका टेबल वर बसला होत्या
सीमा आदित्य राजा एकीकडे होते
सीमा आदित्य कडे बघत होती, राजा गप्प होता, तो चिडलेला दिसत होता खुप, आदित्य जावून राजा जवळ बसला
"राजा शांत हो काय झालं चिडला का तू",.. आदित्य
"तुम्ही दोघांनी मला आधी का नाही सांगितल विक्रम बद्दल, चांगल ठीक केल असत मी त्याला, ताई तू मला नेहमी फोन करते ना, का नाही सांगितल",.. राजा
"राजा अरे मला समजत आहे तुला काय वाटतं ते, पण मला वाटल नाही विक्रम अस काही करेन, अजिबात काळजी करू नकोस, आता आम्ही सगळे ठीक आहोत ",.. सीमा
" मी विक्रमला सोडणार नाही ",.. राजा
" राजा प्लीज , आता नका कोणी मारामारी करू मला भिती वाटते",.. सीमा घाबरेल होती
" नाही करणार तो काही, मी आहे राजा सोबत, सीमा टेंशन घेवू नकोस ",... आदित्य
चहा झाला, आबांची ट्रीटमेंट सुरू झाली,
सीमा आई सोबत होती,.." घरी चलते का सीमा आज?",
"आई नको घरी खूप गोंधळ झाला आहे, मला घरी सगळ्यां सोबत राहिल पाहीजे ",.. सीमा
" अग पण तुझा हात दुखतोय ना, तुला आरामाची गरज आहे",.. मीना ताई
हो
" मग कस करणार काम ",. मीना ताई
" आहेत मावशी, स्वयंपाक करतात त्या, आदित्य करेल बाकीचे कामे, उद्या इलेक्शन आहे तर तिकडे जायच आहे",.. सीमा
"ठीक आहे काळजी घे बाई जास्त काही बोलला का तो विक्रम तुला ?, असा कसा मागे आला तुझ्या तो? ",.. मीना ताई
"काय माहिती आई माझ्या मागे का लागलाय तो, घाण घाण बोलला तो मला की त्याचे माझे आधी पासून संबध होते, मला बोलला सगळे आले म्हणून सुटली, बघ ना आई कधी पाहिल होत का ग आपण या लोकांना, शाळा कॉलेज नौकरीत वेळ गेला माझा आणि राजाचा, संध्याकाळी ही बिझी असायचो आम्ही, इथे कुठे कोणाकडे बघायला वेळ होता ",... सीमा
" हो ना किती मेहनत केली माझ्या मुलांनी, का अस पण आरोप करतात ते, ओळख ही नाही आपली आणि त्यांची",.. मीना ताई
" माहिती नाही ग, या लोकांची आधी पासून काही तरी दुश्मनी आहे, आता तर धमकी ही दिली मला की पाहून घेईन अस",.. सीमा
आता ग?
"आदित्य आहे सोबत काही काळजी करू नकोस, तिथून आम्ही घर बदलतो आहोत, अग आई आज आम्ही खरं तर शाळा सुटल्यावर घरी येणार होतो पण हा गोंधळ झाला, रविवारी फिरायला जाणार होतो आम्ही",.. सीमा
मग आता? ..
"आता नको, नंतर जावू, घरी आई आबा कसे राहतील",..सीमा
हो ठीक आहे..
राजा बसलेला होता, आदित्य राजा जवळ गेला, राजा चल आपण पोलिस स्टेशनला जावून येवू, दोघ निघाले,
" राजा सीमा समोर विक्रमचा विषय नको काढूस , ती खूप घाबरलेली आहे, आपण बघू चांगल विक्रम कडे, मलाही हिशोब चुकता करायचा आहे, सीमाला हात लावला का, मी त्याला बरबाद करून टाकेन" ,... आदित्य
"मलाही खूप राग येतो त्याच्या, मला एक चान्स द्या साहेब मी बघतो त्याच्या कडे ",.. राजा
" नाही राजा तू पडू नकोस यात, मूर्ख आहे तो विक्रम, उगीच तुझ्या मागे लागेन, आणि साहेब काय आता, आपण ऑफिस मध्ये आहोत का, आदित्य म्हण",.. आदित्य
ठीक आहे जिजू...
दोघ पोलिस स्टेशनला आले, काका बाहेर बसलेले होते, आदित्य राजा त्यांच्या कडे न बघता आत आले, कंप्लेंट नोंदणी झाली, काका सारखे आदित्यच्या मागे होते
" आदित्य ऐक अस करु नको एक चान्स दे विक्रमला, अरे भाऊ भाऊ तुम्ही एकत्र रहायला हव, मी सांगतो विक्रमला तुमच्या सगळ्यांची माफी मागायला ",... काका
"काही उपयोग नाही त्याच्या काका, मला नको माफी, आणि तुम्ही काहीही बोलला आहात सीमा बद्दल ते मी कधी विसरु शकत नाही, लहानपणीच्या पासुन चान्स देतो मी त्याला, आता सीमाच्या बाबतीत मी ऐकुन घेणार नाही, तुम्ही या गोष्टीत पडू नका, घरी जा काका, विक्रमची सुटका नाही आता, आणि माझ्या मागे मागे करू नका काही उपयोग नाही होणार",... आदित्य
" आदित्य मी माफी मागतो, थांब रे, कर काही तरी विक्रम साठी", .... काका
ते शक्य नाही काका...
आदित्य, राजा निघाले हॉस्पिटल मध्ये आले,
सचिन आलेला होता तिथे, राजा सीमा सोबत होता, तो सीमाशी बोलत बसला होता, सीमा रिलॅक्स होती आता बरीच, राजा तिला हसवत होता
" केली का पोलिस कंप्लेंट? ",.. सचिन
" हो बघ ना कसा वागला तो विक्रम, सीमाचा हात धरला, आबांना खाली पाडल , काही कमी जास्त झाल असत तर? , आबांच वय काय? काही अक्कल नाही त्या विक्रमला, आणि तो सीमा बद्दल अजुन ही घाण घाण बोलतो आहे की माझी सीमाची पूर्वी पासून ओळख आहे, आमचे संबध आहेत ",.. आदित्य
"मूर्ख आहे तो, अतिशय घाणेरडा मुलगा आहे तो, चांगली अद्दल घडव आता त्याला उगीच नातेवाईक आहे म्हणून सोडू नकोस ",.. सचिन
" अरे ही सीमा इतकी साधी आहे, मला होकार द्यायला तिने किती वेळ घेतला, ती काय अस इतर मुलांशी संबध ठेवणार, लग्नाला ही नकार दिला होता तिने माहिती आहे ना तुला , म्हणे गरीब मुली अश्या असतात श्रीमंत मुलांना हाताशी धरून ठेवतात",... आदित्य
" कोण बोलाल अस बापरे किती घाण ",... सचिन
काका बोलले,..
" मी श्रीमंत आहे ना, मी रेडी असून सीमा नकार देत होती लग्नाला, किती घाबरत होती ती मला, तुला माहिती आहे ना, सीमाने राजाने कष्ट करून शिक्षण केल, नौकरी मिळवली, ती काही माझी बायको आहे म्हणून शाळेत नौकरी करत नाही, तर तेवढी शिकलेली आहे ती, स्वतः मिळवली तिने ही नौकरी, ते ही आबांना इंटरव्ह्यू देवून ",.. आदित्य
" या गावठी मूर्ख लोकांना काय समजणार रे, आता कशी आहे सीमा वहिनी ",.. सचिन
" वाईट वाटल तिला, आता ठीक आहे ती, मी पण चिडलो होतो आज सीमा वर, खूप काळजी वाटते तिची, आम्ही घर शिफ्ट करतो आता तिथून, फॅक्टरी जवळच्या बंगल्यात जावू रहायला ",.. आदित्य
" ते बर राहील",.. सचिन
" मी आधीच करायला हव होत हे लक्ष्यात आल नाही घराची सिक्युरिटी वाढवावी लागेल ",.. आदित्य
सगळ्या टेस्ट झाल्या, दुपारी सगळे तिथे जेवले कॅन्टीन मध्ये, आबा झोपले जरा वेळ,
......
......
निशाचा मेसेज आलेला होता,.." कुठे आहेस? हनीमूनला गेलीस का? मजा आहे बाबा, तुम्ही फिरा छान, आम्ही बसतो घर काम करत ",
निशाचा मेसेज बघून सीमाला हसू आल, ही पण ना नौटंकी नुसती,
" घरी आहे, करते नंतर फोन",.. सीमाला माहिती होत निशा तास घेत असेल
.......
.......
पवार साहेबानी प्रशांतला फोन केला,.." तुला समजले का विक्रमचे प्रताप? ",.
काय झालं?
" विक्रमला अटक झाली, आज सकाळी काहीतरी गोंधळ झाला खूप, विक्रम आदित्य साहेब यांच्यात मारामारी झाली, मॅडमच नाव घेतल विक्रमने आबांना ढकलल",... पवार साहेब
"मी आधी पासून बोलत होतो त्याला नीट वाग तो ऐकत नव्हता",.. प्रशांत
" इकडे वातावरण खूप तापल आहे, दोन तीन दिवस तुम्ही इकडे फिरकू नका ",.. पवार साहेब
" आता मी काय केल पण? मी चांगला आहे ना ",.. प्रशांत
" हो पण वाईट संगत सोबत ठेवली तर थोडी फार बदनामी आपली ही होते हे समजून घ्या, आता त्या विक्रम च्या मदतीला जावू नका ",.. पवार साहेब
हो बरोबर आहे
..........
..........
अनघा शरद राव अचानक आले
अनघा पळत जावून आबांना भेटली.. ती रडत होती, सगळे आबांच्या रूम मध्ये जमले, आक्का अनघाला समजवात होत्या
"अरे काय चाललय ताई, आबा ठीक आहेत एकदम, सहज अॅडमिट केल त्यांना",.. आदित्य
सीमा कुठे आहे? ,... अनघा सीमाला भेटली, काय झालं हाताला, जास्त आहे का? , किती खराब वागला तो विक्रम तुझ्याशी, शरद जिजु सीमाशी बोलत होते, इतके दिवस का थांबली सीमा? फोडून काढायच होत त्या विक्रमला,
" हो आजही ती त्याला मारायला घाबरत होती ",.. आबा
"साधी आहे सीमा खूप, पण बदल कर आता स्वतः त, असे लोक कायम भेटतात जिकडे तिकडे, तुला तुझ सडे तोड रहाव लागेल",.. अनघा
हो ताई,
"तुला कोणी सांगितल हे सगळ, धावपळ झाली तुमची",.. आदित्य
"आजीला फोन केला होता मी, ती सांगत होती ",... अनघा
" सुमित कुठे आहे?", ... आक्का
" तो घरी आहे आजी कडे त्यांच्या, हे अस ऐकुन अनघा रडत होती घरी, मग मी तिला इकडे घेवून आलो, एकदा प्रत्यक्षात भेटल की बर असत, पण मला मला लगेच वापस जायचं आहे घरी, अनघा राहिली इथे, मी नंतर येतो तिला घ्यायला, सुमित एकटा आहे ना घरी आजी-आजोबां सोबत",.. शरद
" अनघा ताई तुही कशाला धावपळ करतेस तू ही जायच असेल तर जा सुमित एकटा आहे, आम्ही ठीक आहोत सगळे ",.. आदित्य
" नाही मला राहायचं आहे , सुमीत रहातो व्यवस्थित घरी रोज, काही प्रॉब्लेम नाही, आबा मी तुमच्या सोबत रहाते" ,.. अनघा
" ठीक आहे, आम्हाला वाटल तुमची गैरसोय होते म्हणून बोललो मी",.. आदित्य
आबांना घरी सोडलं, सगळे घरी आले, मावशींनी सगळ्यांना पाणी दिलं, चहा ठेवला,..." जेवले आहात का तुम्ही सगळे? ",
" हो जेवलो आहोत, नाश्त्यासाठी काहीतरी करू या का ",.. सीमा आत मध्ये जात होती
" सीमा इकडे ये, हात सांभाळ काही करू नको",.. आक्का
चहा नाश्ता झाला, मीनाताई राजा घरी गेले,.. "उद्या ये ग सीमा घरी जरा वेळ",..
"आम्ही उद्या इलेक्शन साठी जाणार आहोत, जर लवकर आलो तर येईन, तसा मी फोन करते ",.. सीमा
ठीक आहे
जरा वेळाने शरद राव घरी गेले
आबा आक्का रूम मध्ये होते, आदित्य सीमा अनघा पुढे बसले होते,
"काय झालं नक्की आदित्य सीमा? विक्रम का एवढा चवताळला? ",... अनघा
" काय माहिती ताई, तो असाच त्रास देतो आहे आम्हाला, आधी माझ्यावर जळत होता, आता सीमाच्या मागे आहे तो ",.. आदित्य
" सीमा तुला कधी समजलं विक्रम त्रास देतो आहे तुला, तुम्ही लोकांनी आधीच ॲक्शन का नाही घेतली ",.. अनघा
" तो माझ्याकडे बघत होता इतर वेळी, काही समजलं नाही की त्याचा विचार काय असेल, एवढ्या टोकाला जाईल तो वागायला असं वाटलं नव्हतं",.. सीमा
" आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर सगळ्यांनी नेहमी सावध राहायला पाहिजे, लोक असे खराब आहेत ना आजुबाजूला काय करणार, इतर लोक टपलेलेच असतात हमला करायला, तू तर खूप सुंदर आहेस सीमा , सावध रहात जा, तुला यापुढे जिथे सेफ नाही वाटल तर लगेच स्वतः एक्शन घेत जा किवा आदित्य त्याला सांगत जा आणि आदित्य तू सुद्धा जरा सिरीयसली घे सीमा ने काय सांगितलं की लवकर ॲक्शन घेत जा",.. अनघा
" हो ना ताई आम्ही आधीच तिकडे त्या फॅक्टरी जवळच्या बंगल्यावर राहायला जाणार होतो, पण खूप वर्षे या घरात राहिल्यामुळे आई नाही म्हणत होती",.. आदित्य
" हो ना आई ला काय माहिती विक्रम अस वागेन, पण सेफ्टीच्या दृष्टीने आता घर बदलून टाका ",.. अनघा
" हो, आणि आपल्या शेतातुन त्यांच्या जायचा रस्ता बंद करतो मी जा म्हणा आता गावाला वळसा घालून, फार सुट दिली त्यांना कंपाऊंड टाकून घेतो आपल आपल ",.. आदित्य
"हो तेच कर आता दया माया नको, तुम्ही दोघं फिरायला जाणार होते ना त्याचं काय झालं",.. अनघा
" आम्ही जाणार होतो रविवारी पण आता हे झालं त्यामुळे सीमा नाही म्हणते आहे",.. आदित्य
" तुम्ही दोघं जाऊन या ना मी आहे आबा आक्कां जवळ",..अनघा
" नको काही प्रॉब्लेम झाला तर?, आम्ही पुढच्या आठवड्यात जातो आरामात ",.. आदित्य
ठीक आहे...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा