©️®️शिल्पा सुतार
........
........
आदित्य घराबाहेर निघाला, आबा आक्का घाबरून गेले होते, सीमाला समजत नव्हत काय कराव, आबा निघाले, सीमा मागे गेली,
आदित्यने मागच्या बाजूने विक्रमला पळतांना बघितल, तो त्याच्या मागे पळाला, विक्रम पुढे आदित्य मागे बराच वेळ पळल्यानंतर आदित्यने विक्रमला गाठलं,
विक्रम थांब... विक्रम, आदित्यने त्याला पकडून दोन ठोसे ठेवून दिले, विक्रम थोडा बाजूला जाऊन धडपडला,.. "तुझी हिम्मत कशी झाली आमच्या घरात यायची, तू जिच नाव घेतो ती बायको आहे माझी, किती घाण वागण तुझ विक्रम " ,
विक्रम उठला,.. "बायको खूप सुंदर आहे तुझी आदित्य, तुला वाटत तेवढी भोळी नाही ती" ,
आदित्यने त्याला परत एक ठोसा ठेवला,.. "तोंड बंद कर विक्रम, सीमा बद्दल काहीही ऐकुन घेणार नाही मी",
" काहीही म्हण जबरदस्त हात मारला यार तु",... विक्रम
" विक्रम तुझे विचार फार घाण आहेत, समजतंय का काय बोलतो आहेस तू? तुझ लग्न जमल ना पूजा शी, तिच्याशी प्रामाणिक रहा ना",.. आदित्य
"नाही ना ती सीमा नाही ना, मला सीमा हवी ",.. विक्रम
आदित्यने त्याला ठोसा ठेवण्यासाठी हात उचलला, तो विक्रमने वरती धरला , दोघांची ढकलाढकली सुरू होती, विक्रमही कमी नव्हता तो आदित्यला पुरून उरतं होता,
" मला बोलायच आहे तुझ्याशी आदित्य, मारामारी थांबव, हे बघ तुझी बायको सीमा तिचे आणि माझे पूर्वीपासून संबंध आहेत, आज मी तुम्हाला सापडलो, आम्ही असं नेहमीच भेटतो, मी सीमा ला लग्नाआधी भेटत होतो, तुझ्याशी लग्न करायचा प्लॅन होता तिचा",.. विक्रम
आदित्य पुढे झाला त्याने सटकन विक्रमच्या थोबाडीत मारलं,.. "किती खोटं बोलणार आहेस विक्रम तू, का माझ्या आयुष्यात विष कालवतो आहेस, आता नाही पूर्वीपासून तू असं करतो आहेस, पुर्वी ठीक होतं माझ्यापर्यंत होतं, आता तू माझ्या बायकोच नाव घेतो आहेस, हे मला अजिबात चालणार नाही",..
विक्रम समोरून चाल करून आला, तेवढ्यात बॉडीगार्ड आणि सीमा तिथे आली बॉडीगार्डने विक्रमला पकडलं, आदित्यने परत पुढे होऊन त्याला दोन-तीन ठोसे मारले, आबा आले तोपर्यंत मागून, काका-काकू पळत येत होते, बॉडीगार्डने विक्रमला धरून ठेवल होत
" सोडा त्याला सोडा ,.. काय चाललं आहे हे आदित्य? तू नेहमी आमच्या विक्रमला पाण्यात बघतो?, त्याने एवढस जरी काही केल तरी खूप काही झाल्या सारख कांगावा करतोस तू, या पुढे मी ऐकुन घेणार नाही, सोडा विक्रम ला",.. काका
" तुम्हाला माहिती आहे का काका नक्की काय झाल इथे, उगीच कशाला मध्ये पाडताय, एवढा हुशार आहे का तुमचा विक्रम? विचारा त्याला त्याने काय केलं आहे आज? बऱ्याच दिवसापासून तो त्रास देतो आहे आम्हाला, आज तो आमच्या घरात शिरला आणि त्याने सिमाचं नाव घेतलं",.. आदित्य
" नाही पप्पा मी सीमाला आधीपासून ओळखतो, माझे आणि तिचे संबंध आहेत",.. विक्रम सीमा कडे अधाशासारख बघत होता,.." सीमा सांग सगळ्यांना, नको घाबरू मी आहे तुझ्या सोबत ",
सीमा तिथेच उभी होती, ती आबां कडे गेली ,.." किती खोटं बोलतो आहे हा, मी याला ओळखत नाही आबा, आदित्य विक्रम खोट बोलतो आहे, का असं माझ्याबद्दल खोटं पसरवत आहे विक्रम, माझी बदनामी का करतो आहेस, मूर्खासारखे काहीही बोलू नकोस ",..
" मला माहिती आहे सीमा हा विक्रम किती खोटारडा आहे, तू काळजी करू नकोस, घरी जा लगेच इथे थांबू नकोस ",.. आदित्य
"सीमा इकडे ये ",.. आबा बोलवत होते, विक्रमला थोबाडीत ठेवून दे, मी बघतो काय करायचं ते पुढे,
" काय बोलत आहात तुम्ही आबा, या पोरीचे लक्षण काही ठीक नाहीत, ते दिसत नाही का तुम्हाला? , या गरीब घरच्या पोरी अशाच असतात, श्रीमंत मुलं ते हाताशी धरून ठेवतात",... काका
आबा काकांकडे रागाने बघत होते,.. "मूर्खासारखे बडबड करू नको, तू कोणाबद्दल बोलतो आहे समजत ना? ती सून आहे माझी, शिकलेली मुलगी आहे, टीचर आहे शाळेची, चांगल्या घरची मुलगी आहे, तेव्हा जरा तोंड सांभाळून बोल ",
सीमा आश्चर्याने काका कडे बघत होती, किती घाण विचार आहेत हे
आबा सीमा जवळ आले,... "सीमा ऐकु नको त्यांच, ते आता सापडले तर मुद्दाम दुसर्या वर आळ घेतात, नेहमीची सवय आहे ही त्यांची, पण या वेळी माझी सून समोर आहे आणि तिच्या बद्दल मी काहीही ऐकणार नाही",
तेवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर तिथे आले त्यांनी विक्रमला ताब्यात घेतलं
"सोडा त्याला",.. काका मध्ये पडले, काकू रडत होत्या,
इन्स्पेक्टर साहेबांनी विक्रमला बेड्या ठोकल्या
" हे फार पूर्वीच करायला पाहिजे होतं मी, कोणीही विक्रमची बाजू घेवू नका, चुकीच्या गोष्टीला सपोर्ट नको",.. आबा
आदित्य साहेब तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यावे लागेल, गुन्हा नोंदणी करून घेवू, थोडं काम होतं
" इन्स्पेक्टर साहेब सिमाला विक्रमच्या कानामागे मारायची आहे",.. आबा
यापुढे मॅडम....
सीमा नाही म्हणत होती, आबांनी तिला रागवलं, सीमा पुढे जा, आटोप, विक्रम तिच्याकडे बघत होता, तिने विक्रमला एक कानामागे मारली,
"आता सगळे आल्यामुळे सुटली तू, पुढे काय करशील? माझ्याशी गाठ आहे ",.. विक्रम हळूच बोलला
" काय म्हणतो आहे हा? ",.. आबा
"तो म्हणतो आहे की आता सुटली सगळे आल्यामुळे, पुढे काय करणार गाठ माझ्याशी आहे",... सीमा
आदित्यने पुढे होऊन त्याला थोबाडीत मारली,.. "बघितलं काका-काकू कसे लक्षण आहे त्याचे, नाते समजता की नाही याला? ",
इन्स्पेक्टर साहेब विक्रमला घेऊन गेले
आदित्य, आबा, सीमा, बॉडी गार्ड घरी आले, आदित्य येऊन आक्कांना भेटला, आजींना भेटला, मी ठीक आहे आई काळजी करू नकोस, आजी पण घाबरलेल्या होत्या
डॉक्टर आलेले होते, त्यांनी आबांना तपासलं, आदित्यला थोडं फार लागलेलं होतं, त्याला मलमपट्टी केली,
सीमा गप्प उभी होती, सीमाचा हातही दुखत होता, पण ती काही बोलली नाही
" आबा तुम्ही ठीक आहात ना? ",.. आदित्य
"हो एकदम ठीक आहे मी \",. आबा
मावशी सगळ्यांसाठी चहा आणि पाणी घेऊन आल्या,
" आदित्य साहेब तुम्ही एक मिनिट इकडे या",... डॉक्टर
हो येतो...
डॉक्टर बाहेर जावुन बसले,
" काय गोंधळ झाला सकाळी सकाळी? , विक्रम कसा काय आत मध्ये आला? , काय करता काय तुम्ही लोक? , दार उघडं होतं का पुढचं? ",.. आदित्य चिडला होता
" हो आम्ही फिरायला गेलो होतो, आजी समोर बसलेल्या होत्या, सीमा किचन मध्ये होती",.. आक्का
"दार बंद करायच समजत नाही का तुला सीमा?, माहिती आहे ना आजुबाजुला कसे लोक आहेत ते, आज काही करता काही झाल असत तर काय करणार होतो आपण, कुठे कुठे लक्ष देणार आम्ही, स्वतः च स्वतः समजत नाही का? ",.. आदित्य खूप बोलला सगळ्यांना, प्रचंड चिडलेला होता तो ,
सीमाच्या डोळ्यात पाणी होत, ती किचन मधे आली, जरा वेळ तिथे थांबली, हात खूप दुखत होता तिचा, खूप जोरात विक्रमने हात पकडला होता, तिने फ्रीज मधुन बर्फ काढून हात शेकला थोडा,
" सीमा... सीमा इकडे ये, आदित्य अजून ही मोठ्याने ओरडत होता, इकडे येवून बस, आम्ही बोलतो आहोत ना काय करते तू आत",.. आदित्य
सीमा बाहेर येवून बसली
"आदित्य अरे कशाला चीड चीड करतोस पुरे आता ",.. आक्का
" चीड चीड करतो म्हणजे काय आई? अग तो विक्रम धमकी देवून गेला सीमाला की बघून घेईन म्हणून, आज सुटली तू अस बोलला, काळजी वाटणार मला, यापुढे कोणाला ही दार उघडायच नाही सीमा , सिक्युरिटी वाढवून घ्यावी लागेल, आबा आपण फॅक्टरी जवळच्या बंगल्यावर जातो आहोत रहायला आता, आई आणि आता तू हो नाही केल तर बघ, तुम्हाला सगळ्यांना माझ ऐकाव लागेल",... आदित्य
" माझा फोन कुठे आहे, माझा फोन द्या",.. आबांनी इन्स्पेक्टर साहेबांना फोन केला,.." कोणत्याही कंडिशन मध्ये विक्रमला सोडू नका, त्याला जरा दम द्यायचा आहे, आमच्या फॅमिली कडे त्याने पहायला नको परत , लिहून घ्या त्याच्या कडून या पुढे तो त्रास देणार नाही",..
हो साहेब..
" मी येतो दुपारनंतर तिकडे, मग बघू त्याच्या कडे",.. नंतर आबांनी मामांना फोन केला
" बोला काय काम काढलं आबा सकाळी सकाळी ",.. मामा
" तुमच्या होणार्या जावया बद्दल सांगायचं आहे जरा, ते आत्ताच सांगण गरजेच आहे, आधीच उशीर झाला आहे, मी आधीच तुम्हाला सांगायला हव होत",.. आबा
" कोण विक्रम का, काही प्रॉब्लेम आहे का? ",.. मामा
हो..
काय झालं??
"तो बऱ्याच दिवसापासून आम्हाला सगळ्यांना त्रास देतो आहे आणि आज तो आमच्या घरात शिरला आणि आमच्या सुनबाईंच नाव घ्यायचा प्रयत्न केला, तो मुलगा चांगला नाही, तुम्ही बघा त्याच्याशी पूजाच लग्न करायचं की नाही, एवढंच सांगतो की तुमच्या मुलीचं नुकसान होऊ नये म्हणून मी फोन केला आहे",.. आबांनी मी फोन ठेवून दिला
" सीमा इकडे ये हात दुखतोय का? ",.. आजी विचारात होत्या
सीमाने मानेने हो सांगितल,.. मी रूम मध्ये जाते
सीमा रूममध्ये आली, तिच्या डोळ्यात पाणी होत, विक्रमने धरलेला हात तिने बाथरूम मध्ये जावुन धुतला,
विक्रम सगळ्यांसमोर किती घाण घाण बोलला मला की त्याचे न माझे संबंध होते आधी पासून, त्याला नक्की काय करायचं आहे? माझा आणि आदित्यचं लग्न तुटायला पाहिजे आहे का त्याला? मी काय करू आता? आदित्यने काही विचार केला तर? मी आदित्य शिवाय राहू शकत नाही, आदित्य किती चिडला आहे आज, आता मलाही ओरडला आदित्य, किती बोलला मला, मला काय माहिती तो विक्रम असा अचानक आत येईल ते,
अजून आदित्य भेटला नाही मला, तो रागवला तर नसेल ना माझ्या वर, मी आता अलर्ट राहील , विक्रमला मी आधी कधीच भेटली नव्हती कसं काय असं पटवून देऊ मी आदित्यला, पण माझा विश्वास आहे आदित्य समजून घेईन,
"मुली बरं सोप्या सापडतात अशा मुलांना नाव घ्यायला, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले की झाल, हे ही बघत नाही यांच्या वागण्याच्या त्या मुलीच्या आयुष्यावर काय परिणाम होईल, त्या मुलीच जर लग्न झालेल असेल तर तीच लग्न मोडू शकत, कायमच आयुष्य उध्वस्त झाल तर, आदित्य बोलला नाही माझ्याशी तर काय करणार आहे मी, एक तरी इथे मी आदित्यच्या शाळेत टीचर आहे, राजा त्याच्या कंपनीत नौकरीला आहे, आम्हाला दोघांना कामावरून काढल तर, मला आदित्य माहेरी सोडून आला तर, विक्रम का अस केल तू",
आदित्य वरती आलाच नाही तर? मला त्याच्याशी बोलायचं आहे ,... सीमा रडत होती
आदित्य अजून खालीच होता तो डॉक्टरांशी बोलत होता
" ठीक आहेत ना आबा, खूप जोरात पडले ते",.. आक्का काळजी करत होत्या
" तुम्ही म्हणत असाल तर त्यांना आज ऍडमिट करायचं का? एकदा पूर्ण चेक अप करून घेऊ" ,... आदित्य
"चालेल, दोन-तीन तास लागतील, मग सोडून देवू",.. डॉक्टर
" उद्या इलेक्शन आहे आबांच, परत तब्येतीकडे लक्ष राहणार नाही, आई काय करायचं? घेऊन जायचं का आबांना दवाखान्यात ",.. आदित्य
हो चालेल...
" मी कपडे बदलून येतो",.. आदित्य
"अरे मला काहीही झालेलं नाही, मी काही विशेष पडलो नाही, नको आता अॅडमिट वगैरे ",.. आबा
" पडले आहात तुम्ही, जोरात आवाज आला होता",.. आक्का
" हो आपण जातो आहोत डॉक्टर कडे ",.. आदित्य
" आदित्य इकडे ये जरा, पाच मिनिट सीमा कडे बघ, ती घाबरून गेली आहे, मग नाश्ता करून आपण डॉक्टर कडे जावू ",.. आबा
" हो आबा मी जातो रूम मध्ये",... आदित्य
आदित्य रूम मध्ये आला, सीमा कॉटवर बसलेली होती, आदित्य तिच्या जवळ जाऊन बसला, त्याने तिचा हात हातात घेतला, सीमा रडत होती, आदित्यने तिला जवळ घेतल,..." पुरे सीमा आता किती त्रास करून घेणार, बघु हाताला लागल का?, "..
हात खूप दुखत होता... चल तू डॉक्टर कडे एक्स रे काढून घेवू आपण
"एवढ काही झाल नाही मला आदित्य, मी ठीक आहे, मला थोड बोलायचं होत, तो विक्रम जे बोलला ते खरं नाही आदित्य, मी ओळखत नाही त्याला, आम्ही आधी कधी भेटलो नाही",.. सीमा
"मला माहिती नाही का ते सीमा? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि अश्या लोकांनी काही जरी बोलल तरी मला फरक पडत नाही, तू काळजी करू नकोस, तू कशी आहेस हे मला चांगल माहिती आहे, जा आटोप",.. आदित्य
" आदित्य आबा आक्का काय विचार करत असतिल माझ्या बद्दल? , मला खूप कसतरी वाटत आहे ",.. सीमा
" अश्या घाणेरड्या मुलांना मी चांगल ओळखतो सीमा, तू काळजी करू नकोस, चल इकडे ये, मी उगीच ओरडलो तुला, पण मला खूप काळजी वाटत होती तुझी, भीती वाटली काही झाल असत म्हणजे, खरं तर आधीच लक्ष्यात यायला हव होत मला, मीच लक्ष द्यायला हव होत, आपण दुसरी कडे रहायला जावू आता ",... आदित्य
सीमा आदित्य जवळ गेली, तिला आता बर वाटत होत आदित्य जवळ,... आदित्य डॉक्टर कडे नको प्लीज
" काही नाही होणार, ते गरजेच आहे, चल जास्त हात दुखला तर, आज करू ट्रीटमेंट नंतर उद्या वेळ नाही आणि परवा आपल्याला फिरायला जायच आहे ",.. आदित्य
" नको आदित्य, आपण आपली ट्रीप पुढे ढकलु, आबा आक्का एकटे राहतील",.. सीमा
"त्यांना ही घेवून जावू मग, ठीक आहे",... आदित्य
हो...
सीमा आदित्य आबा आक्का हॉस्पिटल मध्ये आले, आबांना अॅडमिट केल, सीमाच्या हाताला प्रॉब्लेम नव्हता, थोडा मुरगळला होता, सिस्टरने काळजी घ्यायला सांगितली, हात सांभाळा एक दोन दिवस थोडा, टेंपररी बंडेज दिल, आदित्य काळजीने सीमा कडे बघत होता,
राजा ऑफिस मध्ये आला, त्याला सचिनशी काम होत तो केबिन मध्ये आला
सचिन आदित्यशी फोन वर बोलत होता, कधी झाल हे? कसे आहेत आबा सीमा वहिनी? , बर झाल, अजून मारल पाहिजे त्याला,.... अरे आदित्य राजा आला आहे
"दे त्याच्या कडे फोन",.. आदित्य
"काय झालं? सीमा ताई ठीक आहे ना? हॉस्पिटल बद्दल काय बोलत होता तुम्ही? ",.. राजा
आदित्य सगळ सांगत होता,.. "काय काय झालं, हे बघ राजा काळजी करू नकोस, सगळे ठीक आहेत इथे, संध्याकाळी येवून जा जरा घरी, सीमाला थोडा आधार हवा आहे",..
" मी आता येतो तिकडे हॉस्पिटल मध्ये ",.. राजा
" आता नको राजा तुझी धावपळ होईल ",.. आदित्य
" मी येतो अर्धा तासात",.. राजा
"मी घरी जातो सचिन सर ",..
ठीक आहे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा