नवी आशा जगण्याची... भाग 25

आता सगळ्या बाजूने प्रॉब्लेम मिटला होता, मेन म्हणजे आबा आणि आक्कांशी बोलून झालं होतं, त्यामुळे आदित्यला छान वाटत होत , राजालाही काही प्रॉब्लेम नाही माझ्याशी,


नवी आशा जगण्याची... भाग 25

©️®️शिल्पा सुतार
........

सीमा स्टाफ रूम मध्ये आली, बापरे माझ लग्न ठरत की काय आता आदित्यशी, विचार करून धडकी भरते आहे मला, पण आदित्य छान आहे, आज बर्‍याच दिवसांनी मला चांगल वाटत आहे, काय करु देवू का होकार मी लग्नाला, समजत नाही काही, सीमा खुश होती, निशा आली असेल का, बघु का जावून, पण निशाने माझा फोन नंबर का बर दिला आदित्यला? तिला सोडणार नाही मी, आज मुद्दाम बोलणार नाही तिच्याशी,

आदित्य विचार करत होता की आता नक्की राजाशी बोलायला पाहिजे, सीमाचा डिसिजन बर्‍या पैकी झाला आहे , पण तरीही कुठल्यातरी गोष्टीला ती खूप घाबरते आहे, आता मीच आमच्या दोघांसाठी डिसिजन घ्यायला पाहिजे, तिच्या लाईफ व तिच्या आयुष्यात कोणी नाहीये तिला माझ्याशी लग्न करायचं आहे पण ती कुठल्यातरी गोष्टी मूळे मागे फिरते आहे, मी आजच राजाशी बोलून बघतो ही गोष्ट, आता लग्नासाठी साठी जास्त उशीर करण्यात तर काही अर्थ नाही, आज पहिल्यांदा सीमा माझ्या सोबत होती किती छान वाटत होत, ती माझ्या कडे बघत होती का आज कार मध्ये, तिच्या विचाराने आदित्य खुश होता

आदित्य ऑफिसमध्ये पोहोचला, ऑफिसच काम सुरू झालं होत, पण त्याच्या ऑफिसमध्ये लक्षच नव्हतं दुपारून आबांसोबत साखर कारखान्यावर जायचं आहे, त्या आधी मला राजाशी बोलल पाहिजे, त्याने राजाला आत बोलवलं

राजा आत मध्ये आला सगळ्या फाईल घेऊन,.. "सर हे काम अर्ध झाला आहे आत्ताशी, तुम्ही बघून घ्या एकदा",..

" मला तुझ्याशी जरा वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे राजा, बहुतेक तुला ही माहिती असेल",.. आदित्य

"बोला ना सर",.. राजा

"मला तुझ्याशी सीमा विषयी बोलायचं आहे, बस जरा राजा",.. आदित्य

राजा खुर्चीत बसला...

"तुला माहिती आहे की नाही पण मला सिमा आवडते आणि मला सीमाशीच लग्न करायचं आहे ",.. आदित्य

"हो सर मला माहिती आहे, मला सीमाताई ने सगळं सांगितलं",.. राजा

" पण तिला थोडा वेळ हवा आहे, तिची अजून हिम्मत होत नाही डिसिजन घ्यायची मला असं वाटत आहे की मी आता हा डिसिजन घ्यायला पाहिजे",... आदित्य

" हो सर ",.. राजा

" या विषयी बोलायचं आहे मला तुझ्याशी काय प्रॉब्लेम आहे सीमाचा? ",... आदित्य

" नाही तस काही नाही प्रॉब्लेम, तीच लग्न मोडल होत आधी, सीमाताईने उगीच काही गोष्टी मनात धरल्या आहेत, त्यामुळे ती थोडी घाबरते ",... राजा

"हो सांगितलं मला आज ती दत्तक घेतलेली आहे आणि हुंडापद्धती तिला मान्य नाही पण या साठी लग्न करायचं की नाही असा विचार करते आहे ते म्हणजे जास्त होतं",.. आदित्य

"हो आम्ही पण खूप समजवलं तिला पण सीमाताई ऐकत नाही",.. राजा

"तू मला मदत करशील का राजा",.. आदित्य

"हो सर सांगा ना काय ",.. राजा

" हे बघ आता मला सीमाशी लग्न करायच आहे त्या साठी मी काहीही करायला तयार आहे, मी सीमाला स्पष्ट सांगणार आहे की तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल नाहीतर मी राजाला नोकरीवरून काढून टाकेल आणि सिमाला ही शाळेतुन काढून टाकेल म्हणजे मी हे फक्त सीमा साठी करतो आहे खरं नाही, ठीक आहे का? ",.. आदित्य

" हो सर चालेल, मला माहिती आहे ते सर ",.. एवढे मोठे साहेब मला मदत मागताय याच खूप छान वाटत होत राजाला

" कारण सीमा एक खूप चांगली मुलगी आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे, ती डिसिजन घेत नाही तर मला डिसिजन घ्यावा लागेल ",... आदित्य

" जर या डिसिजनने सीमाताईच चांगलं होत असेल तर मी तुमच्या सोबत आहे काही हरकत नाही" ,... राजा

"निदान भावा साठी तरी ती मला होकार देईल, तू आता घरी गेल्या वर सीमा मला काही सांगू नको, आता मी ही केस माझ्या पद्धतीने हॅडल करणार आहे ",.. आदित्य

" ठीक आहे सर मी तुमच्या सर साईडने आहे",... राजा

" मला दोन-तीन दिवसांपासून बोलायचं होतं तुझ्याशी पण मला वाटलं की की तुला आवडेल की नाही म्हणून गप्प होतो, पण आज तुझ्याशी बोलून खूप चांगलं वाटत आहे राजा",.. आदित्य

" मला ही सीमा ताईच चांगल व्हाव हीच इच्छा आहे पण आम्ही खूप साध्या घरातले आहोत, रोजच्या जगण्यासाठी स्ट्रगल आहे आम्हाला, तुम्हाला माहिती आहे ना आमच्या परिस्थिती बद्दल, आबा साहेब बाकीचे घरचे काही म्हणणार नाही ना? ",... राजा

" हो माहिती आहे आणि घरात कोणी माझ्या शब्दाबाहेर नाही, तू कशाला काळजी करतो राजा मी आहे ना आपण सोबत राहू छान व्यवस्थित करू सगळ ",.. आदित्य

राजा आता खूप खुश होता, सीमाताई चांगलं होणार होत
......

लंच ब्रेक झाला निशा जेवायला आली सीमा एकटी जेवत होती

" अरे आज माझ्यासाठी थांबली नाहीस तू सीमा?",.. निशा

सीमा काही बोलली नाही तिच्याशी.....

" काय झालं आहे सीमा? तू बोलत नाहीये का माझ्याशी?",.. निशा

सीमा तिकडे तोंड फिरवून घेतलं

"बापरे कोणालातरी खूप राग आलेला दिसतोय",.. निशा

"राग नाही येणार तर काय होणार निशा, मला एक सांग माझा फोन नंबर कोणी दिला आदित्य ला?, तू माझी मैत्रिण आहेस ना, तू मला सपोर्ट कर ना ",.. सीमा

" अच्छा म्हणजे काल फोन आला होता वाटतं साहेबांचा संध्याकाळी, काय बोलण झाल? ",.. निशा चिडवत होती

" तुला काय गरज होती निशा, माझा फोन नंबर का दिला तू त्याला, मला तुझ्याशी बोलायचं नाही ",.. सीमा

" मी दिलाच नाही आहे फोन नंबर राजाने दिला असेल",... निशा

" नाही राजाने नाही दिला आहे काम तूच केलेले आहे आणि मी आता काही बोलू नये म्हणून तू मला सांगत नाही",... सीमा

" पण काय प्रॉब्लेम आहे तुला सीमा आहे एवढा चांगला मुलगा आहे आदित्य, पटकन हो बोल आणि पटकन लग्न करून घे",....निशा

" तुमच्या लोकांची तर बोलण चुकीच आहे आता",... सीमा आत मध्ये चालली गेली

बापरे हिचा राग अजून गेला नाही वाटतं...
....

लंच ब्रेक झाला, आदित्य बाहेर आला, ...." सचिन मी निघतो आहे आता, आणि मी आज राजा शी बोललो",

" सांगितल का त्याला सगळ?, काय म्हटला तो",.. सचिन

" हो त्याला काही प्रॉब्लेम नाही ",... आदित्य

"बर झाल तु लवकर जावून ये",.. सचिन

"हो मी करतो नंतर फोन",.. आदित्य

ठीक आहे....

आदित्य घरी आला, जेवण झालं, आबा आणि तो निघणारच होते साखर कारखान्यावर जायला तेवढ्यात काका आले, आबा आदित्यच्या कपाळावर आठ्या होत्या, महत्त्वाचं काम करायला कुठे जायचं असलं की हे येतात नेहमी,

"आम्ही निघतो आहे आई आता तू काकांशी बोल",.. आदित्य आबा निघाले

काकांनी मागून आवाज दिला,.. "बाहेर चालले आहात का कुठे तुम्ही दोघ?",..

"हो थोडं काम होतं",.. आबा

"थोडं बोलायचं होतं आबा मला",.. काका

" आपण रात्री बोलूया मी आल्यावर फोन करतो",.. आबा

"ठीक आहे",.. बाबा आदित्य निघाले,

अर्ध्या तासात ते साखर कारखान्यावर पोहचले, कदम साहेब त्यांची वाटच बघत होते, त्यांनी स्वतः फिरून सगळा साखर कारखाना आबांना दाखवला, खूप गप्पा मारत होते ते, सगळा इतिहास सांगत होते ते, त्यांचा मुलगा ही भेटायला आला होता, खूप छान बोलला तो, आदित्यला खूप आवडला हा प्रोजेक्ट, मेन म्हणजे साखर कारखाना खूप जुना नव्हता, छान काम करता येईल इथे आणि आबांची इच्छा होती ना, राहतील ते इलेक्शन ला उभे, मी पण त्यांना मदत करेल, काम करेल,

नंतर ते कदम यांच्या घरी गेले, खूप मोठा वाडा होता त्यांचा, एकत्र कुटुंब होत , चहापाणी झालं,

आदित्य आबा निघाले, कदम साहेब त्यांचा मुलगा बाहेर पर्यंत आले होते सोडायला,

"कसा वाटला तुला साखर कारखाना आदित्य",.. आबा

"खुप छान आहे, नवीन आहे साखर कारखाना, तुम्ही नक्की उभे रहा इलेक्शनला आबा",.. आदित्य

" थोडी धावपळ होईल माझी पण मला आवडेल हे काम करायला",... आबा

"मी पण आहे मदतीला आबा तुम्हाला काही लागलं तर सांगा",.. आदित्य

"आपल्याला सगळ्यांना मिळूनच थोडे दिवस काम करावं लागेल यासाठी ",.. आबा

" चालेल ना तुम्ही फक्त सांगा आबा आणि मला शाळेच्या मागच्या जमिनीबाबत थोडं बोलायचं होतं तुमच्याशी",... आदित्य

" बोल ना",.. आबा

" ह्या जमीनीवर कधी अतिक्रमण केलं आहे त्या दुसऱ्या लोकांनी ",.. आदित्य

" बरीच जुनी गोष्ट आहे ही दहा पंधरा वर्षांपूर्वीची ते आपल्याला लक्षातच आलं नाही की कधी त्या लोकांनी आपल्या जागेवर पक्के घर बांधले आणि कसे त्यांनी पेपर्स जमवले काही माहिती नाही",.. आबा

" कोणाचं काम असू शकतो हे? पेपर्स आहेत म्हणजे.. तुम्ही राग मानून घेऊ नका आबा पण हे कोणीतरी जवळचे व्यक्तीच काम दिसतं",.. आदित्य

"मलाही तेच वाटत आहे, समजल मला तू काय म्हणतोस ते, एवढंच आहे की मी ते बोलत नाही",.. आबा

" आता काय करू या काहीही करून आपण ती जमीन परत मिळवायची ",.. आदित्य

"आता थोड्या वेळापूर्वी माझं कदम साहेबांशी बोलणं झालं त्या बाबतीत, ते आपल्याला चांगला वकील मिळवून देणार आहेत, पण ते आपल्या चालू वकीलाला सांगायचं नाही, तो फितूर असू शकतो, त्याच्याकडे पण ती केस राहू द्यायची गोडीगुलाबीने त्याच्याकडून सगळे पेपर काढून घ्यायचे",... आबा

" हे चांगलं राहील मी पण तोपर्यंत जरा चौकशीच करतो आहे की तिथे कोण राहतं आणि त्यांना ते घर कसे मिळाले",... आदित्य

" हो ना जरा टेन्शनच काम आहे ते करोडची जमीन आहे ती",.. आबा

" तुम्ही काळजी करू नका आबा मी आता हळूहळू एकेक प्रॉब्लेम सॉल्व करेल",.. आदित्य

आबा कौतुकाने आदित्य कडे बघत होते

" अजून मला तुमच्याशी ऐका विषयावर बोलायचं होतं आबा, मी ते तसा आईला सांगितलं आहे",.. आदित्य

"बोल ना बेटा ",.. आबा

"मला समजत नाही आहे मी कसं बोलू? ",.. आदित्य

" काय झालं काही प्रॉब्लेम आहे का? ",.. आबा

" नाही तसं नाही पण जरा पर्सनल आहे",.. आदित्य

" काय झालं आहे स्पष्ट बोल आपल्या दोघांमध्ये तसं चांगलं नातं आहे मी तुला कधी काही बोललो आहे का आधी ",... आबा

" नाही आबा तुम्ही खूप चांगले आहात एकदम मित्रासारखे",... आदित्य

" बोल मग पटकन",... आबा

" आबा मला एक मुलगी आवडते ती आपल्या शाळेतच आहे टीचर म्हणून मला तिच्याशी लग्न करायचा आहे",... आदित्य

" काय नाव आहे तिच? तुमची भेट कशी झाली? ",... आबा

" आमची भेट शाळेजवळ झाली आहे आबा, तिचं नाव सीमा आहे ",... आदित्य

" कुठे राहते ती? त्यांच्या घरी कोण कोण आहे ",.. आबा

" बाजूच्या गावाला राहते ती पण त्यांच्या घरी कोण आहे हे अजून पूर्ण माहिती नाही मला आणि सीमाने अजून मला होकार दिला नाही पण मला तिच्याशीच लग्न करायचं",..आदित्य

" हे पण हे असं का करतो आहेस तू? जर तिच्या मनात दुसऱ्या कोणाशी लग्न करायचं असलं तर ",.. आबा

"तसं नाही आहे आबा, तिला दुसरं कोणी पसंत नाही असं तिने मला सांगितलं, तिचा प्रॉब्लेम हा आहे की तिचा हुंड्याला विरोध आहे आणि ती दत्तक घेतलेली मुलगी आहे तिच्या आईवडिलां ती पंधरा दिवसाची असतांना तिला दत्तक घेतली आहे, तर तिला असं वाटतं की जेव्हा घरच्यांना समजेल की ती दत्तक घेतली आहे तेव्हा लग्न मोडेल त्यापेक्षा ती मला आधीच नकार देते आहे",.. आदित्य

" पण हा काही खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे, आपण जात-पात मानणारे लोक नाही आहोत, खरंच मुलगी चांगली असेल तर पुढे जायला काही हरकत नाही",... आबा

आदित्य त्याला खूप आनंद झाला होता, त्याने तिथल्या तिथे कार मध्ये आबांना मिठी मारली

" अरे ... प्रकरण खूपच पुढे गेलेलं दिसत आहे, आनंद बघ तुझ्या चेहऱ्यावर किती झाला आहे, मला तशी थोडी कुणकुण लागली होती, छान चांगल आहे आता सूनबाई येणार घरी, आम्हाला तयारी करावी लागेल",... आबा

आता आदित्य लाजत होता,... "मग मी तिच्याशी लग्न करायला काही हरकत नाही ना आबा ",..

" नाही काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित समजावून सांग सीमा ला, घरी भेटायला घेवून ये ",.आबा

हो

आता सगळ्या बाजूने प्रॉब्लेम मिटला होता, मेन म्हणजे आबा आणि आक्कांशी बोलून झालं होतं, त्यामुळे आदित्यला छान वाटत होत , राजालाही काही प्रॉब्लेम नाही माझ्याशी, त्यालाही मी पसंत आहे, आता मी सीमाचं काहीही ऐकणार नाही, मी आता तिच्याशी लवकरात लवकर लग्न करणार, उद्या सकाळी जाऊन भेटतो मी तिला,

"एकदा अनघा ताई शी बोलून घेतो मी आबा, जिजाजींना ही सांगाव लागेल",.. आदित्य

"हो सांगून बघु या, आधी तुम्ही तुमच फिक्स करा ",... आबा

हो आबा....


🎭 Series Post

View all