नवी आशा जगण्याची... भाग 24

थोडी घाई तर होत नाही ना आदित्य, मला थोडा मुलांना शिकवायचं काम करायचं आहे त्यामुळे मी जरा एक-दोन वर्षे थांबणार आहे तोपर्यंत जर आधी तुला थांबायचे असेल तर माझी काही हरकत नाही",..

नवी आशा जगण्याची... भाग 24

©️®️शिल्पा सुतार
........

विक्रम ऑफिस मधे कोणाशी तरी फोन वर बोलत होता, या जमीन बाबतीत अजिबात हक्क सोडू नका,... हो आहे आमचा सपोर्ट... हो तुम्ही काळजी करु नका.. नाही आहे त्यांच्या कडे सगळे पेपर.... हो बहुतेक आपण जिंकणार... करोडोंची प्रॉपर्टी आहे ती,... काळजी मिटली आपली.

त्याचा मित्र प्रशांत आत मध्ये आला,... ठीक आहे मग बोलू पुन्हा.... विक्रम ने फोन ठेवला,... "काढली का माहिती आदित्यची? तुला काम दिलं होतं ना? कोणाला भेटतो तो आता हल्ली?, कोर्ट केस संदर्भात काही हालचाल सुरू आहे का त्याची? ",.

"हो काढली आहे माहिती, सकाळी आदित्य शाळेजवळ एका मुलीशी बोलत होता आज, आणि वकील त्यांच्या घरी गेले होते ",... प्रशांत

" अच्छा तो कागद पत्र घ्यायला गेला असेल, आणि कोण आहे ती मुलगी? ",...विक्रम

" ते माहिती नाही, पण बराच वेळ ते दोघे बोलत होते ",..प्रशांत

"काय प्रकार आहे हा? कोण आहे ती? त्या मुलीची माहिती काढावी लागेल, काही प्रेम प्रकरण वगैरे तर नाही ना? ",... विक्रम

" मला कस माहिती असणार, शाळेत आहे ती मुलगी टीचर एवढ समजल ",.. प्रशांत

" कधीपासून ओळखतात ते एकमेकांना? ",.. विक्रम

" ते माहिती नाही आज पहिल्यांदा बघितलं मी त्यांना बोलतांना ",... प्रशांत

" परत बघितलं तर ओळखशील का त्या मुलीला? ",.. विक्रम

" ओळखेल तस, पण पाठ मोर बघितला चेहरा बघितला तिचा ",.. प्रशांत

" आदित्य काय प्रेमात पडला की काय त्या मुलीच्या? , तिच्या साठी बस मधुन प्रवास करतो की काय हा? मला आदित्य साठी माझ्या मामाच्या मुलीचं स्थळ सुचवायचं होतं, आता घरी गेले की लगेच बोलतो पप्पांशी, आणि त्या मुलीचा काही तरी बंदोबस्त करावा लागेल ",... विक्रम

" तुझ एक एक सुरू असत विक्रम, भन्नाट आयडिया ",.. प्रशांत

" अरे मग एवढी करोडची इस्टेट आहे त्याची, माझ्या मामाची मुलगी तिथे लग्न करून गेली तर माझं अर्ध राज्य राहील तिकडे ",...विक्रम

"बरोबर बोलतो आहेस तू ",..प्रशांत

"तिला हाताशी धरून बर्‍याचशा गोष्टी मिळवू शकतो मी",.... विक्रम

"पण आदित्य हो म्हणेल का तिच्याशी लग्न करायला, आता हे नवीन काय प्रकरण आहे त्याच ",.. प्रशांत

" ते बघु आपण हे नवीन प्रकरण होवू द्यायच नाही, त्या आधी हे स्थळ पुढे करायच, मग बघ का नाही हो म्हणणार तो आदित्य, खूप सुंदर आहे माझ्या मामाची पोरगी, तिला बघून आदित्य अर्धा होऊन जाईल, हुशारही खूप आहे ती",... विक्रम

" तूच करून घे ना तिला",.. प्रशांत

"मी तीच्या लहान बहिणीशी लग्न करणार आहे हिला बरोबर मी आदित्यशी लग्न करायला लावतो",... विक्रम

" झाली का तुझी पैशाची व्यवस्था? कधी भरणार आहे त्या कंपनीत जाऊन पैसे? ",.. प्रशांत

"एक-दोन दिवसात भरावेच लागतील",.. विक्रम

"ठीक आहे मग मी येतो ",.. प्रशांत

" उद्या आपण त्या पोरीला शाळे जवळ जरा हिसका दाखवू",.. विक्रम

" ती घाबरून गाव सोडून तर नाही ना जाणार",... प्रशांत

"तेच तर हव आहे ना आपल्याला ",... विक्रम हसत होता
....

सीमा शाळेतुन घरी आली, ट्युशन झाली, ती आणि मीनाताई बोलत बसल्या होत्या, तिने मुद्दामच मीनाताईंना आज आदित्य भेटला होता ते सांगितलं नाही, तरीही मीनाताई तिला खोदून खोदून प्रश्न विचारत होत्या,..." आई अग रोज कश्याला भेटेल तो आदित्य ",

" तुझा काय विचार आहे पण आता",... मीना ताई

"मी अजून काहीही विचार केला नाही लग्ना बाबत",.. सीमा

"तू निशाला आपल्या घरी बोलावणार होती ना जेवायला? घेऊन ये ना मग उद्या तिला उद्या",.. मीना ताई

"उद्या नको, मी तिला शनिवारी घेऊन येते, शनिवारी अर्धा वेळ शाळा असते मग आम्ही दुपारी येवू, ती जेवून नंतर घरी जाईल, आरामात बसता येईल ",... सीमा

"चालेल काय करू स्वयंपाक ते आधीच सांगून ठेव",... मीना ताई

"तिला तुझ्या हातचे सगळेच पदार्थ आवडतात काहीच प्रॉब्लेम नाही तिला ",.. निशा

मीना ताई खुश होत्या...

सीमाचा फोन वाजत होता, अनोळखी नंबर होता, सीमाने फोन कट केला, परत दोन मिनिटांनी फोन आला..

" कोणाचा फोन आहे ",.. मीना ताई

" नंबर आला आहे आई म्हणजे काहीतरी लोन इन्शुरन्स वगैरे घ्या असा असावा",.. सीमा

" बघून घे एकदा",.. मीना ताई

सीमा ने फोन उचलला

" हॅलो सीमा मी आदित्य बोलतो आहे",...

सीमाला एकदम धडधडलं, तिने बघितला आई कुठे आहे, मीनाताई स्वयंपाकाला लागल्या होत्या, राजा आलेला नव्हता, ती फोन घेऊन पटकन बाहेर गेली

" तू माझ्या फोनवर फोन कसा काय केला आहेस? तुला माझा नंबर कोणी दिला आदित्य?",.. सीमा

"मिळाला मला तुझा नंबर, काय करते आहेस तू?",.. आदित्य

" हे बघ आदित्य यापुढे या नंबर वर कधीच फोन करू नको, नाहीतर मी तुझा नाव घरी सांगेन, आता फोन ठेव ",.. आदित्य

"अरे एक मिनिट थांब, एवढी काय घाई असते ग तुला सगळ्या गोष्टीची? आता जर तू फोन ठेवला, माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुझ्या घरी येईन तुझ्याशी बोलायला",... आदित्य हसत होता

" हे काय अस? का अस करतोस तू? ",.. सीमा

" मग मी जेव्हा तुला भेटायला येतो तेव्हा तू माझ्याशी नीट बोलत नाही म्हणून मी आत्ता तुझ्याशी बोलायला फोन केला आहे, तर आताही तु बोलायला तयार नाहीस, मी करणार तरी काय? ",... आदित्य

" काय बोलायचं आहे सांग पटकन",.. सीमा

" मला तुझ्याशी लग्न करायचा आहे, तुझ्या घरच्यांना भेटायला यायचं आहे ",... आदित्य

"मी आधीच सांगितलं आहे की मला एवढ्यात लग्न करायचं नाही, मग सारखं सारखं तेच तेच का बोलतो आहेस तू आदित्य? आणि मी आता फोन ठेवते आहे आणि घरात जाते आहे मला परत फोन करू नको, तुला इकडे यायच असेल तर ये माझी काही हरकत नाही, मी घाबरत नाही ",.... सीमा

"बापरे बरीच धीट झालीस तू, ठीक आहे उद्या बोलू आपण मी जे बोललो त्याच्या विचार करून ठेव ",.. आदित्य

ती बोलत असताना राजा ऑफिसहुन आला, सीमाने पटकन फोन ठेवला

" काय ग ताई कोणाचा फोन होता",.. राजा

" आदित्यचा फोन होता",.. सीमा

" काय बोलते आहेस, काय म्हटले आदित्य साहेब",..राजा

" आज सकाळी मला आदित्य भेटला होता शाळेजवळ जास्त बोलणं झालं नाही म्हणून आता बोलायला फोन केला होता",... सीमा

"तू काय ठरवलं आहेस ताई मग आदित्य साहेबांच्या बाबतीत? ",..राजा

" मी अजून काहीही ठरवलेलं नाही, काय करावे मला सुचत नाही ",.. सीमाने मुद्दामच काही सांगितलं नाही, ती आत निघून गेली

आता जे काही डायरेक बोलायचं आहे ते मला आदित्यशी बोलायला पाहिजे, हे बाकीचे लोकं सगळे आदित्यच्या बाजूने बोलतात, त्यामुळे यांना सांगितलं मला आता लग्न करायचं नाही तर ते मला समजवण्याचा प्रयत्न करतात, त्यापेक्षा आता फक्त मी आणि आदित्य,

जेवण झालं, सीमा दुसऱ्या दिवशी साठी नोट्स काढत होती, मीनाताई किचन आवरत होत्या, राजा पाणी प्यायला गेला

"आई तू बोलली का सीमाताईशी?",... राजा

" हो पण तिला ते तुमचे साहेब भेटले नाही दोन-चार दिवस झाले ",.. मीना ताई

"भेटले होते ते आज पण सीमाताई आता आपल्याला काही सांगत नाहीये",.. राजा

" काय बोलणं झालं मग?",.. मीना ताई

"ते काहीच माहिती नाही, आता ही आदित्य साहेबांचा फोन आला होता सीमाताई विशेष बोलली नाही त्यांच्याशी",... राजा

" काय करू मग मी बोलून बघू का सीमाशी",.. मीना ताई

" नको मी बघतो आता काय करायचं ते, ती अभ्यास करते आहे उगाचच चिडेल ती" ,... राजा

" आपल्याला तिची काळजी वाटते",.. मीना ताई

हो ना ,
....

नाश्त्याच्या टेबलवर आदित्य रेडी होऊन बसलेला होता, आबा आले,... "आज दुपारून जायचं आहे ना आपल्याला साखर कारखान्यावर आदित्य? ",..

" हो आबा जाऊ आपण",. आदित्य

" तू दुपारी जेवायला घरी ये मग आपण इथूनच जावु",..आबा

हो चालेल... आदित्य ऑफिसला निघून गेला

सीमा घरातुन निघाली, ती बस स्टॉपवर उभी होती, या आदित्यच काय कराव, काल चक्क फोन केला मला, माझ अस शिकवण्या कडे लक्ष रहात नाही, एकदा नीट बोलाव लागेल त्याच्याशी

आदित्य तिला भेटायला आला, सीमाच लक्ष नव्हत ती तिच्या विचारात होती

हाय सीमा..

सीमा दचकली..

"सीमा चल माझ्यासोबत मी तुला शाळेत सोडतो, मला बोलायच आहे तुझ्याशी",.. आदित्य

सीमा विचार करत होती काय करू? याच्याशी एकदा स्पष्ट बोलावंच लागेल

सीमा नुसती उभी राहिलेली बघून आदित्य परत बोलला,.. "चल लवकर सीमा, कोणी नाही गाडीत ड्रायव्हर नाहीये चल",

सीमा त्याच्याबरोबर गेली,.." मी बरोबर करते आहे का चूक काही समजत नाही",

आदित्यने तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडला, सीमा आत मध्ये बसली, ती अशी पहिल्यांदाच इतक्या छान गाडीत बसत होती, सुंदर इंटेरियर होतं, आदित्य ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला, सीमा बेल्ट लावा, सीमाने बेल्ट लावला, ते दोघं निघाले, आदित्य गाडी चालवतांना खूप डॅशिंग दिसत होता, त्याने लाइट ब्लू कलरचा शर्ट घातला होता, परफ्युमचा हलका वास पूर्ण गाडीत येत होता, खूप चांगला दिसतो हा, खरच हीरो वाटतोय..

मी अशी याच्या कडे बघते हे आदित्यला समजल तर, सीमाला हसू आल

"थंक्यु सीमा तू आज माझ ऐकल" ,... आदित्य

सीमा गप्प होती,

"सीमा मी तीन-चार वेळा तुला भेटण्याचा प्रयत्न केला पण आपल हवा तसं बोलणं झालं नाही, तुझ्या मनात काय आहे माझ्याबद्दल तेच मला बोलायचं आहे",.. आदित्य

"आदित्य मला मला माहिती आहे की तू खुप चांगला मुलगा आहे आणि तुझ्या बरोबर लग्न झालं की माझं खूप चांगलं होणार आहे, पण काही गोष्टी आहेत ज्या मी तुला सांगितल्या पाहिजे मग तू विचार कर, मी माझ्या आई वडिलांची दत्तक घेतलेली मुलगी आहे, माझे खरे आई वडील कोण आहेत हे मला माहिती नाही मला, राजा आई- बाबा तिघांच्या कुटुंबात मी दत्तक घेतलेली आहे",... सीमा

"तुझ्या आई-वडिलांनी हे खूप छान काम केलं आहे एका निराधार व्यक्तीला आधार दिला, त्यात प्रॉब्लेम असण्याचं काही कारण नाही, उलट माझ्या मनात त्यांचा आदर अजून वाढला, हे असं तुला वाटत आहे की मला आवडणार नाही ",... आदित्य

" तस नाही आदित्य पण तुझ्या घरच्यांना चालेल का हे ",.. सीमा

" न चालायला काय झाल आणि लग्न हा सर्वस्वी माझा निर्णय आहे ",.. आदित्य

सीमा विचार करत होती माझं आधीच एक लग्न मोडला आहे, हुंडा आणि मी दत्तक आहे हे समजल्यानंतर, बर झाल आधीच बोलून घेतल

"अजून एक मला सांगायच होत माझे स्वप्न मला पूर्ण करायचे आहेत आदित्य, मला निराधार मुलांसाठी काम करायच आहे, आणि हुंडा देण घेण या गोष्टीला माझा विरोध आहे, त्या साठी काम करायच आहे मला, तुमच्या तुलनेत आम्ही अतिसामान्य लोक आहोत, आमच्याकडे काही नाही, माझी आई पूर्वी लोकाकडे स्वयंपाकाचे काम करायची, आता मी आणि माझा भाऊ नोकरीला लागल्यामुळे ती विश्रांती घेते आहे, तुमच्याकडे आमच्यासारखे शंभर नोकर असतील त्यामुळे तू परत एकदा माझा विचार कर आदित्य ",... सीमा

"मी लग्न करेल तर तुझ्याशीच करेल सीमा मला या बाकीच्या गोष्टींशी काही फरक पडत नाही, गरीब श्रीमंत जात पात मी मानत नाही, आपल्या दोघांना सोबत राहायचं आहे, मला तुझ्या विषयी माहिती तुला माझ्या विषयी माहिती असलेली पुरेशी आहे, बाकीच्यांची काही देण घेण नाही, तुझे विचार किती चांगले आहेत, मी नेहमी तुझी साथ देईन, मी तुझ्या घरी येऊ का तुझ्या घरच्यांना भेटायला",... आदित्य

सीमा काही बोलली नाही ती खाली बघत होती

" काही प्रॉब्लेम आहे का तू मला सांगू शकते, करायची ना पुढची बोलणी ",.. आदित्य

" थोडी घाई तर होत नाही ना आदित्य, मला थोडा मुलांना शिकवायचं काम करायचं आहे त्यामुळे मी जरा एक-दोन वर्षे थांबणार आहे तोपर्यंत जर आधी तुला थांबायचे असेल तर माझी काही हरकत नाही",.. सीमा

" तू माझ्याशी लग्न केल्यानंतर सुद्धा हे काम करू शकते ना",.. आदित्य

" हो करू शकते पण मला थोडा वेळ हवा आहे ",.. सीमा विचार करत होती,.. नक्की कसे आहेत याच्या घरचे? , आदित्यचे विचार चांगले आहेत, पण मला नेहा सारख त्रास झाला तर, जमल नाही तर बाहेर जास्त वेळ देण, मग मी माझे स्वप्न कसे पूर्ण करणार, फक्त संसारात अडकून जाईल मी, हे लोक श्रीमंत आहेत, नौकरी नाही करू दिली तर, मी हे आदित्य ला सांगू शकत नाही, कस विचारू?, तो सारख बोलतो काही प्रॉब्लेम नाही येणार

"सीमा काय विचार करतेस... उलट मी तुला तुझे स्वप्न पूर्ण करायला मदत करेन, आपण दोघ सोबत असलो की तू अजून छान काम करू शकते सीमा, मी तुला वचन देतो की तुला आमच्याकडे काहीही त्रास होणार नाही, कुठली गोष्ट तुला कोणी बोलणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव, आता आपण पुढे जावू या, होकार दे मला",... आदित्य

" ठीक आहे, मी विचार करून सांगते",... शाळा आली सीमा आदित्य कडे बघत होती, आदित्य तिच्या कडे बघत होता ती गडबडली, आदित्य ने तिचा हात धरला, सीमा खूप घाबरली,

" मला जायच आहे, कशी तरी ती बोलली",... सीमाने आदित्यच्या हातातून हात सोडवून घेतला , तिला तिची बॅग धरता येत नव्हती, आदित्य पटकन खाली उतरून आला, कारचा दरवाजा उघडला, सीमा पटकन उतरली, आदित्य कडे न बघता ती आत मध्ये चालली गेली, आदित्य ती गेली तिकडे बघत बसला...


🎭 Series Post

View all