नवी आशा जगण्याची... भाग 23

आबा माहिती देत होते, आदित्यच्या चेहर्‍यावर टेन्शन होतं,...."मोठी जमीन आहे ती, कोणी केलं आहे हे प्रकरण त्याची चौकशी करायला पाहिजे, आता परवा कोर्टाची तारीख आहे तेव्हा हे वकील म्हणत आहेत की आपण पुढची तारीख घेऊ पुढची तारीख दोन महिन्यांनी मिळेल


नवी आशा जगण्याची... भाग 23

©️®️शिल्पा सुतार
........

सीमा रागाने आत निघून गेली

आदित्य निशा तिथे उभे होते

" तुम्ही समजावा ना सीमाला, प्लीज मला मदत करा, ती थोड सुध्दा ऐकुन घ्यायला तयार नाही ",.. आदित्य

तुम्ही आदित्य देशमुख ना...

हो..

" माझ्या मैत्रिण लकी आहे, अल्लड आहे ती, समजावते मी तिला",... निशा

" थॅंक्स... फोन नंबर आहे का तुमच्या कडे सीमाचा?",.. आदित्य

निशा ने नंबर दिला,... "मी नंबर दिला हे सांगू नका तिला, नाहीतरी काही खर नाही माझ",...

हो.. आदित्य हसत होता,... "नेहमी चिडलेली असते का सीमा? ",

" नाही खूप चांगली आहे ती स्वभावाने, तिचे काही कारण आहेत त्या मुळे ती अशी करते, ती बोलेल तुमच्याशी तस",... निशा

"तुमचा ही द्या नंबर मी कामा व्यतिरिक्त फोन करणार नाही",.. आदित्य

निशा ने तिचा नंबर दिला,.. "तुम्ही सीमा बाबतीत सिरियस आहात ना ",.

" हो मला लग्न करायच आहे तिच्याशी",.. आदित्य

" घरचे तयार होतील ना? ",.. निशा

" घरी काही प्रॉब्लेम नाही ",.. आदित्य

" सीमा मी आम्ही सगळे एकदम सामान्य घरातील आहोत, सीमा कडे ही ते दोघ भाऊ बहीण नौकरी करतात, तुम्ही श्रीमंत... घरच्यांची अपेक्षा असेल तोलामोलाच स्थळ हव ",...निशा

"नाही तसा काही प्रॉब्लेम नाही, मी आहे ना सीमा साठी, मी तिची कायम साथ देईन ",.. आदित्य

"मी बोलते सीमाशी तुम्ही तिच्या भावाशी बोलून बघा, जमल तर एकदा घरी जावून या त्यांच्या ",... निशा

" माझी ओळख नाही पण ",.. आदित्य

" तुमच्या इंडस्ट्री मध्ये आहे तो कामाला ",.. निशा

" काय नाव त्याच",.. आदित्य

राजा.. अकाऊंट डिपार्टमेंट

" ठीक आहे पण तुम्ही सीमाशी बोलून बघा",... आदित्य

हो....

आदित्य ऑफिसला गेला, निशा शाळेत आली,

गेट जवळच सीमा उभी होती,..." काय बोलत होती ग तू त्याच्याशी इतक्यावेळ? ",

" तुला माहिती आहे का सीमा तो कोण आहे? ",.. निशा

" माहिती आहे आदित्य देशमुख आहे तो ",.. सीमा

" मग तरीपण काय एवढा भाव खाते ",.. निशा

"अरे आदित्य देशमुख असला म्हणून मी लगेच काय पळत जाऊन त्याच्या गळ्यात वरमाला घालायची का? त्याला बोलायच का की चल लगेच लग्न कर माझ्याशी, काहीही... तुम्ही सगळे आदित्यला बघून असे का करतात? , मला काही माझे मत आहेत की नाही? तुमच्या सगळ्यांसाठी तो आदित्य देशमुख आहे म्हणजे मी लगेच होकार द्यायचा का? ",... सीमा

" हो होकार देण्या सारखाच मुलगा आहे तो पागल असंच आहे, अजून कोण म्हटलं तुला असं की आदित्य चांगला आहे ",... निशा

" राजा म्हटला मला", .. सीमा

" बरोबरच बोलला आहे राजा, तुला माहिती आहे का तुझं नशीब किती चांगलं आहे म्हणूनच तुला आधीचे प्रॉब्लेम आले असतील, आता एवढं चांगलं स्थळ आला आहे तर कशाला नकार देते, अग शाळेत टीचर बनायच स्वप्नं होत ना तुझ अख्खी शाळा तुझी होवू शकते",... निशा

" अग अजून फक्त आदित्य बोलला आहे माझ्याशी, त्याच्या घरच्यांना माझ्या बद्दल काही माहिती नाही, जेव्हा त्यांना समजेल की मी दत्तक घेतलेली मुलगी आहे गरीब आहे तेव्हा बघ ते लोक कसे करतील ",... सीमा

" हे तू तुझंच काय ठरवते आहे स्वतः, बाकीच्यांनी ठरवू दे ना त्यांना काय करायचं आहे",... निशा

" तू तर पूर्ण पैकी आदित्यच्या बाजूने झाली आहेस, काय बोलत होते तुम्ही सांग ना ",... सीमा

" तुला इंट्रेस्ट नाही ना मग का आता? मला असं वाटत आहे सीमा की तू आधी एकदा आदित्यचा सिरिअसली विचार करावा ",.. निशा

" हो बाई हो... सगळे माझ्या मागे लागले आहेत, सगळं जग जस काही त्याच्याच बाजूने आहे, खरंच लकी दिसत आहे तो मुलगा",... सीमा चिडली होती

सीमा वर्गात चालली गेली, हा आदित्य कश्याला सकाळी सकाळी भेटतो, तो दिसला की बाकीचे हीरो आल्या सारख करतात, एकदम पुढे पुढे त्याच्या, निशा आधी माझ्या बाजूने होती ती पण बदलली आता, खरच एवढा चांगला आहे का हा आदित्य? सीमाचे हात थरथर कापत होते, सीमाने बॅगेतून पाणी काढल पील, आता तिला बर वाटत होत, आदित्य भेटला की घाबरायला होत मला,
.....

आदित्य ऑफिसला आला, राजा सीमाचा भाऊ आहे, बापरे मला माहिती नव्हत, बोलून बघु का त्याच्याशी? नको पण तो चिडला तर, हे लोक खूप प्रामाणिक असतात, काम किती छान करतो तो, आणि ही सीमा मला होकार देत नाही काय कराव? , तिने आधी होकार द्यायला हवा तर मी डायरेक्ट बोलू शकतो ना राजा शी, एवढा खराब आहे का मी? सीमा का लांब लांब रहाते माझ्या पासून, त्याने आरश्यात बघितल, चांगल तर दिसतो आहे मी, काय प्रॉब्लेम आहे हा सीमाचा? , पण चिडली की गोड दिसते ती, अस वाटत अजून चिडवत रहाव तिला,

राजा कामानिमित्त आत मध्ये आला, आदित्य त्याच्याकडे बघत होता

"सर या पेपर वर सह्या हव्या आहेत तुमच्या",... राजा

आदित्यने सह्या केल्या,... "कसं सुरु आहे काम राजा?",...

"सुरू आहे सर बरीच माहिती मिळाली आहे, खूप फ्रॉड केले आहेत विक्रम सर आणि त्यांच्या मित्रांनी, मी हळूहळू माहिती काढतो आहे",... राजा

"केअरफुल रहा राजा, आज लवकर आला का तू ऑफिस ला",.. आदित्य

" नेहमीच्या वेळी आलो मी सर तुम्ही उशिरा आलात",... राजा

आदित्य घड्याळ कडे बघत होता

राजाला समजल.... सॉरी सर

" अरे त्यात काय एवढ ",... आदित्य

राजा बाहेर आला आज अगदी शंभर टक्के आदित्य साहेब सीमा ताईला भेटायला गेले असतिल, आदित्य राजाशी सीमा बद्दल बोलला नाही आणि राजाही त्याला काही माहिती असेल त्याने दाखवलं नाही

"बाहेर वकील आले आहेत त्यांना तुम्हाला भेटायचं आहे",..शिपाई काका

" ठीक आहे पाठवून दे आत मध्ये",.. आदित्य

वकील आत मध्ये आले,... "सर ते शाळे मागची जमीन आहे त्याची दोन तीन दिवसात डेट आहे कोर्टात, ती जमीन तुमचीच आहे यासाठी हे दोन चार कागदपत्र सापडले आहे, जरा एकदा ते नजरेखालून टाकतात का",

आदित्य पेपर बघत होता,.." हे बघा वकील साहेब मला या बाबतीत काही माहिती नाही, तुम्ही एक काम करा ना सरळ घरी जा आणि आबांना हे सगळे कागद पत्र दाखवा, महत्वाच आहे हे ",..

" ठीक आहे",.. वकील

"किती चान्सेस आहे आपल्याला आपली ती जमीन परत मिळायचे",.. आदित्य

" चान्सेस तर खूप कमी आहेत पण प्रयत्न सुरू आहेत आपले ",.. वकील

" ठीक आहे, करा काहीतरी, आपली जमीन आपल्या कडे राहिली पाहिजे ",... आदित्य

वकील गेले

आदित्यने आबांना फोन लावला,.." आता वकील येतील तिकडे ते शाळेच्या मागच्या जमिनीचे पेपर घेऊन, मला काळजी वाटते त्या केसची",..

" हो ना.. त्या केसची कोर्टाची डेट आहे दोन-तीन दिवसात तिथे बघावे लागेल",.. आबा

" त्या वकिलाकडे काही पेपर्स आहेत ",.. आदित्य

" ठीक आहे मी ते बघून घेतो",.. आबा

"काय म्हणणार आहे त्याचं, कोणी केल हे काम, आपली एवढी चांगली जमीन हातची घालवायची नाही ",.. आदित्य

"तू काळजी करू नकोस, थोडं लक्ष द्यावे लागणार आहे, जमीन मोठी आहे ती, आपण करू काही तरी एक ओळखीचे सापडले आहेत, होईल काही तरी, आणि मला तुझ्याशी अजूनही बोलायचं आहे उद्या तुला दुपारून माझ्यासोबत येता येईल का ते बाजूच्या गावात आपण साखर कारखाना बघून घेऊ एकदा, काय आहे कसा आहे कारभार, काम सुरू करण्याच्या आधी जरा खात्री पटली की बरी ",... आबा

"हो चालेल बघून घेऊन आपण, मी येईल, उद्या काय मिटींग आहे काय नाही करतो ते काम उद्या दुपार पर्यंत, मग जावु",.. आदित्य

ठीक आहे..

सचिन आत मध्ये आला,.. "आज काय खूप बिझी आहेस तू आदित्य?",..

"अरे मी तुझीच वाट बघतो आहे केव्हाची, मला तुला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगायचे आहे",.. आदित्य

" बोल ना",.. सचिन

" आज मी सकाळी सीमाला भेटलो",.. आदित्य

" मग दिला का होकार तुला वहिनीने",... सचिन

"नाही आजही तिने मला नकार दिला पण मला फार महत्वाची गोष्ट समजली आहे आपल्या राजा आहे ना अकाउंट डिपार्टमेंटचा तो सीमाचा भाऊ आहे",... आदित्य

" काय बोलतो आहेस तू? खरं का",... सचिन

" हो एकदम खरं",... आदित्य

"चांगल झाल मग तू बोल मग त्याच्याशी ",.. सचिन

"अरे अस कसा बोलणार त्याला राग आला तर ",... आदित्य

" तुझा राग कशाला येईल त्याला",.. सचिन

" अरे मी त्याच्या बहिणीच्या मागे जातो तर तो चिडला तर",... आदित्य

" त्याला उलट आनंद होईल आपली बहीण एवढय़ा चांगल्या घरी लग्न करून जाईल, नाही चिडणार तो ",... सचिन

"काय करू बोलून बघु का राजाशी, की आधी सीमाला तयार करू ",... आदित्य

" तू आधी सीमाशी बोलून घे तिचा होकार महत्वाचा आहे",... सचिन

" हो बरोबर आहे, मग आता कसं करू या तू बोलून बघतो का राजाशी थोड आडून आडून ",.. आदित्य

" अरे आडून आडून म्हणजे कसं? ",.. सचिन

"थोड तरी विचार त्यांचं घर कुठे आहे वगैरे माहिती विचारून बघ, घरात कोण कोण मेम्बर आहेत मला कोणाला भेटावे लागेल काही माहिती नाही",... आदित्य

" ठीक आहे, नंतर बोलतो मी त्याच्याशी",.. सचिन

" माझ उद्या दुपारच काय मीटिंग शेड्यूल आहे ते जरा विचारून बघशील का? मला उद्या आबांसोबत साखर कारखान्यावर जायचं आहे त्यांचं म्हणणं आहे की मी एकदाच बघून घ्याव, तू पण येशील का?",... आदित्य

"नाही मी ऑफिसमध्ये थांबेल कोणीतरी एकाने इकडे बघाव लागेल ",.. सचिन

ठीक आहे..

पाच वाजले होते, आदित्यला सीमाची आठवण आली, आज सीमा खूपच चिडलेली होती, आपण तिला नंतर फोन करून बघू, तिला सरप्राईज मिळेल, त्याला स्वतःचच हसू येत होतं

पवार साहेबांसोबत राजा आत मध्ये आला,

"शाळे मागच्या जमिनीच्या केस संदर्भात आपल्याकडे काय काय डॉक्युमेंट आहेत पवार साहेब?, ही जमीन कधी बळकवली त्या दुसऱ्या लोकांनी? काही माहिती आहे का कोण आहेत ते लोक कुठून आले अचानक? तुम्ही मला त्या केसचे सगळे पेपर्स द्या, मला स्टडी करायचा आहे ",... आदित्य

"ओरिजनल फाईल नाही आपल्याकडे ती तुमच्या घरी किंवा वकिलांकडे असेल, हे आपल्याकडे त्याचे झेरॉक्स आहे ",..पवार

" चालेल ना झेरॉक्स द्या सगळ्या मी जरा बघतो काय प्रकरण आहे ते ",.. आदित्य

" दोन-तीन दिवसात कोर्टात केस आहे सर",... पवार

हो..

" तुम्ही राजाला जे काम सांगितलं ते सुरू आहे अजून",... पवार

" काही हरकत नाही त्याची एवढी काही घाई नाही आपण त्या विक्रम ची व्यवस्थित चौकशी करू आणि नंतर त्यांच्या वर ॲक्शन घेणार आहे, त्यासाठी या कामाची घाई नाही करायची, व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करा ",.. आदित्य

" ठीक आहे",..

आदित्य घरी आला आबा घरी नव्हते

" अजून आले नाही का ग आबा? ",.. आदित्य

" ते वकीलांना भेटायला गेलेले आहेत",.. आक्का

" पण मी त्या वकीलांना तर घरी जायला सांगितलं होतं, उगीच आबांना त्रास ",.. आदित्य

" हो आले होते ते वकील घरी, त्यांच्या सोबतच कामासाठी गेलेले आहेत तुझे आबा, काळजी करू नकोस ",.... आक्का

" आई मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, आज मला सीमा भेटली होती आणि तिचा भाऊ पण आपल्याच ऑफिस मध्ये कामाला आहे",.... आदित्य

" अरे वा काय म्हटली मग सीमा",.. आक्का

"काही नाही ती तिच्या कामातच बिझी होती",.. आदित्य

" कधी करताय मग तुम्ही लग्न?, कधी जायचं आपण त्यांच्या घरी?",.. आक्का

" आई अजून सीमाने मला होकार दिला नाही",. आदित्य

" बापरे तुला होकार दिला नाही म्हणजे मुलगी स्वाभिमानी दिसते, छान संसार करेल ती, तिला पैशाचा मोह नाही",.. आक्का

बाबा आले, आदित्य त्यांना भेटायला गेला,..." काय झालं आबा पेपर्स मिळाले का सगळे? ",..

आबा माहिती देत होते, आदित्यच्या चेहर्‍यावर टेन्शन होतं,...."मोठी जमीन आहे ती, कोणी केलं आहे हे प्रकरण त्याची चौकशी करायला पाहिजे, आता परवा कोर्टाची तारीख आहे तेव्हा हे वकील म्हणत आहेत की आपण पुढची तारीख घेऊ पुढची तारीख दोन महिन्यांनी मिळेल तोपर्यंत आपल्याला अजून कागदपत्र आणि पुरावे जमा करायला वेळ मिळेल",...

हो चालेल....




🎭 Series Post

View all