नवी आशा जगण्याची... भाग 57

यात तुझा दोष थोडी आहे सीमा, तू काय कश्याला वाईट वाटून घेते, विक्रमला त्याचा वागण्याची लाज वाटत नाही, काका ही तसेच होते आधी


नवी आशा जगण्याची... भाग 57

©️®️शिल्पा सुतार
........

आदित्य आबा गावत पोहोचले, कदम साहेब होते मदतीला लगेच काम सुरू झाल त्यांच, बर्‍याच लोकांना भेटायच होत, कदम साहेबांच ऑफिस सध्या ते वापरत होते, मजा येत होती कामाला, स्पष्ट दिसत होत आबा जिंकतील, आदित्य खुश होता,
........

पूजा मामा मामी गेले, विक्रम ऑफिस मध्ये आला, काय आहे नोटिसच ते बघू आपण, किती पैसे भरायचे आहेत काय माहिती?

प्रशांत आला होता

"भेटले का पवार साहेब?",.. विक्रम

हो..

"काय म्हटले? मदतीला तयार आहेत का ते? ",.. विक्रम

"नाही त्यांच्या हातात काही नाही, आदित्य आता ही केस हॅन्डल करतो आहे त्यांना वकील भेटले नाही",.. प्रशांत

"अस कस शक्य आहे पण? ",... विक्रम

"त्यांनी तस सांगितल मला बाकी माहिती नाही",.. प्रशांत

कोण करेल मदत मग आता? सीमा नीट रिस्पॉन्स देत नाही, तिला काही बोललं की लगेच जावून आदित्यला सांगते ती, पण एकदा बोलणार आहे मी तिच्याशी, अस सोडणार नाही तिला, आज निळा ड्रेस किती छान दिसत होता तिला, उगीच भारी भरते,
....

मधल्या सुट्टीत निशा येवून बसली, सीमा गप्प होती, ती तिच्या विचारात होती, काय करत असेल आदित्य? , थोड्या वेळा पूर्वी केला होता फोन तेव्हाही घाईत होता तो, दोन तीन दिवस आता अस चालेल, बोर होत अस,

"काय झालं सीमा?, कसला विचार सुरु आहे",.. निशा

"कुठे काय?",.. सीमा

"जरा गप्प वाटते आहे",.. निशा

"आदित्य आबां सोबत इलेक्शनच्या कामाला गेला सकाळपासून",.. सीमा

"ओह आठवण येते का जिजुंची",.. निशा

"काहीही काय ग, म्हणजे आज बोर झाल मला शाळेत येतांना",.. सीमा

"हो ना प्रेमात वेडी झाली वाटत तू आमच्या जिजुं च्या ",..निशा

सीमा लाजली होती

" काय चाललय सीमा? बापरे किती लाजते तू, हॅलो मी निशा आहे आदित्य नाही, विचार काही खरे दिसत नाही तुमच्या दोघांचे ",... निशा

म्हणजे...

" गुड न्यूज देता की काय ",.. निशा

" निशा तू गेलीस आता, काहीही काय ग , तुझा पहिला नंबर, तुझ आधी झाल लग्न ",....सीमा

"आम्हाला वेळ आहे अजून, घाई तुम्हाला दिसते आहे ",... निशा

" नाही आधी मी मावशी होणार ",.. सीमा

" वाटत नाही वागण्या वरून नक्की काहीतरी आहे ",... निशा

सीमा जे दिसेल त्याने निशाला मारत होती

" बापरे आदित्यच काय होत असेल, शांततेत घे ग सीमा ",..निशा

"चल जेवून घे ",... सीमा

" जाईल ना जेवण तुला सीमा ?की जिजुंना करून घेते फोन ",.. निशा

"निशा आदित्य नाही तर तू आहेच का माझ डोक खायला",... सीमा

"ओह अस का,.. सांग ना सीमा काय विचार आहे ,खूप सुंदर दिसते आहेस तू आता हल्ली, जिजु गेले कसे एवढ्या सुंदर मुलीला सोडून ",..निशा

"निशा मी ओरडेन तुला आता", ..सीमा

दोघींच जेवण झाली

निशा क्लास मध्ये निघून गेली, सीमा खूप लाजली होती, आदित्यचा विचार करून खूप छान वाटत होत , खरच आज आदित्य नाही आला सोबत तर बोर झाल, तिने पर्स मधुन फोन काढला त्यात बघितल तिने कशी दिसते ते, तिला तीच हसू आल, काय आहे हे? सगळे बोलतात मी सुंदर दिसते,

सीमा तिच्या विचारत होती, समोरून आशा गेली ,... "आशा एक मिनिट",..

आशा आत मध्ये आली, आता तीची आणि सीमाची बऱ्यापैकी मैत्री झाली होती,

"काय करते आहेस आशा? झालं का जेवण? ",.. सीमा

हो

"मला तुझ्याकडे थोडं काम होतं",.. सीमा

"बोल ना सीमा",.. आशा

"तू मला भेटशील का आरामात",.. सीमा

"चालेल शाळा सुटल्यावर भेटू",.. आशा

"तेव्हा नको उद्या सकाळी भेट थोडं बोलायचं आहे",.. सीमा

"काय झालं आहे सीमा काही प्रॉब्लेम आहे का माझ्या शिकवण्यात? , आबा काही बोलले का? ",.. आशा

" नाही आशा, सांगेन उद्या काही टेन्शन घेऊ नको असं जनरल गप्पा मारायच्या आहेत",.. सीमा

ठीक आहे

आदित्य आबा पाच वाजता निघाले तिकडून,

" भरपूर झाल आज काम, बर झाल तु सोबत आलास आज आदित्य ",.. आबा

" हो आबा, मला ही बर वाटल, आबा मला ऑफिसला सोडा, थोड बघतो कामाच, मी येतो थोड्या वेळाने" ,.. आदित्य

ठीक आहे

दोघ ऑफिसला पोहोचले, आदित्य उतरला, आबा घरी निघाले, सीमाला घ्यायला तो पर्यन्त गाडी आलेली होती,

आदित्यचा मेसेज आलेला होता,.." जरा वेळ ऑफिस मध्ये जातो आहे ",

" ठीक आहे लवकर ये ",.. सीमा

सीमा घरी गेली, जरा वेळाने आबा आले घरी

"आदित्य कुठे आहे?",.. आक्का विचारात होत्या

" तो ऑफिसला गेला जरा वेळ, काम असतील ",.. आबा

सीमाने चहा केला,.. " झाल का काम आबा? ",..

"हो बर्‍या पैकी झाल, आता उद्या एक दिवस प्रचार आहे अजून,परवा नाही प्रचार",...आबा

"आबा मला आज आशा भेटली होती, उद्या बोलणार आहे मी तिच्याशी",.. सीमा

" हो चालेल बेटा",.. आबा

आबा थकले होते ते आत गेले,

सीमा रूम मध्ये आली, आदित्य केव्हा येईल काय माहिती? , तिने त्याला मेसेज केला.. लवकर ये

आदित्य केबिन मध्ये काम करत होता, समोर सचिन बसलेला होता, सीमाचा मेसेज बघून आदित्य हसत होता,..
" खूप आठवण येते वाटत माझी सीमा? काय विचार आहे?",..

"आदित्य बोर होत मला तू नसला की",.. सीमा ने मेसेज केला

"आज केव्हा केव्हा माझी आठवण आली ते सांग सीमा",.आदित्य

"दिवसभर आली आठवण" ,... सीमा

"लकी आहे मी, पण आता मला काम करू दे नंतर करतो मेसेज",.. आदित्य

"याला काय अर्थ आहे? बोलायला तयार नाहीस तू माझ्याशी आदित्य ",.. सीमा

" घरी आलो की बोलतो",.. आदित्य

ठीक आहे..

" झाल का आबांच काम आदित्य ",.. सचिन

" हो जवळ जवळ झाल आहे",... आदित्य खूप माहिती देत होता साखर कारखान्याची

"आबा खूप हुशार आहेत ",.. सचिन

" हो खूप मनापासून काम करतात ते, मित्र नाती सांभाळतात खूप चांगले आहेत स्वाभावाने",.. आदित्य

हो खरच...

"पुढच्या आठवड्यात आम्ही फिरायला जाणार आहोत, मी आणि सीमा, शनिवारी इलेक्शन होईल, मग जावू 3-4 दिवस",.. आदित्य

"अरे व्वा जावून या" ,.. सचिन

पवार साहेब आत आले, ते सकाळ पासून आदित्यची वाट बघत होते,..." साहेब थोड बोलायच होत",

बोला...

" प्रशांत भेटला होता आज सकाळी, तो मदत मागतोय",... पवार साहेब

" जमणार नाही सांगून टाका त्याला, उगीच त्याने आशा नको ठेवायला आपल्या कडून ",... आदित्य

बरोबर आहे..

" आपल्या कडून मदत घेतो विक्रमला सपोर्ट करतो तो",.. आदित्य

"तसा चांगला आहे तो विक्रम पेक्षा प्रामाणिक आहे तो",.. पवार साहेब

"हो ते आहे, पण हे पैसे त्याला भरावे लागतील नंतर एखादी ऑर्डर त्याला देता येते का ते बघू ",.. आदित्य

"अजून एक बोलायला होत ",.. पवार साहेब

"हो सांगा ",.. आदित्य

पवार साहेब सचिन कडे बघत होते

" बोला सचिन समोर बोला ",.. आदित्य

" थोड पर्सनल होत म्हणजे मला माहिती नाही ते किती खर आहे, सीमा मॅडम विषयी",.. पवार साहेब

" काय झाल प्रशांत काही म्हटला का?",.. आदित्य

"हो.... विक्रम पासून सावधान रहा तुम्ही साहेब, प्रशांत सांगत होता विक्रमचे विचार ठीक नाहीत, तो सीमा मॅडम च्या मागे आहे",... पवार साहेब

"तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करता येईल ते, आणि एक मिनिट यातल काही राजाला सांगू नका, तो लगेच निघेन मारामारी होईल उगीच, मी करतो त्या विक्रम चा बंदोबस्त ",.. आदित्य

हो सर..

पवार साहेब बाहेर गेले

सचिन आश्चर्याने आदित्य कडे बघत होता,..." काय हे? काय सुरु आहे? ",

" तो विक्रम सीमाच्या मागे लागला, उगीच त्रास देतो तो",.. आदित्य

" तू काही बोलत नाही का त्याला ",.. सचिन

" तस नाही सचिन मला महिती नव्हत आधी, सीमाने एकदा सांगितल पण मला वाटल नव्हत हे एवढं सिरियस असेल , काल बोललो मी विक्रमला, मूर्ख आहे तो मला अस दाखवतो तो चांगला आहे आणि त्रास देतो सीमाला, काहीही बोलतो, सीमा घाबरते त्याला, असा राग येतो ना मला, पण पुरावा सापडत नाही, नाही तर खूप धुलाई करेन मी त्याची ",... आदित्य

" अरे पण आता काय? ",.. सचिन

" मी त्याची पोलिस कंप्लेंट करतो आज ",.. आदित्य

" चल लगेच तू खूप शांततेत घेतो आहेस, हे सिरियस आहे ",.. सचिन

हो..

" मला सांगाव लागत का हे तुला आदित्य? त्या विक्रमच तोंड फोडायला हव होत तू, कधी पासून सुरू आहे हे ",.. सचिन

" आता दोन दिवसा पुर्वी सीमाने सांगितल मला, बॉडी गार्ड बोलवला परत",.. आदित्य

आदित्य सचिन पोलिस स्टेशनला गेले, विक्रमची पोलिस कंप्लेंट केली, रस्ता भर सचिन आदित्यला रागवत होता, एवढ दुर्लक्ष वहिनी कडे, एक तर आत रहाता तुम्ही तिकडे शेतात , समजत नाही का तुला आदित्य, सीमा वहिनी साधी आहे

" जर विक्रमने परत तुमच्या फॅमिलीच नाव घेतल तर मी बघतो त्याच्या कडे",.. इंस्पेक्टर साहेब

"आबांना सांगू नका मी सेफ्टी साठी कंप्लेंट केली",.. आदित्य

"हो ते समजल मला, कोणाला समजणार नाही हा माझा फोन नंबर घ्या, तुम्ही वहिनींना द्या",.. इंस्पेक्टर साहेब

"तुमचे खूप आभार",.. आदित्य

आदित्य घरी आला, आज खूप दमला होता तो, सीमा खुश होती त्याला बघून, तिने चहा करून आणला, आदित्यने चहा घेतला, मी फ्रेश होवुन येतो, आदित्य वरती गेला, सीमा कामात होती

आबा अजूनही फोन वर बोलत होते, उद्या काय काय काम आहेत ते सांगत होते शिंदे साहेबांना, ते सगळे खाली बोलत बसले जरा वेळ, जेवण झालं,

"मी जरा झोपतो आबा मी खुप थकलो आहे" ,... आदित्य सीमा रूम मध्ये आले

" सीमा तुझा फोन आण, तुझ्या फोनमध्ये हा महत्त्वाचा नंबर आधी सेव्ह करून ठेव, हा इन्स्पेक्टर साहेबांचा फोन नंबर आहे, पाठ करून ठेव हा नंबर, काही वाटलं तर वापरता येईल तुला",... आदित्य

"काय झालं आहे आदित्य",.सीमा

"मी आज विक्रमची पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली की या माणसापासून आपल्याला धोका आहे म्हणजे तुला धोका आहे, जर त्याने तुझ्याशी बोलण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो इन्स्पेक्टर साहेबांना फोन कर माझा नंबर इंस्पेक्टर साहेबांचा नंबर लक्षात असू दे आणि तो इमर्जन्सी मध्ये सेव्ह कर",.. आदित्य

" हो आदित्य",.. सीमा

" आज काही प्रॉब्लेम आला नाही ना, तू एकटी असते तर मला कसतरी होत ",.. आदित्य

" नाही काहीच प्रॉब्लेम आला नाही, ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड दोघे आले होते, मी लगेच घरी आली",.. सीमा

" रोज असच करायचं जोपर्यंत कार येत नाही तोपर्यंत शाळेतुन निघायचं नाही",.. आदित्य

हो..

" इलेक्शनच्या दिवशी येशील ना तू माझ्या सोबत तिकडे गावात",... आदित्य

" हो आम्ही येणार आहोत मी आई आजी आम्ही सगळे येणार आहोत ",.. सीमा

"त्या दिवशी शाळेला सुट्टी होईल तुझ्या ",.. आदित्य

" हो मी सांगून ठेवते उद्याच प्रिन्सिपल मॅडमला ",.. सीमा

" उद्या नको परवा सांग इलेक्शन शनिवारी आहे आणि आपण दोघं रविवारी फिरायला जातो आहोत तर पुढची सुट्टी ही वाढवून घे चार पाच दिवसाची",.. आदित्य

" अरे पण कस जमेल?, एवढ्या सुट्ट्या ",.. सीमा

"आता पण वगैरे काही नको सीमा फिक्स झालेला आहे प्रोग्राम, शनिवार इलेक्शन झालं की आपण रविवारी जातो आहोत दोघं फिरायला",.. आदित्य

" बुकिंग झाली आहे का पण",.. सीमा

" हो आज मला बराच वेळ होता तर मी बुकिंग करून घेतल, अनघा ताईने केलेलंच आहे सगळ, फक्त तारखा आपल्याला द्यायच्या होत्या, अनघा ताईचा फोन आला होता, तुझ्या बद्दल विचारत होती ती ",... आदित्य

" हो मी करेन उद्या फोन त्यांना, कुठे जातो आहोत आपण फिरायला ",.. सीमा

" हिल स्टेशन आहे तिथून तीन-चार तासावर तिकडे जात आहोत पण हे कोणालाही सांगू नकोस तसा आपल्या सोबत बॉडीगार्ड आणि ड्रायव्हर आहे, आपण आपल्याच गाडीने जाऊ पण आपण लग्नाला जातो आहोत असं प्रिन्सिपल मॅडमला सांग घरी पण जास्त कोणाला सांगायचं नाही नाहीतर ती बातमी लगेच विक्रम पर्यंत जाईल ",.. आदित्य

"हो ना ती डोकेदुखी झाली आहे आपल्या मागे",.. सीमा

"आपण करू त्याला सरळ तू काळजी करू नकोस",.. आदित्य

"आबा आक्कांना विक्रमच वागण कस ते सांगाव लागेल",..आदित्य

"नको आदित्य मला भिती वाटते, त्यांना काय वाटेल ",.. सीमा

" सीमा ऐक माझ सांगून देवू तो विक्रम सारखी तुझी माहिती घरी विचारतो, तसा तुला धोका आहे ",... आदित्य

" कोणी सांगितल ",.. सीमा

" काम करणाऱ्या काकांनी",.. आदित्य

बापरे

" हो त्या पेक्षा आबा आक्का आजी यांना सांगितल तर ते तुझी माहिती सांगणार नाही, नात्यांचा गैरफायदा घेतला विक्रमने, मुद्दाम सूड भावनेने तो मागे येतो आहे",... आदित्य

" हो पण आबा आक्कांना काय वाटेल ",.. सीमा

"यात तुझा दोष थोडी आहे सीमा, तू काय कश्याला वाईट वाटून घेते, विक्रमला त्याचा वागण्याची लाज वाटत नाही, काका ही तसेच होते आधी ",.. आदित्य

" बापरे कठिण दिसतय हे ",... सीमा

हो..

" आदित्य उद्या केव्हा निघणार तुम्ही दोघ ",.. सीमा

" रोजच्या वेळी", ... आदित्य

"डबा देवू का उद्या ",.. सीमा

"नको, तिकडे जेवू ... चल इकडे ये सीमा",.. आदित्य

"आदित्य आज निशा बोलत होती मी सुंदर दिसते आता हल्ली, खर का ",.. सीमा

"म्हणजे तू आहेच सुंदर, बघाव लागेल नीट जरा, ये बर इकडे",... आदित्य

"आदित्य नीट सांग ना",.. सीमा

"ये ना इकडे मग, लांबून कस समजणार",.. आदित्य

"तू थकला नाही का आता ",.. सीमा

"नाही सीमा तुझ्याशी बोलतांना थकवा पळून जातो... प्रेमाचा रंग चढला की काय तुझ्यावर बघु",... आदित्य

आदित्य काहीही...

🎭 Series Post

View all