Dec 08, 2021
General

नवीन सूरूवात !!

Read Later
नवीन सूरूवात !!

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

” या वीकेंडला पाहुणे येणार आहेत...” हे ऐकल्यावर सुधा कामाला लागली.... तिच्या डोक्यात आठवडाभर हाच विचार होता की घर आवरायचं, सगळ्या खोल्या अस्ताव्यस्त झाल्यात त्या व्यवस्थित करायच्या आहेत, सगळे वॉशरूम क्लीन करायचे, किचन मधला पसारा नीटनेटका ठेवायचा आहे.... त्यानंतर घर सजवायचं आहे... आणि शेवटी जेवणाचा मेनू... हुश्श्य....

साधारणतः प्रत्येक घराची हीच स्थिती असते. पाहुणे येणार म्हटलं, की घरातल्या बाईलाच ह्या सगळ्या कामाची यादी अगदी आठवडाभर अगदी नको नको करून सोडते.... आणि पाहुणे येणार नसतील तरीही दर आठवड्याला इतकी कामं करावी लागतातच... वीकेंडला  दुप्पट कामं !!! पण पुरुषांचं मात्र तसं नसतं... त्यांची लाईफ अगदी सुरळीत असते. आठवडाभर ऑफिस आणि घरी आल्यावर टाईमपास... जेवण, नाश्ता, चहा , धुतलेले घडी घातलेले कपडे, सर्व काही हातात मिळते त्यांना... आणि वीकेंड तर स्पेशल असतो यांचा !


हो .. मान्य कि आजकाल जरा बरं आहे कारण नवरे थोडीशी मदत करतात सांगितल्यावर आज-काल... पण मुख्य जबाबदारी अजूनही घरातल्या स्त्रीची असते.. प्रत्येक गोष्टीसाठी... कारण अजूनही घरी कोणी येणार म्हटलं की जेवढे टेन्शन बाईला येतं तेवढं पुरुषाला कधी येत नाही... कचरा दिसला कि झाडू घेऊन येणारी स्त्रीच असते अजूनही ! वर बोलणार कसं , "कि तू कुठे सांगितलं झाडायला ? म्हणून मी नाही झाडल" !!! जणु काही बायकोला बिग बॉस इंस्ट्रुकशन्स देतो रोज!!!


जर एखादा पुरुष नोकरीनिमित्त बाहेर राहत असेल तर पहिलं त्याच्या लग्नाच बघणं सुरू करतात ,जेणेकरून त्याचे खायचे वांदे संपतील... अजूनही आपल्या समाजामध्ये , लग्न म्हणजे सोयिस्कररित्या पुरुषांसाठी केलेली सोय असते आयुष्यभरासाठी...आधी आई जन्मापासून लग्नापर्यंत सगळं काही हातात देते.. आणि नंतर... बायको!!! ऍटलीस्ट आई साठी आदर तरी असतो... पण बायको! बायको म्हणजे हक्काची मोलकरीण घरातली... आधीच्या काळात तरी बायका घरात दिवसभर असायचा त्यामुळे घर काम या व्यतिरिक्त त्यांना काही करावे लागत नसे(तू काय घरीच असते हे सतत सुनावून )... पण आता नोकरी करणारी स्त्री हवी असते... म्हणजे तिने आता नोकरी ही करायची, पैसेही मिळवायचे आणि घरातही तितकच काम करायचं...

मुळात विचार करायला गेलं तर.. घरात राहणाऱ्या प्रत्येकाला जेवायला लागतं, कपडे धुतलेले लागतात सगळं काही लागतं.. पण हे काम करण्याचा मक्ता कोणाचा? तर फक्त घरातल्या बाईचा...!!! नोकरी दोघेही करतात... दोघेही दमतात... पण घरी आल्या आल्या एक मस्तपैकी कोचावर आडवा पडतो तर दुसऱ्याने लगेच कामाला लागायचे अशी अपेक्षा असते... किंबहुना बायकांच्या मनात असे बिंबवले गेले लहानपणापासून.. किचन म्हणजे फक्त तुझं काम,.. साफसफाई , आवराआवर ही सुद्धा तुझीच काम... त्यात नवऱ्याने जरा मदत केली.. तरी त्याला डोक्यावर घेणार आणि म्हणणार ,माझा नवरा मला खूप मदत करतो!! पण तो मुळात मदत करतो का ? तर नाही ! कारण हे घर त्याचंही आहे .. त्याच्याही गरजा आहेत... मग त्याने घरात काम केलं तर त्याला "मदत " असं का म्हणतात? स्वतःच्या घरात स्वतःचेच काम करणं हे घरात राहणाऱ्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे... पण घरातल्या पुरुषांनी ते कधीच करायचं नाही आणि घरातल्या स्त्रियांनी त्याकडे जन्मजन्मांतरी ओझं घेतल्यासारखं वागायचं, हे काही मला पटत नाही...

पण हे सगळं कसं आणि कुठे थांबेल?

ह्या सगळ्यासाठी एक सुरुवात व्हायला हवी , प्रत्येकाच्या घरातून... तरच पुढची पिढी समान वागेल आणि निदान त्या पुढच्या पिढीमध्ये तरी असे विचार नसतील... आजच्या आईने जर स्वतःच्या मुलांना... मुलगा किंवा मुलगी दोघांनाही जर  जेवण बनवण्याचं शिकवलं ,घराची आवराआवर करणं शिकवलं... आणि हे काम बायकांचं ते काम पुरुषांचं... असा भेद न करता त्यांना प्रत्येक काम करण्यासाठी स्वावलंबी बनवले , तर हे कुठेतरी जाऊन थांबेल. आजच्या मुलांनी त्यांच्या बाबाला आणि त्याच्या आईला दोघांना मिळून घरातले काम करताना बघण्याची जास्त गरजेचे आहे... जर त्यांनी सतत त्यांच्या आईला घराची आवराआवर साफसफाई जेवण भांडीकुंडी करताना पाहिलं तर नकळत त्यांच्याही मनात तीच गोष्ट बिंबवली जाते... आणि हो आईने देखील बाहेरचे काम करण्यासाठी आपल्या नवर्‍याला मदत केली पाहिजे..

स्वतःपुरता स्वयंपाक , स्वच्छता आणि मुळात नीटनेटकं राहणं तेही कुणाच्या मदतीशिवाय हे प्रत्येकाला आलंच पाहिजे , मुलगा असो व मुलगी ! घरात जिथे गरज असेल तिथे , हे माझं काम नाही असा विचार न करता दोघांनी असलं पाहीजे , तर आणि तरच संसार सुखाचा होईल ! काय म्हणता ? पटलं ना?


समाप्त

(© सावली ... स्वतःची )

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now