Jan 26, 2022
नारीवादी

नावडतीचे मिठ अळणी...

Read Later
नावडतीचे मिठ अळणी...

आज कोर्टाची तारीख आहे का ग सीमा? आई विचारत होती

हो आई ऑफिसहुन डायरेक्ट तिकडे जाणार आहे मी, सीमा आवरून ऑफिसला गेली, ऑफिसची कामं पटापट आटोपली, आज तिला हाफ डे घ्यायचा होता....

ऑफिसहून हाफ डे घेवून सीमा डायरेक्ट कोर्टात आली , आज तिची आणि राहुलची तिच्या नवर्‍याची घटस्फोटाची तारीख होती, खरतर तिला हे जे होतय ते आवडत नव्हत,

राहुलला बघून ती इमोशनल व्हायची , खूप प्रेम होतं तिचं राहुलवर, गेल्या वर्षा पासुन ते दोघे वेगळे राहत होते, सीमाने घटस्फोटाचा अर्ज दिला होता,

समोर राहुल उभा दिसला, दोन वर्ष झाली होती लग्नाला त्यांच्या, पण पूर्वी पेक्षा बारीक वाटत होता तो , जाऊ दे आपल्याला काय? तो कसा का असेना , त्यात लक्ष घालायच नाही, उगीच त्रास होतो मग, सीमाने दुर्लक्ष करायचं ठरवल आणि तिचा वकील जिथे उभा होता तिकडे गेली,

दोन वर्षापूर्वी ठरवून दोघांच लग्न झाल, बघता क्षणी सीमा आणि राहुल ने एकमेकाला पसंत केले होते, गप्पा संपायच्या नाहीत त्यांच्या, सगळं मनातलं एकमेकांना सांगायचे ते, मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून सीमा खूप खुश होती, मानपान सगळ दिल सीमाच्या आईवडिलांनी, वाजत गाजत लग्न झालं

तरी सासरच्या लोकांना ते कमीच पडल, लग्नानंतर एक आठवड्यात सीमाला सासुबाईंनी त्रास द्यायला सुरुवात केली, रोज तेच लग्नात हेच नव्हत तेच नव्हत, आमचा मानपान नीट झाला नाही, स्वयंपाक आवडला नाही,

रोजच्या कामावरून बोलणी बसायची सीमाला , खर तर अत्यंत हुशार मुलगी होती ती, नौकरी होती, स्वयंपाकही बर्‍या पैकी जमत होता, पण म्हणता ना नावडतिचे मीठ अळणी तस तिची एक ही गोष्ट सासुबाईंना पटेना,

राहुलच....... तिचे सासरे यांच काहीही चालायच नाही सासुबाईंना पुढे,

काही बोलायचा नाही राहुल आई पुढे, खरंतर पटायच नाही त्याला आईच वागण, पण त्याने कधीच बाजू घेतली नाही सीमाची,

खूप तोफांड करायच्या त्या, नाही... नाही ते बोलायच्या सीमाला, कंटाळून गेली होती ती,

सगळ अगदी सहनशक्तीच्या पलीकडल होत..

सीमा आशेने बघायची राहुलकडे, तो साफ दुर्लक्ष करायचा तिच्या कडे , मानसिक रित्या पूर्ण तुटून गेली होती ती, आपल्याला वेड लागेल की काय? असे तिला वाटायला लागले, तरी घरची परिस्थिती बदलली नाही,

शाब्दिक बोलणं खूप लागत मनाला, स्वतःवरच विश्वास उडून जातो अश्या परिस्थितीत, आपण काहीही केलं की चूकेलच असं वाटायला लागतं, अशा वेळी आपल्या माणसांचा आधार गरजेचा असतो , तू कर ग मी आहे तुझ्या पाठीशी, हे वाक्य खूप दिलासा देऊन जात,

हेच तर नव्हतं सीमाच्या आयुष्यात, आधार मिळालाच नाही तिला कधी, डोकं खूप दुखायला लागलं तिचं, एक दिवस चक्कर येऊन पडली ती, तसंच दवाखान्यात नेल , डॉक्टरांनी सांगितलं की मानसिक आधाराची गरज आहे सीमाला, तीने ठरवलं आता आपला उपाय आपणच करायला पाहिजे, स्वतःसाठीच स्टॅन्ड नाही घेतला तर आपलं मरण निश्चित आहे

तिचा निर्णय झाला...... तिने घर सोडल ते परत कधी न येण्यासाठी, राहुलने खूप समजवले तिला पण ती ठाम राहिली, अस कस जगता येईल नेहमी दबावात, किती तो त्रास, काही चुकत असेल काही तर ठीक होत, सगळ नीट असून रोज भांडणं.... टोमणे सहन करण्या पलीकडले होते, तिलाही जगायचा अधिकार होता, आनंदी राहायचा अधिकार होता, शेवटी स्त्रीलाही मन असत, एवढच आहे की दरवेळी होणारा त्रास ती बोलून दाखवत नाही म्हणून का घरच्यांनी तिला गृहीत धरायच.....

केस सुरू व्हायला अर्धा तास होता.......

सीमा चहा प्यायला कॅन्टीन कडे गेली, राहुल तिच्याशी बोलण्याची संधीच शोधत होता, तो ही आला तिच्या मागे,

सीमा एक मिनिट मला बोलायच आहे तुझ्याशी,..... राहुल

जे बोलायचे आहे ते इथे वकिलांन समोर बोल ,..... सीमा

राहुल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.... हे सगळ थांबव सीमा , मला घटस्फोट नकोय, मी नाही जगू शकत तुझ्या शिवाय, हे पूर्ण वर्ष मी कसं काढल ते माझं मलाच माहिती, तू बोलशील तस करू आपण,

आता उशीर झालाय राहुल , तुझ्यासारख्या भित्रा मुलगा नवरा म्हणून नकोय मला, ज्याच्या बायकोवर त्याच्या डोळ्यासमोर अन्याय होतो तरी तो गप्प बसतो, तो काय सांभाळणार मला जन्म भर, वेळेवर अन्याय थांबवला नाही तर किती त्रास होतो दुसर्‍याला, बायकोच्या बाजूने बोलल नाही तर काय उपयोग आहे? , आपल्या माणसांची बाजू घेतली नाही तर काय अर्थ आहे? , अन्याय करणार्‍यांना पाठींबा देणे हा ही मोठा गुन्हा आहे, चुकीच वागणाऱ्या व्यक्तिला वेळेवर सांगितल पाहिजे.... की हे थांबवा, नाही ऐकल तर आपण तिथून निघून पुढे गेल पाहिजे, यातच प्रगती आहे भलं आहे,.... खूप बोलली सीमा,

राहुल ऐकत होता, एकदम त्याचे डोळे भरून आले, मला माफ कर सीमा, मला माझी चुक समजली, आपण वेगळे राहु पण घटस्फोट नको,

मला एकटीने लढा द्यायचा खूप कंटाळा आला आहे राहुल, परत एकत्र राहायला सुरुवात केली की तू तसाच वागणार

नाही सीमा मी तुला वचन देतो यापुढे मी तुला अंतर देणार नाही

सीमाचही प्रेम होत राहुलवर, काय कराव सुचत नव्हत, तिने राहुलला नकार दिला,.....

राहुल तू मनाने खूप चांगला आहे, पण मी तुझ्या सोबत राहू शकत नाही, एक तर माझ्यावर माझ्या आईची जबाबदारी आहे ,

तुझ्या सारख्या भित्र्या मुलांनी तर कधीच लग्न करू नये, तुझ्यामुळे तुझच नाहीतर माझं नुकसान झालं आहे, मला परत ती चूक करायची नाही आणि मला नाही वाटत माझ्यामुळे तू तुझ्या आई-वडिलांना एकटे सोडाव, आपले रस्ते वेगळे आहेत........

हृदयावर दगड ठेवून ती वकिलांसोबत कोर्टाकडे निघाली........ तीचे आणि राहुलचे नाव पुकारले जात होते
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now