नवसाला पावला
रात्री, रेखा कॅलेंडर चे पानं पलटून पहात होती.”मागच्या अठरा ला तिची पाळी होती .आता आठ दिवस उलटले– तेवढ्यात तिची सासू रखमा मागेयेऊन उभी राहिली.

‘अगो उद्या संकष्टी आहे..’
‘ तेच पाहते आहे, म्हणत रेखाने वेळ मारून नेली.
‘कांग आता शी तू दूर नाही बसली?’
अं हो येईल ‘
रेखा ने वेळ मारून नेली
..
मला उद्या 21 दूर्वांची जुडी, हार फूल लागतील!’ ,गणपतीच्या देवळात जायचं, त्यांच्या प्रसादाचे मोदक ,
‘हो, हो सासूबाई आहे माझ्या ध्यानात .’

‘तुले सांगते रेखा –
रेखा साठी हे नेहमीच होत, दर संकष्टीला रखमा न विसरता रेखाला त्यांच्या मुलाच्या म्हणजे गणेशच्या जन्माची कहाणी अगदी रंगवून सांगायच्या— तुला सांगते रेखा माझं लगीन झालं ना तेव्हा मी पंधरा-सोळा वर्षाची होते सासू माझी लय कडक* बाई.
दोन-चार वर्षे झाली पण माझी कूस काही उजवली नाही.
सासू एक दिवस शेजारणीला सांगत होती काय जाणे वांझोटी दिसते, पाहीन अजून एक दोन वरिस नाहीतर दुसरी आणेन.
माझा जीव लय घाबरला मी धावत गणपती बाप्पाच्या फोटू समोर उभे राहिले त्याला साकडं घातलं देवा तूच आता माझ्या पाठीराखा.
कोणी सांगत संकष्टी चे उपवास कर आणि मी केले आणि पावला ग माझा गजानन म्हणून तर तुझ्या नवऱ्याचं नाव गणेश ठेवल आहे.
रेखा आपल काम करत हं हं करत होती. बघ तुला पण पावल.रेखा ला माहित होतं
दोन मुलींच्या पाठी सासूला मुलगा हवाय , पण् या महागाईच्या काळात दोन लेकरांना पोसण जड झालय . आणि तिसरं मूल परवडणार नाही.आता मुलगा काय आणि मुलगी दोघेही सारखेच. पण सासूबाई काही समजून घेत नाही.
‘ हां करते’ म्हणून रेखाने वेळ मारून नेली.
रेखा ला घरातल आटपून कामाला जायच असायचं एका कारखान्यात रोजिनदारी वर कामाला होती ती. गणेश एका आफिसात प्यून होता दोघांच्या मिळकतीत जेमतेम घर चालत होत.

दुपारी रिद्धी सिद्धी दोन्ही नाती शाळेतून आल्या आणि आजी काय करते आहे म्हणत मागे लागल्या.
निविद्य करते हाय गणपतीला. रात्री आरती करून मगच प्रसाद भेटेल .अगदी पावणारा आहे हा बाप्पा.
‘आणि म्या शेजारच्या इंदी बरोबर देवळात जाती आहे तुम्ही गपगुमान घरी रहा!’आणी अभ्यास करा, म्हणत रखमा निघाली.
देवळात खूप गर्दी होती दर्शन घेऊन दोघी एका झाडाखाली बसल्या तेवढ्यात सुभद्रा दिसली. ‘अग बया ही सुभी हाय का कोणी अजून? किती हडकली आहे ओळखु बी येत नाही.’ रखमा आश्चर्याने म्हणाली.
‘अग मुलाकडे राहत होती कोण जाणे कोणास ठाऊक काय झालं पण आता म्हणते इथेच राहीन कष्टाची मीठ भाकरी खाईन, आणि मानाने जगेन..
‘अगं बया असं काय बाई झालं एवढा नवसाने एक पोरगा झाला होता.
पोरगा पोरगा म्हणून लय डोक्यावर बसवलं मग दाखवले त्याने आपले गुण. जोपर्यंत आई कामाची होती तोपर्यंत ठेवून घेतलं आता म्हातारीच्या नी काही होत नाही मग तिचे हाल सुरू झाले अस पोरग नसल्या परीस बरं.’

‘मग आता इथं कुणाबरोबर राहते? अग दोन पोरी आहेस ना तिच्या त्या संभाळतात, मधून मधून येऊन पाहून जातात आता त्यांना बी त्यांच्या संसार हाय ना लेक म्हणते येऊन रहा माझ्याकडे पण म्हातारीला काही पटत नाही.
आजकाल काय बी खरं नाही लोक म्हणतात पोरापेक्षा पोरी बऱ्या म्हातारपणी आय ला संभाळतात तरी.
संध्याकाळी आरती करताना” रेखा अग चल न बाय आरती करून निविद्य —-”
तुम्ही करून घ्या सासुबाई मला नाही करायची..
“अग बया व्हय काय दूर बसली वाटत.”
सासूबाई चा स्वर सामान्य होता.रेखाला आश्चर्य वाटले.

आरती झाली नातींना प्रसाद भेटला. जेवणाची ताट वाढून झालं तरी सासूबाई देवापाशी हात जोडून उभ्या.
पाळी आली म्हणून दाराशी येऊन रेखा पाहू लागली. सासूबाई देवापाशी जोरजोराने बोलत होत्या”खूप उपकार बाबा गजानना दोन पोरी आहेत ना राद्धि सिद्धी त्याच पुऱ्या आहे माझ्या लेकरासाठी त्यातच मी खुश. काय करायचं अजून ?मुलगा काय मुलगी काय दोन्ही सारखेच…आता रेखा म्हणते तस गणेश ला आपरेशन करायला सांगिन.

रेखाचा तिच्या कानावर विश्वासच बसेना. सारखं देव पावेल नातू होईल चा धोशा लावणारी सासू काय झाले यांना?
काहिही असो चला गजानन पावला म्हणायचं सासूबाईंची मती फिरवली असे म्हणून रेखाने तिथूनच गजाननाला हात जोडले…
—-------------------------------++++++++
लेखन सौ प्रतिभा परांजपे

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा