Login

नावडतीचे मीठ अळणी.. भाग २

सुख शोधता आले पाहिजे


नावडतीचे मीठ अळणी.. भाग २


आधीपासूनच वृंदाताईंना स्वयंपाकाचा थोडा कंटाळाच होता.. म्हणजे मूड असेल तर त्या भरपूर स्वयंपाक करायच्या.. पण तरिही उत्साह नसायचाच.. त्यात मीनलचे लग्न झाल्यापासून त्यांना बहाणा मिळाला. मग काय कणिक तू भिजव.
पोळ्या मी करते.. पण मग पोळ्या करताना एखादा फोन यायचाच.. मग तो फोन आला कि \" हि एवढी पोळी बघ ग..\" पण फोन आला कि तो अर्धा तास चालणार हे मीनलला माहित असायचे. मग काय ती करतेय सगळ्या पोळ्या, कारण पोळ्या करुन तिला ऑफिसला जायचे असायचे.. मुले होईपर्यंत तिने हे चालवून घेतले. पण मुले झाल्यावर मात्र तिने हट्टाने एका स्वयंपाकाच्या मावशींना ठेवून घेतले.. भाज्या चिरणे, पोळ्या करणे अशी कामे त्या करायच्या.. पण त्यामुळे वृंदाताईंचे काम खूपच कमी झाले.. मग काय त्या फक्त त्यांच्या यजमानांना काही हवे असेल तरच स्वयंपाकघरात जायच्या नाहीतर नाही.. असे चालू असतानाच एक दिवस अचानक त्यांचे यजमान सुधाकरराव आजारी पडले.. आणि आठ दिवसात गेले सुद्धा.. त्यांचे आजारपण, नंतर दिवसपाणी हे सगळे सुरू असताना त्यांचा स्वयंपाकघराशी संबंधच तुटला.. मीनलला सगळेच सांभाळावे लागले.. दोन मुलांचे, नवर्‍याचा नाश्ता, डबे, संध्याकाळचे खाणे, जेवण हे सगळे तिलाच पहावे लागे.. याचा परिणाम असा झाला कि वृंदाताईंनी स्वयंपाकघरात जाणेच थांबवले.. पण कधी काही करावेसे वाटले तर त्यांचे पदार्थ बिघडू लागले.. मग कोणी ते खायला तयार होईना.. त्याचा राग त्यांनी मीनलवर काढायला सुरुवात केली.. तिच्या स्वयंपाकात सतत चुका काढायला सुरुवात केली.. मीनलने हे सगळे तिच्या नवर्‍याच्या सलीलच्या कानावर घातले. पण नुकतेच बाबा वारले आहेत त्यामुळे तिची मनस्थिती थोडीशी बरी नाही.. तू तरी समजून घे अशी तिची समजूत काढली.. इतर वेळेस बर्‍या असणाऱ्या वृंदाताईंचे वागणे स्वयंपाकाचे नाव काढले कि जास्तच बिघडत चालले होते.. प्रत्येक वेळेस जेवताना हे मला आवडत नाही तरी तू केलेस, मला त्यामुळे जेवणच जात नाही असे त्यांनी बोलणे सुरू केले.. खरेतर वृंदाताईचा सकाळी नाश्ता, संध्याकाळी खाणे असायचे. त्यामुळे जेवण कमी जेवले जायचे. पण तरिही येणाऱ्या जाणाऱ्या कडे मी कशी जेवत नाही हे तुणतुणे सतत चालू असायचे.. या सगळ्याला मीनल वैतागली होती.. पण काहीच बोलता येत नव्हते.. शेवटी एक दिवस सुचेतानेच मनाशी काहीतरी ठरवले.. तिने सलीलला विश्वासात घेतले..

" आई, हॅपी बर्थडे.." सुचेता त्यांच्या गळ्यात पडून म्हणाली..
" थॅंक यू.." वृंदाताई खुश होऊन म्हणाल्या..
" आज तू, मी आणि सलील आपण तिघेच बाहेर जाणार आहोत.. "
" अग पण कुठे?"
" ते एक सरप्राईज आहे.." मग ते तिघेही गाडीत बसून निघाले. वृंदाताईंनी पाहिले तर डिक्कीत जेवण आणि भेटवस्तूही होत्या.. त्यांना सुचेताचा स्वभाव माहित होता. कितीही विचारले असते तरिही तिने सांगितले नसते ना सलीलला सांगू दिले असते. मग त्यांनीही तो विषय नाही काढला.. पण खूप दिवसांनी तिघांनी छान गप्पा मारल्या.. एका ठिकाणी आल्यावर सलीलने गाडी थांबवली.. " आई, मी आणि सलीलने तुझा वाढदिवस आहे म्हणून या वृद्धाश्रमात जेवण आणि भेटवस्तू द्यायचे ठरवले आहे. आम्हाला माहीत आहे तुला हे जास्त आवडत नाही.. तू आत ये असे मी म्हणत नाही.. आग्रह तर अजिबात नाही.. आम्ही पटकन हे देऊन येतो.. मग आपण देवळात जाऊ. फक्त तू आत येणार कि गाडीत थांबणार हे सांग.." सुचेताने आईला बोलायची संधी न देता पटकन बोलून टाकले..
" मी आत येत नाही. बाहेरच थांबीन.. गाडीत बसून मी काय करणार? पण तुम्ही लवकर या.." वृंदाताई नाराज होत म्हणाल्या..
" आलो लगेच.." सलील म्हणाला.. दोघेही भेटवस्तू व आणलेले डबे घेऊन आत जाऊ लागले.. वृंदाताई बाहेरच्या बागेतल्या बाकड्यावर टेकल्या.. आजचा दिवस तरी त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचा होता.. पण..
त्यांना एकटे बसलेले बघून एक बाई त्यांच्या जवळ येऊन बसल्या..
" तुम्हीपण येणार का इथे?" त्यांनी विचारले...
मुले ठेवतील का वृंदाताईंना वृद्धाश्रमात? बघू पुढील भागात तोपर्यंत हा भाग कसा वाटली ते नक्की सांगा....

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all