"नव आकांक्षा........"

नवे वर्ष....नवी स्वप्नं


कविता..
विषय. "नव आकांक्षा......."

नववर्षाच्या उंबरठ्यावर,
आली नवी पहाट.
नवे स्वप्न नवी आशा
दाखवी उत्कर्षाची वाट.

जिगीषा जागवी लेखनाची,
नवसाहित्य वाचनाची.
नोंद होवो सृजनाची,
नव नव्या संकल्पनांची.

साहित्याच्या बागेतुनी
शब्दरूपी फुलं वेचिले
काव्यरूपी माळ गुंफुनी
वागेश्वरी चरणी वाहिले. 

***********************