Feb 26, 2024
नारीवादी

नात्यात अहंकार नको...भाग 3 अंतिम

Read Later
नात्यात अहंकार नको...भाग 3 अंतिम
नात्यात अहंकार नको...भाग 3 अंतिम

"जेव्हा मला कळलं की तुझं लग्न होतंय तेव्हा मी परमेश्वराला हात जोडून कोटी कोटी प्रणाम केलं." अंजली अजून पुढे बोलणार तोच अनुजने बोलायला सुरुवात केली.""तुझा नवरा जतिन कधी येतोय?" अनुजने गोष्ट बदलवत विचारलं.

"जतिनचं आधीच इथे ट्रांसफर  झालंय म्हणुन तर मी माझं ट्रांसफर करुन घेतलंय. तो सहा महिन्यांसाठी ऑफिशिअल टुर वर गेलाय, तो आला की मग झालं. तो म्हणायला "केमिकल इंजिनियर" आहे पण त्याला प्रकृति प्रेम खुप आहे. नद्या, झरणे, पहाडी..त्याला निसर्ग खुप आवडतो."अजंली खळखळून हसली.


"चल, उठ आता. किती वेळ पडून राहणार आहेस?" आरतीच्या आवाजाने अनुज तंद्रीतून बाहेर आला.

"अनुज उठ लवकर, तयार हो रे..आपल्याला निघायचं आहे."

आज जतिन (अंजलि चा नवरा)  टुर वरून परत येणार होता. अंजलीने अनुज आणि आरतीला जेवायला बोलावले होते.


दोघेही छान तयार होऊन निघाले. वाटेत पुर्ण वेळ अनुजच्या डोक्यात जुन्या गोष्टीचा काहुर माजला होता. पुर्ण वेळ तो विचारच  करत राहिला.

अंजलोकडे पोहोचताच,


हाय..हलो. पासून सुरूवात झाली. चौघांच्या गप्पा सुरू झाल्या. जतिन कविता लिहायचा, तो निसर्गवेडा होता. निसर्ग, पहाडी, नद्या.. हे त्याला खुप आवडायचे. त्यात तो रममाण होऊन कविता लिहायचा.

आरतीलाही कविताची आवड आहे हे जतिनला कळलं तो खुश झाला.

"अरे व्वा आपल्या सोबत कुणीतरी आहे." या गोष्टीचा त्याला आनंद झाला.

गप्पा गोष्टी करत करत जेवानाचा कार्यक्रम निपटला आणि मग सुरु झाली कवितेची मैफिल.

"मग आरती मॅडम एकवा तुमची एखादी कविता."जतिन मिश्किलपणे बोलला.

"अहो..नाही..नाही, मी तर आपलं सहजच थोडफार लिहीते."

जतिनने खुप आग्रह केला म्हणून आरतीने आपली कविता ऐकवली.

जतिनने आरतीच्या कविताची खुप तारीफ केली.

अंजलीच्या घरी आरतीने काही डिशेस तयार केल्या होत्या. आधी जतिनने तिच्या खाण्याची तारीफ केली आणि आता कवितेची. त्या तिघांच हसणं, खिदळण सुरू होतं पण अनुज मात्र विचारात गठला होता.

जतिनने आरतीची केलेली तारीफ , तिच्या कवितेच केलेलं कौतुक अनुजच्या डोळ्यांनी कदाचित पाहावत नव्हत.

एकाद तासांनी दोघेही घराकडे परतले. आरती खुश होती. पण अनुजच्या चेहरयावर मात्र बारा वाजले होते. माथ्यावर आठया उमटल्या होत्या.

दुस-या दिवशी आरतीच्या आई बाबांचा फोन आला, त्यांनी सहजच फोन केलेला.

बोलता बोलता ट्रांसफरचा विषय निघाला. बाबांनी सहज म्हटलं

"आता दोन वर्ष तर तुम्हचं येण होणार नाही."

त्यावर अनुज पटकन उत्तरला.
"नाही नाही बाबा.... मी पुढल्या दोन-तीन महिन्यात ट्रांसफर करुन घेतोय. मी आता माझा विचार बदलला आहे"

आणि अनुज फोन ठेवतो.

त्याच्या बाजुला उभी असलेली आरती मात्र स्तब्ध होते.जो अनुज दोन वर्ष आपण कुठेही जायचं नाही अस म्हणत होता तो अचानक बदली का करून घेतोय? अनुज अस का करतोय हेच तिला कळल नव्हतं.


तिने अनुजला विचारलं,


"अनुज आपण दोन वर्ष इथेच राहणार होतो ना मग अचानक काय झालं? अनुज..उत्तर दे. काय झालं?


अनुज जवळ मात्र या प्रश्नाचं उत्तर नव्हत.

समाप्त:अनुज आणि अंजली हे एकाच कॉलेज मध्ये होते. दोघांच प्रेम प्रकरण ही होत (लग्ना आधी). हे आरतीला माहीत असूनही तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता.

ते एका ऑफिस मध्ये होते, एकमेकांशी बोलत होते यात आरतीने वाईट वाटून घेतले नाही. मोकळ्या मनाने तिने त्याच्या मैत्रीला स्विकारलं. मग एखाद्या व्यक्तीने जर त्याच्या बायकोच कौतुक केलं. तर त्याला एवढा राग का आला? हे आरती वरचं प्रेम होतं? त्याची जेलसी होती? की त्याचा इगो होता. हे मात्र आरतीला अजूनही कळलेल नव्हतं. तिला याचं उत्तरच मिळाल नव्हतं. बघा तुम्हाला उत्तर मिळतंय का आणि मिळाल्यास कॉमेंटमध्ये नक्की सांगा.


धन्यवाद


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//