नात्यात अहंकार नको...भाग 2
हे विश्वास प्रदर्शन आणि आश्वासन केवळ यासाठी कारण ती त्याची प्रेमीका होती आणि आज बारा वर्षानंतर त्याच्याच ऑफिस मध्ये ऑफिसर या पदाच्या निमीत्ताने ट्रांसफर होऊन आली आहे.
अचानक दोघांची अशा प्रकारे भेट होईल याचा कधी अनुजने विचारही केला नव्हता.
जसं अजंलीला कळलं की अनुजही त्याच ऑफिस मध्ये आहे. तिला खुप आनंद झाला आणि तितक्याच आनंदाने ती अनुजला भेटली.
अनुजला पण खुप आनंद झाला, त्याच्या मनातली धडकन होती ती.
एकाच ऑफिस मध्ये असल्यामुळे, काम संपलं की दोघेही जवळच्या कॉफी शॉप मध्ये बसायचे. मग सुरु व्हायचा "जुन्या आठवणीचा सिलसिला आणि लग्नानंतरच आयुष्य."
"काय मग कसं चाललंय तुझं? लग्न झालंय की नाही."
"हो दोन मुलं आहेत मला."
"तूझ्याकडे बघून वाटत नाही, तुझं लग्न झालं असेल आणि दोन मुलांची अम्मा असशील." तो हसायला लागला.
अजंली डोळे विस्फारून उत्तरली.
"अम्मा.. तिनेही मिश्किलपणे अनुज कडे पाहीलं.
"तुझी ती कशी आहे रे आरती? नाव तर खुप छान ठेवलस."
"ह, छान आहे ती मनाने सुद्धा आणि स्वभावाने सुद्धा.
माहीत आहे तुला आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचं मी तिला सगळं खरं सांगितलं. तिला काहीच प्रॉब्लेम नव्हता. शी इज सो ग्रेट."
"चला आनंद झाला हे ऐकून की तु खुश आहेस नाहीतर आज पर्यंत मी स्वत:लाच कोसत होते की मी तुझी साथ दिली नाही" अजंली श्वास रोखून बोलली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा