Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

नात्यांची वीण अंतिम ( मेघा अमोल)

Read Later
नात्यांची वीण अंतिम ( मेघा अमोल)"रामभाऊ, कुठं जायचं र आता? पाय लै दमायला लागले. आता चालून होईना."

रामभाऊने तिच्या कपड्याला पकडत ओढत तिला बाजूला असलेल्या रेल्वे स्थानकावर नेले.

"लै हुशार हायेस र. माणसास बी एवढी अक्कल नाय." आनंदाने तिने त्याची पाठ थोपटली. बाजूच्या ठेल्यावरून बिस्कीट पुडा घेतला. दोघांनी वाटून खाल्ला. पाण्याचाकुलरचे थंड पाणी पिले. तिथेच एक कोपरा बघितला. सोबतच्या गाठावड्यातून एक चादर काढून खाली अंथरली. आणि त्यावर अंग टेकवले. रामभाऊ नेहमी प्रमाणे तिच्या भोवती पहारा देत बसला होता.

झाले आता तिचे असेच जीवन सुरू झाले होते. रस्त्यांवर जायचं, सिग्नल लागले की गाड्यांचे काच पुसून द्यायचे. कोणी पैसे देत तर कोणी झटकन पुढे निघून जात. तर कधी कोणी फुलं विकायला द्यायचे, तर कोणी पेन इत्यादी वस्तू देत. ते विकले की त्यावर तिला थोडे कमीशन मिळत होते. दिवसभर रस्त्यावर आणि रात्र रेल्वेस्टेशनवर, असे तिचे दिवस जात होते. आता मात्र हळूहळू ती बरीच दुनियादारी शिकली होती. मोलभाव करण्यात तरबेज झाली होती. आपल्या हक्कासाठी बोलायला शिकली होती.

****

"ए छोरी, चल निकल इधरसे." एक रेल्वे कर्मचारी तिच्या जवळ येत काठी ठोकत ओरडला.

"कायकू? कायकु इधरसे निकलू?"

"ये क्या तेरा घर हैं क्या? रोज रोज आजाती इधर सोने को?"

"घर तो तोड दाला वो पैसोके तुम्हारे सहाब लोगोने. बनवा दे, चली जाऊंगी."

"तेरा घर बनवानेको क्या सरकार खाली बैठी हैं?"

"हां तो तेरे सरकारनेही मेरा घर तोडा हैं. नही वहा अवैध बांधकाम दिखता ऊसे, तोडते फिरता. हमारे इधर का नाही दिखा. कैसे दिखेगा, मुहमे पैसे ठुसे होंगे ना." ती चिडत बोलत होती.

"जा सरकारसे अपने हकके लिये लढ, इधरसे जानेका."

"हे एवढे लोकं इथं झोपली आहेत, त्यांना चालते. पण मज नाय?"

"तू पोरीची जात आहे. काय कमीजास्त झाले तर आमच्यावर येईल. जा माझी माय इथून, कशाला माझी नोकरी घालवायला निघाली आहेस." तो हात जोडत म्हणाला.

"चला रामभाऊ. आपल्यामुळे यांचं दानापाणी बंद व्हायचं. चला दुसरीकडे जागा बघू." म्हणत तिने आपले गाठोडे उचलले आणि परत रस्त्याने चालू लागली.

बरेच दूर आल्यावर फूटपाथवर तिला काही लोकं झोपलेले दिसले. ते बघून तिला दिलासा मिळाला. तिथे एका खांबाखाली जागा स्वच्छ केली, चादर टाकली. आणि दोघंही पडले. आता असेच तिचे जीवन सुरू झाले होते.

फिरता फिरता तिला एका हॉटेलपुढे एक भिकारी अन्नासाठी नोकराची विनवणी करतांना दिसला. पण तो त्याला हाकलून लावत होता.

"ये पैशे देत हाय ना ते म्हातारबाबा, फुकटात नाय मागत हाय. देणं भाकरी." ती त्या नोकरावर ओरडली.

"द्यास काय नाय. कुठून कुठून येतात किडेकिटकुल घेऊन. सगळी बिमारी फैलावतात. Hygienic नाय ते. " तो नोकर म्हणाला.

"कोरोना यायीनेच आणला नाय रे?"
तशी त्याची मान खाली गेली.
"बरोबर हाय, विमानात बसून आला ना तो, त्याची तुम्ही खातिरदारी कराल. साले अती शिकलेले, hygienic नाय म्हणते." तिने शिव्या हासडल्या.

त्याने गपचुप पोळी भाजी त्या म्हातारबाबाला दिली.

"पोरी तुझे खूप उपकार झाले. घरी म्हातारीची तब्येत बरी नाही. उपाशी बसली आहे." तो केविलवाण्या स्वरात म्हणाला.

"आओ तुम्ही तर चांगल्या घरचे दिसता?\"

"हो. पण म्हातारपण लय वाईट. पोराने घरातून हाकलून लावले. म्हातारीच्या अंगावर थोडं सोन होतं. त्यात खोली घेतली. एक मशीन घेतली. पिशव्या शिऊन विकत होतो. पाच पन्नास रुपये मिळत होते. म्हातारी बिमार पडलीईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Megha Amol

❤️

//