Dec 01, 2021
नारीवादी

नात्यांची किंमत

Read Later
नात्यांची किंमत

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

आई...…..आई.......अगं माझा रुमाल कुठे आहे.....…आणि माझे सॉक्स पण सापडत नाहीत........तुला कितीदा सांगायचं माझ्या कपड्याना हात लावू नको........एकतर स्वतः स्वच्छ धुवत नाही आणि लॉड्रि मध्ये दिले की ते आणल्यावर बेड वर ठेवायचे सोडून इकडे तिकडे टाकून ठेवतेस.......... सुमेध आई वर(सुलक्षणा ताईंवर)  जोरजोरात डाफरत बोलत होता.......


आई त्याचा डोर नॉक करते आणि आत येऊ का विचारते.


हम्म........ये.....!!!! नशीब माझं..... डोर नॉक करून यायचं तरी आहे लक्षात.........काही म्हणून सेन्स नाही गं आई तुला........"सुमेध"

हो रे बाळा......चुकलंच माझं......तू येस्तोवर कपडे बेड वर धूळ खात पडलेले असतात ना..... म्हणून ठेवून देते कपाटात.........हे बघ.......कपाटात समोरच आहेत तुझे कपडे.....अगदी जसेच्या तसे.............."सुलक्षणा ताई"

 

हम्म.…....ठीक आहे........ दे ते इकडे......आणि हो........हे घे....गेल्या महिन्याचे लॉड्रि वाल्याचे पैसे......संध्याकाळी आला की दे त्याला आठवणीने.......विसरू नको वेंधळ्यासारखी......"सुमेध"


सुलक्षणा ताई होकारार्थी मान डोलवत.......निघून जातात आणि किचन मध्ये येतात. सुमेध चा डब्बा भरून आणि त्याला गरमागरम कॉफी......त्याच्या आवडत्या दडप्या पोह्यांसोबत देतात...…दडपे पोहे आणि आईच्या हातचं अंड्याचा कालवण...... म्हणजे सुमेधचा जीव की प्राण.आईच्या हातच्या या दोन गोष्टी त्याला झोपेत सुदधा देऊ का विचारलं ना तरी, तो कधीच नाही म्हणणार नाही....तसं बघायला गेलं तर मुळात...... सुलक्षणा ताई साक्षात अन्नपूर्णा...... अगदी पाण्याला फोडणी दिली तरी .…... जिभेवर रुळणारी चव येईल......

 

सुमेध चे बाबा गंगाधरराव उर्फ साहेब......म्हणजे त्यांना कामात सगळे साहेब म्हणत, त्यामुळे घरी किंवा बाहेर त्यांना साहेबचं म्हणावं अशी सक्ती होती........रिटायर होऊन दोन वर्षे झाली.......लग्न झाल्यापासून कधीच सुलक्षणा ताईंना त्यांनी कसलीच हौसमौज करू दिली नाही..... त्यांनी कधी कसला विषय काढला की त्यांना उलट म्हणायचे........कशाला ही नसती थेरं........ घरात बसा गपगुमान........ बायकोला कमी लेखण्यात त्यांना फार आनंद वाटे.......मुळात बाई ने कस झुकून राहावं असल्या कुचकट विचारांचे साहेब........बायकोला पायातील पायताण समजायचे........सुमेध पण अगदी वडिलांच्या स्वभावावर गेला होता.......


वयाच्या एकविसाव्या वर्षी कॉलेजांतर्गत पीकनिक साठी सुमेध महाबळेश्वरला गेला. आठ दिवसांची पिकनिक होती. खूप खूप मज्जा केली त्याने........ आणि परतीच्या प्रवासात त्याच्या गाडीचा अपघात झाला. बरेच जण गंभिर जखमी होते तर, काहींना मुका मार लागला होता. सुमेध आणि त्याचे आणखीन दोन मित्र आय.सी.यू. मध्ये होते. अपघातात सुमेधच्या लिंगाला दुखापत झाल्याने तो कधीच बाप होऊ शकत नाही असं डॉक्टर सांगतात. त्याचे वडील तर हे ऐकून मटकन खालीच बसतात. सुलक्षणा ताई त्यांना समजावत बोलतात.

अहो आपलं नशीब चांगलं म्हणून लेकरू व्यवस्थित आहे. आपण घेऊ की त्याला सांभाळून...... आणि तुम्ही त्याच्या समोर असे हतबल झालात तर त्याला कसं सावरायचं...."सुलक्षणा ताई"


त्याला काय सांभाळू हो........पण आता माझा वंश कसा पुढे जाईल..... तरी सांगत होतो काही गरज नाही पिकीनीक ला जाण्याची.........आता बोलून काय उपयोग....."साहेब"


सुलक्षणा ताईंचे पती अस बोलताना बघून डॉक्टर पण हैराण होतात. साहेब निघून गेल्यावर सुलक्षणा ताई डॉक्टरांना सुमेधच्या तब्येतीबद्दल विचारणा करतात. तो आता धोक्याच्या बाहेर असल्याचं सांगून त्याला आता सगळ्यात जास्त मानसिक आधाराची गरज आहे,त्याला समजून आणि सांभाळून घ्यावं लागेल......अस डॉक्टर बोलतात आणि निघून जातात. जवळजवळ वीस दिवसांनी त्याला डिस्चार्ज मिळतो. देवाने सुमेधचं पौरुषत्वचं हिरावल्याने तो मानसिकरीत्या ढासळलेला असतो.सुलक्षणा ताई त्याला खूप समजावून त्यातून बाहेर काढतात.तरीपण त्याला यातून बाहेर आणायला सात आठ महिने जातात.


सुमेध हिम्मत करून घराबाहेर पडला आणि पुन्हा परीक्षे साठी त्याने फॉर्म  भरला. सुमेध घरी राहून खूप अभ्यास करतो आणि तो उत्तम रित्या पास होतो. सुमेध सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करून मोठ्या कम्पनीत कामाला लागतो.आठ लाख चाळीस हजार च वर्षभराचं पॅकेज असा करार होतो आणि तो कामाला लागतो.साहेब आता खूप खुश असतात. लेकाला महिन्याला सत्तर हजार पगार आहे म्हंटल्यावर सगळीकडे मिरवत असतात.सुमेध पण या सगळ्या मुळे जरा अहंकारी  होतो. सुलक्षणा ताईंना घालून पाडून बोलू लागतो. त्या या सगळ्याकडे दुर्लक्ष करीत. नवरा आणि मुलगा दोघांची बोलणी ऐकून पण त्या निमूटपणे सगळं करीत होत्या. 


एक दिवस कपडे वाळत घालतांना त्यांचा पाय घसरला आणि त्या पडल्या.......हाताला फ्रॅक्चर झालं होतं आणि पायाला मुका मार लागला होता. या सगळ्यात बापलेकानी त्यांची काळजी घेणं तर सोडाच पण त्या अवस्थेत पण त्यांना जेवण आणि इतर काम करायला लावली..


इतकी वर्षे गप्प ऐकून घेणाऱ्या सुलक्षणा ताई आज मात्र चिडल्या....त्या बेड वरून उठल्याच नाही. घरात सगळा पसारा तसाच बघितल्यावर सुमेध तडक आईच्या खोलीत आला.


इथे बसून राहिली आहेस तू??? घरात एवढा पसारा पडला आहे तो कोण आवरणार??? पडली आहेस फ्रॅक्चर आहे माहीत आहे मला म्हणून अस लोळत पडणार आहेस का??? "सुमेध"


मी उठले होते रे पण मला एका हाताने काही करता येत नाही आहे खूप दुखतोय त्रास होतोय...."सुलक्षणा ताई"


काम करायची नसली ना की लोक हेच बहाणे करतात. उठ चल कामाला लाग काही दुखणार नाही..... "सुमेध"


सुमेधचा शब्द त्यांच्या जिव्हारी लागतो. त्या उठायचा प्रयत्न करत असतातच की, एवढ्यात साहेब म्हणजे सुलक्षणा ताईंचे पती येतात....


हे काय अजून माझा चहा नाही झाला...... बस करा आता आराम आणि उठा आता......कामाला लागा........पूर्ण घराचा केरवाडा झालाय........सगळं इकडे तिकडे पसरलंय...... साहेब हॉल मधूनच बडबड करत असतात....सुमेध पण त्यांचा आवाज ऐकून लगेच बाहेर येतो.......


कुठं आहेत तुमच्या मातोश्री...... उठायचं नाही का विचारा त्यांना.......एवढ्यात मागून सुलक्षणा ताई लंगडत लंगडत बाहेर येतात.एक हात त्यांच्या गळ्यात असतो..

हां....... बोला आता.......दोघे मिळून एकदाचं तुम्हाला काय वाटत ते बोला.......तुम्हाला काय वाटते मी मुद्दाम पडले का???? मला काही हौस नव्हती समजलं ना......मला आधार द्यायचा..... समजून घ्यायचा, सोडून कामासाठी किरकिर करताय माझ्या पाठी........काय हो साहेब इतक्या वर्षात तुम्ही जेंव्हा जेंव्हा आजारी पडलात तेंव्हा तुमच सगळं हवं नको ते मी बेड वर केलं आहे ना लक्षात निदान त्याची तरी जाणं ठेवा जरा.....आणि सुमेध तू रे.......चार पैसे जास्त कमवायला लागलास म्हणून मला आता शिकवतोस काय????? अरे जेंव्हा तुझा अपघात झाला होता त्यात तू बाप होण्याचं सुख गमावलं होतंस त्यावेळी तुला आधार द्यायचा सोडून वंशाची फिकीर करणारा बाप........ आज तू त्याच्या सोबत राहून मला बोलतोयस.......अरे नालायका सात आठ महिने तुला आणि तुझ्या मनाला फुलासारख जपलं मी त्यावेळी कुशीत येऊन रडत होतास म्हणून मायेने तुझ्या डोक्यावरून हात फिरवून तुला झोपवत होते आणि आता जरा आराम करतेय तर खुपतयं का तुम्हा दोघांना........सुलक्षणा ताईंचा कंठ दाटून आला होता डोळ्यातलं पाणी पुसतंच त्या बोलत होत्या..…अरे तुमच्या साठी काम केली तुम्हाला पाहिजे तेंव्हा...... हवं ते दिल त्याचे पांग फेडताय का दोघे...... हात जोडते आता तुमच्या पुढे........थकली मी आता........माझ्यात ताकत नाही उरली काही करायची........एवढं बोलून सुलक्षणा ताई त्यांच्या खोलीत जाऊन बेड वर पडतात. 

 

इतक्या वर्षात कधीच त्या अस बोललेल्या नसतात, म्हणून त्यांना खूप वाईट वाटत असतं. त्या रडत असतात.इकडे मात्र बापलेकाला त्यांची चुक समजलेली असते. 


दोघे मिळून सगळं घर आवरतात. सुमेध आई साठी चहा करतो आणि साहेब बायकोसाठी कांदेपोहे बनवतात. दोघेही खोलीत जातात. सुलक्षणा ताईंना आवाज देतात.

 

आई......ए आई.....आम्ही चुकलो गं...... माफ कर आम्हाला......आम्ही तुला फक्त घरात काम करणारं मशिन समजत होतो. तू कधी काही मागितलं नाही म्हणून तुला कधीच काही हवं नको ते विचारलं नाही. आम्ही खरचं चुकलो गं......"सुमेध"


हो.......मी पण कधीच तुम्हाला समजून नाही घेतलं.उलट मित्रांसमोर बायकोला कसं तालावर नाचवतो हेच दाखवत राहिलो.....तुझ्या मनाचा कधी विचारच नाही केला.......पण आता त्या सगळ्या उणिवा मी भरून काढणार आहे...... मला जमेल तसा स्वयंपाक मी करेन आणि तुला स्वतःच्या हाताने चारेन.....माफ कर मला पण..... चुकलो मी........तू खूप मोठ्या मनाची आहेस आम्हाला नक्की माफ करशील खात्री आहे मला...."साहेब"


सुलक्षणा ताई मात्र काहीच बोलत नव्हत्या. हे बघून सुमेध पुढे गेला त्याने आईच्या हाताला स्पर्श केला पण त्यांच अंग बर्फासारखं गार पडलं होतं......सुमेधला आईचा चेहरा पण निष्प्राण झाल्यासारखा दिसला म्हणून तो आई ला हाक मारतो......एवढ्या वेळ आवाज देऊनही आई उठत नाही बघून सुमेध त्यांची नसं चेक करतो आणि आई गेल्याची त्याची खात्री होते. तो तिथेच गळून पडतो...... सुलक्षणा ताईंच्या जाण्याने दोघेही आज पोरके होतात......त्यांना आज सुलक्षणा ताईंची कमी भासत असते त्यांची किंमत कळत असते.दोघेही सुलक्षणा ताईंच्या मृत शरीराकडे बघून हात जोडतात आणि त्यानं शेवटच बघून घेतात. त्यांची चूक त्यांना समजते पण खूप उशीर झालेला असतो... त्यांना माणसांची आणि वेळेची किंमत समजलेली असते.

"स्त्री.....मग ती बायको असुदे ,किंवा आई,मुलगी असुदे,किंवा मैत्रीण.....
तिचा सन्मान करा......
एक मुलगी आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरी येते आणि नव्याने तिथे उमलते. एक सोबत अनेक नाती जपते.तुमची एक कौतुकाची थाप तिला शंभर हत्तीचं बळं देते.तिला दुखवू नका......

समाप्त......

कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा पोस्ट करायची असल्यास ती लेखिकेच्या नावासाहित करावी.

धन्यवाद????????

 

 

 

 


 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading