मागील भागात आपण वाचलंत,
अवधूतने मुक्ताच्या घरी येऊन तिच्या वडिलांना लग्नाची मागणी घातली होती आणि त्याचे परिणामही चांगलेच भोगले होते. असे काय झाले की, परत अवधूत आणि मुक्ता समोरासमोर आलेच नाही वाचा कथेच्या शेवटच्या या भागात.
अवधूतने मुक्ताच्या घरी येऊन तिच्या वडिलांना लग्नाची मागणी घातली होती आणि त्याचे परिणामही चांगलेच भोगले होते. असे काय झाले की, परत अवधूत आणि मुक्ता समोरासमोर आलेच नाही वाचा कथेच्या शेवटच्या या भागात.
मुक्ता अवधूतला त्या संध्याकाळी काय झालं ते सांगत होती.
"तू त्या सायंकाळी घरी येऊन आबांना मोठ्या हिंमतीने सर्व काही सांगितलं खरं, परंतू नंतर लगेचच तुला त्याचे परिणामही भोगावे लागले हेही तेवढेच सत्य; पण नंतर जे माझ्या बाबतीत घडलं ते महाभयंकर सत्य होतं. अवधूत त्या रात्री आबांनी मला खूप मारलं. संपूर्ण शरीर सुजले होते. जेवण तर सोडाच साधं पाणीदेखील प्यायलं तरी मरण यातना होत होत्या. परंतु याही परिस्थितीत मी लढायला तयार होते कारण मला ठाऊक होतं काहीही झालं तरी माझा अवधूत माझ्यासोबत राहणारच परंतू थोड्याच दिवसात तुझ्या मित्रांकडून तुझे लग्न ठरल्याची गोड बातमी कळली. खरंतर ही बातमी माझ्यासाठी विषापेक्षाही कडू होती. ज्या हिंमतीने मी तुझ्यासाठी लढायला तयार झाली होती, ती हिंमत तर केव्हाच गळून पडली होती. ही बातमी पचवणं मला आबांच्या मारापेक्षाही जड गेलं होतं रे अवधूत..
ज्या मनात सदैव माझा अवधूत वास्तव करायचा त्या मनात आता आत्महत्येच्या विचारांचं काहूर माजलं होतं; परंतू घरात इतकी माणसं सतत आजूबाजूला असायची की तेही नाही जमलं कधी. लास्ट इयर असताना देखील आबांनी माझं कॉलेज, ट्युशन इतर सर्व सर्व बंद केलं होतं. आता माझ्यासाठी घर एक एक घरच राहिलं होतं. माझं ते चार चार पाच पाच दिवस उपाशी राहणं, कुणाशीही न बोलणं,दिवस दिवस रडत राहणं.. कदाचित आबांना माझी ही अवस्था पहावली नसेल म्हणूनच की काय! त्यांनी माझी रवानगी माझ्या आजोळी केली. तिथे रोजच मला दाखविण्याचे कार्यक्रम होत असे. नाईलाजास्त का होईना पण मला समोर जावेच लागेल व एके दिवशी आबांच्या प्रयत्नांना यश आले. एका मुलाने होकार कळविला मुलगा चांगला सरकारी कर्मचारी असल्याने आबांच्या आनंदाला पारावर नव्हता. तोच तो माझा नवरा दौलत. आता तो या जगात नाही; पण अवधूत खरं सांगते रे.. मनात जरी तू असला तरी त्याचा संसार मी अगदी प्रामाणिकपणे केलेला. लग्नानंतर काही वर्ष नित्यनेमाने मन तुझी आठवण काढी. डोळ्यात पाणी येई.. परंतू दिवसागणित डोळ्यातील पाणी आटलं. नवरा मुलं घर या सर्वात मन रमायला लागलं; पण म्हणून काही तू माझ्या मनातून कायमचा गेला असं नाही आणि त्या दिवशी अचानक तू पुन्हा समोर आला विचार कर अवधूत तेव्हा माझी अवस्था कशी झाली असेल? इतकी वर्षे एखाद्या व्यक्तीबद्दल काहीच माहीत नसतं, तो कुठल्या शहरात आहे हे माहिती नसतं आणि अचानक तो समोर येतो म्हणजे काय? अवधूत, एवढं सगळं सांगितल्यावर एक मात्र आवर्जून सांगावसं वाटतं की, माझा नवरा मात्र देव माणूस होता रे.. खूप सुखात ठेवलं. त्याने मला तसं माझ्या मनात कितीही वादळ असलं तरी मी मात्र प्रामाणिकपणे त्याचा संसार केलाय.”

मुक्ता सर्व सांगताना ढसाढसा रडत होती. तिला वाटलं अवधूत तिला समजवेल, जवळ घेईल पण छे, सर्वच व्यर्थ! अवधूतर दूर कुठे एकटक पाहत उभा होता. तशीच मुक्ता पुन्हा म्हणाली,
"अवधूत तुझी आठवण इतकी मनात ठसली होती म्हणूनच की काय, जेव्हा मला नातू झाला तेव्हा तुझ्याच आद्य अक्षरावरून त्याचे नाव ठेवले मी.. ”
"अवधूत तुझी आठवण इतकी मनात ठसली होती म्हणूनच की काय, जेव्हा मला नातू झाला तेव्हा तुझ्याच आद्य अक्षरावरून त्याचे नाव ठेवले मी.. ”
हे वाक्य ऐकल्याबरोबर आतापर्यंत शांत बसलेला अवधूत म्हणाला,
"मग माझ्या बाबतीत काय वेगळे आहे मुक्ता?”
शांत बसलेल्या अवधूतकडे आपला मोर्चा मुक्ताने वळविला व म्हणाली,
"अवधूत माझा भूतकाळ येथे संपतो व वर्तमान सुरू होतो आणि तो तुला ठाऊक आहे. आता मला तुझा भूतकाळ जाणून घ्यायचाय. ऐकायचंय की, तू का मला अर्ध्यावर सोडून निघून गेलास? का इतकी वर्ष माझा साधा फोन नंबर देखील तू मिळवला नाहीस? का अवधूत का?”
"सांगतो सर्व काही सांगतो परंतु तू आधी शांत हो मुक्ता.. ”
"कशी शांत होऊ अवधूत? इतकी वर्ष मनात शमवून ठेवलं होतं हे वादळ आता तरी त्यांना त्यांच्या वाटा मोकळ्या करू दे. ”
"मुक्ता शांत हो तुला शपथ आहे माझी."
अवधूतचे वाक्य ऐकल्याबरोबर मुक्त शांत होण्याचा प्रयत्न करू लागली तसा अवधूत म्हणाला,
"अजूनही तशीच आहेस मुक्ता.. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवणारी."
"तुझी मुक्ता तशीच आहे अवधूत, जसा तू सोडून गेला होतास."
"माफ कर ग मला.. पण माझा नाईलाज माझी कोंडी ऐकशील की नाही. "
"त्या सायंकाळी तुझ्या आबांनी व काकांनी मला मारून घरातून रस्त्यावर फेकून दिले. तेव्हा मी मूर्च्छित अवस्थेत होतो. कसे ते माहित नाही पण शुद्धीवर आलो तेव्हा एका छोट्याशा दवाखान्यात होतो. कोण्या एका सज्जन गृहस्थाने मला तेथे आणले होते. किरकोळ मलमपट्टी केल्यावर घरी गेलो तर घरच्यांना झालेला सर्व प्रकार आधीच कळला होता. त्या रात्री घरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यातच भरीस भर म्हणून आईची तब्येत बिघडली. बाबांनी टोकाची भूमिका घेतली. मुक्ता किंवा आई बाबा यातून कोण्या एकाचीच निवड करायला त्यांनी मला भाग पाडलं होतं आणि याच गरम वातावरणात दामिनीचे स्थळ मला आलं. दामिनी अशी होती मुक्ता की, नाव ठेवायला जागा नव्हती: पण खरं सांगतो, दामिनीला होकार कळवायच्या आधी मी तुला भेटण्याचा फार प्रयत्न केला ग! पण दरवेळी निराशाच व्हायची. तुझ्या आबांनी व काकांनी मला तुझ्यापर्यंत पोहोचूच दिले नाही अशातच आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. डॉक्टरी उपायांचा,औषधांचा तिच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. आणि याच सर्व दडपणात मी दामिनीचा स्वीकार केला. दामिनी लग्न करून घरी आल्यावर डॉक्टरांच्या औषधांशिवाय आईमध्ये पॉझिटिव्ह बदल घडत गेला. दामिनीने आपल्या प्रेमाने व मायेने सर्वांना आपलंसं केलं होतं. लग्नानंतर काही वर्ष मन वेड्यासारखं तुझ्या आठवणीच्या मागे धावलं; परंतू मग हळूहळू मी दामिनीशी एकनिष्ठ व्हायचं ठरवलं.
तिला सर्व सूख द्यायचं ठरवलं. पुष्कळ केलं होतं तिने माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी आणि खास म्हणजे माझ्या आईसाठी… परंतू अनपेक्षितपणे जे घडतं त्यालाच आयुष्य म्हणतात ना! अगदी तसंच झालं. नियतीला माझं हे सुख पहावल नाही म्हणूनच की काय! दामिनी मला आमच्या पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर कायमची सोडून गेली. ते लहान बाळ हातात घेऊन त्या रात्री मी खूप रडलो ग! दामिनीशिवाय संसाराची कल्पनाच करवत नव्हती मला.. परंतू जे अटळ असतं तेच विधीलिखित असतं.. आणि म्हणूनच मी त्या लहानशा जीवाला उत्तम प्रकारे घडवायचं ठरवलं. सर्व ताकतीनिशी पुन्हा एकदा मी माझा संसार उभा केला खरा, पण अडचणी काही पाठ सोडत नव्हत्या म्हणूनच की काय दामिनी गेल्यावर वर्षभरातच आई गेली व आई नंतर सहा महिन्यांनी बाबाही गेले. याही परिस्थितीत मी हिंमत न हारता माझ्या संसाराचा गाडा पुढे रेटत होतो. मुलाला उच्च शिक्षित केलं. सूनही उच्च शिक्षित मिळवली. सर्व सुरळीत सुरू असताना दुधात साखर पडावी त्याच प्रकारे आमचं त्रिकोणी कुटुंब मोहिनीच्या जन्माने चौकोनी झालं होतं.”

"आणि इथेच माझा भूतकाळ संपून वर्तमान सुरू होतो; पण खरं सांगू मुक्ता? माझ्या मुलाच्या जन्मानंतरच मी स्वतःशीच एक करार केला की, माझ्या मुलाला जर प्रेम विवाह करायचा असेल तर मी स्वतः पुढाकार घेईन; पण त्याला ते कधी जमलंच नाही. जमलंच नाही म्हणण्यापेक्षा त्याने ते जमवलच नाही. त्याला प्रचंड राग आहे प्रेमविवाहाचा.”
“याबाबतीत माझा मुलगा त्याच्या आजोबांवर गेलाय.”
“आणि माझं प्रेम विवाहाचं स्वप्न माझ्या नातीच्या रूपाने आकार घेऊन पाहतेय.”
“याबाबतीत माझी नात मात्र तिच्या आजोबांवर गेलीय."
दोघांची भेट झाल्यापासून दोघेही प्रथमच थोडे हसले होते. मुक्ताच्या डोळ्यात काठोकाठ पाणी भरले होते तरीही अवधूतला साथ द्यायला ती हसत होती हसता हसता मध्येच मुक्ता थांबली व अवधूतला थांबवत म्हणाली,
"अवधूत, या मुलांचे स्वप्नातरी पूर्ण होईल ना रे? आपल्यासारखा त्रास त्यांना तर होणार नाही ना?
अवधूत मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं. अगदी कुठल्याही परिस्थितीत.. अवधूत, कुठल्याही परिस्थितीत."
अवधूत मला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं. अगदी कुठल्याही परिस्थितीत.. अवधूत, कुठल्याही परिस्थितीत."
"अगं हो किती त्रास करून घेशील स्वतःला? या मुलांचे हाल आपल्यासारखे होणार नाही मी वचन देतो तुला..”
ही भेट तर इथे संपली;पण मनात असंख्य प्रश्न देऊन गेली होती. मुक्ता व अवधूत ने घरी पोहोचल्यावर सायंकाळी झालेलं सर्व मुलांजवळ मनमोकळेपणे बोलायचं ठरवलं. त्यांना विश्वासात घेऊनच पुढील पाऊल फेकायचं हे दोघांनीही ठरवलं होतं.
सून आणि मुलगा घरी आल्यावर मुक्ताने थोड्याच वेळात त्यांच्यासमोर अनिरुद्ध च्या लग्नाचा प्रस्ताव मांडला पण हे त्याचं लग्नाचं वय नव्हेच म्हणून मुक्ताचा तो ठराव त्यांनी फेटाळून लावला. तिने समजावून सांगितले, त्याचं प्रेम आहे मोहिनीवर एकदा भेटून काय ते नंतर ठरवूया. या तिच्या प्रस्तावाला घरून दुजोरा मिळाला तिच्या आनंदाला पारावर नव्हता.
इकडे अवधूतनेही त्याच्या मुलाला मोहिनीच्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली. थोडेसे आढेवेढे घेत मोहिनीचे ही पालक अनिरुद्धला भेटायला तयार झाले. पहिली पायरी पास झालो म्हणून मुक्तांना अवधूत आनंदात होते.
भेटीचा दिवस ठरला दोन्ही कुटुंब एकत्र आले एकमताने लग्नाला संमती मिळाली; परंतू आधी शिक्षण, नोकरी नंतरच लग्न हा ठराव एक मताने पास झाला. सर्व खूप आनंदात होते परंतू मुक्तानं अवधूत त्याही पलीकडे होते. त्यांचे प्रेमविवाहाचे स्वप्न नातवंडांच्या रुपात पूर्णत्वास आले होते.
(कथा नावासोबत प्रकाशित करावी)
©®मीनल सचिन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा