नात्याला काही नाव नसावे...
भाग चार
मागील भागात आपण वाचले :
अवधूत आणि मुक्तांनी ठरवले होते की, अवधूत लग्नाचा प्रस्ताव मुक्ताच्या आबांसमोर मांडणार. काय झाले त्या प्रस्तावात? वाचा पुढील भागात...
अवधूत आणि मुक्तांनी ठरवले होते की, अवधूत लग्नाचा प्रस्ताव मुक्ताच्या आबांसमोर मांडणार. काय झाले त्या प्रस्तावात? वाचा पुढील भागात...
आबा दुकानातून घरी आले तशी मुक्ताची घालमेल आणखीनच वाढली.
"मी आत येऊ का?"
म्हणत अवधूतने घरात प्रवेश केला. आबांनी स्वतः समोर येऊन अवधूतला घरात बोलवले. बसायला सांगितलं आणि ते आस्थेने त्याची चौकशी करू लागले,
"कोण आपण? माफ करा मी आपल्याला ओळखलं नाही. कृपया आपला परिचय द्याल का?”
"कोण आपण? माफ करा मी आपल्याला ओळखलं नाही. कृपया आपला परिचय द्याल का?”
म्हणत आबा आता अवधूतच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागले.
"नाही तुम्ही मला न ओळखणं साहजिकच आहे. कारण ही आपली पहिलीच भेट आहे. मी अवधूत अवधूत पाटील.. माझं शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत झालेला आहे एका सरकारी ऑफिसला मी कामाला आहे."
"अरे वा उत्तम.. पण तुम्ही हे सर्व मला का सांगताय? मी समजलो नाही."
"नाही, कारण ही तसंच आहे त्याला हे सर्व सांगितल्याशिवाय गत्यंतर नाही."
"म्हणजे?"
"म्हणजे तुमच्या मुक्तावर माझं प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं."
शरीरातील सर्व शक्ती एकवटून अवधूतने आबांना सर्व सांगितलं. एवढे बोलून होईस्तोवर मुक्ताच्या घरातील सर्व पुरुष मंडळी बैठकीत जमा झाली होती. अवधूतच वाक्य संपते न संपते तोच आबांनी अवधूतच्या थोबाडीत मारली. मुक्ताच्या तर पायाखालची जमीनच सरकली. इकडे अवधूतचेही अवसान गळून पडले होते परंतु त्याने तसे भासू दिले नाही. पुर्णशक्तींनीशी तो पुन्हा पुन्हा आबांना सांगत राहिला परंतु तेथे ऐकून घ्यायला कुणीच तयार नव्हते. मुक्ताच्या काकांनीही आता अवधूतवर हल्ला चढवला होता. त्याला मार मार मारून त्यांनी रस्त्यावर फेकून दिले त्या परिस्थितीत अवधूत घरी आला. काहीही सांगितले असते तरी घरच्यांच्या यायच्या ते लक्षात आलंच होतं. आता त्यांनीही अवधूतच्या लग्नाविषयी फारच मनावर घेतले.
झालेलं सारं सारं आठवून त्या रात्री ती ढसाढसा रडली. दोन पायांच्या मध्ये डोके घालून लहान मुलागत झोपी गेली. परंतु झोपायच्या आधी तिने ठरवलं होतं की, काहीही झालं तरी ती उद्या ठरलेल्या ठिकाणी अवधूतला भेटायला जाणारच.
इतकी वर्ष मनात चाललेले वादळ आता तिला शमवायचे होते. हवे होते उत्तर हिच्या असंख्य प्रश्नाचे. जाणून घ्यायचं होतं तिला.. असं काय झालं होतं की, त्या रात्री नंतर अवधुत ने आपलं तोंड सुद्धा मुक्ताला कधी दाखवलं नाही?
इतकी वर्ष मनात चाललेले वादळ आता तिला शमवायचे होते. हवे होते उत्तर हिच्या असंख्य प्रश्नाचे. जाणून घ्यायचं होतं तिला.. असं काय झालं होतं की, त्या रात्री नंतर अवधुत ने आपलं तोंड सुद्धा मुक्ताला कधी दाखवलं नाही?
दुसरा दिवस उजाडला. मुक्ता सकाळपासूनच अस्वस्थ होती परंतु तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ होता कुणाला? सून व मुलगा ठरलेल्या वेळी ऑफिसला निघून गेले. अनिरुद्धने ही घाईघाईत ब्रेकफास्ट आटपला व कॉलेजला पळाला आता घरात राहिली ती फक्त मुक्ता व तिचा एकांत. त्यात एकांतात ती परत अवधूतच्या आठवणीत रमली. आज काहीही झालं तरी अवधूतच्या तोंडून ती घडलेलं जुनं सारं सारं वदवून घेणार होती. तिची लागलेली तंद्री पुन्हा तुटली. मग पटापट सारे काम आटोपली. पोटात थोडं अन्न तिला नको असतानाही रिचवलं व घराला टाळ लावून झपाझपा पावलं टाकत ती टॅक्सीच्या दिशेने अवधूतने चिट्ठीवर लिहिलेल्या ठिकाणी जायला निघाली. टॅक्सी सुनिश्चित स्थळावर थांबली घाई घाईत तिने टॅक्सी वाल्याच्या हातात पैसे कोंबले व मागे वळली.
"काकू तुमचे सुटे पैसे तर परत घ्या.."
असा टॅक्सीवाला जवळजवळ ओरडलाच परंतु तिला भानच कुठे होते आसपासच्या जगाचे. ती तर आपल्याच विश्वात रमली होती. थोडं अंतर चालत गेल्यावर अवधूत तिला तिच्या समोर उभा दिसला. ती परत गांगरली. डोळ्यासमोर हलकी अंधारी आली; परंतु लगेच तिने स्वतःला सावरले व अवधूतकडे वळली. तिला वाटत होतं, तिला पाहताच अवधूत धावत येऊन मिठीत घेईल; परंतु तसा काहीही प्रकार अवधूतने केला नाही. ती मनात विचार करायला लागली.
“अंगकाठीने अजूनही तसाच आहे परंतू स्वभाव कणखर झालेला दिसतोय. तो पाठमोरा होऊन चालायला लागला. ही देखील त्याच्या पाठोपाठ चालत राहिली. एका वडाच्या सावलीत अवधूत बसला व मुक्ताला म्हणाला.
"बसा सौ.देशपांडे.."
अवधूतच्या तोंडून ते नाव ऐकताच मुक्ता थोडीशी चिडली व म्हणाली,
"मुक्ता म्हटलं तरी चालेल अजून तो अधिकार मी तुझ्यासाठी अबाधित ठेवला आहे.”
"मुक्ता म्हटलं तरी चालेल अजून तो अधिकार मी तुझ्यासाठी अबाधित ठेवला आहे.”
तिची वाक्य ऐकून अवधूत चेहऱ्यावर खोटं हसून आणत म्हणाला,
"हा अधिकार आता देऊन काय फायदा मुक्ता? तेव्हा जर तू मला साथ दिली असती तर आज…"
"हा अधिकार आता देऊन काय फायदा मुक्ता? तेव्हा जर तू मला साथ दिली असती तर आज…"
अवधूत च्या डोळ्यातील जागा पाण्याने व्यापली होती तेव्हा मुक्ता त्याला म्हणाली,
"अजूनही तसाच हळवा आहेस अवधूत तू.. अरे पण माझं काही ऐक तरी.. मलाही तुझ्याकडून अजून बरच काही जाणून घ्यायचं; पण त्याआधी मला तुझ्याकडून एक वचन हवयं."
"काय मुक्ता?"
"हेच की, आजची आपली भेट व आपला भूतकाळ आपल्या नातवंडांना कधीच कळता कामा नये."
"मुक्ता माझ्यावर विश्वास ठेव मलाही तसंच वाटतंय."
"तर मग ऐक माझा भूतकाळ आणि तुझाही सांग बरं का?"
क्रमश:
पुढल्या भागात वाचा:
काय होता मुक्ता आणि अवधूतचा भूतकाळ..
काय होतं असं त्या भूतकाळात की अजून पर्यंत दोघांच्याही मनातली जागा त्याने व्यापली होती.
(कथा नावा सोबत प्रकाशित करा)
काय होता मुक्ता आणि अवधूतचा भूतकाळ..
काय होतं असं त्या भूतकाळात की अजून पर्यंत दोघांच्याही मनातली जागा त्याने व्यापली होती.
(कथा नावा सोबत प्रकाशित करा)
©®मीनल सचिन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा