नात्याला काही नाव नसावे...
भाग तीन
मागील भागात आपण वाचले की, तब्बल पंचेचाळीस वर्षानंतर मुक्ताच्या समोर तिचे पहिलं प्रेम अवधूत उभा होता. त्याने दिलेल्या कागदात काय लिहिले होते? त्याचा काही परिणाम अनिरुद्ध आणि मोहिनीच्या आयुष्यावर होणार होता? वाचा कथेच्या तिसऱ्या भागात
मुक्ता...
नावाच्या पहिले प्रिय लिहिण्याचे धाडसच होईना ग..
वाटलं आपण आता तो अधिकार गमावला आहे. असो, एवढ्या घाई घाईत चिट्ठी याकरिता लिहिली की, मला तुला फक्त एकदाच भेटायचंय अगदी शेवटचं.. जुनं सारं जाणून घ्यायचंय. मुक्ता फक्त विनंती करतो ग.. आशा आहे विनंतीला मान देशील.
वाटलं आपण आता तो अधिकार गमावला आहे. असो, एवढ्या घाई घाईत चिट्ठी याकरिता लिहिली की, मला तुला फक्त एकदाच भेटायचंय अगदी शेवटचं.. जुनं सारं जाणून घ्यायचंय. मुक्ता फक्त विनंती करतो ग.. आशा आहे विनंतीला मान देशील.
अवधूत..
एवढं वाचूनच मुक्ताच्या डोळ्यासमोर अंधारी आली.
तिने कसेबसे स्वतःला सावरले व पुन्हा चिठ्ठीकडे वळली. चिठ्ठीत खाली भेटण्याचे ठिकाण व वेळ लिहिली होती. मुक्ताने चिठ्ठी बॅगमध्ये कोंबली खरी पण एकदा वाचून थोडीच तिथे समाधान होणार होते. त्या रात्रीत तिने मनाला समाधान प्राप्त होईस्तोवर चिठ्ठी वाचून काढली व नंतर विचारात गर्क झाली. मनात प्रश्न तर अनेक होते परंतु त्यातल्या एकाही प्रश्नाला उत्तर मात्र तिच्याजवळ नव्हते.
तिने कसेबसे स्वतःला सावरले व पुन्हा चिठ्ठीकडे वळली. चिठ्ठीत खाली भेटण्याचे ठिकाण व वेळ लिहिली होती. मुक्ताने चिठ्ठी बॅगमध्ये कोंबली खरी पण एकदा वाचून थोडीच तिथे समाधान होणार होते. त्या रात्रीत तिने मनाला समाधान प्राप्त होईस्तोवर चिठ्ठी वाचून काढली व नंतर विचारात गर्क झाली. मनात प्रश्न तर अनेक होते परंतु त्यातल्या एकाही प्रश्नाला उत्तर मात्र तिच्याजवळ नव्हते.
“आता काय बोलायचं राहिला इतक्या वर्षानंतर? आताही तो मला विसरला नसेल का? त्याने भेटायला का बोलावले? कुणाला कळले तर आमच्या पवित्र प्रेमाला लोक व्यभिचार म्हणायलाही कमी करणार नाही. तसं मीही इतके वर्ष लोटूनहीं कुण्या एकेकाळी आमच्यात प्रेम होते हे कुठे विसरले? तेव्हा त्यालाच दोष का द्यावा?”
रात्रभर मुक्ता अवधूतला भेटायला जायचं का नाही म्हणून विचार करत होती. त्या रात्री ती नुसती कूस बदलत होती. मुक्ता फार गांगरून गेली होती. काय करावं तिला सुचेना. जीव आता रडकुंडीला आला होता. जून सार घडलेलं उजळणी करत होती. डोळ्यातल्या पाण्याला वाट मोकळी झाली होती.
अवधूत.. दोन वर्षांनी तिचा कॉलेजचा सीनियर.. आजही तो दिवस तिच्या डोळ्यासमोर जश्याच्या तसा उभा राहिला होता. कॉलेजचा तिचा पहिला दिवस.. अवधूत व त्याच्या मित्रांचा ग्रुप कॉलेजच्या कट्ट्यावर नवीन स्टुडन्टची टर काढीत बसला होता. तेवढ्यात मुक्ताने कॉलेजमध्ये प्रवेश केला. अवधूतला मुक्ता प्रथमदर्शनीच आवडली होती. तिला पाहिल्याबरोबरच त्याच्या काळजात धडधडायला लागले होते. त्याच्या काही मित्रांनी तिला आपल्याकडे बोलवले व सौम्य का होईना परंतु रॅगिंग करायला सुरुवात केली. मुक्ता घाबरली.. अवधूतला हे अजिबात आवडले नाही. त्याने पुढाकार घेऊन मुक्ताची सुटका करवली त्या दिवसापासूनच मुक्ता व अवधूतची मैत्री बहरत होती. मैत्रीचं रूपांतर एका वर्षातच प्रेमात झाले. गिफ्ट झाले.. ग्रीटिंग झाले.. प्रेमपत्र लिहून झाली. प्रेमाच्या आणाभाकाही झाल्या. इतकेच काय तर दोघांच्या नावाने कॉलेजच्या भिंतीही रंगल्या होत्या.
एका वर्षातच अवधूतचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले.अवधूतला चांगली सरकारी नोकरीही मिळाली होती. आपल्या बीजी शेडूल मधूनही तो मुक्तासाठी बरोबर वेळ काढत होता. दररोज न चुकता कॉलेजला तिला भेटायला जात होता. परंतु हे निखळ प्रेम मात्र जास्त काळ नियतीला पहावल नाही. अवधूतच्या घरी त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. त्यांच्याच नात्यातली एक मुलगी सांगून आली. नाव ठेवायला कुठेच जागा नव्हती. शिक्षण...सौंदर्य सारं काही होतं. जेव्हा घरच्यांनी हा प्रस्ताव अवधूत समोर ठेवला. तेव्हा त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. ती संबंध रात्र त्याने विचारात घालवली. दुसऱ्या दिवशी अवधूत ऑफिसला न जाता सरळ मुक्ताच्या कॉलेजला गेला. तिची भेट घेतली. दोघांनी आपापले मत मांडले. प्रश्न झाले, शंका कुशंका झाल्या. सोबत भीतीही होतीच..
तेव्हा अवधूत मुक्ताचा हात पकडून मुक्ताला म्हणाला,
तेव्हा अवधूत मुक्ताचा हात पकडून मुक्ताला म्हणाला,
“मुक्ता माझ्याबरोबर पळून जाऊन लग्न करशील? ठेवशील माझ्यावर तेवढा विश्वास?”
“अवधूत, प्रश्न विश्वासाचा नाहीये.. विश्वास नसता तर आबांच्या भीतीला न जुमानता तुझ्यावर प्रेमच केले नसते.”
मुक्ताला स्पष्ट बोलता येत नव्हते. तिचा गळा दाटून आला होता. डोळ्यातले पाणी गालावर ओघळायला लागले होते तसंच अवधूत गांगरला.
“मुक्ता, ए मुक्ता.. तू प्रत्येक गोष्टीचा शेवट असा रडूनच का करतेस ग? रडूनच प्रत्येक समस्येवर मार्ग निघतो का ग?”
अवधूतने मुक्ताला जवळ ओढले व म्हणाला,
“परमेश्वरा! अशा रडूबाईला आयुष्यभर जोपासायची बरी जिम्मेदारी दिली तू माझ्यावर..”
“परमेश्वरा! अशा रडूबाईला आयुष्यभर जोपासायची बरी जिम्मेदारी दिली तू माझ्यावर..”
दोघेही मोठ्याने हसले परंतु थोड्याच वेळात मुक्ता म्हणाली,
“अवधूत, मला हा पळून जाऊन लग्न करण्याचा मार्ग आवडलेला नाही, त्यापेक्षा मला असे वाटते की,
तू माझ्या घरी येऊन माझ्या आबांसोबत बोलावं. अरे, तुला ते नाही म्हणणार नाही असं वाटतं मला.”
तू माझ्या घरी येऊन माझ्या आबांसोबत बोलावं. अरे, तुला ते नाही म्हणणार नाही असं वाटतं मला.”
“तसंही इतका चांगला जावई त्यांना शोधूनही सापडणार नाही म्हणा..”
अवधूत मध्येच म्हणाला व दोघेही हसले. त्याचबरोबर अवधूतने आज सायंकाळी मुक्ताकडे जाऊन तिला तिच्या आबांसमोर लग्नाची मागणी घालायची असा ठराव एकमताने दोघांनी पास केला खरा पण अवधूतच्या मनात अजूनही शंका होती परंतू मुक्ता बरोबर बोलून त्याचे मन बऱ्याच अंशी मोकळे झाले होते. दोघेही आपापल्या घरी गेले परंतू दिवसभर दोघांच्याही मनात घालमेल चालली होती. मुक्ताच्या वडिलांसमोर कसे बोलावे याची दिवसभर अवधूत उजळणी करीत होता कारण मुक्ताच्या घरचं वातावरण फारच कडक होतं. सोहळ, पूजापाठ, जातीभेद यामध्ये तिच्या आबांचा नंबर नेहमी पहिला असायचा. थोड्याफार फरकाने का होईना परंतु अवधूतचेही आई बाबा जातीभेदाला खतपाणी घालणारेच होते. इकडे घड्याळात सहाचा ठोका झाला. आबा दुकानातून घरी आले. आता मुक्ताच्या जीवाची घालमेल आणखीनच वाढली.
अवधूतने मुक्ताच्या आबांसमोर लग्नाचा प्रस्ताव कसा ठेवला? त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला का? काय झाले असे पुढे की दोघांचे लग्न झालेच नाही? पाहूया कथेच्या चौथ्या भागात..
(कथा नावासोबत प्रकाशित करावी)
(कथा नावासोबत प्रकाशित करावी)
©®मीनल सचिन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा