Login

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 16

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 16

©️®️शिल्पा सुतार

सचिन टेंशन मधे टेरेस वर उभा होता. हे राहुल प्रकरण लवकर संपवाव लागेल. घरच्यांशी मी अजून खोट बोलू शकत नाही. आईला समजल तर ती मला ही, सुरभीला ही बोलले. सुरभी निरागस आहे. तिला काही माहिती नाही. त्याने शिंदे साहेबांना फोन लावला. "कुठे पर्यंत काम आल शिंदे साहेब? "

"सुरू आहे साहेब."

"मी रोज तुम्हाला फोन करतो. तुम्ही तेच सांगता. आपल्याला थांबून चालणार नाही ." सचिन बोलला.

"उद्या मीटिंग फिक्स झाली आहे त्या राहुलच्या वकीला सोबत. मी ठीक करतो सगळं. ओळखीचा आहे तो ." शिंदे साहेब सांगत होते.

"किती वाजता आहे मीटिंग ?"

"दुपारी दोन वाजता."

"ठीक आहे मी येतो."

"तुम्ही येवू नका सचिन साहेब. मी बरोबर करतो. तुम्हाला बघितल की ते लोक जास्त करतील. हा कोण आहे वगैरे. मी सुरभी मॅडमच्या साइडने भेटणार आहे. त्यांना काही आठवत नाही ते सांगायच नाही. आता तुम्ही यात यायच नाही."

"बरोबर आहे ."

"वाटल तर सुरभी मॅडमचा भाऊ सौरभला बोलवून घेवू. "

" ठीक आहे लवकर करा हे. "

" हो तुम्ही काळजी करू नका. "

त्याने सौरभला फोन केला.

" तुम्ही शिंदे साहेबां सोबत मीटिंगला जा. वकिलांना सांगा आम्ही सेटलमेंट साठी तयार आहोत. किती हि पैसे लागु द्या नो प्रॉब्लेम. माझ्या टच मधे रहा. " सचिन भराभर सांगत होता.

" चालेल जातो. "

"उद्या तुमच ऑफिस असेल ना. काही प्रॉब्लेम नाही ना." सचिनने विचारल.

"नाही. काही प्रोब्लेम नाही. मी जाईन उद्या."

सचिनने फोन ठेवला.

सौरभची नोकरी विशेष नव्हती. मध्ये सुरभी मुळे बर्‍याच सुट्ट्या झाल्या. कंपनीतुन त्याला नोटिस दिली होती. तो नाराज होता. उद्या सुट्टी घेतली तर नक्की नोकरी जाईल. जावु दे ही केस ही महत्वाची आहे. सुरभी सुखी राहिली पाहिजे. सचिन साहेब चांगले आहेत.

तिथे गावत एका ठिकाणी अकाऊंटच काम करायला तो जात होते. पैसे खूप कमी येत होते. नवीन नोकरी मिळे पर्यंत धकवु. तो विचार करत होता.

"कोणाचा फोन होता. सुरभीच काही समजल का? " पूजाने विचारल. आजकाल तिला संशय होता हे काही तरी नक्की लपवता आहेत.

" ऑफिसचा होता." सौरभने सांगितल.

" सुरभीच काय?"

" उद्या पोलिस स्टेशनमध्ये जावून बघतो."

" तुम्ही एकदम काळजी सोडली सुरभीची."

" नाही अस नाही."

" अहो मला थोडे पैसे द्या."

" कशासाठी?"

" उद्या माहेरी जाते ना मी मावशी कडे प्रोग्राम आहे."

" उद्या सकाळी देतो पण ऐक पूजा जरा सांभाळून खर्च कर. माझ्या नोकरीच काही खर नाही."

" एवढा शिकलेला नवरा केला पण चांगल्या नोकरीचा काही योग दिसत नाही तुमचा. मी उद्या बोलते बाबांशी. "

" नको त्यांना काही सांगू नको आहे माझ्या बघण्यात एक दोन लोक तिकडे प्रयत्न करणार आहे मी. "

" ठीक आहे जे आहे ते लवकर करा. " पूजा स्वयंपाकाला लागली.
........

" दादा तू काय करतो आहेस इथे टेरेस वर . खाली चल आई जेवायला बोलवते आहे." मनु त्याला शोधत वर आली.

तो खाली गेला. सुरभी नंदाताईं सोबत छान बोलत होती. आजी समोर बसलेल्या होत्या. तो फ्रेश होऊन आला. सुरेश राव आले. आशिष, मनु नुसते सुरभीच्या मागे होते. गमती जमती सांगत होते. ती ताट करत होती.

" वहिनी जेवल्यावर आपण आइस्क्रीम खायला जावू." आशिष बोलला.

" हो खूप छान आईस्क्रीम मिळत इथे." मनुने सांगितल.

" चालेल जावू." सुरभी उत्साहात होती.

"नाही. उगीच इकडे तिकडे फिरायच नाही." सचिन बोलला.

"या वेळी या दादाला काय झालं आहे काय माहिती? दर वेळी राहतो तस मोकळ प्रेमाने रहात नाही." आशिष मनुला हळूच बोलला.

"हो ना. मला ही तेच वाटतय. नक्की काहीतरी झालय. काय पण? " मनु विचार करत होती.

" सचिन इथे सुरभी जवळ बस. " आजींनी त्या दोघांना शेजारी शेजारी बसवल. सगळे खुश होते.

सचिनने जेवायला सुरुवात केली. त्याच्या आवडीचा स्वयंपाक होता. "आई भाजी छान झाली आहे. सुरभी वांग खायच नाही. माझ लक्ष आहे. "

" जेवू दे तिला. नको सारख बोलूस." आजी बोलल्या.

"आजी तिला पथ्य आहे."

" मी नाही खात ती भाजी ." सुरभी हळूच बोलली. सचिन तिची काळजी घेत होता तिला छान वाटल.

छान जेवण झालं. जेवल्यावर ही सुरभी मनु सोबत होती.

"पुरे झाल्या गप्पा. सुरभी जा झोप आता." नंदाताई बोलल्या.

ती रूम मधे आली. सचिन आत मधे नव्हता. तो बाहेर सुरेशरावां सोबत ऑफिसच्या गप्पा मारत होता. ते दोघ पुढचे प्लॅन ठरवत होते. सुरेश राव अतिशय हुशार होते. स्वकष्टाने त्यांनी सगळ कमवल होत. सचिन त्यांना आदर्श मानत होता. त्यांचा सल्ला घेवून बिझनेस मधले डीसीजन घेत होता.

नंदाताई त्यांच्यात येवून बसल्या." अहो पुरे झाल्या ऑफिसच्या गप्पा. याला जावू द्या. सुरभी वाट बघत असेल."

"हो सचिन जा झोप. " सुरेश राव बोलले.

" नाही बाबा बोला ना तुम्ही."

"सचिन जा आत. मला ही आराम करायचा आहे ." बाबा असे बोलावल्यावर तो उठला. आत आला. सुरभी कॉटवर बसलेली होती. ती मोबाईल बघत होती. ती छान हसली. थोडी लाजल्या सारखी दिसत होती. मंगळसूत्र इतर दागिने तिच्यावर खूप शोभत होते. तिला समजल सचिन तिच्या कडे बघतो आहे. तिने ओढणी सावरली. हातात बांगड्या सुंदर कीणकीणल्या.

हिच्या सोबत छान वाटत. तरी ही अजून पंधरा दिवस मिळायला हवे होते. खूप लवकर घरी समजल. अजून कशात काही नाही. लग्न ही झाल नाही. कुठे झोपू? इथे जागा ही नाही. सोफा नाही.

ही सुरभी किती सुंदर दिसते आहे. ती लाजते आहे का? सहाजिकच आहे.

तो बाथरूम मधे निघून गेला. कपडे बदलून आला.
"आवडल का इकडे सुरभी? मनु आशिष सोबत तू रमली. "

"हो किती छान घर आहे .घरचे सगळे चांगले आहेत. आजी किती गोड आहेत. अहो मी इथे राहू का?" सुरभी त्याच मूड मधे होती.

"नाही आपण सोबत रहायच. सारख तेच तेच विचारायच नाही सुरभी ." सचिन तिच्या बाजूला येवून झोपला. त्याने मधे उशी ठेवली. ती त्याच्याकडे बघत होती. "काय झाल? तू ही झोप."

ती बाजूला झोपली. हे माझ्याशी अंतर राखून वागतात. काय कारण असेल. म्हणजे मला जरा आज भीती वाटत होती की काय होईल. आम्ही दोघ एका खोलीत रहाणार. हे तर आरामात झोपले.

सचिनला झोप लागली होती . ती जागी होती. त्याच्याकडे बघत होती. तिने हळूच बाजूची उशी काढली. त्याच्या जवळ सरकली. त्याच्या केसावरून हात फिरवला. तो थोडा सावध होता.

" सुरभी नको त्या बाजूला सरकून झोप. मला हात लावू नकोस. " तो झोपेत बोलला. ती छान हसली.

"अहो उठा ना. तुम्ही एवढ्यात कसे झोपलात. मला तर लगेच झोप येत नाही. ऐका ना. माझ्याशी बोला ना."

" सुरभी झोपू दे उद्या गप्पा मारू. आणि तिकडे सरक." त्याने तिकडे तोंड केल.

"या रूम मधे बोर होत आहे. मनु जवळ तरी झोपली असती." सुरभीने परत मधे उशी ठेवली ती तिकडे तोंड करून झोपली.

सुरेश राव आत आले. नंदा ताई कपाट आवरत होत्या." आता काय काम चाललय?"

"ह्या दोन तीन साड्या सुरभीला देते. नव्या आहेत. "

"हो दे. छान आहे पोरगी."

" हो ना खूप साधी आणि उलट उत्तर देत नाही. जे सांगू ते ऐकते. प्रत्येकाशी प्रेमाने वागते बोलते. " नंदा ताई खुश वाटत होत्या. सुरेश राव फ्रेश होवुन आले. पुस्तक हातात घेवून कॉटवर बसले.

"अहो त्या निधीच काय? तुम्ही काही शब्द दिला नाही ना त्या लोकांना ?"

"नाही तस काही बोलण झाल नाही. सांगून देवू त्यांना. तशी ही त्या लोकांची बळजबरी नव्हती. "

" हो ते समजूतदार लोक आहेत. पण मला वेगळीच काळजी आहे. अहो पण मनु आणि आशिषच लग्न होईल ना? सचिनने लव मॅरेज केल त्यामुळे. " नंदाताई काळजीत होत्या.

"तुझी काळजी समजते मला. आपल नाव समाजात किती मोठ आहे हे तुला माहिती नाही का? काळजी करू नकोस भरपूर स्थळ येतील. झोप आता. " सुरेश राव पुस्तक वाचत होते. नंदा ताई विचारात होत्या.

" हे मूल कोणताच कार्यक्रम करायला नकार देत आहेत. "

" नाही आवडत त्यांना. "

" अस कस चालेल. निदान पूजा तरी करू. "

"आता नको. ते घाईत आहेत. बहुतेक उद्या जातील."

" अहो सुरभीला घरी ठेवून घेवू. सचिनला म्हणा दोन तीन दिवसानी ये. मीटिंग झाली की करू पूजा . "

" ठीक आहे मी सांगून बघतो. "
....

सकाळी सुरभी आवरून रेडी होती. सचिन अजूनही झोपलेला होता. ती बाहेर आली नंदाताई, आजी चहा घेत होत्या. ती त्यांच्यात येवून बसली.

" सुरभी आज साडी नेस. " नंदाताई बोलल्या.

" पण मी साडी आणली नाही. "

" ही घे. " अतिशय सुंदर गुलाबी पांढरी साडी होती.

" आई ब्लाऊज?"

"मनुच घे. मागे तिने सहजच काळा, पंधरा, सोनेरी रंगाचे ब्लाऊज शिवून घेतले होते."

मनु आली.

" मनु तुझ्या वाहिनीला तुझ्या रूम मधे ने तिला ब्लाऊज दे. साडी नेसायला मदत कर. "

दोघी आत गेल्या. पाच मिनिटात साडी नेसुन सुरभी तयार होती.

"अरे वाह वहिनी किती पटकन आणि छान साडी नेसली. तुला सवय आहे का?" मनु बघत होती.

"नाही मी ड्रेस घालते नेहमी. चांगली नेसली का?"

"परफेक्ट नेसली आहेस. अस वाटत तू बरेच वर्ष साडी नेसते आहेस. तू खूप सुंदर दिसतेस. मी तुझे केस वींचरुन देवु का ?"

"नाही ते डोक्याला टाके होते. केस हळूच विचारायचे. डॉक्टरांना स्पेशल ब्रश दिला त्याने. थोडे दिवस जपाव लागेल. " सुरभीने सांगितल.

" कस काय लागल?"

"एक्सीडेंट झाला होता. मनु कोणाला बोलू नकोस उगीच ते काळजी करतील. "

"हो वहिनी चल आता."

सचिन उठला. किती वाजले? सुरभी कुठे गेली? आज तो सुरेशरावां सोबत इथल्या कंपनी मधे जाणार होता. तो आंघोळ करून आला. बाहेर सगळ्यांचे आवाज येत होते.

सुरभीने आज सगळ्यांसाठी शिरा केला होता. ती गॅस जवळ उभी होती. नंदा ताई पोहे वाढत होत्या. सचिन आला. समोर बघत राहिला .सुरभी गुलाबी साडीत खूप सुंदर दिसत होती. केस मागून मोकळे सोडले होते. मोठ मंगळसूत्र अतिशय छान दिसत होत. सचिनची नजर तिच्या आकर्षक बांध्यावर होती.

सुरभीला ही समजल सचिन नाश्तासाठी आला आहे. तिला उगीच धडधड झाली. तिने केस मागे केले त्याच्याकडे हळूच बघितल. तो इकडे बघतो आहे. तिने पटकन गॅस कडे नजर वळवली. तिला लाल टिकली शोभत होती. बाकी मेकअप काही नाही.

कठिण आहे हीच रूप आज खूप खुलल आहे. सचिनला सुरभी कडे बघून काही सुचत नव्हत.

सगळे सचिन कडे बघत होते. तो सुरभी कडे बघत होता.

उहु उहु आशिष मुद्दामून खोकलला. मनु हसत होती.

" सचिन अरे उभा का बस. सुरभी शिरा वाढ सगळ्यांना. आजचा शिरा स्पेशल आहे. सुरभीने केला आहे. आजींच्या मदतीने." नंदाताई बोलल्या.

सुरभी शिरा वाढत होती. सचिन तिच्याकडे बघत होता. ती लाजली. ती मुद्दाम त्याच्या पासून नजर चोरत होती. तो छान हसला.

"करा सुरवात. चल सुरभी तू पण. एवढ टेंशन घेवू नकोस. छान झाला असेल शिरा. छान वास येतो आहे. " ती नंदाताई जवळ बसली. सचिन शिरा खातो आहे की नाही ती बघत होती. त्याला ही ते समजल. त्याला शिरा आवडण तिच्या साठी खूप महत्वाचं होत.

"बापरे शिरा खूप गोड झाला आहे." मनु बोलली.

" सॉरी. मी साखर प्रमाणात टाकली होती. हो ना आजी. आता काय करू या. आई सांगा ना. " सुरभी गडबडली.

सगळे हसत होते.

" वहिनी अग तु आधीच गोड. त्यात शिरा गोड. फारच गोड कॉम्बिनेशन झाल आहे हे. हो ना दादा." मनु बोलली.

सचिन हसत होता. सुरभी लाजली.

" छान चव आहे तुझ्या हाताला सुरभी." आजींनी आशीर्वाद दिला.

नाश्ता झाला." चला बाबा निघायच का? "

"आज सुट्टी नाही का?" आजी विचारत होत्या.

"आम्ही येतो दोन तासात थोड महत्वाच काम आहे."

सुरेश राव आत आवरायला गेले. "नंदा इकडे ये." त्यांनी आवाज दिला.

" आशिष तू येतोस ना?" सचिन विचारत होता.

हो.

"जा मग तयार हो. "

तो त्याच्या रूम मधे गेला.

आजी, मनु, सुरभी समोर होत्या. सचिन गप्प होता. तो उठला. "सुरभी जरा इकडे ये. "

" जा सुरभी. सचिन बोलवतो ना. " आजी बोलल्या.

यांनी मला अस का बोलवलं. मनु होती ना तिथे. तिला काय वाटेल. ती आत आली. मी बोलणार आहे यांना.

सचिन रूम मधे उभा होता.

तिच्या बांगड्यांचा आवाज आला. त्याने मागे वळून बघितल. तो छान हसला. ती लाजली. तो तिच्या जवळ आला. ती थोडी घाबरली होती. त्याचा त्याच्यावर कंट्रोल नव्हता इतका तो तिच्या रूपाने भारावून गेला होता. समोर साक्षात सौंदर्य मूर्ती समोर उभी होती. जिच्यावर त्याच खूप प्रेम होत. तो तिच्याकडे बघत होता. "आज साडी का नेसली?"

"सहज." ती हळूच बोलली.

" तयारी कोणी करून दिली? "

" मीच केली. मला साडी नेसता येते."

त्याने तिला मिठीत घेतल. तिच्या जवळ अतिशय सुंदर वास येत होता.

"सुरभी तू कोणती पावडर लावते?"

" नेहमीची." तिने टेबल कडे बोट दाखवल.

ही? ती तर मी पण वापरतो. सुरभी जवळ तरी एवढा छान वास का येतो. तो विचार करत होता.

"अहो मला जावू द्या ना." सुरभी त्याच्या मिठीतून सुटण्याची धडपड करत होती.

"नाही अशी थांब माझ्या जवळ." तो तिच्या जवळ येत होता. ओठांवर ओठ टेकवणार तेवढ्यात ती बाजूला झाली. "अहो नको ना. मला जावू द्या."

तो भानावर आला. सॉरी. तो बाजूला झाला. काय करत होतो मी. मला ही हिला बघितल की काही सुचत नाही.

तिला कसतरी वाटल." अहो तुम्ही रागवले का? "

" नाही. "

" तुम्ही या माझ्या जवळ."

तो थोडा हसला. "ठीक आहे सुरभी. मी ऑफिसला जावून येतो."

"लवकर या."

"साडी छान दिसते तुला. थोड्या वेळाने साडी बदल. ड्रेस ठीक आहे."

का?

"तू साडीत खूप छान दिसते ना म्हणून. आणि थोडे दिवस साडी नेसू नकोस." त्याने सांगितल.

"त्या दिवशी तुम्ही म्हणत होते साडी नेस. आज म्हणता आहात नको नेसु. नक्की काय कराव?" सुरभी हसून बोलला.

सचिन फक्त हसला." तुला नाही समजणार. मी जावून येतो. " तो बाहेर आला. ऑफिसला निघून गेला.


0

🎭 Series Post

View all