Login

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 9

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 9

©️®️शिल्पा सुतार

शिंदे वकील ऑफिसात आले. ते सचिनच्या केबिन मधे आले. " बोला साहेब काही समजल का मॅडम बद्दल? "

सचिन सगळ सांगत होता.

"ही केस अगदी सोपी आहे. त्या मुलाला अटक करा. किती खराब वागला आहे तो. त्याच्या वर आपण घरगुती हिंसाचाराची केस लावू. त्याच्या कडून घटस्फोटच्या पेपर वर सही घेवू. तुम्ही मॅडमची सही घ्या. लगेच म्युचल अंडरस्टांडींगने घटस्फोट होईल. मग तुम्ही सुरभी मॅडम सोबत कोर्ट मॅरेज करू शकता. "

" पण तिच्या मते आमच लग्न झालेल आहे. मग काय करता येईल? डबल लग्न कस करणार. "

"हो. मग त्या पेपर वर मॅडमची गुपचुप सही घ्या. नंतर मंदिरात पूजा आहे अस सांगुन वैदिक पद्धतीने लग्न करून घ्या." ते आयडिया देत होते.

" होईल ना अस शिंदे साहेब? सुरभी गैरसमज नाही ना करून घेणार? तिला करायच असेल ना माझ्याशी लग्न. तिची मेमोरी वापस आली की ती निघून तर नाही ना जाणार. "

"अस काही नाही होणार. काहीच प्रॉब्लेम नाही. जास्त विचार करू नका साहेब. सुरभी मॅडमच लग्न मोडलेल आहे त्या आत्ता या क्षणाला तुमच्यावर प्रेम करतात."

" हो ते आहेच. पण कॉलेज मधे तिने मला नकार दिला होता. "

" तेव्हा मुली हिम्मत करत नाही. तुम्ही लग्न करून घ्या साहेब. जास्त विचार करू नका. " शिंदे साहेब बोलले.

सचिन खूप खुश होता.

"साहेब माझ पेमेंट ठरवून घ्या."

"तुम्ही म्हणाल ते देईन. एकदा मनासारख होऊ द्या. ठीक आहे मग तुम्ही दोघी पेपर बनवा. उद्या या पोलिस स्टेशनमध्ये. "

हो. शिंदे साहेब गेले.

सचिनला काहीच सुचत नव्हत. तो खूप आनंदात होता. शिंदे साहेब म्हणतात अस झाल तर माझ सुरभीशी लगेच लग्न होईल. नाहीतरी तिच्या सासरचे चांगले नाहीत. मी त्या तिच्या नवर्‍याला सोडणार नाही. आता तो नाही सुरभीचा नवरा, मी होणार आहे.

सगळे काम झाल्यावर तो घरी निघाला. सौरभ नजर ठेवून होता. तो सचिनच्या कार मागे निघाला. मध्ये एका दुकाना जवळ सचिन थांबला. सुरभी साठी चॉकलेट घेतले. बाजूच्या फुलांच्या दुकानात गेला. त्या दिवशीचा मुलगा होता. "साहेब काय देवू? "

"लाल गुलाब द्या."

" तुम्ही निवडा."

त्याने टवटवीत लाल गुलाब घेतले. सगळ घेवून तो कार मधे बसला. सौरभ मागे होता. थोड्या वेळाने एका टुमदार बंगल्याच्या आत कार गेली. गेट बंद झाल सिक्युरिटी होती. सौरभने पत्ता बघून घेतला.

तो बराच वेळ बाहेर उभा होता. आत माझी बहिण आहे. काय करू? भेटायला जावू का? पण सचिन साहेब चिडले तर? या पुढे सुरभीला भेटू दिल नाही तर. माझी आणि माझ्या बहिणीची कायमची ताटातूट नको व्हायला. तो त्यांचा पोलिस मित्र डेंजर आहे.

पण अस होणार नाही. सचिन साहेब चांगले आहेत. त्याच तिथून निघायच मन नव्हत. जड पावलाने तो निघाला. उद्या येणार आहे तेव्हा येवून बघु इकडे. सौरभ घरी गेला त्याने पूजाला काही सांगितल नाही.

सचिन घरी आला. सुरभी वाट बघत होती. तो फ्रेश होऊन आला. तिच्या रूम मधे आला. "हे घ्या मॅडम तुमचे चॉकलेट. आणि हे घे." त्याने गुलाबांचे फुल तिला दिले.

" वाह किती सुंदर फुल आहेत. थँक्यू." ती फुलांकडे बघत होती तो तिच्याकडे. "किती छान वास आहे फुलांचा."

" तुला आवडले? "

"हो. आज का आणले फुल?" ती सोफ्यावर बसली होती. तो तिच्या जवळ बसला.

" सहज वाटल मला. तुला आवडतात ना? "

" हो खूप."

"सुरभी एकदा माझ्या जवळ ये ना. " सचिन बोलला.

आज काय झालं यांना? काल किती ओरडले. आज फुल, चॉकलेट, एकदम प्रेम. ती आनंदाने त्याच्या मिठीत शिरली.
आज वेगळ वाटत होतं त्याच्या जवळ. ती रीलॅक्स होती. त्याने तिला घट्ट जवळ घेतल. "सुरभी. "

" हम्म. "

" आज मी खूप खुश आहे. "

" का? तुमच महत्वाच काम झाल का? "

हो.

" मला पार्टी हवी."

"करू आपण. तु म्हणशील ते करू." सचिन हळूच बोलला.

"अहो. मला सोडा ना. " सुरभी आता लाजली होती.

"नाही अशी जवळ रहा. लव यु."

"अहो सोडा ना. कोणी येईल."

"नाही सुरभी. तू छान आहेस. मला अस छान वाटत."

मावशी जेवण रेडी आहे सांगायला आल्या. दोघ पटकन बाजूला झाले. सुरभी खूप लाजली होती. " बघा मी म्हणत होती ना. "

" मावशी मधेच आल्या नाहीत. " तो हळूच बोलला.

सुरभी लाजली.

" अहो मी तुम्हाला अहो म्हणते ना. मला सचिन बोलायची सवय नाही. "

" ठीक आहे तुला जे बोलायच ते बोल. मी तुला या पुढे काहीही म्हणणार नाही. मी तुझा आहे." सचिन खुशीत होता.

"आज काय झालं एकदम मस्त मूड आहे तुमचा? "

"चल इथून आधी. नाहीतर माझ्या मूडच काही सांगता येत नाही."

"म्हणजे? "

" काही नाही."

दोघ जेवायला बाहेर आले. "अरे वाह. आज माझी आवडती भाजी."

" हो तुम्ही त्या दिवशी जास्त खाल्ली होती ना. म्हणुन मला समजल. " ती बोलली.

" तुझ लक्ष असत? "

हो.

" सांग ना का केली?"

" ते तुम्ही काल चिडले होते ना म्हणून केली."

" सॉरी. मी पुन्हा अस करणार नाही. " तो तिच्या कडे प्रेमाने बघत होता.

जेवण झालं. दोघ सोबत टीव्ही बघत होते. "माझ चॉकलेट?"

त्याने आतुन चॉकलेट आणून दिल. "जास्त नाही थोड खा."

सुरभी त्याच्या जवळ बसलेली होती. " जा आत झोप आता उशीर झाला. औषध घे आराम कर. "

तो त्याच्या रूम मधे निघून गेला. ती त्याच्या मागे मागे गेली.

"काय झाल सुरभी? काही हव का?"

ती जात नव्हती.

" काही बोलायच का?" त्याने विचारल.

"मी इथे तुमच्या सोबत राहू का?" तिने हळूच विचारल.

" नाही."

" काय झालं आता? आपण छान सोबत होतो ना. मला तुम्ही हवे आहात." ती थोडी लाजली होती. हे अस कस बोलू अस तिला वाटत होत. आता हल्ली तिला सारख त्याच्या जवळ जावसं वाटत होत. तो पुढाकार घेत नाही. ती वाट बघुन थकली. शेवटी ती बोलली.

त्याला समजल ती काय म्हणते आहे. तिच्या नजरेत मी तिचा पती आहे. तिला वाटत असेल मला जवळ का घेत नाही?

"नाही सुरभी. गप्प एकदम. जा तुझ्या रूम मधे."

"मी जाणार नाही." ती कॉटवर जावून बसली. "आपले आधी संबंध कसे होते? आपल कधी लग्न झालं? मी आली की तुम्ही लांब रहातात. काय प्रॉब्लेम आहे. ते काही नाही मी आजपासून इथे झोपणार. मला तुमच्या जवळ आवडत."

"नाही सुरभी तुझ्या रूम मधे जा. " तो गोंधळला.

नाही.

" तुझ्या सोबत नर्स आहे. कस वाटेल ते तू मी आणि नर्स सोबत."

" नर्स राहील ना तिकडे. मला एकटीला आवडत नाही. मला तुमच्या सोबत रहायच आहे. " सुरभी तिच्या विचारावर ठाम होती.

" अजून नाही. ऐकत जा. "

का?

" तुला किती लागल आहे. हाताला प्लास्टर आहे. काळजी घ्यायला हवी. " सचिनला काहीतरी सुचलं.

" डॉक्टर बोलत होते मी ओके आहे. मला प्रेमाची गरज आहे. प्लीज ऐका ना. मी जाणार नाही."

" मला भीती वाटते तुझ्या हाताला धक्का लागेल."

सुरभीने पुढे येवून त्याला मिठी मारली. तो तिच्या स्पर्शाने विरघळला. " सुरभी नको अस करु. "

ती त्याच्या जवळ होती. "मला अस आवडत. "

त्याने तिला जवळ घेतल. तिच्या सहवासात एक जादू होती. तो विरघळला त्याने तिला उचलल तो कॉटकडे आला. तो तिच्या जवळ येत होता. काय होईल? सुरभी थोडी घाबरली. त्याने तिला नीट पांघरुन दिल.

"झोप आता शांत." ही झोपली की मी दुसरीकडे जाईन. तो विचार करत होता.

त्याचा फोन वाजत होता. इन्स्पेक्टर रोहितचा फोन होता. "करतो पाच मिनिट दे."

"अहो तुम्ही कुठे जात आहात?"

"तू झोप इथे ."

"तुम्ही?"

"मी तिकडे आहे. "

"नको ना इथे थांबा ."

"मग तू तुझ्या रूम मधे जा. "

"काय झालं." ती त्याच्या कडे बघत होती.

"मला ऑफिस काम आहे." नर्स. त्याने आवाज दिला.

"मला नाही जायच. तिने त्याचा हात घट्ट धरला. "

"सुरभी मला त्रास देवू नकोस .मी ओरडेन. "

नर्स पळत आली.

" सुरभीला औषध दिल का?"

"नको मला औषध. मला कडू लागतात त्या गोळ्या. मी ठीक आहे. मला इथे राहू द्या. "सुरभी बोलली.

" चला मॅडम प्लीज वेळेवर झोपा. नाहीतर मला डॉक्टरांना फोन करावा लागेल."

ती त्याच्या कडे बघत होती. "अहो प्लीज."

तो काही म्हटला नाही. ती वापस गेली.

सॉरी सुरभी.

सुरभी रागात होती. एक तर औषध घेतल्यावर गुंगी येत होती. ती झोपली.

त्याने रोहितला फोन केला. बोल.

" उद्या ये अकरा वाजता. मी नोटिस दिली आहे. तो राहुल उद्या येणार आहे." रोहित बोलला.

"कोण राहुल? "

"सुरभी मॅडमचा नवरा."

"त्याला राहुल म्हणत जा. सुरभीचा नवरा नाही. येतो मी. मला त्या माणसाचा खूप राग येतो आहे." सचिन रागात होता.

"तू शांततेने घेणार आहेस सचिन."

ठीक आहे.

सकाळी सचिन आवरून आला. आज त्याच्या डोक्यात खूप काम होत. सुरभी रोज समोर बसलेली असायची. आज कुठे आहे? मावशी समोर दिसल्या." सुरभी उठली नाही का आज?"

"मॅडम उठल्या आहेत. "

" मग? कुठे आहे? "

" त्या नाही म्हणता बाहेर यायला. "

" काय यार एक एक. " तो आत आला. व्हाइट शर्ट ब्लॅक पँट मधे तो जबरदस्त दिसत होता. ती त्याच्या कडे बघत होती. "चल सुरभी नाश्ता कर. मला उशीर होत आहे. "

तिने तोंड फिरवल.

" हे काय आहे आता सुरभी? चल लवकर. तुझ रोज एक एक सुरू असत." तो थोडा रागात बोलला.

तरी ती उठली नाही.

" ऐकु आल ना? "

ती मानेने नाही म्हटली.

"उठ लवकर चल मला उशीर होतो आहे. नाहीतर मी तुला उचलून घेवून जाईल." सचिन पुढे आला.

"मी या पुढे तुमच्या सोबत नाश्ता आणि जेवण करणार नाही. इथे एकटी राहीन. " सुरभी रागाने म्हटली.

" बर सॉरी राग सोड चल. काय हव तुला? "

"मला तुम्ही हवे आहात. मला तुमच्या सोबत रहायच आहे ."

"हो तुला बर वाटल की राहू. सारख तेच बोलायच नाही. "

"नक्की."

" हो. चल आता. हे बघ आज मला खूप महत्वाच काम आहे. मला तुझा हसरा चेहरा बघायचा आहे. "

ती त्याच्या सोबत येत होती. थोडी नाराज वाटत होती.

त्याने तिचा हात धरला. तिला जवळ ओढल. तो तिच्या कडे बघत होता. आज त्याची नजर वेगळी वाटली." काय हव तुला सांग? बोल पटकन. आज तुझी इच्छा पूर्ण करू. तू म्हणशील ते करू. मला तुझ उतरलेला चेहरा आवडत नाही. "

सुरभी मागे सरकली. तो तिच्या जवळ आला. सुरभी आता खाली बघत होती. त्याने पुढे होवुन गालावर ओठ टेकवले. तिला जवळ घेतल.

ती बाजूला व्हायचा प्रयत्न करत होती. नको वाटतय. मला नाही जमणार.

त्याने तिला घट्ट धरून ठेवल.

" अहो सोडा मला जायच आहे ." ती जात होती. त्याने तिचा हात धरला. परत जवळ ओढल.

" काय झालं आता? कधीच सुरू आहे ना तुझ की माझ्या जवळ यायच. मग आता का नको म्हणतेस? गप्प रहा आता. माझ्या जवळ ये."

ती बाहेर पळून गेली.

हे अस आहे हीच. बर झाल पण चांगला धडा शिकवला हिला. आता सारख माझ्या जवळ यायच बोलणार नाही.

"नाश्ता करायचा का? की चलते आत." तो तिच्या जवळ बसत हळूच बोलला. त्याच्या बोलण्याने ती लाजली.

मावशी. तिने आवाज दिला. त्या पोहे घेवून आल्या. नाश्ता झाला. मी निघू का?

हो.

" सुरभी आज मी एक महत्त्वाच काम करणार आहे. तू मला साथ देणार ना?"

तिला समजल नाही. पण ती हो म्हटली.

" आराम कर आणि मला दुपारी फोन कर."

ती आता छान लाजून हसत होती.
...

थोडी बिझी आहे. कथा मालिकेचा पुढचा भाग दोन तीन दिवसांनी येईल.
वाचकांचे खूप आभार.


0

🎭 Series Post

View all