Login

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 3

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 3

©️®️शिल्पा सुतार

ही तर सुरभी आहे. माझी मैत्रीण.

तिचा चेहरा सुजलेला होता. ओरखडे पडलेले होते. त्याला एकदम वाईट वाटल. काय झालं हे. किती लागल आहे हिला. माझ्या मुळे झाल. ती झोपलेली होती. तो तिच्या जवळ बसुन होता.

" सर तुम्ही यांच्या सोबत आहात ना? " नर्स आली.

हो.

"हे घ्या." नर्सने तिची ज्वेलरी त्याच्या कडे दिली.

कानातले, बांगड्या, मंगळसूत्र, अंगठी अस एका प्लास्टिकच्या बॅग मधे होत. "साहेब या मॅडमची पर्स."

तो मंगळसूत्राकडे बघत होता. हीच लग्न झालं आहे हे समजल होत. कोणाशी झाल काही समजल नाही. त्याला थोडा राग आला.

सुरभी त्याच्या कॉलेज मधे होती. अगदी त्याच्या ग्रुप मधे नव्हती पण ओळख होती. त्याचा ग्रुप श्रीमंत मुला मुलींचा ग्रुप होता. ती साध्या मुलींच्या ग्रुप मधे होती. तो तिला नेहमी येता जाता बघायचा. एक वर्ष लहान होती ती.

अगदी सुंदर साधी अशी. कॉलेजची ब्युटीक्वीन . बरेच मुल तिच्या मागे होते. ती आपली सगळ्या पासून अलिप्त होती. कोणी कितीही मागे येवू दे ती भाव द्यायची नाही.

मोठे केस, बोलके डोळे. त्यात ती छान काजळ भरायची. चेहऱ्यावर अगदी निरागस भाव. शांत. सुरभी सगळ्यात वेगळी होती. त्याला खूप आवडत होती.

तिला समजल होत सचिन रोज तिच्याकडे बघतो. ती तो दिसला की नजर चोरत होती. क्लास कडे मुद्दाम लांबून जात होती. सगळ्या मैत्रिणी तिला सांगत होत्या सचिनला हो म्हण. श्रीमंत मुलगा आहे. तिची हिम्मत झाली नाही.

ग्रॅज्युएट झाल्यावर त्याने एकदा दोनदा तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला होता. ती खूप घाबरली होती.

"मी अशी मुलगी नाहिये. मला घरून प्रेम करायची परवानगी नाही." ती एका दमात बोलली.

तो खूप हसत होता. "कोणाच्या घरून असते अशी परवानगी. मला तू आवडते. मी दोन वर्ष इथे नाहिये. शिक्षणासाठी फाॅरेनला जातो आहे. तू हो म्हणशील तर आपण नंतर लग्न करू."

"नाही मला वचन देता येणार नाही. " कारण तेव्हा तिच्या साठी स्थळ बघत होते.

" फोन नंबर तरी दे. "

तिने दिला नाही.

तो निघून गेला. तेव्हा ती शेवटच्या वर्षाला होती. ती खूप रडली होती.

"अजून वेळ गेली नाही. फोन कर त्याला." मैत्रिणी बोलत होत्या. तिने नकार दिला. जावू दे चांगला मुलगा गेला.

दोन वर्ष झाले तो वापस आला. घरच्या फॅक्टरीत जॉईन झाला. तिची चौकशी केली. काही समजल नाही. त्या लोकांनी घर बदलल होत. तीच लग्न ही झाल होत. त्याला खूप वाईट वाटलं होत.

आज तिचा तो टवटवीत सुंदर चेहरा अगदी मलुल झालेला होता. ती निस्तेज डोळ्यांनी सगळीकडे बघत होती. काही समजत नसल्या सारख.

" सुरभी." त्याने हाक मारली. मी सचिन. तिने उत्तर दिलं नाही.

"तुम्ही यांच्या सोबत आहात ना. तरी का सांगितल नाही. काय लोक आहेत एक एक." नर्स बोलली.

सचिनच लक्ष नव्हतं.

नर्स बाहेर गेली तिने फाईल वर लिहिल. " सुरभी सचिन मोहिते." तिने ती फाईल पुढे पाठवून दिली.

नर्स आत आली.

"ही काही का बोलत नाही सिस्टर?"

"सुरभी मॅडम." नर्सने हाक मारली ."तुम्ही यांना ओळखता ना ? बघा यांच्या कडे. " नर्स बोलत होती.

ती त्याच्याकडे बघत होती. चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन नव्हते.

"नर्स काय झालं आहे. ही अस का करते. सुरभी मी सचिन."

ती अगदी ब्लॅंक होती.

" तुम्ही थांबा इथे दोन मिनिट मी डॉक्टरांना बोलवते. " ती पटकन बाहेर गेली. त्याने तिचा हात हातात घेतला. "सुरभी बोल ना काहीतरी. "

ती शांतपणे त्याच्याकडे बघत होती. शून्य नजरेने.

" मला ओळखलं का? "

ती नाही म्हटली. "मी इथे कशी आली?" तिला बोलता येत नव्हत.

डॉक्टर आले ते तिला तपासत होते.

"तुम्ही यांच्या सोबत आहात का? " डॉक्टरांनी विचारल.

"हो. पण ती म्हणते तिला काहीच आठवत नाही. " सचिन काळजीत होता.

"तुमचं गाव कुठलं मॅडम? तुम्ही कुठे राहतात? नाव सांगा? " डॉक्टर मुद्दामून प्रश्न विचारत होते.

"मला माहिती नाही. माझं डोकं दुखत आहे. मला झोपू द्या. " एवढंच ती बोलली.

डॉक्टर बाहेर आले. सचिन त्यांच्या सोबत होता. " काय झालं आहे डॉक्टर? "

"मला असं वाटतं आहे की त्यांना आधीच काहीच आठवत नाही. मेमोरी गेली वाटत त्यांची."

"आता कस होईल?"

"आठवेल हळू हळू. काळजी करू नका. सध्या खूप बळजबरी करता येणार नाही. डोक्याला खूप ताण द्यायचा नाही. सुरभीला आरामात राहू द्या."

" ठीक आहे. मी आहे हिच्या सोबत. मला सांगा काही लागल तर . " सचिन बोलला.

तिला स्ट्रेचर वर झोपवलं ते दुसऱ्या रूम मधे आले. तिला आत मध्ये नेलं.

" हा फॉर्म भरा. "

तो विचार करत होता. तिला मागचं काही आठवत नाही. तिच्या घरच्यांना कस शोधणार.

डॉक्टर नर्सला काहीतरी सांगत होते.

" या टेस्ट कराव्या लागतील अर्जंट. तुम्ही या फॉर्म वर सही करा."

त्याने सही केली. तिला टेस्ट साठी नेल.

तो ही सोबत होता. बाहेर बसलेला होता. थोड्या वेळाने एक नर्स आली. "तुम्ही सुरभीचे मिस्टर ना."

तो फोन वर होता. एक मिनिट त्याने फोन म्युटवर टाकला.

"तुम्ही आहात ना सुरभी सोबत? "

त्याने हो सांगितल.

" चला आत. "

त्याने फोन ठेवला. तो डॉक्टरांच्या केबिन मधे गेला . रीपोर्ट समोर होता.

"हे बघा सुरभीच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे. त्यामुळे त्यांना काही आठवत नाही. या पुढे तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल. त्यांना त्रास होईल अस. डोक्याला ताण येईल अस काही सांगायच नाही. थोडे दिवस जपावं लागेल. नाहीतर त्या कोमा मधे जावू शकतात. उगीच त्रास होईल अश्या गोष्टी सध्या नाही बोलल्या तरी चालतील. " डॉक्टर समजून सांगत होते.

" मी काळजी घेईल तिची. "तो अजून माहिती विचारत होता.

सुरभीला रूम मधे आणल. ती त्याच्या कडे बघत होती. ती छान हसली त्याच्याशी.

"नर्स हिला जेवण चहा पाणी देता येईल का?" सचिनने विचारल.

" सगळ द्या त्यांना आवडत ते खावू द्या. फक्त आनंदी वातावरण ठेवा."

"हिच्या डोक्याला एवढी मोठी पट्टी का आहे? जास्त लागल आहे का?" तो काळजीत होता.

" हो मेमोरी गेली. जास्त आहे. ते टाके आहेत. थोड लागल आहे. काळजी घ्या." नर्स हळूच बोलली.

त्याला खूप वाईट वाटलं. मी काळजी घेईन हिची. जो पर्यंत हिला आठवत नाही ही माझी जबाबदारी.

त्याचा फोन वाजत होता. रेंज विशेष नव्हती. सारखा कट होत होता. कोण फोन करत ते ही समजत नव्हत.

त्याने चहा ऑर्डर केला. तिला चहा पाजला. ती झोपली.

दुपारी थोडी खिचडी खाल्ली. रात्री पर्यंत गोळ्या सलाईन सुरू होत म्हणुन ती झोपून होती. विशेष बोलत नव्हती. रात्री तो तिथे झोपला. मालू काकू फोन करत होती.

"काकू मी सकाळी येतो. थोडा बिझी आहे."

"ठीक आहे साहेब."

"काकू तुम्ही मला सचिन म्हणा ना." तो नेहमी सांगत असे.

"काही तरी खावून घ्या."

"हो जेवलो मी."

तो सकाळी उठला. ती उठून बसलेली होती. आज थोडी बरी वाटत होती. ती त्याच्या कडे बघत होती.

तो छान हसला. "बर वाटतय का? "

हो.

" चहा सांगू. "

हो.

" मी थोड्या वेळ घरी जावून येतो. "

हो.

" तुम्ही कोण आहात? मी इथे कशी आली?"

त्याचा फोन वाजत होता. त्याने पटकन आवाज कमी केला.

"काय झालं?" तो बोलला.

"मी इथे कशी आली. आपल घर कुठे आहे?" ती हळूच बोलली.

"तुला लागल. सोड तो विषय. आरामात रहा." त्याला भीती वाटत होती तिला त्रास नको व्हायला.

त्याचा परत फोन व्हायब्रेट होत होता. इथे रेंज नाही वाटत तो बघत होता.

"तुम्ही माझे मिस्टर आहात का?" तिला नर्सने सांगितल होत. तिने तोंडातल्या तोंडात विचारल. अगदी हळू थकल्या सारख ती बोलत होती.

हो. तो बोलला. खर तर त्याला ती काय बोलते ते विशेष समजत नव्हत. त्याच लक्ष नव्हत. ऑफिसचे कॉल सुरू झाले होते. "सिस्टर इथे फोनला रेंज नाही का? माझा महत्वाचा फोन येतो आहे."

"बाहेर थोड त्या बाजूला जावून बघा."

तो फोन घेवून बाहेर निघून गेला.

"तुमचे मिस्टर दोन दिवस झाले इथे आहेत. चांगले आहेत ते. तुमची खूप काळजी घेतात." नर्स तिला बोलली.

ती विचार करत होती मला का काही आठवत नाही. मला इतक काय लागल?

" तुमच्या कारचा एक्सीडेंट झाला. एका ड्रायवरला ही पकडल आहे . " नर्सने सांगितल.

" ओह. मला काही माहिती नाही." तिच्या डोक्यातून कळ गेली. ती शांत पडून होती.

तो आत आला. झोपली वाटत ही. विचारायला हव हिला की तुझ घर कुठे आहे? घरचे काळजीत असतिल. पण कस? उगीच हिने टेंशन घेतल तर?

हिला काही आठवत नाही. उगीच नको विचारायला. डोक दुखत वाटत हीच. आठवे पर्यंत राहील माझ्या सोबत.

" तुमच काय नाव?"

अरे ही जागी आहे. "सचिन. तू शांत पणे झोप बर. खाते का काही तरी."

"नको. अहो. माझा हात दुखतोय."

ही मला अहो का म्हणते आहे? काय करू विचारू का? जावू दे. "बघू काय झालं?"

"ह्या बाजूने. " ती दाखवत होती.

"डॉक्टर आले की सांगू. "

नर्स आत आली.

"नर्स माझा हात खूप दुखतोय." ती परत बोलली.

"हो तुम्हाला लागल ना म्हणून."

"मला घाबरायला होत आहे. "

" आहे इथे सगळे. मी आहे. तुमचे मिस्टर आहेत. झोपा बर शांत. " नर्स कामात होती. ती बाहेर गेली.

सचिन गडबडला. काय कोण? काय बोलली ही नर्स? घरून फोन येत होता तो फोन घेवून बाहेर गेला.

"बोल आई."

"कुठे आहे सकाळ पासून?"

"थोडा बिझी होतो ."

"तुझे बाबा येत आहेत उद्या तिकडे. "

" काय कशासाठी? " तो दचकला.

"काय बोलतो आहेस तू सचिन ?"

" म्हणजे सॉरी आई अस नव्हत म्हणायच मला. काय काम आहे. मी करतो. त्यांना का एवढ दमायला सांगते."

"कोर्टात काम आहे. शेतीची केस तेच लागतील. "

" ओह ती काकां सोबतची केस का?" त्याला आठवल. चुलते होते ते जमिनीवरून भांडत होते.

" हो मग ते टपून बसले आहेत ते लोक त्या जागेवर. आपण का सोडा. " नंदा ताई चिडल्या होत्या.

" बरोबर आहे. आपली जागा आहे ती. " सचिन बोलला.

" तु जा उद्या त्यांच्या सोबत. "

" हो आई. " तो विचार करत आत आला उद्या दिवसभर बाबा असतिल मग सुरभीच काय करू?

सुरभी त्याची वाट बघत होती. तीला त्रास होत होता. तो आत आला. तिला बर वाटल. "अहो मला थोड सरळ करा ना. पाठ ही दुखते आहे."

" काय आहे हे? सुरभी तू मला अहो का म्हणते आहेस. " तो वैतागला.

ती थोडी हसली. "नवर्‍याला अहो म्हणता ना? मी तुम्हाला काय म्हणत होती आधी?"

नवरा कोण नवरा? काय आहे हे? तिच्या समोर तो काही बोलू शकत नव्हता. ती फक्त त्याला बघून थोडी खुश असायची. इतर वेळी तिला लागल होत तर त्रास होत होता.

तिची फाइल समोर पडलेली होती त्यावर सुरभी सचिन मोहिते लिहिलेलं होत.

काय करू? गैरसमज झाला आहे हा. ही माझी बायको नाही. सांगू का. कोणाला पण? ड्युटी बदलून दुसरी नर्स आली होती. डॉक्टर बिझी होते. सुरभीला काही आठवत नव्हत. तिला बोलून काही उपयोग नाही.

तो तिच्या जवळ आला. ती लोळलेली होती. "अहो मला सरळ करा ना. केव्हाच सांगते आहे."

त्याने तिच्या पाठी खाली हात नेवून तिला सरळ केल. दोघ अगदी जवळ होते. तिला काही वाटल नाही. तो उगीच लाजल्या सारखा झाला.

नर्स फाईलवर काहीतरी लिहीत होती." हे औषध आणून घ्या."

तिने सचिनकडे चिठ्ठी दिली. "औषध आणल्यावर मला दाखवायला या. "

" तुम्ही आहात ना इथे सुरभीजवळ. मी खालून जाऊन येतो."

" हो चालेल."

" मी पाच मिनिटात येतो." त्याने तिला सांगितलं. तो औषध घेवून आला. नर्स कडे दिल.


0

🎭 Series Post

View all