नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 32

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच
नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 32

©️®️शिल्पा सुतार

सुंदर पडणारा पाऊस बघत सुरभी उभी होती. सचिन हळूच रूम मधे आला. तिला मागून मिठी मारली. ती दचकली.

"सचिन तू केव्हा आलास? तू खरच आला का? मला कारचा आवाज नाही आला. जेवायला आलास का?" ती खूप प्रश्न विचारत होती.

तो तिच्याकडे बघत होता. सुंदर पावसाळी वातावरण. त्यात ती साडी मधे खुप सुंदर दिसत होती. दोघांच्या चेहेऱ्यावर अधीरता होती. पण कोणी काही बोलत नव्हत. त्याच्या बघण्याने ती लाजली.

"मीटिंग झाली का? " तिने उगीच विचारल.

तिला तर खरं वाटत होत सगळ सोडून त्याच्या मिठीत शिराव. त्याला सांगाव की मला तुझी खूप आठवण येत होती. आपण सोबत वेळ घालवू या का? पण ती गप्प बसली.

"हो. झाली मीटिंग. आत चल मधे ओली होशील." त्याने बाल्कनीच दार बंद केल.

"तुला जेवायला देवू का?"

हो. दोघ खाली आले .

सुरभीने ताट केले. सचिन तिच्या समोर बसला होता तिच्या कडे बघत. वेगळाच अवघडलेला पणा होता त्यांचात. जेवण झाल. ती आवरत होती.

"सुरभी राहू दे ना आता हे. चल."

ती थोडी लाजली. तो पुढे आला तिचा हात धरला स्वतः सोबत रूम मधे घेवून आला.

तिची धडधड वाढली होती. सचिनची सोबत हवीहवीशी वाटत होती. ती खुश होती. "तू कसा काय लवकर घरी आलास? तू तर बिझी होता ना. " तिने हसत विचारल.

" कोणाला तरी माझी खूप आठवण येत होती म्हणून आलो. म्हटलं सुंदर पाऊस पडतो आहे. रोमॅन्टिक वातावरण आहे. आपण काय करतो आहे ऑफिस मधे. तुझ्यासाठी आलो. आता अस बोलण्यात वेळ घालवणार का?" तो बोलला.

ती लाजली होती. त्याने रूम बंद केली. सुरभीला उगीच धडधड झाली. त्याने तिला मिठीत घेतल.

" आज का एवढी सुंदर दिसते आहेस. माझ्यासाठी केली का ही तयारी? "

हो. ती हळूच बोलली.

" मग बघू तरी कशी दिसते आहे माझी सुरभी."

ती लाजली पटकन बाजूला जावून बसली. तो तिच्या मागे आला.

" सुरभी आपण सोबत वेळ घालवायचा का?" त्याने हळूच कानाजवळ येवून विचारल.

तिने मागे वळून त्याला मिठी मारली. दोघ काही बोलत नव्हते. दोघांच्या मनात सारख्या भावना होत्या. दोघ एकमेकांसाठी खूप अधीर झाले होते. सचिनने तिला उचलल.

सचिन नको ... ती संकोचून बोलली.

"शु.. काही बोलू नकोस."

बरसणार्‍या पावसासोबत त्यांच प्रेम खूप बहरल होत. दोघ एकमेकांसोबत खूप खुश होते. थोड्या वेळाने सचिन तिला जवळ घेवून बसला होता. सुरभी अजूनही लाजलेली होती. गालावरची गुलाबी लाली कमी होत नव्हती.

"सुरभी थँक्यू. तू खूप गोड आहेस. " त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

ती लाजून खूप हसत होती. "सचिन नको ना अस बोलूस. तू खुश आहे ना?"

" हो खूप."

"तुझ्या जवळ असा परके पणा वाटत नाही." सुरभी बोलली.

"आपण बरेच दिवस झाले एकमेकांना ओळखतो ना म्हणून."

"चांगल्या लोकांसोबत चांगल वाटत. " सुरभी मनातल बोलली.

हो का. सचिन परत तिच्या जवळ येत होता. ती उठून बाजूला झाली.

" ऑफिसला जायच नाही का? चहा करू का? "

" नाही आज मी माझ्या बायको सोबत राहणार." सचिन लॅपटॉप घेवून बसला होता. "इकडे ये सुरभी हे बघ हिल स्टेशन इथून जवळ आहे. इथे जावू या का आपण फिरायला."

"कधी?"

" उद्या सकाळी."

" किती दिवस?"

"किती हि. तू म्हणशील तितके दिवस ."

" आता ऑफिसच काम नाही का?"

"मी चार पाच दिवस सुट्टी घेतली आहे. आपल्या साठी. "

खर?

" हो. पण सुट्टीचा चांगला उपयोग करायचा. हो नाही करायच नाही." सचिन सहज बोलला.

सुरभी लाजली होती.

" सांग लवकर बूकिंग कराव लागेल. "

" हो जावू चार दिवस."

"सुरभी बूकिंग झाल बॅग भर. " सचिन खुश होता.

दोघ दिवस भर सोबत होते. अगदी प्रेमाने एकमेकांना सांभाळत होते. सुरभीचा तिच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. एवढे चांगले लोक आयुष्यात आले. मी खूप चांगल वागेल. सचिनला नेहमी खूप प्रेम देईल. जे मिळाल आहे ते मनापासून जपणार आहे. तिने त्याचा जवळ जावून उगीच त्याच्या कपाळावर ओठ टेकवले.

"काय झालं मॅडम? आज माझ्या वर खूप प्रेम येत आहे वाटत. नीट तरी जवळ ये." त्याने उठून लाइट आॅफ केले. सुरभीला जवळ घेतल.

सकाळी ते लवकर निघाले. ड्रायवर सोबत होता. खूप मस्त रस्ता होता. सुरभी त्याच्या जवळ बसली होती. तिचे केस वार्‍याने उडून सचिनच्या चेहर्‍यावर जात होते. त्याने एका हाताने तिचे केस धरून ठेवले. तिने त्याच्याकडे बघितल सॉरी.

"त्यात काय. छान आहेत तुझे केस धुतले का आज?"

हो.

एका ठिकाणी त्यांनी चहा नाश्ता केला. ते रिसॉर्ट वर आले. छोटे टुमदार बंगले होते सगळीकडे. आजुबाजुला गार्डन होत. खूप शांतता होती. थंड वातावरण होत. सुरभी सगळीकडे फिरून आली. "सचिन तिकडे त्या बाजूने तलाव दिसतो आहे. चल ना. "

"सुरभी बसू दे ना थोड. आता आपण आहोत इथे तीन चार दिवस. उद्या आपण बोटिंगला जावू." सचिन साठी हे काही विशेष नव्हत. ते नेहमी फिरायला जात होते.

या आधी सुरभी अशी कधी फिरायला आली नव्हती. त्यामुळे ती खूप उत्साही होती. एवढ प्रेम पूर्वी कधी तिला मिळाल नव्हत. तिच्यासाठी एवढा खर्च कोणी करायला तयार नव्हत.

सचिन सोबत ती खुश होती. तो तिला खूप जपत होता. तिच्या मना प्रमाणे होत होतं. तिचा चेहरा खुलला होता. सचिन सोबत कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती रोकटोक नव्हती. खूप प्रेम सम्मान तिला मिळत होता.

ती सचिन जवळ येवून बसली. "वेगळ वाटत ना इथे. अगदी प्रसन्न. निसर्गाचा चमत्कार आहे हा. किती गार वातावरण आहे. फळ वेगळे आहेत ना. पक्षी पण खूप आहेत. " तिला किती बोलू किती नको अस झाल होत. तिला इथे आवडल होत हे बघून सचिन खुश होता.

"चला तुला आवडल ना हे ठिकाण. आपण नेहमी येत जावू."

थोड्या वेळाने ते फिरायला निघाले. जवळ फिरून आल्यावर त्यांनी रूम मधे जेवण घेतल. सचिन टीव्ही बघत होता, सुरभी फोन वर बोलत होती." सुरभी किती वेळ झाला फोन सुरू आहे. ये ना आता इकडे."

"दोन मिनिट." तिने खूण केली. ती थोड्या वेळाने आली.

" काय अस सुरभी? एवढ्या वेळ फोन वर का बोलतेस? माझ्या सोबत कोण वेळ घालवणार?"

"अरे आधी वहिनीला फोन केला होता, मग आपल्या घरी."

"चल जा कपडे बदलून ये. मी केव्हाचा वाट बघतो आहे. तुझ्या साठी गिफ्ट आहे. "

समोर सुंदर पांढरा नाईटी होता. सुरभी त्यात खूप सुंदर दिसत होती." सचिन हे बघ. "

" आवडला का?"

"छान आहे कंफर्टेबल. केव्हा घेतला. "

"ते नाही सांगणार. ये इकडे आता. "

ती सचिन सोबत रमली.

दुसर्‍या दिवशी ते तिथे साईट सिइंगला गेले. भरपूर खरेदी केली. सचिन घरातल्या सगळ्या लोकांचा विचार करत होता. आई आणि मनु साठी त्याने खूप वस्तु घेतल्या होत्या. सुरभी बघत होती हा एकदंरीत चांगला आहे.

"सुरभी तुला काय घ्यायच?"

"काही नको."

"अस चालणार नाही बघ किती वस्तू आहेत."

"घरी ही किती वस्तु आहेत. कसली कमी नाही मला. तुझ्या सोबत प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा आहे बास." सुरभी बोलली.

सचिनने तिला जवळ घेतल.

"सचिन सोड इथे रस्त्यात काय आहे?"

"अरे आपल्या आजुबाजुला असे कपल आहेत बघ. लाजू नकोस. हनीमूनला आल्या सारख तर वाग. " तो हळूच बोलला.

सुरभीची खरेदी झाली.

" सचिन उगीच एवढ्या वस्तु घेतल्या. "

" तुझ्या साठी काहीही. "

सचिन सोबत तीन चार दिवस कसे गेले ते समजल नाही. दोघ खूप खुश होते. त्यांच नात अजून घट्ट झाल होत .

" आज काय करू या? " तिने विचारल.

" काही नाही आज बोटिंग करू आणि बाजूच्या बागेत शांत पणे बसू."

"मला खूप आवडत निसर्गाच्या सान्निध्यात. मस्त आयडिया आहे. "

" मला पण धावपळ आवडत नाही."

ते दुपारी जेवण करून आरामात निघाले. तलाव मोठा होता. बोटिंग झाल्यावर ते बागेत हिरवळीवर बसुन मस्त गप्पा करत होते. खेळणारे मुल बघत. दोघांच्या मनात सारखे विचार सुरू होते. आपल्याला मूल होईल का. पण ते दोघ काही म्हटले नाही. संध्याकाळी वापस रिसॉर्ट वर आले.

सुरभी सचिन सोबत छान रमली होती. पूर्वीच आयुष्य थोड सुद्धा तिला आठवत नव्हत. सचिनने तीच जग प्रेमाने भरून टाकलं होत. ती त्याच्या सोबत अतिशय मोकळी वागत होती. खूप प्रेम विश्वास होता त्यांच्यात. ती म्हणेल ते होत होतं, मिळत होत. सुरभीला या गोष्टीची जाणीव होती. ती होईल तितक सचिनला जपत होती.

अगदी चार पाच महिन्या पूर्वी ती किती त्रासात होती. घरच्यांच्या राग सांभाळत कसतरी जगात होती. आता तिला खूप प्रेम मिळाल होत.

समोर छोट मंदिर होत. ती तिथे गेली. हात जोडून उभी होती. देवा तुझे खूप आभार. मी सुखी आहे. सचिन आणि त्याच्या घरचे खूप चांगले आहेत. त्या लोकांनी मला सुखी ठेवल आहे. कधीच काहीच बोलत नाही. पण मला मनातून त्रास होतो आहे. मला ही त्यांना आनंदी करायच आहे. मला बाळ होऊ दे देवा. कृपा करा.

सचिन बघत होता सुरभी कुठे गेली? तो ही देवळात आला. दोघ बराच वेळ तिथे बसले होते.

"देवा कडे काय मागितल?"

"काही नाही."

"तू इथे येवून खूप शांत झालीस. सुरभी कुठल्याही गोष्टीच टेंशन घ्यायच नाही. आपण जस आहोत तस ठीक आहे. मी खुश आहे." त्याला बहुतेक समजल होत सुरभी नाराज आहे. बागेत मुल बघितल्या पासून ती शांत होती.

"सचिन माझ्या मनाप्रमाणे होईल ना."

"हो सुरभी तू खूप चांगली आहेस. देव तुझ नक्की ऐकेल."

ते हॉटेल वर वापस आले. आराम केला.

दुसऱ्या दिवशी ते घरी आले. सचिन नेहमी प्रमाणे बिझी झाला. आता हल्ली तो रोज उशिरा घरी येत होता. अगदी थोडा वेळ ते सोबत होते. सुरभी त्याची वाट बघत बसायची. तिला करमत नव्हत. ती चिडली होती. आज मी बोलणार आहे सचिन सोबत.

सचिनला यायला नेहमी प्रमाणे थोडा उशीर झाला. घरी आल्यावर ही तो बिझी होता. सुरभी केव्हाची समोर बसली होती. शेवटी ती कंटाळली. रागाने आत निघून आली.

सचिन तिच्या मागे आला. "काय झालं सुरभी? तू चिडली का?"

"सचिन मला गावाला जायच. तिकडे राहीन मी थोडे दिवस."

"जमणार नाही."

"अरे मी कंटाळते इथे. काय करू एकटी. तू किती उशिरा घरी येतो. मला जॉब दे नाहीतर मी गावाला जाईल." ती बोलली.

"काय काम करशील तू. तुझा एवढा मोठा एक्सीडेंट झाला. कश्याला डोक्याला ताण करते. आरामात रहायच. टीव्ही बघायचा. "

" मला नाही आवडत अस. "

" मी तुला घरी काम आणून देतो ते करशील का? " त्याने सांगून बघितल.

हो.

" जून रेकॉर्ड नीट कर. "

" मला सॅलरी किती मिळेल. " ती खुश होती.

" तुझ तर आहे सगळं. त्यात काय सॅलरी? "

" हे अस चालणार नाही. "

" बर किती हवी सॅलरी? मग इंटरव्यू ही द्यावा लागेल. तयारी करून ठेव."

आता सुरभीला टेंशन आल होत. " कोण घेईल इंटरव्यू? काय विचारतील ते." तिने हळूच विचारल.

" मी घेणार इंटरव्ह्यू. मी बॉस आहे ना." तो सिरियस होत बोलला.

" मग टेंशन नाही. "

" नाही मी ऑफिस वर्क बाबतीत स्ट्रीक्ट आहे. "

" ठीक आहे. "

" अभ्यास करून ठेव. तुझा क्यूट चेहरा बघून मला काही सुचणार नाही अस तुला वाटत असेल तर तो भ्रम आहे. उद्या दुपारी असेल इंटरव्ह्यू. ऑल द बेस्ट. " सचिन परत बिझी झाला.

बापरे उगीच जॉबचा विषय वाढवला. सुरभी टेंशन मधे होती. काय विचारेल हा? मला काही आल नाही तर. काय करू अभ्यास करू का? रात्री ती मोबाईल वर काहीतरी वाचत होती

" सुरभी ये ना आता इकडे. काय करते आहेस? " सचिनने आवाज दिला.

" मी बिझी आहे. अभ्यास सुरू केला आहे."

"आता काय? चल आराम कर."

"नाही, थोडाच वेळ बाकी आहे. दुपारी इंटरव्यू म्हणजे बारा तास बाकी आहेत. तु शांत बस मला डिस्टर्ब होत आहे." ती परत वाचत होती.

"सुरभी प्लीज ये ना इकडे." त्याने परत आवाज दिला.

"नाही गप्प एकदम. सचिन तू झोप. "

तो उठून तिच्या जवळ आला. "चल आता. मी सोपे प्रश्न विचारेल. प्रॉमीस. आणि आता जर तू आली नाहीस तर मग विचार कर इंटरव्ह्यू कसा होईल. "

" सचिन काय अस इथे मी टेंशन मधे आहे. "

तो हसत होता.

उगीच या नोकरीच्या मागे लागली. पूर्ण फसली मी. शेवटी हा त्याची मनमानी करणार. ती उठली. आत गेली.

सकाळी नाश्ता करतांना सुरभी काहीतरी वाचत होती. सचिन हसत होता. एवढी सिरियस. नक्की ही चांगली एम्पलोयी असेल. हिला हे काम जमले तर ऑफिस मधे घेवू.

" मी निघतो सुरभी. दुपारी येतो जेवायला. तेव्हा तुझा इंटरव्ह्यू आहे. तयार रहा." तो निघाला.

सुरभी विचार करत होती काय करता येईल. तिला आयडिया सुचली. थोड्या वेळाने ती छान तयार झाली. प्लेन नेव्ही ब्लू साडी नेसली. केस मोकळे सोडले. थोडा मेक अप केला . मॅचिंग टिकली लावली . यात ती कमालीची सुंदर दिसत होती. मुव्ही मधल्या हेरॉईन सारखी. आरश्यात बघून ती स्वतः खुश होती.

आता बघते कसा इंटरव्ह्यू होतो आणि हा सचिन कसे प्रश्न विचारतो ते. मला त्रास देतो का. तिला खूप हसू येत होत.

दुपारी बाहेर कारचा आवाज आला. सचिन आत आला. सुरभी कुठे आहे? अभ्यास करत असेल. तिला टेंशन आल होत. आता तिला दोन तीन अवघड प्रश्न विचारतो. चांगल हरवतो. म्हणजे ती मला त्रास देणार नाही. मस्त आरामात रहायच तर काय काम करायच तिला.

तो आत आला. "सुरभी रेडी का? झाला का अभ्यास? कुठे आहेस? हे बघ इंटरव्ह्यूच एवढ टेंशन घ्यायच नाही."

सुरभी आतून बाहेर आली. "अरे केव्हा आलास तू सचिन आधी जेवायच का की इंटरव्ह्यू?"

तो कडे बघत राहिला. ती एकदम स्टाइल मधे समोर येवुन उभी राहिली.

एवढी सुंदर. बापरे साडी तो रंग तिला अतिशय छान दिसत होता. केस सावरत तिने त्याचा कडे हसून बघितल.

" कुठे चाललीस तू? एवढी नटूनथटून? "

" इंटरव्यू आहे ना म्हणून तयार झाली. "

"अशी? "

" हो काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का?"

"नाही." सचिनने समोरच्या बाटलीतल पाणी घटाघट पिल. माझा काही विचार. ही अशी तयार झाली तर काय बोलणार हिला.

"चल मग सचिन. " सुरभी मधाळ आवाजात बोलली.

"कुठे?" तो खुश होता.

" इंटरव्यूला सुरुवात करू. स्टडी रूम मधे जायच ना. " ती मागे फिरली. ब्लाऊजचा गळा सुंदर होता. तिने केस पुढे घेतले.

सचिन बघत राहिला.

तिने तीच सामान घेतल. केस सावरले. चल सचिन.

"सुरभी ऐक ना. तुला येत सगळं मला माहिती आहे तू छान काम करशील. मी काय म्हणतो आहे. "

" काय? " तिने त्याच्या कडे बघत विचारल.

" इंटरव्ह्यू कश्याला तु कामाला सुरुवात कर."

"पेमेंट?"

"तु म्हणशील ते."

"लेटर हव तस ऑफिशियल."

"देतो."

"आता."

"आता नाही. आधी माझ्या जवळ ये." त्याने तिला जवळ ओढल.

"नाही."

"बर संध्याकाळी देतो लेटर."

"आता? "

"बर." त्याने मोबाईल काढला. ईमेल आय डी दे. तिने दिला त्याने मेल सेंड केली. त्यात तिला पंचवीस हजार पेमेंट होता. काम घरून होत. वाटल तेव्हा ऑफिस मधे यायच. बोनस होता. सुट्ट्या होत्या.

सुरभी वाचत होती.

" ठीक आहे का?"

हो. ती खुश होती. त्याच्या जवळ पळत आली. थँक्यु.

त्याने तिला उचलून घेतल. दार लावून घेतल. दोघ छान रमले होते.

"सुरभी काही झाल तरी तू जिंकते ना." तो जेवता जेवता हसत बोलला.

"आता मी काय केल?" सुरभीने मुद्दामून विचारल.

"तू काय केल हे तुला माहिती नाही वाटत. मला पूर्ण पणे गुंडाळून ठेवल आहे."

"अस काही नाही सचिन." सुरभी खूप हसत होती.

"ठीक आहे तुझ्या साठी काहीही." दोघ खूप आनंदात होते.


🎭 Series Post

View all