नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 31

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच
नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 31

©️®️शिल्पा सुतार

आज सत्यनारायणाची पूजा होती. घरात खूप लगबग सुरू होती. सुरभी आत तयार होत होती. मनु तिच्या मदतीला होती. बाहेर गुरुजी पूजेची तयारी करत होते. नंदाताई, मामी त्यांच्याकडे बघत होत्या. त्यांना हवं ते सामान देत होत्या. सौरभ पूजा आले. पूजा आत मदतीला आली. तिची आजींशी ओळख करून दिली.

आजी एका जागी बसून सगळीकडे लक्ष देत होत्या.

रूममध्ये सचिन नुसतं बसून लॅपटॉप वर काहीतरी काम करत होता. दोन वेळा नंदाताई येऊन सांगून गेल्या की तयार हो. तरी तो ऐकत नव्हता.

"सचिन काय झाल आहे?" शेवटी त्यांनी विचारल.

"काही नाही, ऑफिसच काम करतो आहे बाकी काही नाही."

" दुपारनंतर नाही करता येणार का? मी केव्हाच सांगते आहे. सौरभ आला बघ. तुझे मामा आले आहेत . बाहेर बस पाहुणे आहेत." नंदा ताई ओरडल्या.

"हो आलो."

तो उठला तयार झाला. त्याला हे पाहुणे गर्दी बोर होत होतं. त्याला वाटलं होतं लग्न झाल्यावर छान सुरभी सोबत वेळ घालवता येईल. पण इथे तर खूप गडबडीतच येऊन पडलो.

तो बाहेर येऊन बसला. मामा चहा घेत होते. सौरभ ही बसला होता.

" सचिन चल चहा घे. " मामा बोलले.

" नाही त्या दोघांचा पूजा होईपर्यंत उपास आहे." नंदा ताईंनी आठवण दिली.

"नवरदेव नवरी कुठे आहेत. बोलवा त्यांना लवकर पूजा करून घेऊ." गुरुजींनी आवाज दिला.

नंदाताई बोलवायला गेल्या. सुरभी मनु बरोबर हळूहळू बाहेर आली. सगळे तिच्याकडेच बघत होते.

"सचिन चल."

तो सुरभी कडे बघून खुश होता. लग्नाच्या शालू मध्ये सुरभी खूपच सुंदर दिसत होती. लग्नात जशी दिसत होती त्यापेक्षा आता वेगळीच दिसत होती. लग्न झाल्याच तेज तिच्या चेहऱ्यावर होतं. कपाळावर आज तिने मुद्दामुन ठसठशीत कुंकू लावलं होतं. त्याने चेहरा अगदी वेगळाच दिसत होता. सगळे दागिने घातलेले होते.

दोघ सोबत उभे होते. ती मुद्दाम खाली बघत होती. आजींनी उठून दोघांची नजर काढली.

"चला घरातल्या मोठ्यांचा नमस्कार करा आणि पूजेला येऊन बसा." गुरुजी बोलले.

सुरभी सचिन जवळ जवळ बसले. ती वाट बघत होती हा माझी स्तुती करेल. म्हणेल तरी की छान दिसते आहेस. पण सचिन काहीच बोलला नाही. मुद्दाम त्याच त्याच बसला होता.

सुरभी त्याच्याशी हसली.

तो एकदम मंत्र मुग्ध झाला होता. पण त्याने स्वतःला कंट्रोल केल.

" आज बोलायच नाही का?" तिने विचारल.

"तुला माझ्या पासुन लांब रहायच आहे ना." त्याने रागात उत्तर दिल.

" अस काही नाही. अहो कशी वाटते आहे तयारी? तुमच्या साठी केली." सुरभी बोलली. मुद्दाम त्याला चिडवायला अहो बोलत होती.

"माझ्यासाठी? काय उपयोग आहे त्याचा. तू मुद्दामून माझ्या पासून लांब थांबते. आणि मला अजिबात आवडली नाही एवढी तयारी? जास्त वाटते आहे. किती वाजता उठली होती सकाळी? काहीतरी आपल." सचिन शांततेत बोलला.

" मला वाटलं तू मला म्हणशील की छान दिसते आहे तर तू अस करतोस ." सुरभीने नाक मुरडल.

"हो मग, किती लावून घेतलं आहे सगळं. बाहेर येण्या आधी आरश्यात तरी बघायच. " सचिन आता तिला मुद्दामून चिडवत होता. तिच्यासोबत वेळ घालवायला मिळत नाही म्हणून तो चिडलेला होता.

सुरभीला कसतरी वाटल." मनु इकडे ये. काहीतरी झाली का तयारी?"

"नाही वहिनी तू गोड दिसते आहेस. "

"हे बघ म्हणता आहेत खूप लावल आहे. "

"दादा काय अस करतोस. वहिनी छान दिसते आहे. " मनु त्याला बोलली.

काहीही.

"हा ना जळतो वहिनी तुझ्यावर .तू छान दिसते ना म्हणून. तू रीलॅक्स रहा."

सुरभी आणि मनुने सचिन कडे रागाने बघितल.

थोड्या वेळाने पूजा सुरू झाली. दोघ शांततेत छान पूजा करत होते. सुरभी त्याच्या हाताला हात लावून बसली होती. एकमेकांच्या सोबत राहिल्याने परत सचिन खुश झाला.

पूजा झाली. आरती झाली. नेवैद्य दाखवला. जेवणाच्या पंगती बसल्या.

जेवण झाल्यानंतर लगेचच ते लोक मंदिरात जाणार होते. आशिष, मनु, मामा, मामी, पूजा, सौरभ, सुरभी, सचिन, पूजा सगळे मंदिरात जायला निघाले. इथून एका तासावर मंदिर होत.

सुरभीने साधी तयारी केली. छोटी साधी टिकली लावली. केसांची वेणी घातली. सचिनला आवडत नाही. तस नको करायला.

खूप मजा येत होती. त्यांनी मोठी गाडी सोबत घेतली होती. मनु सुरभी सोबत बसली होती. सौरभ, पूजा जवळ बसले होते. आशिष, सचिन जवळ होता. मामा, मामी सोबत बसले होते.

सचिन मामींकडे बघत होता. मामींनी मनुला बोलवलं. "इकडे ये मनु माझ्याजवळ बस."

मामा उठून आशिष जवळ गेले. मनु मामीं जवळ आली.

सचिन सुरभी जवळ जाऊन बसला. सुरभीला ते सगळं समजलं होतं. ती हसत होती. दोघ खूप खुश होते. सचिन तिच्या खांद्यावर हात ठेवून बसला होता.

"झाल मनाप्रमाणे." तिने विचारल.

"अजून नाही."

"मग आता काय?

" सांगू."

"नको. गप्प बस. कोणी ऐकेल."

"अरे तयारी दुसरी केली. दागिने काढून ठेवले का?" सचिन तिच्या कडे बघत होता.

"मग काय करणार? तुला नाही ना आवडल. म्हणून साधी तयारी केली. " सुरभीने सांगितल.

"मी गम्मत करत होतो. तू छान दिसत होती."

"तु जे म्हणतोस ना ते माझ्यासाठी खूप महत्वाच आहे सचिन. तुला नाही आवडल विषय संपला." सुरभी बोलली.

"बापरे खूप प्रेम दिसतय. " सचिन तिच्या जवळ जात बोलला. सुरभी लाजली होती. दोघ पूर्ण वेळ गप्पा मारत होते.

निसर्गाच्या सानिध्यात मंदिर होतं. खूप सुंदर दर्शन झालं. दोघांनी मिळून पूजा केली. मामी पूजा सोबत होत्या. तिथे चहा घेतला.

सगळे वापस आले. संध्याकाळी छान शेतावर पार्टी होती. मस्त जेवण झालं.

सचिन तर संध्याकाळ पासून खुश होता. आज सुरभी रूममध्ये झोपायला येईल.

रात्री घरी आल्यानंतर नंदाताई सुरभी जवळ आल्या. "तुझं सामान घेऊन सचिनच्या रूममध्ये मध्ये शिफ्ट हो. जा सचिन तिला तिला मदत कर."

दोघेजण नंदाताई जवळ उभे होते.

"इथे कोणाला माहिती नाही तुमचं लग्न आता झाल्याचं त्यामुळे तुमची रूम सजवली नाही."

"काही हरकत नाही आई." सचिन बोलला.

सुरभी तर लाजून अर्धी झाली होती. सचिन सुरभीच सामान घेऊन रूम मध्ये आला. सुरभीने बदलायला ड्रेस हातात घेतला. ती कपडे बदलून आली. सचिन सोफ्यावर बसलेला होता. ती त्याच्याजवळ येऊन बसली." तुला नाही कपडे बदलायचे का? "

" हो जातो. " सचिन फ्रेश होऊन आला.

" आपण रीसेप्शन झाल की घरी जाऊ. मला खूप काम आहेत. एक आठवडा झाला काहीच केलं नाहीये खूप मेल आलेल्या आहेत." आता ही तो कामात होता.

" सचिन मी पण ऑफिस जॉईन करू का?"

" थोडे दिवस थांब आराम नाही करायचा का?"

"बोर होतं घरी."

" मी रोज येत जाईल ना घरी जेवायला. ठरवू आपण. आत्ताच बोलणं गरजेचं आहे का? एक तर तू ऑफिस मधे आली की मला काही सुचणार नाही. "तो हसत बोलला.

ठीक आहे.

थोड्या वेळाने दोघं बाल्कनीत येऊन बसले. इतके दिवस अधीर झालेला सचिन आज एकदम शांत होता. त्याची बायको आज त्याच्यासोबत होती. तो तिची खूप काळजी घेत होता. दोघे छान गप्पा मारत होते.

दोन-तीन दिवसांच्या कार्यक्रमामुळे दोघेही खूप थकले होते. सुरभी त्याच्याशी बोलता बोलता झोपून गेली. त्याने तिला हळूच आत मध्ये आणलं. कपाळावर ओठ टेकवले. तिच्या सुंदर चेहर्‍याकडे बघत तो पण झोपला.

सकाळी उठला तर सुरभी नव्हती जागेवर ती किचन मध्ये होती. नाश्ता बनवत होती. पाहुणे भरपूर होते. सचिन ही बाहेर जावुन बसला.

आज रीसेप्शन होत. दुपारी पार्लर मधली ताई आली. सुरभी, मनु, पूजा रेडी होत होत्या.

सचिन तयार झाला.

"चला सहा वाजले सात नंतर सगळे यायला सुरवात होईल." सुरेश राव आवाज देत होते.

सुरभी बाहेर आली. मोती कलरचा घागरा खूप सुंदर होता. त्यावर तिने साधी तयारी केली होती. तरी सुद्धा ती खूपच सुंदर दिसत होती. सचिन तिच्या सोबत मॅचिंग कुर्ता मधे होता. कार मधे खुप गर्दी होती. त्यामुळे सचिनला सुरभीशी नीट बोलता आल नाही.

खूप पाहुणे येत होते. सुरेश रावांचे बिझनेस मधले मित्र येत होते. सगळे नवीन जोडी कडे बघून खुश होते. खूप फोटो निघत होते. जेवण ही खूप छान होत.

सौरभ पूजा लवकर वापस गेले. दुसर्‍या दिवशी ऑफिस होत.

सचिन सुरभी आता कार मधे सोबत होते.

"सचिन खूप पाय दुखत आहेत." सुरभी थकली होती.

"हो ना. आपण खूप वेळ उभ होतो. घरी गेल की आराम कर."

सगळे घरी आले. खूप छान झाला प्रोग्राम. ते गप्पा मारत बसले होते.

सचिन, सुरभी इकडे या. यांची नजर काढा आजी. सुरभीचे खूप लाड होत होते.

सुरभी रूम मधे आली. सचिन बाहेर मामा, बाबां सोबत गप्पा मारत बसला. दोन तीन तास झाले. नंदा ताई बाहेर आल्या. " तुम्ही सगळे जागे अजून. झोपा आता उशीर झाला आहे. "

"होऊ दे आम्ही नेहमी भेटत नाही." सचिन बोलला.

"अरे पण याची बायको वाट बघत असेल." नंदा ताई बोलल्या.

"जा तू सचिन ." मामा बोलले.

" इतका वेळ जागी राहील का ती? झोपली असेल." नंदा ताई बोलल्या.

थोड्या वेळाने तो आत आला. सुरभी झोपलेली होती. त्याला एक वेळ वाटल तिला उठवाव. नको घरात खूप पाहुणे आहेत. कंफर्टेबल वाटत नाही. तो पण झोपला.

सकाळी सचिन नाश्त्याला येऊन बसला. "आम्ही निघतो आहोत आता आई. मला खूप काम आहेत. सुरभी आटोप."

"सुरभीला राहू दे. " त्या मुद्दामून म्हटल्या. आशिष, मनु हसत होते.

" काय प्रॉब्लेम आहे तुमच्या दोघांचा?" सचिन चिडला.

"आईला माहिती आहे दादा ऐकणार नाही तरी दरवेळी तेच बोलते." मनु बोलली.

" आजी तू चल आमच्यासोबत." सचिन बोलला.

" नको बाबा, मला तिकडे बोर होतं आणि मी सांगितलं आहे ना आधीच सुरभी तू आनंदाची बातमी दे मग मी येईन." आजी नकळत बोलल्या.

सुरभीचा लगेच चेहरा उतरला. तिला टेंशन आल होत. या लोकांची इच्छा मी पूर्ण नाही करु शकत. मला मूल होईल की नाही माहिती नाही.

ते नंदाताई आणि सचिनने बघितलं. नंदाताईंनी पटकन विषय बदलला .त्या मुद्दाम आशिष आणि मनुला रागवत होत्या. " आटपा तुम्हाला अभ्यास नाही का? कॉलेज नाही का?"

आता सुरभी हसत होती. "आई नका ओरडू मनु, आशिषला. ते माझे लाडके आहेत."

सुरभी अजून किचनमध्ये होती." जा बेटा आवर तुम्हाला निघायचं आहे ना. "

सुरभी आत आवरायला गेली. मनु तिच्या मागे होती.

सचिन नंदाताईंकडे बघत होता. " बरं झालं आई तू परिस्थिती सांभाळली. "

" सुरभीला जपायला हवं. लग्नाला थोडे दिवस होऊ दे मग आपण तिची व्यवस्थित तपासणी करून घेऊ. माझ्या ओळखीची स्पेशलिस्ट गायनाकॉलॉजिस्ट आहे. मी आहे तुमच्या दोघांसोबत." नंदाताई बोलल्या.

सचिनला खूप चांगलं वाटलं.

सगळ्यांना भेटून सचिन सुरभी निघाले. रस्त्यात ऑफिसचे खूप फोन येत होते. महत्वाचे क्लायंट आले होते. ते घरी आले. सचिनने दुपारचं जेवण केल. " सुरभी मी ऑफिसला जातो जरा घाई आहे."

" सचिन घरी थांब ना. "

" नाही सुरभी, रात्री ही उशीर होईल. खूप सुट्ट्या झाल्या आहेत. एक दोन दिवस. हे महत्वाच काम होऊ दे. मग आपण फिरायला जावू. प्लीज नाराज होऊ नकोस. "

"मी दादा कडे जावू का?"

"लगेच काय माहेरी?"

"तू नाही मग मी काय करू? जावू दे ना. " सुरभी रीक्वेस्ट करत होती.

" ठीक आहे जा. " तो ऑफिसला निघून गेला.

सचिन ऑफिसला गेल्यानंतर सुरभीने पूजाला फोन केला ती जरा वेळ दादा वहिनी कडे गेली. रात्री ही ती तिकडेच होती.

सचिन क्लायंट सोबत डिनर साठी गेला होता. त्याला घरी यायला उशीर झाला. त्याने सुरभीला मेसेज केला. " सकाळी लवकर ये. "

सुरभी सकाळी पटकन घरी आली. सचिन रेडी होता. "तू तिकडे का थांबली? "

"सॉरी तू उशिरा येणार होता म्हणून दादाकडे राहिली."

" काही हरकत नाही सुरभी. मी घाईत आहे. तू आराम कर. लवकर ऑफिसला जायच आहे ."

याला एवढी घाई आहे तर मला का इकडे बोलवून ठेवल. सुरभी चिडली होती.

मोठी मीटिंग होती. नाश्ता करतांना ही त्याच लक्ष नव्हतं. फोन सुरु होता. निघतांना ही घाई झाली. सुरभी फक्त त्याच्या कडे बघत राहिली. ती रूम मधे येवून बसली. थोडी रूम आवरली. लग्नाचे फोटो मोबाईल मधे पाठवले होते ते ती बघत बसली.

आज सकाळ पासून ढग भरून आले होते. वेगळच वातावरण होत. सुरभी खूप खुश होती तिला पाऊस खूप आवडत होता. तिला सचिनची आठवण येत होती. काय करू मेसेज करून बघू का? नको तो किती घाईत ऑफिसला गेला. बिझी असेल.

सुरभी तयार झाली. आज तिने मुद्दाम साडी नेसली होती. बहुतेक सचिन मीटिंग झाली की येईल. तीला खात्री होती. ती तिची तिची लाजली. त्याच्या जवळ जायची तिला ही ओढ लागली होती. विशेष तयारी न करता ही ती खूप सुंदर दिसत होती. तिने आरश्यात स्वतःला बघितल. ती खुश होती.

बाहेर बारीक पाऊस बरसत होता . अरे मला कस समजल नाही. ती बाल्कनीत उभी होती. स्विमिंग पूल मधे पडणारा पाऊस छान दिसत होता. आता ती आत येवून बसली. तीचे आवडते गाणे लावले. सचिन मला ऑफिस मधे येवू देत नाही. तो घरी थांबत नाही. घरी बोर होत.

पाऊस आणि नवरा यांच गणित का जमत नाही? रोमॅन्टिक वातावरण असल की ऑफिस मधे जास्त काम का असत. ती विचार करत होती. ती तिची तिची हसली.

आज सचिनची आठवण येते आहे. किती रोमँटिक वातावरण आहे. तो का बिझी आहे? तिने मोबाईल मधे बघितल. तो ऑनलाईन नव्हता. सहाजिकच आहे. मोठी मीटिंग आहे.

" झाली का मीटिंग?" तिने उगीच मेसेज केला. बाहेर बघत ती बराच वेळ बसली होती.

"मॅडम जेवुन घ्या." मावशी आल्या.

बापरे किती वेळ झाला. "घेते मी थोड्या वेळाने."

सचिनने तिचा मेसेज बघितला होता. उत्तर दिलं नव्हतं. ते नेहमीच होत. तिने परत हातातलं पुस्तक वाचायला घेतल. आज तीच मन लागत नव्हत.

काय हव आहे मला? का अस होत आहे. मी मनमोकळ का बोलत नाही सचिन सोबत. की मला तू हवा आहेस. नाही अस कस बोलणार. तिला लाज वाटली. अस आहे इतर वेळी सचिन जवळ असतो तर मी लांब थांबते. आज तो ऑफिस मधे आहे तर मी त्याची वाट बघत आहे. ती लाजली.

बाहेर जोरात पाऊस सुरू झाला. ती पटकन बाल्कनीत गेली. पाण्याचे तुषार अंगावर येत होते. तीने डोळे बंद केले. ती पाऊस अनुभवत होती. हलके पाणी अंगावर उडत होत. तिच्या अंगावर काटा आला होता. किती सुंदर वातावरण आहे. ती गाण गुणगुणत होती. मागून कोणी तरी तिला मिठी मारली. तिच्या कानाजवळ त्याने ओठ टेकवले. तिने आश्चर्य चकित होवुन बघितल. हात ओळखले. ती खूप खुश होती.


🎭 Series Post

View all