

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 25
©️®️शिल्पा सुतार
सुरभी घरी आली. सौरभ, पूजा टीव्ही बघत बसलेले होते.
" येवून गेले का तुमच्या घरचे? तुझ्या सासुबाई नणंद?" पूजा विचारत होती.
" पूजा काहीही काय बोलतेस?" सौरभ बोलला.
"सचिन साहेबांना लग्ना साठी हो बोलली असेल ती आज. दिसत नाही का चेहरा. ती खूप आनंदी आहे. " पूजा बोलली. तिला सुरभी कडे बघून समजल होत. नक्की आनंदाची बातमी आहे.
सौरभ सुरभी कडे बघत होता. सुरभी पाणी पिऊन आली.
" कशी आलीस? " त्याने विचारल.
" सचिन आला होता सोडायला."
"अरे मग वरती का नाही बोलवलं त्यांना? "
" उशीर झाला होता म्हणून." सुरभी खुश वाटत होती.
"जेवण कर." पूजा बोलली.
"माझ जेवण झालं आहे." ती पूजा जवळ बसली.
तिला वेगळ छान वाटत होत. अस वाटत होत माझ ही कोणी आहे या जगात. हे नात निभावण होईल का माझ्याकडून? पण मला सचिन खुश असलेला हवा आहे. आता जे होईल ते होईल. जास्त विचार करायचा नाही. दादा वहिनीला सांगू का? नको मला लाज वाटते.
" सुरभी काय झालं? आज एकदम खुश? " पूजाने हळूच विचारल.
"वहीनी मी सचिनला हो बोलले. "
पूजा खुश होती. मला वाटलच होत. " लग्नाच पुढे काय ठरवल?"
" माहिती नाही तो दादाशी बोलणार आहे." दोघी एकमेकींना भेटल्या.
"काय सुरू आहे मला ही सांगा. " सौरभ बोलला.
"सुरभी लग्न करते आहे सचिन साहेबांशी. तिने होकार दिला." पूजाने सांगितल.
"सुरभी इकडे ये. ही आनंदाची बातमी आहे. " त्याने तिला जवळ घेतल.
"दादा माझा निर्णय बरोबर आहे ना ? तू खुश आहेस ना."
" हो सुरभी. काही प्रॉब्लेम नाही. मला तू नेहमी सुखी झालेली हवी आहे."
"आता पुढचे कार्यक्रम ठरवावे लागतील. " पूजा बोलली.
" आधी आम्ही सचिनच्या घरी पूर्ण सत्य सांगणार आहोत. ते लोक काय म्हणतात ते बघू. मग ठरवू." सुरभी बोलली.
" बरोबर आहे. म्हणजे नंतर टेंशन नको. " पूजा साखर घेवून आली. तोंड गोड करा.
" हो ना मला त्या लोकांसोबत खोट बोलतांना कसतरी वाटत. "
" पण यात तुमच्या दोघींची काही चूक नाही. तेव्हा परिस्थिती तशी निर्माण झाली होती. " सौरभला मागच आठवल.
" हो ना दादा, मला सचिनने खूप सांभाळुन घेतल. "
" खरच चांगले आहेत ते साहेब. " सौरभ बोलला.
" मी आराम करते. "
सुरभी झोपायला रूम मधे आली. सचिनचा मेसेज आलेला होता. "घरी पोहचलो."
झोपतांना सुरभी खूप खुश होती. सचिनचा विचार सुरू होता. पण त्या आधी त्याच्या घरच्यांना खर सांगाव लागेल. काय माहिती काय होईल? हे असच राहील का? की ते लोक माझा राग राग करतील. पण ते सगळे खूप चांगले आहेत . समजून घेतील अस वाटत. आई तर सासुबाई वाटत नाही. काही काम देत नाही. प्रेमाने बोलतात. ती देवा कडे प्रार्थना करत होती. नीट होऊ दे सगळ. ती झोपली.
सचिन सकाळी उठला. वेगळाच खुश होता. मला सुरभीला भेटायच आहे. काय करू तिच्या घरी जावू का? नको. काहीतरी स्पेशल करू या.
तो तयार होवुन ऑफिस मधे आला. सुरभीचा मेसेज आला होता. गुड मॉर्निंग.
ती रीप्लायची वाट बघत होती. सचिन बिझी आहे की काय?
तिकडून गुड मॉर्निंग आल.
ती पूजा सोबत बिझी होती.
सचिन केबिन मधे बसला होता. लंच टाईम झाला. त्याने सौरभला आत बोलवलं. त्याला हे अपेक्षित होत. सौरभ खुर्चीवर बसला.
"मला सुरभी बद्दल बोलायचं आहे. काल आम्ही भेटलो आणि आम्ही दोघांनी लग्न करायच ठरवल आहे." सचिनने सांगितल.
" खूप अभिनंदन साहेब. मी तुमच्या दोघांसाठी खुश आहे. काय करू या आता? पुढचे कार्यक्रम ठरवायला हवे."
"हो. सुरभी माझ्या सोबत रहात होती ही गोष्ट सगळीकडे हळू हळू पसरते आहे. राहुल सांगत असेल. आपल्याला घाई करायला हवी. आम्ही आमच्या घरी ही सांगतो आहोत. " सचिन बोलला.
"चालेल त्या नंतर जवळचा मुहूर्त काढू. " सौरभ खुश होता.
दुपारी सचिनने सुरभीला फोन केला होता." काय करते आहेस सुरभी?"
" मी वहिनीला घर आवरायला मदत करते आहे. "
" आज भेटायला येशील का? " सचिन खुश होता.
" कुठे जायच?"
"मी सांगणार नाही सरप्राईज आहे. "
"हो येते. " सुरभी ही खुश होती.
"संध्याकाळी रेडी रहा."
" कोणता ड्रेस घालू? सांग ना कुठे जायच आहे? म्हणजे त्या नुसार तयार होता येईल." सुरभी खूप प्रश्न विचारत होती.
"कोणताही ड्रेस घाल तू नेहमीच खूप सुंदर दिसतेस. " सचिन बिनधास्त बोलला. आता ही माझी आहे. मी तिची तारीफ करू शकतो.
"जा बाबा अस काय? नीट सांग. " सुरभी मुद्दाम चिडली होती.
" साडी नेस."
"साडी नको. मी ड्रेस घालते. "
"अस आहे. तुला तुझ्या मनाप्रमाणे करायच तर मला का विचारते. मी आधीच बोललो होतो कोणताही ड्रेस घाल. " सचिन हसत बोलला.
सुरभी तयारी करत होती. तिने सुंदर गुलाबी अनारकली घातला होता.
" वाह सुरभी तुला हा रंग अगदी छान दिसतो. वेणी काय घातली आहे. सोड ती. छान केस मोकळे सोड. " पूजा आत येत बोलली.
" नको वहिनी. राहू दे ना. "
पूजाने तिचे केस मोकळे सोडले. छान विंचरून दिले. कानात झुमके, हातात बांगड्या, लाइट लिपस्टिक. वाह मस्त झाली तयारी.
"सुरभी जा आता."
"वहिनी अति वाटतय. कमी कर. "
"असु दे. सचिन साहेबांना आवडेल. "
सचिन ही तयार होता. व्हाइट टी शर्ट ब्लू जीन्स मधे तो नेहमीप्रमाणे रुबाबदार दिसत होता.
सुरभीचा फोन वाजत होता.
"जा सुरभी सचिन साहेब आले."
"वहिनी अग थोडी तयारी कमी करते का?" ती अजूनही आरश्यात बघत होती.
"नाही असू दे. चल मी येते खाल पर्यंत. नाहीतर तू लिफ्ट मधे कानातले काढून ठेवायची." दोघी खाली आल्या. सचिन कार जवळ मोबाईल मधे बघत उभा होता. आज ड्रायवर सोबत नव्हता. दोघींचा आवाज ऐकुन त्याने समोर बघितल. तो सुरभी कडे बघत होता. सुरभी एकदम गडबडली. पूजा सोबत होती.
" हॅलो वहिनी. "
" सुरभी कशी दिसते आहे. "
तो हसला." खूप सुंदर. "
" मी तिला तयार केल."
" थँक्स. "
" निघा तुम्ही. लवकर या. एन्जॉय."
हो.
सचिनने कारच दार उघडल. सुरभी आत बसली. पूजा गेली. सचिनने कार सुरू केली. तो तिच्या कडे सारख बघत होता. तिने त्याच्या कडे बघितल. "काय झाल? जास्त झाली ना तयारी? वहिनी अजिबात ऐकत नव्हती."
"छान दिसते आहेस. तुला दागिने शोभतात . "
"काहीही. खूप जास्त घातलं आहे हे." कानातले, बांगड्या ती काढत होती.
"राहू दे सुरभी."
"आपण कुठे जातो आहोत? तिथे जर ही तयारी सूट नाही झाली तर?"
"काही हरकत नाही. अस काही होणार नाही. "
ते एका रिसॉर्ट वर आले. गेट पासून हिरवळ होती. सुंदर झाडे होते.
" वाह किती सुंदर जागा आहे."
ते आत गेले एका प्रायव्हेट जागेत त्यांच बूकिंग होत.
" हे इथे किती छान वाटत आहे. फक्त आपण दोघ. बाहेर हॉटेल मधे सगळ्यांमधे खूप बोर होत. बोलता येत नाही. " सुरभी नकळत बोलली.
सचिन हसत होता. " हो की. किती छान फक्त आपण दोघ. मला माहिती होत तुला अस छान निसर्गाच्या सान्निध्यात आवडत."
" म्हणजे तस नाही. " ती गडबडून बोलली.
" ठिक आहे सुरभी. तुला माझ्या जवळ आवडत हे माहिती आहे मला. रीलॅक्स. " ते बागेत येवून बसले. सुरभी फुलां जवळ सेल्फी घेत होती.
" मी काढु का तुझे फोटो?"
" हो पण फोटोत फुल यायला हवे. नाहीतर मागच्या वेळी तू फक्त माझे फोटो घेतले होते. " सुरभी झाडा जवळ जावून उभी राहिली.
" आता मला तुझ्या शिवाय दुसर काही दिसत नाही तर मी काय करणार." दोघ टेबल खुर्ची जवळ येवून बसले.
"ह सांग ना. आपण का आलो इथे? "
" सहज एकमेकांसोबत वेळ घालवायला. तू काल हो बोललीस. लगेच घरी निघून गेलीस. मला आज अजिबात करमत नव्हत."
वेटर आला. तो सचिनशी बोलला. तो वापस गेला. सरबत घेवून आला.
" सुरभी आज तू खूप खूप छान दिसते आहेस. तुझे बांगड्या, कानातले किती छान. ड्रेस किती छान. "
" सचिन पुरे ना नको अस बोलू. "
" अरे काय अस? मला मनातल्या गोष्टी तर बोलू दे. मला हे सगळं खूप एन्जॉय करायच आहे. तुझ्यावर खूप प्रेम करायच आहे."
"सचिन प्लीज . " ती लाजली.
" तू लाजली की खूप छान दिसतेस."
केक आला. सुरभी बघत राहिली.
" केक का? कोणाचा बर्थडे आहे. ओह सॉरी तुझा वाढदिवस आहे का सचिन?"
"नाही हा केक आपल्या साठी आहे. आपल लग्न जमलं म्हणून. "
"आपण एकमेकांना वाढदिवसाची तारीख विचारली नाही ."
हो ना.
तो तिच्या जवळ आला. तिच्या जवळ खाली बसला. सुरभी पटकन मागे झाली. " सचिन उठ. खाली नको बसू."
त्याने खिशातून अंगठी काढली. सुरभी समोर धरली. तीला धक्का बसला. ती छान हसली.
" सुरभी तू काल मला होकार दिला. तरी आज परत एकदा विचारतो माझ्याशी लग्न करशील का? "
सुरभी हो म्हटली. तिने हात पुढे केला. त्याने हातात अंगठी घातली. सुरभी त्याच्या मिठीत शिरली. दोघ अगदी शांत पणे एकमेकांच सानिध्यात होते.
"सचिन हे खर आहे ना?"
"हो हे खर आहे. आपण सोबत आहोत आणि यापुढे खूप प्रेमाने राहणार आहोत. "
प्रॉमीस.
हो प्रॉमीस.
त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. " ये इकडे आपण केक कापू." एक मुलगा आला. त्या दोघांचे छान फोटो काढले. दोघांनी मिळून केक कापला. एकमेकांना भरवला.
" जेवायला काय घेवू या? तू सांग." दोघांनी मिळून जेवण मागवल. सुरभी खुश होती.
"लग्नाची तारीख कोणती काढायची?" सचिनने तिच्या कडे बघत विचारल.
ती लाजली." मला माहिती नाही. "
"अरे अस कस चालेल. काहीतरी तर सांग. इतके दिवस आरामात होतीस माझ्या सोबत. आता का दूर राहतेस. " तो मुद्दाम तिला चिडवत होता.
सुरभीने त्याला नॅपकीन फेकून मारला.
"सुरभी तुला आठवत? मी नाही म्हणायचो तरी तू माझ्या जवळ येवून रहायची."
"हो आठवत आहे. " ती हसत होती.
" या पुढे माझ्या जवळ यायला अस अधीर रहायचं. अजिबात हो नाही करायच नाही. "
हा सचिन खूप रोमँटिक आहे वाटत. " सचिन मी जाईल ह इथून. अस बोलू नकोस."
"बर दुसर बोलू. तुला लग्नासाठी काय काय घ्यायचं. लिस्ट तयार कर. खरेदी करून घेवू."
"काही नको. "
" एवढी साधी आहेस का तू. किती चांगली. " तो हसत होता. " मला तर खूप खरेदी करायची आहे. तुझ्या साड्यांना मॅचिंग कुर्ता सेट घ्यायचे आहेत. "
तो त्याची लिस्ट सांगत होता. किती उत्साही आहे हा. माझ जरी दुसर लग्न असल तरी याच पहिल लग्न आहे. तो एन्जॉय करतो आहे. आपण त्याला निराश करायच नाही.
" अजून काय घ्यायच. असे कानातले, भरपूर बांगड्या घे. साड्या घे. आपण फिरायला कुठे जावू या. हनीमून साठी?"
एवढय़ा वेळ उत्साहात असलेली सुरभी आता थोडी गप्प झाली होती. भीती अशी नव्हती. पण पूर्वीच्या काही गोष्टी मनात होत्या. याने मला थोडा वेळ दिला असता तर बर झाल असत. सोडून द्यायच. सचिन सोबत आनंदाने रहायच. मी का आधीच्या गोष्टीचा विचार करत बसते. उलट सचिन सोबत जेवढ जास्त रमू तेवढ बाकीच्या गोष्टी विसरलाय बर पडेल. मी सचिनची साथ देईल.
"मी दोन चार ठिकाण बघतो. तू एक निवड. आपण बूकिंग करून घेवू."
ती हिम्मत करून हो बोलली.
"अंगठी आवडली का? "
आता सुरभी अंगठी नीट बघत होती. "किती छान आहे. कधी घेतली?"
"आज. "
"खूप आवडली. "
"अजून काय काय घ्यायच?"
"आईंनी आधीच दागिने दिले."
"माझ्या पसंतीने घे. "
हो.
जेवण आल. आज दोघ खूप खुश होते." सुरभी आपण लवकर लग्न करू."
"घरी कधी सांगायच?"
" हे करायला हव का?" सचिनने विचारल.
"हो माझ्यासाठी महत्वाच आहे. मला अस वाटत आपल्या नात्याची सुरुवात खर सांगून व्हावी. "
" ठीक आहे उद्या सांगतो घरी. पण फक्त आई बाबांना सांगायच. "
" हो चालेल. तू बोलला की मी पण त्यांच्याशी बोलेल."
"आता नको ना तो विषय. मला घाबरायला होत."सचिनने पाणी पिलं.
सुरभी हसत होती.
जेवण झाल. दोघ थोड्या वेळ बोलत बसले." निघू या का? उशीर झाला. दादा वहिनी वाट बघत असतिल."
" घरी चल उद्या जा तिकडे. "
" नको लग्न झाल्यावर येईल. "
" आधी तर सोबत रहात होतो ना. तेव्हा माझ्या मागे मागे करत होतीस. आता मला तुझ्या शिवाय अजिबात करमत नाही. घर रिकाम वाटत. " सचिन बोलला.
" थोडे दिवस. तू चल दादा कडे रहा."
"नको."
सौरभच घर आल. " मी निघू? "
सचिनने तिचा हात हातात घेतला." नको जावू. "
" अरे अस कस चालेल. आपण उद्या परत भेटू. "
" ठीक आहे जा. "
" घरी गेलास की मला फोन कर. "
" हो. तू आधी बिल्डींग मधे जा. मग मी निघतो. "
सुरभी आत गेली. सचिन निघाला.
.....