नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 23

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच
नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 23

©️®️शिल्पा सुतार

सुरभी कार मध्ये बसली होती. ती रडत होती. सचिन तिच्या जवळ येवून बसला. राहुल जे बोलला त्याने त्याला ही शॉक बसला होता. बायकोला किती कमी समजायच. कसे घाणेरडे विचार आहेत त्या राहुलचे. कसे खराब लोक आहेत. आज अस तर नेहमी किती वाईट वागत असेल तो सुरभी सोबत.

"सुरभी का रडतेस. त्या मूर्ख माणसाला इतक महत्व द्यायची गरज नाही. त्याच्या साठी तू रडू नकोस." सचिन बोलला.

"त्याच्या साठी नाही रडत. एकंदरीत परिस्थितीचा मला त्रास होतो आहे . हे अस बोलल की मला आवडत नाही. आपला काय दोष आहे यात ? तू मला किती आधार दिला सचिन. नाहीतर माझ काय झालं असत. तू व्यवस्थित वागतो. ते ही लोकांना सहन होत नाही. किती घाण आरोप करतो तो राहुल आपल्यावर. तो अस का बोलत होता?" सुरभी अगदी मनापासून बोलत होती.

" आपल्या दोघांना माहिती आहे ना आपल काय नात आहे ते आणि आपण कस रहातो. सोड बाकीच्या लोकांच. काळजी करू नकोस. मूर्ख लोक असे बोलतात. त्यांना प्रेम आपुलकी समजत नाही."

"तो आपल्या बद्दल सगळीकडे सांगेल." सुरभी काळजी करत होती.

"सांगू दे. तो जळकुटा आहे. तुझ चांगल होत ते त्याला बघवत नाही. त्याला वाटल तू त्याचे पाय पकडशील घरात घ्या म्हणून रीक्वेस्ट करशील. पण अस काही झाल नाही उलट तू वरचढ आहेस हे त्याला सहन झाल नाही. म्हणून अस टोचून बोलतो तो त्याचा इगो हर्ट झाला. "

"सचिन तू चांगला आहेस. माझ्या मुळे तुला ही बोलणी ऐकावी लागतात. "

" मला काही फरक पडत नाही. ज्याला जे बोलायचं ते बोलू दे. त्रास करून घ्यायचा नाही. लोक तर नेहमी बोलतात. आपल्याला हव ते करायच. घे पाणी पी. चला सौरभ." सौरभ आत येवून बसला.

शिंदे साहेब बाजूला उभे होते. " एक मिनिट सचिन साहेब."

" सुरभी मी येतो. काका कार लॉक करा. खाली उतरायचं नाही. "

तो शिंदे साहेबांकडे आला." मी बोलतो तुमच्याही नंतर आता सुरभीचा मूड ठीक नाही. ते लोक आहेत आजुबाजूला. तिला त्रास देतील. "

" हो साहेब लग्नाचे पेपर तयार आहेत लगेच सही घेत आहे का मॅडमची? " शिंदे साहेब पेपर दाखवत होते.

" नको सुरभीचा मूड नाही. मला ही तिच्या मनाप्रमाणे व्हायला हव. बळजबरीने नाही. तरी देऊन ठेवा माझ्याकडे पेपर. मी बघतो." सचिनने पेपर घेतले. तो कार मध्ये येऊन बसला. तो विचार करत होता सुरभी करेल का माझ्याशी लग्न? हो बहुतेक.

सुरभी अजूनही रडत होती. सौरभ सचिन कडे बघत होता. मी बोलतो त्याने डोळ्याने सांगितल.

" पुरे झाल ना आता काय सुरभी अशा लोकांसाठी कशाला रडतेस. काळजी करू नको. तब्येत खराब होईल. डोळे पुस. तू चहा घेते का चल आपण छान हॉटेल मधे जावू. "सचिन बोलला.

" हो ना सुरभी पाच मिनिट ही वाईट वाटुन घेवू नकोस किती फालतू आहे तो राहुल. सुटली तू आता मस्त रहा." सौरभ बोलला.

ती तिच्या विचारात होती. अशी बदनामी नाही आवडत मला. घर आल्यानंतर ती आत निघून गेली. तिने दार लावून घेतलं. ती रडत होती.

" सुरभी दार उघड. " सचिन दार वाजवत होता.

तिने दार उघडलं नाही. त्याने फोन केला. तिने उचलला नाही.

"सुरभी दार उघड नाही तर मी दार तोडेल." सचिन ओरडला. सौरभ ही सोबत होता.

आजी बाहेर आल्या. "काय झालं सचिन?" त्या घाबरल्या होत्या.

"काही नाही आजी. तू शांत हो बस बर. "

सुरभीने आतून ऐकल आजी आवाज देत होत्या. तिने दार उघडलं

" काय झालं बेटा? का नाराज आहेस तू?" आजींनी आत येत विचारला." बाई बाई किती त्रास करून घेतला आहे. का रडतेस?"

"काही नाही आजी."

"कोणी काही बोललं का तुला? काय रे सचिन. "

" नाही आजी. ते चांगले आहेत. " सुरभी बोलली.

"आजी पाच मिनिट मी सुरभी सोबत बोलतो. सौरभ तू आजींना ने."

हो.

सचिन आता आला. तो तिच्याजवळ उभा होता. तिला रुमाल दिला." डोळे पुस थोड स्ट्रॉंग हो. "

ती शांत होत नव्हती.

"सुरभी काय हव आहे तुला? का त्रास करून घेते आहेस? चल तुला बोलायच का त्या राहुल सोबत. भांडण करायच का? मी नेतो. तुला वाटत ते करू. पोलिस बोलवायचे का. त्याला मारायची का?"

नाही.

" मग काय हव आहे? अश्या प्रकारे रडायच म्हणजे काय? तो राहुल चांगल असता तर ठीक होत. शांत हो बघ आजी ही घाबरली ना." सचिन समजावत होता.

"मी या पुढे अस करणार नाही. मला माझ माझ वाईट वाटत आहे. त्या राहुल साठी नाही." सुरभी हळूच बोलली.

"चल इकडे ये." तिला एकदम भरून आल. तीने एकदम त्याला मिठी मारली. त्याने तिला जवळ घेतल. तिला आता बर वाटत होत. ती अगदी शांत झाली.

"चल बाहेर सौरभ, आजी काळजी करत असतिल."

ती बाथरूम मधे जावुन फ्रेश झाली बाहेर आली. बाहेर येवून सगळ्यांचा चहा ठेवला. ती शांत पणे चहा घेत होती. सौरभ, सचिन बोलत होते. आजी तिच्यावर लक्ष देवून होत्या. काय झालं हिला नेमक त्या अंदाज लावत होत्या.

सचिन सौरभ ऑफिस साठी निघाले.

" मी लवकर येतो थोडा आराम कर." सचिन तिच्या कडे बघत बोलला.

हो.

"सुरभी मी ऑफिस हून घरी जाईल. "सौरभ सांगत होता.

" दादा तुझ्या इंटरव्यूच काय झाल?" तिला आठवल काल इंटरव्यू झाला होता.

" झाल काम. आज पासून जॉइन होणार आहे."

" काय? वाह. आधी का नाही सांगितल." तिला आनंद झाला. " सचिन थँक्यु."

तिघे हसत होते. सचिन बॅग घेत होता तो आजींशी बोलत होता.

"दादा मी येवू का घरी. " तिने हळूच विचारल.

"आजी आहेत ना." सौरभ बोलला.

"मी विचारू का सचिनला?"

"सुरभी कुठे ही जायच नाही. आराम कर." सचिन मागून आला.

"सचिन प्लीज. "

नाही.

" आजी मी येतो. सुरभी कडे बघ."

" हो. लवकर ये. "

सुरभी दुपारी झोपली होती.

सचिनने आजींना फोन केला. "ती झोपली आहे मी आहे तिच्या जवळ. "

" आजी तू पण आराम कर."

" काय झालं रे सुरभीला. " आजी काळजीत होत्या.

" सांगेल नंतर. ती खूप दुखावली गेली आहे. तिला त्रास होतो आहे. "

" का पण? तिला नोकरी नाही मिळाली म्हणून रडते का?"

हो.... आता काय सांगणार आजीला.

"सचिन तिला आपल्या ऑफिस मधे काम दे. ती रडते तर मला आवडत नाही. "

"हो थोड्या दिवसानी देतो. आता थोड आरामात राहू देवू तिला. "

सचिन आज लवकर आला. सुरभी अजून आत बसुन होती. आजी तिच्याशी बोलत होत्या. सचिन आल्याने त्या उठल्या." बस आजी. "

" मी देवाला दिवा लावते. तुम्ही बसा बोलत. "

तो फ्रेश होऊन आला. "सुरभी ऑल ओके?"

हो.

"चल मग बाहेर बस. "

"हो येते. सचिन मी थोडे दिवस दादा कडे जाते."

"थांब अजून."

"का पण? आता आजी जाणार एक दोन दिवसात. मी काय करू इथे?" सुरभी उगीच चिडली.

"मी नाही का? माझ्या साठी नाही थांबव वाटत का?"

सुरभी लाजली. "सचिन आपण अस नाही राहू शकत. "

"म्हणून म्हणतो ना की माझ्याशी लग्न कर ."

ती शांत होती. बाहेर जात होती. त्याने जावू दिल नाही." सुरभी मी काय म्हणतो आहे. "

आज जरी ती त्या राहुलला फाडफाड बोलली तरी ती मनातन पूर्ण हलली होती. तिला त्रास होत होता. ते दिसत होत. थोडे दिवस ती कोणताही निर्णय घेवू शकत नव्हती. पूर्णपणे तुटून गेली होती.

" सचिन मला थोडा वेळ दे ना. सध्या मला काही सुचत नाही. "

" काही हरकत नाही. "

" मी जावू का मग दादा कडे? थोडा बदल होईल. "

नाही.

का?

"तुझा दादा आता इकडे शिफ्ट होतोय."

"अरे वाह कुठे घर आहे?" तिला आनंद झाला.

"शोधतो आहे. सांगितल एक दोन लोकांना."

"सचिन खूप थॅन्क्स. दादा साठी माझ्या साठी तू खूप करतो. दादाला नोकरी लागली. बर वाटत आहे. "

" तू खुश रहावी. मला एवढच वाटत. " तिला त्याच्या बोलण्याने खूप छान वाटल. तिच्या चेहर्‍यावर ते स्पष्ट दिसत होत. सचिन समाधानी होता चला बर्‍या पैकी सावरली ही.

दोघ बाहेर आले. जेवण झालं. ती आता आजींशी बोलत होती. सुरभी ठीक आहे हे बघून आजी खुश होत्या.

थोड्या वेळाने ती आत आली. " सुरभी गोळ्या घे."

तिने शांततेचे ऐकल.

दुसर्‍या दिवशी ती तीच काम करत होती. चहा नाश्ता झाला. आज नंदा ताई मनु येणार होत्या. तिला आनंद झाला. मनु सोबत खूप बर वाटत. त्या थांबतील का की लगेच जातील. आजी ही जातील त्यांच्या सोबत. तिचा चेहरा उतरला. ती आजीच्या रूम मधे गेली. आजी सामान नीट ठेवत होत्या. "आजी तुम्ही नका जावू. मला करमणार नाही."

"तु येते का माझ्या सोबत? सुरभी बेटा छान खुश रहा. वाटल ते काम कर. नाराज. व्हायच नाही. रडायच नाही." आजी बोलल्या.

ती त्यांना मदत करत होती. "आजी सगळं आपल्या मनाप्रमाणे का होत नाही? "

"याला आयुष्य म्हणतात. थोड हो नाही चालतच बेटा. त्यातून शिकून पुढे जायच. आनंदी रहायच. तुला त्रास झाला की सचिनला त्रास होतो ना. काल बघितल ना. तो नीट जेवला ही नाही. "

"हो का."

"तु बघितल नाही का. तो किती काळजीत होता."

आजी बरोबर बोलत होत्या. सचिन खूप प्रेम करत होता सुरभी वर. तिला थोडा जरी त्रास झाला तरी तो घाबरून जात होता. जिच्यावर प्रेम असत तिच्यासाठी माणूस हळवा होवुन जातो.

सुरभी विचार करत होती. मी अस करणार नाही. सचिनला टेंशन येत. तो खूप चांगला आहे.

थोड्या वेळाने नंदाताई आल्या. त्यांनी खूप सामान आणल होत. मनु खूप धावपळ करत होती. वहिनी वहिनी करत सुरभीच्या मागे होती. सुरभी तिला घेवून सगळीकडे फिरत होती.

"आवरा ग मुलींनो सुरभी मनु एकमेकांसोबत अगदी लहान होवुन जातात." नंदा ताई ओरडत होत्या.

"आज ठीक आहे अग ती काल रडत होती." आजी सांगत होत्या.

"का? काय झालं?"

"तिला नोकरी मिळाली नाही म्हणून ."

" आपल्याकडे कामाची कमी आहे का. कर म्हणा जे आवडत ते. त्यात रडल्यासारख काय आहे. "

" तिचा भाऊ आला होता त्याच्या सोबत इंटरव्यूला गेली होती." आजी बोलल्या.

"कसा आहे तिचा भाऊ? " नंदा ताईंना उत्सुकता होती.

" खूप चांगला आहे. आपल्या कडे बोलवून घेवू त्याला. लग्न झालं आहे. रुबाबदार आहे. "

हो ना.

दुपारी सचिन जेवायला आला." काय म्हणतेस मनु?"

" मजेत दादा."

" अभ्यास करत जा जरा."

हो.

तो आत आवरायला जातो.

" जा सुरभी बघ त्याच्या कडे बघ . " नेहमी प्रमाणे आजी बोलल्या. सुरभी आत आली. सचिन त्याच सामान नीट ठेवत होता. " बोला मॅडम? "

" काही नाही आजींनी आत पाठवल."

" माझ्या कडे लक्ष द्यायला.. "

हो.

" बघ सगळ्यांना वाटत आपण सोबत रहायला हव. चल मला पटकन कपडे दे."

ती आश्चर्याने बघत होती." खरच का सचिन?"

"हो. जरा माझे काम करत जा. " तो हसून बोलला.

कुठे आहेत याचे कपडे. ती बघत होती.

"घेतले मी. " तो फ्रेश होवुन आला. दोघ जेवायला आले. सुरभी कामात होती. खूप मजा येत होती. जेवण झालं. थोडा वेळ आराम केला.

" आम्ही निघतो आता. अंधार होईल. सुरभी चलते का? "नंदा ताई बोलल्या.

" चल वहिनी. मजा येईल."

"नको. तुम्ही थांबा आजच्या दिवस. आजी तुम्ही नका जावू ना. मला करमणार नाही." सुरभी त्यांच्या मागे होती. त्या सामान घेत होत्या.

आजींनी सुरभी जवळ घेतल. सचिन ये इकडे. "दोघांनी मजेत रहा. सुरभी कुठल्याही गोष्टीची काळजी करत बसू नकोस. आणि येईन मी लवकर. इथे राहीन. फक्त तू लवकर आनंदाची बातमी दे. मी तुझ्याकडे लक्ष द्यायला येईल. " त्या हसत होत्या.

सुरभीला कसतरी झाल. सचिन ही गडबडला. ती त्याच्या कडे बघत होती.

"आजी आमच्या साठी ही ये. या साठी आनंदाची बातमी कश्याला हवी? आता पासून अस बोलू नकोस. " सचिन बोलला.

" अरे आता लग्न झाल तर आनंदाची बातमी मिळेलच त्यात काय लागण्यासारखं. " आजी सहज बोलल्या.

ते गेले.

सचिन घरून काम करत होता. सुरभी तिच्या रूम मधे निघून गेली. ती नाराज होती. याच्या घरच्यांच्या माझ्या कडून अपेक्षा आहेत. तिला याच गोष्टीची भीती वाटत होती.

संध्याकाळी मावशी आत आल्या." मॅडम तुम्हाला बाहेर बोलवलं चहा घ्यायला. "

सुरभी येवून बसली. दोघांनी शांततेत चहा घेतला.

ती विचार करत होती मी जावू का दादा कडे? पण हा सचिन मला जावू देणार नाही. मला याच्या सोबत राहता येणार नाही. तसा चांगला आहे तो. पण आज त्या आजी कस बोलल्या त्यांना बाळ हव आहे. जर माझ्यात प्रॉब्लेम असेल तर इथे ही सेम प्रॉब्लेम होईल. माझ्यात हिम्मत नाही आता परत तोच त्रास सहन करायची. लग्न झाल की थोड्या दिवसांनी त्यांना वाटेल की बाळ हव. मग मला सोडून जर या सचिनने दुसरीशी लग्न केल तर? नको मला पडायच नाही त्यात.

" सचिन उद्या दादा ऑफिसला येईल तर मी त्याच्या सोबत जावू का?"

"हो जा. लवकर ये दोन तीन दिवसात. मी सोडून देईन तुला. आपल्या बद्दल विचार कर. मला होकार हवा आहे."

"सचिन आपण सोबत राहू शकत नाही. मी बहुतेक परत येणार नाही."

" सुरभी शांततेत घे थोडं. काय झालं आता?"

" तुझ्या घरच्यांना अपेक्षा आहेत. सुखी संसार हवा. बाळ हव. ते कस होईल?"

" सगळ होईल लग्न झाल की. "

" तुला माहिती आहे माझा प्रॉब्लेम. "

"या जगात काहीही अशक्य नाही. सुरभी तू फक्त हो म्हण. माझ्या वर सोड. मी बघून घेईल. " सचिन हक्काने बोलला तिला बर वाटल.

दुसर्‍या दिवशी सकाळी नाश्त्या झाला." चल सुरभी तुला सौरभ कडे जायच ना? "

ती खूप खुश होती.

" मी घ्यायला आलो की लगेच यायच. मी तुझ ऐकतो ना, तू पण माझ ऐकायच. "

चालेल.

दोघ एका बिल्डिंग मधे आले. खूप छान फ्लॅट होता. दोन बेडरूम हॉल किचन. सौरभ पूजा सामान लावत होते. "या सचिन साहेब. पूजा इकडे ये. हे सचिन साहेब. "

पूजा बघत होती किती रूबाबदार आहेत हे. सुरभी आणि ती किचन मधे चहा करायला आले." सुरभी, सचिन साहेब खूप छान आहेत. हो बोलली का तू लग्नाला?"

"नाही वहिनी."

"का उशीर करतेस?"

"माहिती नाही. "

"अरे तुझ चांगल होईल त्यांच्या सोबत. "

" ते ठीक आहे पण माझा असा डिवोर्स झाला आहे. तेच वाटत आहे मला."

"त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर तू का एवढ टेंशन घेतेस. "

सुरभी विचार करत होती. वहिनी बरोबर बोलते आहे. होकार देवू का ? ती थोडी लाजली.


🎭 Series Post

View all