नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 21

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच
नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 21

©️®️शिल्पा सुतार

सचिन समोर बसुन काम करत होता. सुरभी तिच्या विचारात होती. मला ना या राहुलचा विचार आता सोडायला पाहिजे. उगीच त्रास होतो. ऑफिस जॉईन करायला हव. पण माझ्या ऑफिस मधे मला घेत नाही. ह्या सचिनच ऑफिस जॉईन करू का? कोणत डिपार्टमेंट मिळेल माहिती नाही. कामात मन रमवु.

"सुरभी तू तुझ्या ऑफिस मधे काय काम करत होती?" सचिनने विचारल.

"मी अकाऊंट डिपार्टमेंट मधे होती." सुरभी बोलली.

" किती वर्ष झाले नोकरी करते आहेस?"

"तीन वर्ष झाले."

"पगार किती होता? "

"पंचवीस हजार."

"काही बँक बॅलन्स?"

"नाही ना. सगळे पैसे घरी द्यायची. बघ ना सचिन या लोकांसाठी मी इतक केल. त्यांना माझी अजिबात काळजी नाही. त्यांना माहिती आहे माझ्याकडे पैसे नाहीत. मी पुढे कस करेल काही वाटत नाही का? इतके वर्ष सोबत होतो ना आम्ही. मला ना अस आठवल ना की खूप त्रास होतो. " सुरभीच आता हल्ली अस होत होतं. कोणताही विषय डिवोर्स वर येवुन थांबायचा.

" सुरभी चीडायच नाही. मी उगीच विचारल. तुझ्या साठी ऑफिस मधे जागा तयार करत होतो. "

" सचिन मी कधी पासून ऑफिस जॉईन करू शकते? "

" तुला हव तेव्हा पासून ये. "

" मी नीट काम करेल. इंटरव्यू असेल का?"

" सांगतो मी. मला माहिती आहे तू हुशार आहेस. असच पुढे जायच. जास्त त्रास करून घ्यायचा नाही." सचिन बोलला.

करणार तरी काय जगण्यासाठी काही तरी कराव लागेल. आता हल्ली अजिबात करमत नाही. इतकी हतबल मी कधीच झाले नाही. आई बाबा का गेले तुम्ही इतक्या लवकर. मला किती गरज आहे तुमची. तिच्या मनातले विचार थांबत नव्हते. ती तिकडे तोंड करून झोपली. हळू हळू रडत होती. तिला तीच पुढे काय होईल याची खूप काळजी वाटत होती?

सचिन या बाजूने आला. त्याला वाटलच होत सुरभी रडत असेल. " काय सुरू आहे हे सुरभी? का रडतेस?"

" काही नाही. मला ना आता हल्ली खूप एकट एकट वाटत कोणाचा आधार नाही. हे राहुल प्रकरण नको नको झाल आहे." सुरभी उठून बसली.

"इथे अस तर कोर्टात कस होईल तुझ? तिथे तर ते लोक समोर दिसतील. धीर धर जरा. डोळे पुस."

"सचिन माझ्याकडून हे होणार नाही. मला नाही जायच कोर्टात."

"अस कस चालेल मी आहे ना सोबत. सौरभ येईल. हे बघ ज्या गोष्टीचा त्रास होतो ना त्यापासून बाजूला झाल पाहिजे. एक दोन तासाची गोष्ट आहे. प्रॅक्टिकल हो. सही कर मोकळी हो. खूप छान आयुष्य पुढे वाट बघत आहे. "

" सचिन माझा काही दोष नसतांना या लोकांनी मला घराबाहेर काढल. आता स्वतः आरामात आहेत. त्या लोकांना अस सहज सोडायला नाही पाहिजे. " ती चिडली होती.

"भांडत बसुन काय होणार आहे सुरभी?"

" तुला नाही समजणार ते सचिन. मला ना खूप राग येतो आहे. "

"समजत आहे मला पण काय करणार आपण? यातून फक्त त्रास होईल. नको करू अस. शांत पणे बाजूला हो. उगीच आपला मानसिक त्रास." सचिन तिला समजावत होता.

" या राहुल मुळे माझे इतके वर्ष गेले."

" नशीब लवकर समजल. अजून पूर्ण आयुष्य आहे तुझ्या पुढे सुरभी. "

"सचिन तू इतक पॉझिटिव्ह कस राहू शकतो?"

"त्रास देणार्‍या लोकांना महत्व द्यायच नाही सुरभी. आपण आनंदी रहाण हेच आपल्या हातात आहे. एक सांग, तुला काय वाटत काय करायला हव जो आपल्या वर प्रेम करतो त्याच्या सोबत रहायला पाहिजे की ज्याना आपण नको आहोत त्यांना आठवून त्रास करत रहायचं?"

"खुश रहायला हव." सुरभी हळूच बोलली.

"बरोबर. सुरभी माझ्या सोबत रहा. आपण लग्न करू. नवीन आयुष्याला सुरुवात करू. आय लव यू. " सचिन तिच्या कडे बघत बोलला.

सुरभी गडबडली. सचिन पासून दूर सरकून बसली. "अस नको ना बोलू सचिन. मला जमणार नाही. तुला वाटत इतक हे इजी आहे का?"

" हो. मला तु आवडते मला तुझ्याशी लग्न करायच आहे आणि तुला ही मी आवडतो अस मला वाटत. अगदी सिम्पल आहे. आपण दोघ तयार आहोत. आपल्याला लग्न करायच आहे बाकीच्या लोकांशी आपल्याला काय घेणं आहे. " सचिनच बरोबर होत.

"मला नाही आवडत तू. " ती हिम्मत करून बोलली.

" तु खोट बोलते आहेस सुरभी. तुला जे आवडत ते मान्य करायच नाही. स्वतःला कायम कमी समजायचं. तुला ना काय हव तेच समजत नाही. तु आनंदी रहायच नाही अस ठरवल आहे. तुला निर्णय घेता येत नसेल ना तर माझ्यावर सोड. मी ठरवतो आपण काय करायला हवं ते . "

" सचिन नाही."

"एकदा आपल्या दोघांचा विचार कर. तू अस वागतेस मला किती त्रास होतो. सुरभी मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही. किती वेळा सांगू. काय करू मी म्हणजे तुला विश्वास बसेल. "

सुरभी काही बोलली नाही. ती विचार करत होती याच ही बरोबर आहे. उद्या दादाशी बोलते.

" लोक काय म्हणतील सचिन. मला नाव ठेवतील. म्हणतील आता डिवोर्स झाला लगेच लग्न केल. "

" हे लोक कुठे होते जेव्हा तुला त्रास होत होता. आल का कोणी विचारायला? राहुलला काय म्हणता आहेत लोक? काही नाही ना? त्याने तर एवढ्या चांगल्या बायकोला सोडल. लगेच दुसर लग्न करतो आहे. काही वेळेस झाल ही असेल गुपचुप लग्न. जास्त विचार करू नकोस. आपल्याला काय हव ते बघ. आपण छान राहू."

"तुझ्या घरचे चिडले तर."

"मी आहे ना का काळजी करतेस. मी बघून घेईल. तू फक्त हो बोल. "

" मी सांगते. "

" चालेल पण आपल्या बद्दल पाॅझीटीव्ह विचार कर. काहीही झाल तरी आपण सोबत राहणार आहोत. तू सौरभ कडे गेली तर मी पण तुझ्या सोबत येईल. " सचिन बोलला.

सुरभी थोडी हसत होती. ती बाथरूम मधे निघून गेली तोंड धुवून आली. येवून झोपली. सचिन अजूनही बिझी होता.

सकाळी आजी बाहेर फिरत होत्या. सुरभी त्यांच्या सोबत होती. ती खूप बोलत होती. सचिन उठला. आवरून झाल. सुरभी कुठे आहे? बाल्कनी तुन त्याने बघितल. सुरभी गोड दिसत होती. आजीला सांभाळत होती. दोघी वॉक घेत होत्या.

सचिन बाहेर गेला. "चल आत सुरभी. आजी चल नाश्ता करू. मला उशीर होतो आहे."

"हो आलो."

सौरभ आला. सुरभी पळत गेली. त्याला भेटली. दोघांच्या डोळ्यात पाणी होतं. "दादा कसा आहेस तू?"

"मी ठीक आहे, तू कशी आहेस. देवाचे आभार तू आधी सारखी झाली. नाहीतर तुझ्या डोळ्यात माझ्या साठी काहीच भावना नव्हत्या ते मला सहन होत नव्हत. आज किती छान वाटतय." सौरभ खुश होता.

सुरभी रडत होती.

सचिन त्या दोघां जवळ आला. "चला आत सौरभ. सुरभी रडायच नाही. शांत हो. आजी बघता आहेत."

सुरभीने डोळे पुसले. "चल दादा." ते आत आले. सचिन आजीं सोबत होता हे बघून सुरभी हळूच बोलली. "दादा मला तुझ्या सोबत घरी यायच."

"हो जावू. आधी इथल काम करू. उद्या कोर्टात जायच आहे."

"हो. हळू आजी ऐकतील."

आजी बघत होता. "आजी हा माझा भाऊ सौरभ दादा. "

त्याने नमस्कार केला. सचिन जवळ सौरभ बसला. ते दोघ बोलत होते. सुरभी नाश्ताची तयारी करत होती. आज वेगळाच उत्साह होता.

आजी त्या दोघांजवळ येवून बसली. "काय नाव तुझ ? काय करतो तू? लग्न झाल का ? घरी कोण कोण आहे? कुठे रहायला आहात." आजी खूप प्रश्न विचारत होत्या. सौरभ माहिती देत होता.

"आज सुरभी खूप खुश आहे ना. नवरा किती चांगला असला तरी माहेरची माणस आली की बायकांना खूप आनंद होतो." आजी बोलत होत्या.

"चला नाश्त्याला ." तिघ येवून बसले.

"सुरभी भावाला भेटून तुझ पोट भरलेल दिसत." आजी हसत बोलल्या.

"तस काही नाही आजी."

"मग अजून घे की पोहे."

"आजी मी पण कामा निम्मीत जाते आहे. दुपार पर्यंत येते."

" हो जाशील आधी भरपूर खा. "

ते तिघे निघाले. कार मधे मागे सुरभी सचिन बसले होते. सौरभ पुढे बसला होता. ऑफिस आल. "चल आत."

" आम्ही जातो. "

" पाच मिनिट ये सुरभी. " ती आत गेली. केबिन मधे गेले. छान आहे ऑफिस. सुरभी सोबत असल्यामुळे सचिन खुश होता. त्याने फोन केला. मॅनेजर आत आले.
" सौरभ तुम्ही एच आर मधे जा. तिथे तुमचा बायो डेटा द्या. म्हणजे पुढच काम सुरू होईल."

हो.

सौरभ गेला. सुरभी केबिन बघत होती.

"आवडल का ऑफिस? "

"हो खूप छान आहे. हे एवढे बक्षिस कोणाचे आहेत?" तिने विचारल.

"आपल्या कंपनीचे."

"तु खुप काम करतो ना. त्यामुळे मिळाले." सुरभी खुर्ची वर बसली.

"काही जुने आहेत ही बाबांची मेहनत आहे. " सचिन बोलला.

" हो बरोबर तुझे बाबा खुप छान आहेत हुशार एकदम."

" चहा घेणार का?"

" नको मी जाते ."

"काय घाई आहे. सुरभी इकडे ये. इथे बस या खुर्चीवर." सचिन तिला बोलवत होता.

" ही तुझी जागा आहे ना. बॉसची खुर्ची."

" हो तू मला लकी आहेस. म्हणून एकदा बस." सुरभी लाजली. हा मला खूप महत्व देतो. या आधी कोणी मला अस महत्व दिल नव्हत. तिला छान वाटल.

"सचिन दादाचा आता इंटरव्यू आहे का? "

" दुपार नंतर असेल. "

" मी इथे आली तर इंटरव्यू असेल का? "

" हो. "

"कोण घेईल? "

" आहेत ना लोक."

" तुझी टीम मोठी आहे का? "

हो.

"सचिन मला भीती वाटते. "

" हुशार आहेस की करशील बरोबर आणि मी पण आहे. होईल ठीक. "

सौरभ आला. ते दोघ निघाले. कार ड्रायवर सोबत होते. डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिल. ते ऑफिस मधे आले एच आर मध्ये गेले. तिची जागा भरली होती. नवीन मुलगी कामाला आली होती.

" सुरभी हा फॉर्म भर त्याला सर्टिफिकेट जोड. जागा निघाली तर सांगतो. " तिथला मॅनेजर बोलला.

" मला गरज आहे जॉबची. काहीतरी करा ना सर. "

"हो ते ठीक आहे पण तु अचानक गायब झालीस."

" माझा एक्सीडेंट झाला होता. नाहीतर मी रेग्युलर होती तुम्ही माझे जुने रेकॉर्ड बघा. " सुरभी बोलली.

" निदान कंपनीत निरोप तर द्यायचा. "

" माझी मला शुद्ध नव्हती. काय सांगणार यांना."

"ठीक आहे तुझा हिशोब करून बँक अकाऊंट वर पैसे जमा करतो."

" ओके सर. " दोघे निघाले.

" सौरभ दादा माझा जॉब गेला. "

जावू दे थोड्या दिवसानी सचिन साहेबांच्या ऑफिस मधे जॉईन हो. काळजी नको करू तब्येत सांभाळ."

"आजी गेल्यावर मी घरी येईन. "

"तू सचिन साहेबां बद्दल काय ठरवल आहे? " सौरभने विचारल.

" दादा मी अशी माझा डिवोर्स झालेली. मला बाळ होत नाही म्हणून त्या लोकांनी अस केल. मी कस काय लग्न करणार सचिन सोबत. "

" पण दोष कोणात आहे हे समजल नव्हत. तू का स्वतः च्या अंगावर ओढून घेते."

"माझ्यात ही कमी असू शकते. "

" पण सचिन साहेबांना काही प्रॉब्लेम नाही ना. ते खूप काळजी करतात तुझी बहुतेक तुझ्या वर खूप प्रेम करतात."

" हो कॉलेज पासून. पण ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खावु नये. "

" अरे पण ऊसाची तशी इच्छा आहे. "

दोघ हसत होते.

" तरी पण मला भीती वाटते. त्यांच्या घरचे खूप चांगले आहेत. मी अस त्यांना फसवू शकत नाही. तुला काय वाटत आहे दादा? "

" यात काय? तू थोडी फसवते आहेस. तुझ चांगल व्हाव हेच मला वाटत. "

" सगळ माहिती असून इतक्या चांगल्या मुलाशी लग्न करण म्हणजे मला कसतरी वाटत आहे."

"जास्त विचार करू नकोस. तुमच्या दोघांची इच्छा असेल तर आयुष्यात पुढे जायला काही हरकत नाही. तुझ खूप चांगल होणार आहे मला माहिती आहे."

सुरभी लाजली दादा सुध्दा सचिनच्या बाजूने आहे. मला तर सचिन खूप आवडतो. ठरवु काहीतरी.

"दादा अजून एक काम होत."

काय?

"थोडे पैसे हवे होते. "

" हो. एटीएम वर घ्या गाडी देतो. "

" नाही तस नाही. हे माझे जुने दागिने आहेत हे देवून पैसे करून घेवू. आपल्याला कामा येतील."

"काय गरज आहे याची? शांत हो सुरभी माझ्याकडे पैसे आहेत. तुला हवे तर हे घे. आत्ता हजार आहेत नंतर अजून आणतो."

" नाही दादा मला नको पैसे. तिने वापस केले. " एकट जावून आणावे लागतील पैसे. दादा ऐकत नाही. या सचिनच काय करू समजत नाही. मला रहायच आहे त्याच्या सोबत. पण नको ही वाटत. मला दादा कडे जायच आहे. आजी गेल्यावर जावू. ठरवू काही तरी.

दोघ घरी आले.


🎭 Series Post

View all