नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 17

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 17

©️®️शिल्पा सुतार

सचिन ऑफिसला गेला. सुरभी बराच वेळ बेडरूम मधे बसलेली होती. सचिनचा विचार करत. माझ खूप प्रेम आहे यांच्यावर. त्यांच ही माझ्यावर आहे. पण वेगळ वाटत आहे. अस वाटत की आम्ही आता भेटलो. ही नवीन ओळख आहे.

मनु आत आली. "चल वहिनी."

"कुठे?"

"फिरायला जावू."

" नको हे ओरडतील."

"आता येवू आपण एका तासात. दादा तीन चार तासाने येईल आणि खूप चांगला आहे तो. आज तू एवढी सुंदर दिसते आहे. काही ओरडणार नाही तो." मनु हसत बोलली.

सुरभी लाजली. तिला आठवल सचिन आज तिच्याकडे खूप बघत होता. ती आरश्यात बघत होती. अस आज काय विशेष आहे माझ्यात? नुसती साडी तर नेसली आहे. सगळ्यांना मी का सुंदर दिसते आहे.

वहिनी.... मनुने परत आवाज दिला. सुरभी पटकन बाहेर गेली. त्या दोघी फिरत शेतात आल्या. "किती छान वाटत आहे."

" साडीत चालता येत ना वहिनी?" मनुने विचारल.

" हो. हे झाड किती छान आहे. हा तुझा झोका आहे का?"

" हो. तुला बसायच का वहिनी? "

हो.

तिने झोका खाली सोडला. दोघी खूप खेळत होत्या.

" आपण उद्या नदीवर जावु." मनु बोलली.

"पण आम्ही आज वापस जाणार आहोत. हे आले की." सुरभी बोलली.

" बाबा नाही जावू देणार. तू काळजी करू नकोस वहिनी." त्या दोघी घरी आल्या.

" मी साडी बदलून येते." सुरभी रूम कडे निघाली.

"का? राहू दे छान दिसते आहेस."

" नको. हे नाही म्हटले. "

" वहिनी तू दादाच खूप ऐकते ना." मनु तिच्या मागे आली.

" हो सचिन खूप चांगले आहेत. " सुरभी थोडी लाजली होती.

"दादा लकी आहे. एवढी गोड बायको मिळाली. तू आवर मी किचन मधे आहे."

थोडा वेळ आराम करून ती किचन मधे आली.

"आई हे का नाही आले? "

" येतील आता. "

थोड्या वेळाने तिघे आले. ऑफिस बद्दल खूप बोलत होते.

" थोड्या दिवसात होवुन हे जाईल काम. छान प्रोजेक्ट आहे. आशिष बघ तू आता." सचिन बोलत होता.

" हो दादा."

सुरभी ड्रेस वर होती. बर झालं हिने साडी बदलली. "सुरभी झाली का तयारी? आपण जेवण करून निघू."

" संध्याकाळी शेतावर पार्टी आहे उद्या जा. " नंदाताई बोलल्या.

" पार्टी म्हणजे? कोण कोण येणार आहे." सचिन दचकला.

" आपणच. बाकी कोण. मामा येईल फक्त. " नंदा ताईंनी सांगितल.

"आई मी तुला म्हटलो होतो ना कोणाला बोलवू नको. मला इतक्यात ही गडबड नको. " सचिन चिडला होता.

"मामा काय परका आहे का. येवू दे त्याला. "

"अग पण मामा मामी बाकी कडे सांगतील. अस पसरत."

" आता लग्न झालं आहे तर बातमी सगळीकडे पसरणार. त्यात काय सचिन? आता तू जे केल आहे त्याचा अभिमान बाळग. किती छान आहे तुझी बायको. अस घाबरतो का?" त्या बोलल्या.

" आई मी घाबरत नाही माझे काही कारण आहेत. सांगेन नंतर. " सचिन काळजीत होता. इथे माझ काय सुरू आहे. बाकीचे लोक समजून घेत नाही. तो आवरायला आत निघून गेला.

मनु, सुरभी खुश होत्या. " वहिनी आज जात नाही तुम्ही. तुला रहायच का इथे? इकडे ये एक आयडिया आहे. आपण सांगू तुला बर वाटत नाही. तू सकाळी झोपून रहा म्हणजे दादा तुला इथे राहू देईल. मग आपण नदीवर जावु, माझ्या कॉलेज मधे जावू."

'चालेल." सुरभी खुश होती.

" सुरभी बोलव सचिनला जेवण गार होत. " नंदाताई बोलल्या.

ती रूम मधे आली. "अहो जेवायला चला."

"सुरभी काय केल मग आज?" ती आत आल्यामुळे तो खुश होता.

"काही नाही मी आजीं सोबत होती. मला थोड दमायला होत आहे. "

" शांत रहा थोडी. त्या मनु सोबत इकडे तिकडे करू नकोस. तुला धावपळीची सवय नाही ना. म्हणून म्हणतो. " सचिन बरोबर बोलत होता. सुरभी विचार करत होती.

संध्याकाळी शेतावर खूप मजा आली. मामा मामी त्यांची मुलं खूप छान होते. सुरभी मामींसोबत रमली होती. त्या तिला माहिती विचारत होत्या. जमेल तस तिने सांगितल. त्या दोघांनाही खूप छान वाटत होतं. चांगली मुलगी मिळाली आहे. मस्त बेत होता मसाले भात, भरीत, पुऱ्या, छोले, गुलाबजाम.

सुरभी सचिन बाजूला हळू हळू बोलत होते.

"काय झाल सुरभी? काय म्हणतो आहे सचिन?" मामी विचारत होत्या.

"ते मला भरीत खावु नको म्हणता आहेत. माझा एक्सीडेंट झाला होता तर पथ्य आहे." सुरभीने सांगितल.

"कसा काय झाला?"

"मला विशेष माहिती नाही."

"म्हणजे? सचिन इकडे ये सुरभीचा कसला एक्सीडेंट झाला होता . " मामींनी विचारल. नंदाताई ही येवून उभ्या होत्या.

"मागे झाला होता. डोक्याला टाके होते. हात फ्रॅक्चर होता." सचिनने विशेष सांगितल नाही.

"बापरे काळजी घे सुरभी. छोले घे पुरी सोबत. भरीत खायच नाही." नंदा ताई बोलल्या.

तिने डोक्याला हात लावून घेतला. आता सचिन सोबत घरचे बाकीचे तिच्यावर लक्ष देवून होते. इथे सगळे काळजी घेतात.

"तू आता तिकडेच शहरात राहणार आहे का सचिन?" मामा बोलले.

"हो मामा. माझं काम तिकडे आहे ना. फॅक्टरी तिकडे आहे खूप काम पेंडींग आहेत. तुझ कस सुरू आहे?"

"चांगल चालला आहे बिझनेस. तू नसतो तर इकडे करमत नाही."

"येत जाईल मी मधून मधून. उद्या सकाळी निघतो आहे."

" आमच्याकडे कधी येणार आहे?" मामा बोलवत होता.

" पुढच्या वेळी नक्की येईन."

ते घरी आले .बराच वेळ झाला तरी सुरभी रूम मध्ये आली नाही .सचिन वाट बघत होता. तो बाहेर आला तिला शोधत होता ." आई सुरभी कुठे गेली? "

" तुझ्या रूममध्ये नाही का? "

नाही.

" थांब बघते. "

सुरभी आणि मनू झोपल्या होत्या." ही बघ इकडे आहे उठवू का तिला? "

"नको झोपू दे. पण आम्हाला सकाळी लवकर निघायचं होतं. "

आजी आतून आल्या. "तिला राहू दे इथे. मी लक्ष देईल. तिला बरं वाटत नाही. थकली ती. दगदग होईल. तू दोन दिवसांनी येऊन तिला घेऊन जा. तिची ही इथे रहायची इच्छा आहे."

" ठीक आहे. " त्याला मनापासून तिला सोडून जावसं वाटतं नव्हत. पण घरचे खूप चांगले आहेत. सुरभी व्यवस्थित राहील. त्याला काळजी नव्हती.

सकाळी लवकर उठून सचिन निघून गेला. थोड्यावेळाने मनू आणि सुरभी उठल्या. "वहिनी दादा गेला वाटत गावाला. म्हणजे तू दोन दिवस इथे आहे."

दोघी खूप खुश होत्या.

"चल प्लॅन कर आपल्याला काय काय करायचं आहे दोन दिवस. मी आवरून येते."

सुरभीने मोबाईल बघितला. सचिनचा मोठा मेसेज आलेला होता. "मी घरी जातो आहे. महत्त्वाची मीटिंग आहे. नीट रहा. मनुच ऐकु नको. ती अल्लड आहे. इकडे तिकडे करायचं नाही. उगीच कुठेही फिरायचं नाही. आई सोबत आरामात रहा. तयारी करून ठेव मी परवा येतो आहे. घरी यायचं. कोणतही कारण चालणार नाही."

ओके. तिने मेसेज पाठवून दिला. सचिनने मेसेज बघितला.

"झाली का झोप?"

" हो. कुठे आहात तुम्ही? "

"मी अर्धा तासात पोहोचेन. तुला बर वाटत ना? काल थकली होतीस तू? " सचिनने लगेच मेसेज केला.

" हो एकदम ओके आहे. तुम्ही काळजी करू नका. "

" तुझ्या शिवाय करमत नाही सुरभी. तू का तिकडे राहिली."

" मी दोन दिवसांनी येणार आहे तिकडे. " मेसेज वाचतांना सुरभी लाजली होती.

" तो पर्यंत मी एकटा काय करू? "

सुरभी हसत होती." माझा फोटो बघा. "

" अस का. नंतर बघतो तुझ्या कडे फक्त लांबून एवढ बोलतेस तू. मी जवळ आलो की लांब पळतेस. "

सुरभी लाजली होती. खर आहे मला यांच्या जवळ जावस वाटत. पण भीती ही वाटते.

" चल बाय फॅक्टरी आली. खूप काम आहे. "

" उद्या लवकर या. काळजी घ्या. बाय. "

नाश्त्यासाठी सगळेजण हजर होते. आशिष, मनु सुरभीशी खूप बोलत होते. " आशिष दादा आज आपण संध्याकाळी फिरायला जाऊ. मंदिरात नदीकाठी जाऊ. "

" चालेल खूप छान वाटतं तिकडे. मी आता ऑफिस आणि कॉलेजला जाऊन येतो."

" दोघं कसं? " सुरभीने विचारल.

" सकाळी कॉलेज असतं. दुपारी घरी येतो. जेवण करतो आणि थोडा वेळ ऑफिसला जातो. " त्याने सांगितल.

" हो आशिष दादा काम शिकतो आहे. आधी सचिन दादा पण असंच करायचं. मी पण पुढच्या वर्षापासून ऑफिसला जाणार आहे. वहिनी तू जाते का ऑफिसला?" मनुने विचारल.

" हो मी पूर्वी जात होती. मला काम येत. " अरे मी हे काय बोलली. सुरभी विचार करत होती. मी आधी ऑफिस काम केलं आहे का? मला असं वाटतं आहे मी ऑफिसला जात होती. तिला कसं तरी झालं. काही आठवत का नाही? तिने एकदम बसुन घेतल.

नंदाताई तिच्याकडे बघत होत्या. "काय झालं सुरभी? चक्कर आली का? "

" मी ठीक आहे आई."

"तयारी कर आपण डॉक्टर कडे जाणार आहोत." नंदाताई बोलल्या.

"मला काही झालं नाही. बरं वाटत आहे. नको डॉक्टर कडे मला आवडत नाही. " सुरभी बोलली.

"मी सांगितलं ना सुरभी. आटोप."

सुरभी तयारी करायला आत मध्ये आली. सचिन आणि त्याच्या आई सेमच आहेत. नुसतं त्यांनी म्हटलं तेच करायचं.

ते डॉक्टर कडे आले." मॅडम, सुरभी माझी सून आहे. तिला सारखी चक्कर येते. वीक आहे ती. "

" आत जा. मी तपासते. "

ती नर्स सोबत आत गेली.

" यांची प्रेग्नन्सी टेस्ट केली का?"

"नाही. आजकालचे मुल काही सांगत नाही. तुम्ही तपासा."

" हो मी बघते."

डॉक्टर चेक करत होत्या. सुरभीने त्यांना एक्सीडेंटच सांगितल." बरोबर आहे. आराम करायचा. एवढ लागल होत म्हणुन चक्कर येत आहेत. "

त्या दोघी बाहेर आल्या.

" सुरभी खूप वीक आहे. डोक्याला लागल्या मुळे चक्कर येते. बाकी काही नाही. मी चेक केल. टॉनिक लिहून देते. भरपूर जेवण करायच सुरभी. ताजी फळ खा. हिरव्या पालेभाज्या भरपूर खायच्या. आराम करायचा उगीच इकडे तिकडे करायच नाही. "

" डॉक्टर मला आधीच काही आठवत नाही."

"तुमची फाईल आहे का? "

"हो. पण इथे नाही घरी आहे."

" हिस्ट्री बघावी लागेल. तुम्ही पेपर घेवून या मग बघू. सध्या तरी कसलाच विचार करायचा नाही. आनंदी रहायच. "

दोघी घरी आल्या. आजी विचारत होत्या." काय म्हटल्या डॉक्टर? "

" ठीक आहे ती. एक्सीडेंट मुळे चक्कर येते. बाकी काही नाही. "

"काय ग. मी किती खुश होते. "

" आजी तिला माहिती नाही आपण काय विचार करत होतो ते. होईल ना अजून लहान आहे. "

हो.

" आराम कर सुरभी."

दुपारी जेवण झाल्यावर सुरभी मनु सोबत होती. जूने फोटो बघत होती. एक फोटो ती बराच वेळ हातात घेवून बसली होती. माझ्या घरी असा टीव्ही होता. आई बाबा मी सौरभ दादा असा फोटो होता. माझ घर कुठे आहे ती आठवत होती. अस गाव होत का? मनु खूप बोलत होती. तीच लक्ष नव्हतं.

जेवण झाल्यावर तिने आराम केला.
....

सचिनच ऑफिस मधे खुप काम सुरू होत. लंच ब्रेक नंतर त्याने शिंदे साहेबांना फोन केला.

"मीटिंग साठी निघतो आहे आता." शिंदे साहेब घाईत होते.

"सौरभ आला का?"

"तो डायरेक्ट तिकडे येणार आहे."

"तिकडे काय होत ते मला सांगा. मी वाट बघतो तुमच्या फोनची."

राहुलचे वकील भेटले ते बर्‍याच वेळ चर्चा करत होते.

"हे बघा तुम्हाला घटस्फोट घ्यायची घाई आहे. राहुलला लग्न करायच आहे. आमच्या बाजूने काही घाई नाही. तुम्ही ताणून धरल तर चालू द्या ही केस वर्षानुवर्ष. आम्हाला काही फरक पडत नाही. आणि केस साठी किती खर्च आला तरी आम्हाला फरक पडत नाही. राहुलने गुपचूप लग्न केल तर आम्ही पोलिस केस करू. तुम्हाला महागात पडेल आमच्याशी डील करण. " शिंदे साहेब बोलले.

त्या बाजूचे वकील घाबरले. "मी एका मिनिटात फोन करून येतो." ते बहुतेक राहुलशी बोलत असतिल.

" मिटवून टाका ही केस लवकरात लवकर. शक्य तोवर आपल्या बाजूने त्या सुरभीला पैसे द्यायचे नाही. " राहुल बोलला.

" बघतो मी बोलून. "

" मला पण लवकर घटस्फोट हवा आहे. ही केस जास्त चिघळायला नको. " राहुल बोलला.

ठीक आहे मी बोलतो. ते येवून बसले. शिंदे साहेब त्यांच्या कडे बघत होते.

" आमच्या बाजूने ओके आहे. पण सुरभी मॅडमला खर्च द्यायला जमणार नाही. तरच लवकर सह्या होतील. एक तर त्या मॅडम नोकरी करतात त्या स्वत चा खर्च स्वतः करू शकतात. "

" काही हरकत नाही. आपण लवकर संपवू ही केस."

"ठीक आहे. तुम्ही सुरभी मॅडमला घेवून या. मी जवळची तारीख घेतो. सह्या करून घेवू. "

" तुम्ही तारीख घ्या आम्ही येवू. "

शिंदे साहेब, सौरभ, सचिनच्या ऑफिस मधे आले. काय ठरलं ते सांगितल. सचिन खुश होता." बर झाल तुम्ही हे ठरवल. मी सुरभीला घेवून येतो. "

" तुम्ही दूर रहायच या केस पासून सचिन साहेब. "

" ठीक आहे."

" सौरभ तुम्ही तेव्हा सारख सुरभी मॅडम सोबत रहायच. त्यांना कोणाशी बोलू द्यायच नाही. त्यांना समजायला नको मॅडमला काही आठवत नाही." शिंदे वकील ठरवत होते काय करता येईल ते.

" हो चालेल. "

" एकदा सही झाली ना मग काही प्रॉब्लेम नाही. "

सौरभ विचार करत होता बोलू का मी माझ्या कामाच या सचिन साहेबांशी. नको बरोबर वाटत नाही. पण उद्या मी ऑफिसला गेलो की ते लोक मला हाकलून देतील. अस ही तो काम करत होता ती कंपनी अगदी लहान होती. हातात पगार देतात ते. काही सुविधा नाही. भविष्याची तरतूद नाही.

" सौरभ काय विचार सुरू आहे." सचिन बघत होता याला काहीतरी टेंशन आहे.

" काही नाही."

" काही प्रोब्लेम?"

" नाही साहेब."

"सौरभ तुम्ही मला सचिन बोला."

" नाही. अस कस म्हणणार."

सचिन हसत होता. "मी पण आता तुम्हाला सौरभ साहेब बोलतो."

"आम्ही कुठे साहेब." इथे नोकरी जेमतेम. तो हळूच बोलला.

"सौरभ काय झाल? काही असेल तर मला मोकळ सांगा. "

"काही नाही. मी निघतो. थोड काम आहे. "

" ठीक आहे."

शिंदे साहेब, सौरभ गेले. सचिनने फोन लावला." सौरभची चौकशी करा. काय प्रॉब्लेम आहे ते समजत नाही. त्याची नोकरी वगैरे ठीक आहे ना? कुठे राहतो सगळी माहिती हवी आहे."

"हो साहेब."

किती झाल तरी माझ्या होणार्‍या बायकोचा भाऊ आहे हा. सचिन त्याच त्याच हसत होता. सुरभीचे विचार काही मनातून जात नाही.


🎭 Series Post

View all