नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 14

तुझ माझ नात समजण्या पलीकडंच

नात्याला आपुल्या नाव नसे काही भाग 14

©️®️शिल्पा सुतार

सचिन ऑफिस मधून निघाला. त्याला खूप टेंशन आल होत. आई कशी रीलॅक्ट होईल माहिती नाही. बाबांना सांगितल की नाही माहिती नाही. मी काय करू सत्य सांगू का? शिंदे साहेब नाही म्हणता आहेत. त्यांच ही बरोबर आहे. सुरभीला या लोकांनी घराबाहेर काढल तर. माझ लग्न त्या निधी सोबत बळजबरीने जुळवल तर. नाही अस नको व्हायला. घरचे तसे चांगले आहेत. पण सुरभीच आधीच लग्न झाल आहे हे त्यांना सहन होणार नाही. ते त्यांच्या मुलाला अस करू देणार नाही.

त्याने रोहितला फोन केला. " हॅलो रोहित जरा गडबड झाली. आई घरी अचानक आली आहे. तिला सुरभी बद्दल समजल. काय करू?"

"काय समजलं?" रोहितने विचारल.

" हेच कि ती माझी बायको आहे. "

"अजून इतर तर समजलं नाही ना? सुरभीच आधी लग्न झालेलं आहे. एक्सीडेंट वगैरे. " रोहित विचारत होता.

"नाही मी तोच विचार करत होतो की काय करावं? आईला सांगू का सगळं?"

" अजूनतरी नको सांगू. अजिबात असं करू नको. तुला राहायचं आहे ना सुरभी सोबत?"

"हो मग. "

" त्यांना जर समजलं सुरभीच लग्न झालं आहे आणि तिचा अजून घटस्फोट झाला नाही. तर ते काहीही करु शकता. तुझं लग्न होणार नाही तिच्याबरोबर. ते शक्य होईल तो पर्यंत तुम्हाला वेगळ करतील. तुझ्या बाबांच्या वरपर्यंत ओळखी आहेत. चालेल का तुला असं? " रोहित सत्य परिस्थिती सांगत होता.

"अजिबात चालणार नाही. मला भीती वाटते आहे. मला सुरभी हवी. करा ना काहीतरी पटकन. त्या राहुलची केस काही इतकी काॅप्लीकेटेड का आहे?" सचिन टेंशन मधे होता.

"सचिन ही थोड्या दिवसाची गोष्ट आहे. सत्य सांगू नको. सुरभी तुझी बायको आहे असं सांग. त्या नंतर खरोखर तुमच लग्न झालं की काही प्रॉब्लेम नाही. तू काळजी करू नको. मी बोलतो त्याच्या वकीला सोबत. लवकरच तुमची मीटिंग करून देतो. थोडे पैसे फेकावे लागतील." रोहित काहीतरी प्लॅन सांगत होता. अस करु.

"चालेल माझी काही हरकत नाही. मी आता घरी काही सांगत नाही सुरभी बद्दल. शिंदे वकीलही तेच म्हणत होते." सचिन बोलला.

" जे जस चाललं आहे तसं चालू दे. काही जास्त सांगू नको. तस सुरभीच्या बाजूने काही प्रॉब्लेम नाही. आपण एका बाजूला ही केस सोडवण्याचा प्रयत्न करू."

"रोहित मला ना खूप कसतरी वाटत आहे. माझे आई बाबा खुप चांगले आहेत. सुरभीला या बाबतीत काही माहिती नाही. मीच मधे अडकलो. प्रेम करण म्हणजे गुन्हा आहे का. किती ती अस्थिरता. "सचिन बोलला.

" होईल ठीक काळजी करू नकोस सचिन. चल मी फोन ठेवतो थोड काम आहे. "

सचिन घरी आला. घरात काय वातावरण असेल याची कल्पना नव्हती. पण आई खूप चिडणार आहे एवढं नक्की होत. पुढच्या खोलीत मालू काकू बसलेल्या होत्या. आशिष फोनवर बोलत होता. तो मालु काकूंकडे बघत होता." काकू काय आहे हे? तुम्ही माझ्याशी बोलायला हव होत. हे अश्या पद्धतीने आईला सांगण गरजेच होत का? किती गडबड झाली आहे ही. चक्कर आली ना आईला."

त्या ओशाळल्या. "साहेब ते......"

सचिनने त्यांना पुढे बोलू दिल नाही. काही माहिती नाही तर कशाला बोलतात ह्या. उगीच सगळी गडबड करून ठेवली. तो रागात होता. "आशिष आई कुठे आहे? "

मालू काकूंनी समोर बोट दाखवलं.

तो आत गेला. नंदाताई कॉटवर झोपलेल्या होत्या. त्यांच्या बाजूला सुरभी बसलेली होती. सचिनला बघून सुरभी उठून उभी राहिली. नंदाताई ही सचिन कडे बघत होत्या.

" अहो, या काकू तुम्हाला भेटायला आल्या आहेत. त्यांना चक्कर आली." तिने सांगितल.

नंदाताई ऐकत होत्या. तोपर्यंत आशिषही आत मध्ये आला.

"सुरभी तू बाहेर जाऊन बस. मला यांच्याशी बोलायचं आहे. स्वयंपाक झाला का बघ."

ती मानेने हो म्हटली. बाहेर निघून गेली. सचिनने दरवाजा लावला. तो नंदाताई जवळ येऊन बसला. नंदाताईंनी तोंड फिरवलं." आई डॉक्टरांना बोलावलं आहे. डॉक्टर येतीलच."

"काही गरज नाही त्याची. आम्ही आता निघतो आहोत. " त्या रागाने बोलल्या.

"काय असं करते आई. बोल माझ्याशी ओरड मला." सचिन त्यांचा हात हातात घेत बोलला.

"तुम्ही मुल मोठे झाले आहात. काय बोलणार तुम्हाला. जे आहे ते ठीक आहे. मला काही अडचण नाही. तुझ्या बाबांना फोन केला आहे. ते येत आहेत. "

सचिन आशिष कडे बघत होता." बाबांना कोणी फोन केला? "

" आईनेच फोन केला असेल. मला माहिती नाही." आशिष बोलला.

"सचिन कधी झालं तुझं लग्न? आम्हाला सांगावसं वाटलं नाही का? लग्न म्हणजे छोटी गोष्ट वाटली का तुला? मला आता तुझ्याशी काही बोलायचं नाही. तुझे बाबा आल्यावर बघू. म्हणून तुला इतके दिवस घरी यायचं नव्हता का? " नंदाताई रागवत होत्या. सचिन गप्प बसून ऐकत होता. आईच बरोबर आहे. तिला राग येईलच.

सुरभी किचन मध्ये गेली. सगळ्यांचा स्वयंपाक करायला सांगितला. ती बाहेर येऊन खुर्चीवर बसली होती. मालू काकू तिच्याकडे बघत होत्या. ती त्यांच्याशी हसली.

" कुठे राहते तू पोरी? "

" याच घरात. " ती बोलली.

" ते नाही याच्या आधी कुठे राहत होती? आई वडील कुठे आहे तुझे?"

" आई-बाबा नाहीत. भाऊ आहे सौरभ दादा. तो कुठे राहतो हे मला माहिती नाही. "

मालू काकू तिच्याकडे संशयाने बघत होत्या. अशी कशी मुलगी आहे ही ?सगळ्या गोष्टी माहित नाही असं सांगते.

" मॅडम स्वयंपाक झाला आहे. ताट करायचे का? " मावशींनी थोड्या वेळाने येवून सांगितल.

"थांबा मी सांगते. " ती आत गेली. नंदा ताई कॉटवर बसलेल्या होत्या. आशिष, सचिन बाजूला बसुन बोलत होते.

" अहो जेवायच का? स्वयंपाक झाला आहे." तिने गोड आवाजात विचारल.

सचिन गडबडला.

सगळे सुरभीकडे बघत होते. आशिष हसत होता. नंदा ताई ही थोड्या हसल्या सारख वाटल्या.

"सुरभी इकडे ये. ही माझी आई आहे आणि हा भाऊ." सचिनने ओळख करून दिली.

ती त्यांच्या कडे प्रेमाने बघत होती. या काकू चांगल्या आहेत. तिने नमस्कार केला.

"असू दे. "

" बर वाटतय का काकू तुम्हाला? अहो डॉक्टर आले का?"

"नाही सांगितल डॉक्टरला. आई ठीक आहे ." सचिन बोलला.

ते तिघं गप्प होते. बहुतेक मी इथे आहे म्हणून बोलत नाही वाटत. "मी बाहेर आहे तुम्ही या."

सचिन हो म्हटला. सुरभी बाहेर निघून गेली .

नंदा ताई फ्रेश व्हायला गेल्या.

" दादा वहिनी छान आहे. तुला छान हाक मारते. अहो ऐका ना. कुठे भेटले तुम्ही? घरी का नाही सांगितल. " आशिष हसत होता, सचिनला चिडवत होता.

" आशिष गप्प बस जरा. इथे बाबा येणार आहेत तर मला भीती वाटते आहे. काय बोलतील ते? मला सुरभीला घरा बाहेर काढल तर मला थोडी पैशाची मदत करशील का? " सचिन बोलला.

" दादा मीच तुझ्याकडून पैसे घेतो. माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत. पण मी मित्रांकडून घेवू शकतो. आणि काळजी करू नकोस. बाबा काही करत नाही. वहिनी छान आहे. तिला बघून बाबा गप्प बसतील." आशिष बोलला.

सचिन टेंशन मधे होता. या लोकांना पूर्ण सत्य माहिती नाही. सुरभी मॅरीड आहे. हे समजल तर काय होईल." त्याने शिंदे साहेबांना मेसेज केला. त्या राहुलच्या वकिलाला भेटा. मी पैसे लावायला तयार आहे. फक्त आठ दिवस. त्या नंतर मी माझ्या पद्धतीने हे मॅटर हॅन्डल करेल.

" सचिन साहेब शांततेत घ्या. मी करतो आहे काहीतरी. " शिंदे साहेबांनी उत्तर दिलं.

" काय शांततेत घेवू. इथे माझ्या घरचे येवून बसले आहेत. दर पाच मिनिटाला मी खोट बोलतो आहे. मला नाही आवडत आहे अस वागायला. माझे आई बाबा खुप चांगले आहेत. त्यांना समजल मी असा वागतो तर काय होईल."

"होईल ठीक. काळजी करू नका. "

आशिष घाईने आत आला." दादा, बाबा आले. "

सचिन बाहेर आला. सुरेश राव त्याच्याकडे न बघता आत गेले . नंदा ताई त्यांच्याशी बोलत होत्या. सचिन, आशिष बाहेर बसलेले होते. सुरभीला समजत नव्हत काय सुरू आहे. सचिनला आत बोलवलं. तो आशिष कडे बघत होता. " ऑल द बेस्ट दादा. "

सचिन आत गेला.

सुरभी तिच्या कामात होती. आशिष तिच्या जवळ गेला. "वहिनी पाणी दे ना."

ती थोड हसली. पाणी आणून दिल.

"तुम्ही दोघ कुठे भेटले. तू आणि दादा."

ती फक्त हसली. तिला काही आठवत नव्हत. कुठे भेटली मी यांना? ती विचार करत होती.

"वहिनी तू आणि दादा कुठे भेटले? ऑफिस मधे की कॉलेज मधे." त्याने परत विचारल.

काय सांगू? सुरभी विचार करत होती. मी कोणत्या कॉलेज मधे होती. आशिषचा फोन आला. तो बिझी झाला.

सचिन समोर बसला होता. सुरेशराव, नंदाताई त्याच्याकडे बघत होत्या. "अहो विचारा ना."

"सचिन काय आहे हे? तुझ लग्न झाल का सुरभी सोबत? तू ही बातमी लपवून का ठेवली. आम्ही काही जुन्या विचाराचे आहोत का. तुला काय वाटल आम्ही विरोध करू. अशी कोणती घाई होती?" सुरेश राव बोलले.

"आई बाबा मला माफ करा. मला आत्ता काही सांगता येणार नाही. योग्य वेळ आली की मी सांगेन ." त्याला काय बोलाव अस झाल होत.

" याला काय अर्थ आहे. कस ही वागायच का? " नंदा ताई चिडल्या.

" तुम्हाला वाटत तर तुम्ही मला बोला. पण मी सुरभी सोबत राहणार. " सचिन हळूच बोलला.

" आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण तू आम्हाला का सांगितल नाही. का घाईघाईत लग्न केल?" सुरेश राव बोलले.

सचिन काही बोलला नाही.

" हे अस वागण बर आहे का? तुझा आमच्यावर विश्वास नाही ना. काय करायच आता तुझ. तूच सांग. " सुरेश राव बोलले.

"आई बाबा माफ करा. "

" एवढा हुशार तू. मोठे मोठे डिसिजन असे सहज घेतोस. एकदम सक्सेस फुल. इथे गडबड कशी केली." सुरेश राव बोलले.

" तुम्हा मुलांना लग्न म्हणजे खेळ वाटतो का. तुझी बायको भोळी लहान अगदी. कुठे भेटली ती. काय बोलणार तिला. साधी आहे अगदी. ही आयडिया तुझी दिसते आहे. " नंदा ताईंनी ओळखल.

"कॉलेज मधे सोबत होतो आम्ही." सचिन बोलला.

"पण आता त्या गोष्टीला चार वर्ष झाले. तेव्हा पासून तुम्ही दोघ सोबत आहात का? " नंदा ताई विचारत होत्या.

तो काही म्हटला नाही.

"बोलाव सुरभीला आत." सुरेश राव बोलले.

"तिला काही नका बोलू प्लीज." सचिन पटकन बोलला.

" आम्ही काही बोलणार नाही तुझ्या बायकोला. एवढी काळजी करू नकोस. " नंदा ताई बोलल्या.

" आई तस नाही. मला बोला काय बोलायच ते. तीच काही म्हणण नाही. मीच घाई केली . " सचिन तिची बाजू घेत होता हे बघून नंदाताई सुरेशराव कडे बघत होत्या.

" समजल ते आम्हाला. सुरभी शांत आहे. साधी आहे. बोलव तिला." नंदा ताई बोलल्या.

सुरभी आत आली.

" सुरभी हे बाबा आहेत." तिने त्या दोघांच्या पाया पडल्या.

" छान. काय नाव आहे तुझ? " सुरेश राव विचारत होते.

" सुरभी."

" पूर्ण नाव."

"सुरभी सचिन मोहिते." तेच नाव तिने फाईल वर वाचल होत.

सचिन खाली बघत होता. सुरेश राव ,नंदा ताई हसत होते. किती निरागस असाव एखाद्याने.

" कधी झाल लग्न?"

सुरभी सचिन कडे बघत होती.

"तुला नाही माहिती का?" सुरेश राव बोलले.

"बाबा आता झाल एक महिना झाला." सचिन बोलला.

"हिच्या घरचे कोण लोक आहेत. त्यांना बोलवून घ्या. एकत्र बसुन पुढचे कार्यक्रम ठरवु." सुरेशराव नंदाताईं कडे बघून बोलले.

"कोणते कार्यक्रम? "

"सत्यनारायणाची पूजा. रीसेप्शन. नातेवाईकांना सांगाव लागेल. " नंदा ताई खुश वाटत होत्या.

"नाही आम्हाला नको असे कार्यक्रम." सचिन घाबरला.

"काय अडचण आहे?" सुरेश रावांच्या चेहर्‍यावर प्रश्न चिन्ह होत.

"बाबा नंतर ठेवू ना. "

"ठीक आहे. "

"चला जेवून घ्या. "

ते बाहेर येवून बसले. सुरभी ताट करत होती. मालू काकू मदतीला होत्या.

"बसा आई बाबा."

नंदा ताई बघत होत्या सुरभी छान काम करते.

आशिष, सचिन दोघ जवळ जवळ बसले होते. तो हळू हळू सचिन सोबत बोलत होता.

सुरभी उभी होती. कुठे बघितल आहे मी अस की सगळे जेवायला बसले आहेत मी वाढते आहे. माझे सासू सासरे हे आहेत? ती डोक्याला ताण देत होती. काय आहे हे? काही तरी वेगळ वाटत आहे.

"सुरभी तू पण बस जेवायला. " सुरेश राव सुरभीला बोलले.

सुरभीच लक्ष नव्हतं. डोक धरून ती उभी होती. तिला एकदम चक्कर आली. ती खुर्चीवर बसली.

"सुरभी काय झालं?" सचिन पटकन उठून आला. तिला पाणी दिल. "सुरभी ठीक आहेस ना." सगळे घाबरून सुरभी कडे बघत होते.

"हो बर वाटतय. काही नाही. बहुतेक भूक लागली आहे." सुरभी हळूच बोलली. ती विचार करत होती. काय होत आहे हे अस?

"जेव आधी." सचिनने त्याच ताट तिला दिल.

"अहो तुम्ही बसा."

"नाही. तू जेवण कर. एकदम शांत. पाणी देवू का?" सचिन गडबडीत होता.

"मी घेते. "

सगळे त्या दोघांकडे बघत होते. किती ते प्रेम. सचिन नुसत तिला जपतो. पण छान आहे सुरभी.

ती जेवत होती. मालू काकूंनी सचिनच ताट बनवल. तो ही जेवायला बसला.

"काय झालं सुरभीला कसला त्रास होतो आहे?" नंदा ताई संशयाने बघत होत्या.

" काही नाही. तिला आरामाची गरज आहे." सचिन बोलला.

सुरभी थोडी गडबडली होती. ती विचार करत होती. आमच आता लग्न झालं आहे का? यांच्या घरच्यांना का नाही माहिती मी कोण आहे ते? मला आधीच काहीच का आठवत नाही ? त्या लोकांनी मला नाव का विचारल? हे लोक अनोळखी आहेत. घरचे असून इतके दिवस आम्ही एकटे का रहात होतो. सगळा गोंधळ आहे. यांना विचाराव लागेल.


🎭 Series Post

View all