नातीगोती_५

माझे काका काकू .
#नातीगोती५
जिथे मी घडले वाढले ज्याच्या शिवाय माझं आयुष्य पूर्णत्वाकडे नाही जाणार एकदाच नाही अनेकवेळा ज्या घराण्यात जन्म घ्यावा वाटतो ते घर म्हणजे माझ्या देशपांड्याच घर. सगळे म्हणतात हा एकच जन्म बास पण मला तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला आवडेल देशपांडेंच्या घरात.
माझा जन्म झाला तिसरी मुलगी होते पण कुठेच नाराजी नाही होत ते फक्त आणि फक्त कौतुकच . आई बाबा काका काकू अश्या चार चार पालकांच्या छायेत मी वाढली माझ्यावर जे काही संस्कार झाले ते इथेच देशपांडेंच्यात.
सामाजिक जाणीवा आणि जबाबदारीची जिथे जाणीव करून दिली ते माझं देशपांडेच घर .
माझा काका म्हणजे एक चालत बोलत विद्यापीठ अनेक वर्ष शिक्षक घडवण्याचं काम त्याने केलं . इंग्लिश आणि इतिहास काकाच्या तळ हाताचा मळ आहेत म्हंटले तर ही अतिशयोक्ती नाही ठरणार . नोकरीतील चढ उतार आयुष्यातील चढउतार ज्याने सहज स्वीकारले तो माझा काका. माझे बाबा आणि काकाचा अण्णा असे पर्यंत त्याने कोणता ही निर्णय स्वतः घेतला नाही. अण्णा म्हणेल ती पूर्व दिशा होती त्याच्यासाठी.
त्याला साथ लाभली ती काकुची काकू आणि मी खर तर देशपांडेंच्या घरी एकाच वर्षी आलो म्हणजे देशपांडेंच्या घरातील आमचं वय सारखच आहे . काकूंच्या हातात एक जादू आहे ती तिच्या रांगोळीतून, साडीवरील विणलेल्या विविध टाक्यातून आपल्याला पाहायला मिळते. एवढेच नाही तर तिच्या हाताची जादु ही बटाटे पापड पोह्याचे पापड या रूपाने सर्वत्र पसरलेली पाहायला मिळते.
काका काकूनी मला स्वतःची मुलगी मानलं नुसत मानलं नाही तर एक मुलीचे आईवडील म्हणून माझ्या सर्व जबाबदाऱ्या ही काका काकू ने पार पाडल्या माझा जन्म ते माझ्या मुलाचा जन्म माझ्या प्रत्येक फ्रेम मध्ये काका काकू हे आहेतच. जसा काका काकूंनी जीव लावला तसाच त्यांच्या दोनही मुलांनी देखील जीव लावला.
माझ्या बालपणीचा आठवणींचा अल्बम तर ऋग्वेद काकाचा मोठा मुलगा त्याच्या शिवाय पूर्णच नाही होवू शकत. तसाच काही काळाने या आठवणींच्या अल्बम मध्ये आमचं देशपांडे शेंडेफळ ऋत्विज काकाचा धाकटा मुलगा जोडला गेला आणि हा आठवणींचा अल्बम अजूनच फुलला.  
दादुस आणि मी म्हणजे ऋग्वेद आणि माझं नात हे अगदी तू तिथे मी अस होत ना कधी सोडून राहणार नी कधी सोडून काही करणार पण आता कामाच्या रगाड्यात फोन वर ही बोलणं होत नाही आमचं इतके बिझी झालोत आम्ही.
ऋत्विज सोबतच नात म्हणजे तुझं माझे जमेना तुझ्याविना करमेना. माझं लग्न ठरलं तेंव्हा खुश असणार ऋतू माझ्या डोक्यावर अक्षता पडताच इतका भावनिक झाला होता एकाकी त्याला धीर देणे अवघड झाले होते. कायम खळखळून हसणारा ऋतू त्यादिवशी मात्र हमसून हमसून रडत होता 
काका काकू काय भावंडं काय यांच्यामुळे जी एक रंगत माझ्या आठवणींच्या अल्बम मध्ये आहे ती नेहमी अशीच राहावी व हे आमचं नातं असच फुलाव बहराव हीच देशपांडेंचा कुलस्वामी वेंकटगिरी ला प्रार्थना

🎭 Series Post

View all