Jan 26, 2022
नारीवादी

नाती जपू या....

Read Later
नाती जपू या....


नाती जपू या....
एकमेकांना समजून घेवू या.....

©️®️शिल्पा सुतार
..........

प्रिया रोहित सुखी जोडी, खूप जमायच त्यांच, लग्नाला बरेच वर्ष झाल्यानंतर एकमेकांना काही सांगायची आवश्यकता राहत नाही अस होत त्यांच , रोहित मोठ्या पोस्ट वर होता कामाला, प्रिया मनमिळावू, सगळ सांभाळणारी होती, रोहित च्या आई त्यांच्या सोबत रहात होत्या, एक मुलगी होती त्यांना विभा ,

प्रिया छान सांभाळून घ्यायची घरच बाहेरच, कोणाला काय हव नको या कडे तीचं नीट लक्ष असायचं,

सगळ नीट असतांना घराची शांती सासुबाईना खटकत होती, त्यांची सध्या खूप चीड चीड होत होती, काहीही कारण पुरत होत त्यांना रुसून बसायला, त्यांच्या अश्या वागण्याने घरातले सगळे त्रासले होते, अतिशय हट्टी स्वभाव झाला होता त्यांचा, पण त्यांच अस सदोदित रागात असण कंटाळवाण होत

रोहित नेहमी प्रमाणे ऑफिस ला गेला तेव्हा सासुबाई नीट होत्या, त्याच्या सोबत मस्त चहा घेतला त्यांनी, नंतर काय झाल अचानक काय माहिती त्या कोणाशी बोलत नव्हत्या, आदल्या दिवशी त्या प्रिया सोबत एका प्रोग्राम ला गेल्या होत्या तिथून आल्या पासुन त्यांची चिडचिड सुरू होती,

नाश्त्या साठी प्रियाने पोहे केले होते आज,

"आई येत आहात ना नाश्ताला? ",.... प्रिया

"नको मला पोहे",..... सासुबाई

"दुसर करू का काही, काही तरी खा तुमच्या गोळ्या असतात",..... प्रिया

"एवढी काळजी आहे का ग तुला माझी",... सासुबाई

"आई अस का बोलता आहात तुम्ही",... प्रिया

तरी सासुबाईंनी राग सोडला नाही..

"काय झालं ग आई आजी का येत नाही नाश्ताला",.... विभा

"माहिती नाही त्या अस करतात आता हल्ली तू नको विचार करूस",...... प्रिया

प्रियाने दोन तीन दा विचारल, संध्याकाळ नंतर त्या खाली आल्या नाहीत, शेवटी प्रिया रोहितची वाट बघत बसली

"हे काय अजून जेवण झाले नाही तुमचे?",... रोहित ऑफिस हून आला, आवरलेल दिसलं नाही म्हणून विचारत होता,

" नाही अजून आई आल्या नाही जेवायला, प्रिया सांगत होती" ,..... माहिती नाही, पण त्या दार उघडत नाही आहेत,

"आधी सांगायचं मग? काय करताय तुम्ही दोघी?",.... रोहित घाबरलेला होता,

" तुला किती कॉल केले" ,..... प्रिया सांगत होती,

"ओह्ह फोन सायलेंट वर होता" ,..... रोहीत आईच्या रूमकडे गेला,

" काय झालं आई? दार उघड?...... काय झालं? आतून काहीच आवाज आला नाही, आई..... रोहित ने परत आवाज दिला, हळूच दार उघडलं गेलं, काय झालं आहे आई? जेवायला का नाही आलीस? आणि दार काय लावून घेतलं? प्रिया किती घाबरले माहितीये का"?...... रोहित

" प्रिया..... प्रिया..... प्रिया..... सारखं तिचंच कौतुक कर, मला यायचं नाही जेवायला" ,.... आई चिडली होती

"अरे काय झालंय काय? काही बोलली का प्रिया तुला" ?... रोहित विचारात होता

" नाही ती कशाला काही बोलेल, ति खूपच चांगली आहे, मीच वाईट आहे" ,..... आई

रोहित खाली आला, प्रियाला विचारू लागला...." काय झालं आहे? , काही भांडण झाल का तुमच?, दिवसभर कशी वागली आई? दुपारी जेवली का"?

प्रियालाही काही कल्पना नव्हती,.... "हो दुपारी जेवल्या त्या पण विशेष काही बोलल्या नाहीत, चिडचिड चालली त्यांची बरेच दिवस झाले" ,

" काय झालं काही बोलली का तू तिला" ?,..... रोहित

" नाही रे मुळात मी त्यांना बोलायला त्या माझ्याशी बोलतात कुठे? माझ्यावर कसला राग धरलाय त्यांनी काय माहिती? तू असं कर त्यांच ताट घेऊन वरती जा त्यांच्या रूम मध्ये, आणि तिकडे जेवण कर",.... प्रिया

" पण असं काय हे? तिची ही अशी सवय मोडायला हवी, मी ऑफिस हून आल्यावर रुसवे फुगवे काढत बसू का आता, मला माझा वेळ हवा आहे ", ?.... रोहित वैतागला होता

" अरे मग काय करता येईल, आजच्या दिवस जा त्यांना समजाव, परत तू माझ्यासोबत जेवण करत बसलास तर आई रागवतील",.... प्रिया समजावत होती

"पण मला खरच तुझ्या सोबत बसायचा जेवायला, तुला सांगायच आहे काय झाले दिवस भर",.... रोहित रागातच कपडे बदलायला गेला

"जेवण झाल्या नंतर बोलू आपण", ..... प्रिया

असं झालं आहे सध्या सासुबाईना सगळ्या गोष्टींचा खूप राग येतो, प्रियाचा तर खूपच राग येतो, ती छान दिसली, छान साडी नेसली तरी यांना राग येतो, कुठे सोबत गेलो आणि सगळ्यांनी प्रियाची तारीफ केली तरी त्यांना खूप राग येतो, रस्त्याने जातांना येताना लोकांनी प्रिया कडे बघितलं तरी खूप राग येतो, ही कशी छान दिसते, माझा कोणी कौतुक करत नाही, स्वयंपाक छान झाला अस घरच्यांनी बोललं तरी त्याना राग येतो, मुळात त्या एकट्या पडल्या होत्या, पण सगळ्यांमध्ये मिळून मिसळून रहायच तर त्या चीड चीड करत होत्या,

प्रिया स्वभावाने छान होती कुठे चुकत नव्हत तीच , तिच्या माहेरचे लोकं चांगले होते .... काहीही करायला चुकत नव्हते ते , त्यामुळे आईंना प्रियाचा खूप राग यायचा, हिला बोलायला जागा नाही, प्रियाही कंटाळून गेली आहे त्यांच्या स्वभावाला,

रोहीत तर सकाळी ऑफिसला निघून जातो, रोहित असेपर्यंत आई छान असतात घरात, त्याच्याबरोबर चहा नाष्टा घेतात, तो गेला ऑफिसला की फुगून बसतात, नीट बोलत नाही कोणाशी, जेवत नाही, कोणी काही विचारलं की सांगत नाहीत, हे अस रोजच झाल होत,

प्रियाला हे आता हल्ली अजिबात सहन होत नव्हत ,पण रोहितला रोज काय सांगणार म्हणून ती गप्प असायची

आज ही असाच झालं, त्यांनी टीव्ही लावला होता, रात्री पाहिलेली मालिका त्या परत बघत होत्या, प्रियाच्या लेकीचा विभाचा ऑनलाइन क्लास सुरु होता, वाय-फायची रेंज पुढच्या खोलीतच चांगली यायची त्यामुळे विभा आजीला बोलली टीव्ही बंद कर, तू बघितली आहे ना ही मालिका रात्री, मला क्लासला डिस्टर्ब होतंय, एवढ्यावरून त्यांना राग आला, आज त्या जेवायला आल्या नाही, त्यांना अजिबात एडजेस्ट करायच नसत, मी म्हणेन ती पूर्व दिशा, कोणाचही ऐकुन न घेता त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतले

प्रियाने ताटे तयार केली, रोहित त्याचं आणि आईचं ताट घेऊन वरती आईचा रूम मध्ये गेला, खाली विभा आणि प्रिया जेवायला बसले, त्यांनी त्यांचा आवडता पिक्चर लावला, हसत खेळत दोघी जेवू लागल्या, त्या दोघींचे आवाज वरती येत होते, ते ऐकून आई चिडल्या,

"बघितल का रोहित, मला टिव्ही लावू देत नाहीत त्या आणि आता स्वतः किती मजा घेत आहे, मी तुला सांगते रोहित प्रिया म्हणजे एकदम लबाड बाई आहे",.....

रोहितला हे अपेक्षित नव्हतं, तो एकदम दचकला,.... "काय बोलतेस तू आई? प्रियाने का कमी केलं तुझं, तू नेहमी तिला कमी लेखते, आता ही तू जेवली नाही तर कोणीही जेवलं नव्हतं आणि तुला जेवण जाव म्हणून मलाही वरती पाठवलं जेवायला, तू तुझा स्वभाव बदल आई, किती चिडचिड करतेस, तुझ्यामुळे घरचं वातावरण खराब होत, विभाच्या अभ्यासावरही परिणाम होतो, कशाला बघतेस डबल डबल त्याच मालिका, त्यापेक्षा प्रियाला मदत करत जा घरात, तुझंच मन रमेल, हट्टीपणा सोड",

आईला रोहित कडुन असं बोलणं ऐकून घ्यायची अपेक्षा नव्हती, त्या रडायला लागल्या, तसा रोहित ताट घेऊन खाली आला, विभा आणि प्रिया बरोबर जेवायला बसला,

" काय झालं रोहित? आई कुठे आहेत", ?... प्रियाने विचारलं,

" जेवते आहे ती, तिला एकांत हवा आहे, मी इथेच बसून जेवणार, वरती जाणार नाही",...... रोहित वैतागला होता

तिघांनी हसत खेळत जेवण केला, आईंना ही समजत होतं हे असं वागणं चुकीचं आहे, तरीपण त्या हट्टी पणा करत होत्या, उगीच चिडचिड करत होत्या, मुद्दामून प्रियाला त्रास होईल असं वागत होत्या, खरं तसं बघितलं तर प्रिया आणि त्यांची काही बरोबरीच नाही पण उगाचच स्वतःची तुलना प्रिया बरोबर करून स्वतःला त्रास करुन घेत होत्या,

घरात व्यवस्थित मान मिळत होता, प्रिया ही सगळं करत होती तरीही त्यांना घरच्यांकडून विशेष कौतुक करून घ्यायचं होतं पण आज मुलाने बरच ऐकवलं, खूप राग आला होता त्यांना, जेवण ही नकोसं वाटत होतं, खूप एकट वाटत होता, त्यांनी स्वतःचे नुकसान करून घेतलं होतं, काय करावं? जावं का खाली? मागावी का माफी? मुळीच नाही, मी त्या प्रियाची माफी मागणार नाही, परत मन बंड करून उठलं, अर्धी पोळी खाऊन ताट झाकून ठेवलं, पण कोणीच वर आलं नाही बघायला त्या जेवल्या की नाही , जरा वेळाने हळूच खाली बघितलं तर प्रिया आणि रोहित फिरायला निघून गेले होते, विभा अभ्यास करत होती, मी जेवली की नाही कोणालाच काही पडलेलं नाहिये , आपणच आपलं नीट वागावं का? काय करावं? की घर सोडून वृद्धाश्रमात राहावे? नको पण तिथे करमले नाही तर...... त्यांच्या मनात द्वंद्व सुरू होतं, तशीच त्यांना झोप लागली

तिकडे रोहित ने प्रियाला सांगितले, ..."आई कडे लक्ष देऊ नकोस तू, ती खाली उतरून आली तर चहा-नाश्ता दे, नाही आली तर विभा तर्फे पाठवून दे, तू लक्ष देऊ नको तिच्या कडे",

"का काय झालं आहे रोहित? तू असा का म्हणतोस? तुझी आई आहे ना ती",?.... प्रियाला नव्हत आवडल

"हो पण एखाद्या गोष्टीचा त्रास होत असला की ती गोष्ट नकोशी वाटते, आई ही असच करते आहे, मी ऑफिस मधून थकून येतो, वाटत जरा रिलॅक्स होवु तर हे घरी अस, समजुतीने घ्यायला हव तिने , मला त्रास होतो ग आईच्या वागण्याचा, आईचा आधार वाटत नाही नुसता त्रास देते ती आता हल्ली",.... रोहित सांगत होता

" असू दे रे त्या एकट्या पडल्या आहेत, त्यांना वाटत सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष द्याव, ठीक आहे, मी असते लक्ष देवून, तू काळजी करू नकोस",.... प्रिया समजावत होती

" तू देते ग लक्ष पण आई तुला आपला मानत नाही",..... रोहित

" हो माहिती आहे ते मला, बर्‍याच वेळा बोलून बघितला मी त्यांच्याशि पण उपयोग नाही, काय करणार आपण कितीही नीट वागलं तरी त्याचा उपयोग नाही थोडं खराब वागून बघूया का"?..... प्रियाने सुचवल , माझ्या कडे एक आयडिया आहे आपण तिघानी ठरवला तर आई नीट होतील,

कस काय? .......रोहित विचारात होता

ठरवल्याप्रमाणे तिघे वागणार होते प्रिया, विभा, रोहित....

सकाळ झाली, आईला उठवायला कोणीही गेल नाही, रोहित ही चहा नाष्टा करून ऑफिसला निघून गेला, विभाही कॉलेजला चालली गेली, प्रिया रोज प्रमाणे आवरत होती, आई खाली आल्या बघितलं तर चहा रेडी नव्हता ना नाष्टा,

चहा दे ग प्रिया,..... सासुबाई

"आई तुम्ही स्वतः करून घ्या चहा, तुम्हाला हवा तसा",.... प्रिया

" नाश्त्याला काय आहे"?,..... सासुबाई

" आम्ही पोहे केले होते, तुम्हाला जे हवं ते करून घ्या, नाहीतरी तुम्हाला मी काही केलेला आवडत नाही, चव नाही ना माझ्या हाताला",... प्रिया

प्रियाने पहिल्यांदा सासूबाईंना टोमणा मारला होता, तिला ते आवडत नव्हतं पण इलाज नव्हत

आईंनी स्वतः चहा करून घेतला, वरती जाऊन पिऊन घेतला, दुपारी जेवताना ही तसंच झालं, विभा आली कॉलेज होऊन प्रिया आणि विभाने जेवायला घेतल, पहिल्यांदाच झालं असेल असं, एक वाजला आई खाली आल्या बघतात तर दोघीजणी जेवत होत्या, त्यांनी त्यांचं ताट वाढलं किचनमध्ये जेवुन घेतलं, संध्याकाळ झाली तश्या त्या बाहेर फिरून आल्या, रात्री रोहित आला त्या तिघांनी जेवायला घेतले, आई खाली आल्या त्यांनी किचनमध्ये जेवुन घेतल,

रात्री रोहित आणि प्रिया फिरायला निघाले,

"मला हे आवडत नाहीये रोहित जे चाललंय ते, जाऊदे नाटक पुरे करू या का" ,... प्रिया

"नको प्रिया धीर धर, आईला कळायला पाहिजे आपल्या चांगल्या वागण्याची किंमत" ,... रोहित

दुसऱ्या दिवशी परत प्रियाने आईंचा चहा केला नाही, त्या दिवशी दुपारी प्रियाची आई आणि वहिनी भेटायला येणार होत्या, प्रियाने चांगला स्वयंपाक केला, आई वहिनी आल्या, नेहमीप्रमाणे आई सासूबाईंना भेटायला वरती गेल्या नाहीत, त्याही नाटकाचा एक भाग होत्या, खालीच बसून ते हास्यविनोद करत होते, दरवेळी प्रियाची आई आली की सासूबाईंसाठी काहीतरी घेऊन येत असे, प्रियाशी कमी आणि सासूबाईंशी जास्त बोलायच्या त्या,

खाली काहीतरी बोलायचा आवाज येत होता, आईंनी खाली बघितलं, त्या स्वतः उठून खाली आल्या, व्यवस्थित बोलल्या, वहिनीची चौकशी केली, प्रिया ताटं घ्यायला उठली तेव्हा त्यानी तिला मदत केली, थोडा थोडा बदल होत होता, संध्याकाळी ही फिरायला जातांना विभाला विचारला, "काही आणायच का" ? ,.. विभाने भाजी आणायला सांगितली

रात्री आई सगळ्यांमध्ये जेवायला येवून बसल्या, ताट करायला मदत केली, रोहितला स्वतः होऊन एक पोळी जास्त वाढली, प्रियाला आनंद होत होता, रोहित अजून ही नाराज असल्याच दाखवत होता,

दुसर्‍या दिवशी आई लवकर उठल्या, भाजी चिरून दिली, रोहितच्या आवडीचे पोहे बनवले, रोहित आला नाश्ताला, त्याला पोहे बघून आनंद झाला, आई बोलल्या,... "मला माफ करा प्रिया.... रोहित, माझ्यात कसला मी पणा भरला होता काय माहिती, तुम्ही सगळे किती जपतात मला आणि मी नीट वागत नव्हते, आज पासून मी ही घरात मदत करणार" ,

रोहितने आईला मिठी मारली,... "आई मला माफ कर मी खूप बोललो तुला, मला तू अशीच हवी आहे, माझे लाड करणारी.... पूर्वी सारखी" ,

दोघांच्या डोळ्यात पाणी होते,

"प्रिया मला माफ कर मी तुला सदोदित बोल लावले, अपमान केला तुझा , तू मला रोहित पेक्षा जास्त सांभाळून घेतलं, मुळात मी स्वतः ची तुलना तुझ्याशी का करत होते माहिती नाही, या पुढे मी तुम्हाला त्रास होणार नाही अस वागायचा प्रयत्न करेन, मी ही माणूस आहे कितपत जमतय बघते ", ...... सासुबाई ,

" आई मला माहिती आहे तुम्ही कधी कधी कंटाळतात, अश्या वेळी आमच्याशी बोलत जा मोकळ, आमचा राग आला तरी तो व्यक्त करत चला, आणि तुम्ही या कुटुंबातील महत्वाची व्यक्ति आहात स्वतःला एकट समजू नका, तुम्हाला त्रास झाला की आम्हाला ही त्रास होतो, आम्हाला तुम्ही हव्या आहात" ,...... प्रिया

अश्या एका घटनेने कधी कुटुंबातील परिस्थिती सामान्य होत नाही, पण त्यातून शिकून पुढे एकमेकांशी नीट वागायला काय हरकत आहे, सगळे चुकतात, एकमेकांना समजून घ्यायला हव

नेहमी तरुण वर्ग नाही तर कधी कधी मोठी माणसे ही चुकतात, पण वेळेवर चूक दुरुस्त केली तर त्याहून चांगलं काही नाही, मोठ्यांनी लहानांना समजून घ्यावे, नेहमी आपल्याच मनाचं होईल असा हट्ट करू नये, अहंकार बाजूला ठेवावा, घरच्या सुनेशी, इतरांशी मिळतेजुळते घ्यावे, तरच घरात आनंदवन नांदेल....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now