नातीगोती_८

आत्या भाचीचे भविष्य आत्याचा भूतकाळ भाची

आज सातवा भाग,
सात ह्या संख्येला असे ही आपण खूप मानत असतो जसे  की
हिंदूंमध्ये सात ॠषींची कल्पना मांडली आहे.
सात समुद्र आहेत.
विष्णूच्या दहा अवतारात सातवा अवतार प्रभू रामचंद्रांचा आहे.
सप्तनद्यांचे हिंदू धर्मशास्त्रात मोठे महत्त्व आहे. तसेच सात रंगाच्या कमानीला इंद्रधनुष्य म्हणतो , सात सुरांचा मेळ जुळला की गाणे गाजतेच गाजते. तसेच माणसाच्या आयुष्यात ही सात वाचन सात फेरे सात जन्म याला अनन्यसाधारण महत्व आहे..ज्याच्याबरोबर आपण सात पावले चालतो त्याच्याशीच आपले सात जन्माचे नाते जोडले जाते .
सात वर्षांपूर्वी अशीच साताजन्मासाठी माझी लग्नगाठ प्रवीणशी बांधली गेली. आणि प्रवीण मला समजत गेला अजून ही नव्याने समजतोय.
प्रवीण एक असे व्यक्तिमत्व ज्याला तुम्ही कधीच वश नाही करू शकणार, प्रवीण कोणत्याही गोष्टींवर एकाचं वेळी डोळ्याने पाहून कानाने ऐकणार नाही तोपर्यंत तो विश्वास नाही ठेवत, म्हणूनच त्याच्या बद्दल लोकांचा कधीच गैरसमज नाही होवू शकत.
घरातून विसाव्या वर्षी नोकरीसाठी बाहेर पडल्यानंतर सात वर्षात त्याने संसार थाटून स्वतःचे घर ही उभे केले.
लहापणापासूनच कष्टाची सवय असलेल्या प्रवीण ला त्याचे कौतुक केले की राग येतो यात काय मोठे आहे कुणी ही हे काम सहज केले असते असे त्याचे म्हणणे असते . पण त्याच्या तोडीचे काम क्वचितच इतक्या सहज कुणी करत असेल .
जेंव्हा जेंव्हा प्रविणच्या आयुष्याच्या प्रवासाबद्दल बोलले जाते तेंव्हा तेंव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटतातच.
आई आबांच्या डोळ्यातील पाणी आणि त्याच्या कष्टाचे कौतुक करताना भारावलेले शब्द आणि भावना मी अनुभवल्यात  प्रविणच्या बाबतीत.
जेंव्हा लग्नासाठी दाखवण्याचा कार्यक्रम झाला आमचा तेंव्हा प्रवीणने एकच अपेक्षा व्यक्त केली होती आयुष्यात खूप गोष्टी साध्य करायच्या आहेत आणि त्यात मला साथ देणारी कुणी तरी हवी आहे तर तुला आवडेल का मला साथ द्यायला? इतका जर महत्वकांक्षी व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवून सोबतीचा हात मागत असेल तर आपण नाही म्हणुच शकत नाही जर नाही म्हंटलो तर आपल्यासारखे करंटे आपणच असतो.
त्यामुळेच की काय पहिल्याच भेटीत त्याच्या  (तुला आवडेल का मला साथ द्यायला ) या प्रश्नाला कसले ही आढेवेढे न घेता मी ही होकार दिला होता.   पहिल्याच भेटीत बोलल्याप्रमाणे खरच तो अनेकगोष्टी आयुष्यात साध्य करतोय ही. आपल्याकडे जे नाही किंवा आपण जसे नाही आहोत तिकडेच आकर्षिले जातो आमच्या ही बाबतीत तेच घडले  opposite aatract  असेच घडले बहुदा आमच्यात
प्रवीण हा आमच्या घरातील एक दूरगामी संयमी,मृदुभाषी, मितभाषी, सारासार विचार करून शक्यतो कुणाला ही दोषी न मानता त्याच्या भावना समजून घेवून शांत डोक्याने परिस्थिती हाताळणारा एकमेव व्यक्ति आहे. कोणत्याही परिस्थितीत आपले मानसिक संतुलन सांभाळण्याचे कौशल्य अवगत आहे. याचमुळे प्रवीण त्याच्या काका काकूचा आत्याचा मामा मावशींचा भावंडांचा ही लाडका  आहे . मोजकेच मित्र पण ते ही जीवाला जीव देणारे असे  त्याने कमवून ठेवलेत.
आमच्याही नात्यात त्याने मला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी बंधन नाही घातले. तू तुझे घर सोडून माझ्याघरी येणार माझ्यासाठी मग मलाही तुला तसेच  सांभाळावे लागेल असे त्याचे म्हणणे  असते.
प्रवीण कधीच त्याचे प्रेम त्याची काळजी शब्दात व्यक्त नाही करत, त्याला भावना व्यक्त करण जमतच नाही. म्हणून त्याला भावनाच नाहीत असे नाही तो त्याच्या कर्तव्यातून त्याच्या वागण्यातून आपल्याला जाणवून देतो त्याचे प्रेम काळजी. कोणतीही गोष्ट आम्हाला एकत्रित आवडले असे होत नाही नेहमीच आमची आवड ही परस्पर विरोधीच राहिली आहे. म्हणून असे जरी असले  तरी एकमेकांच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्यावर आम्ही कधीच बंधने नाही घातलीत .
आमचा स्वभाव परस्पर विरोधी आहे पण तरीही छोट्या कुरबुरी सोडल्या तर विशेष असे वाद कधीच  प्रवीण होवू देत नाही.

प्रविण मुळेच  अजून एक गोष्ट मला खर तर कळली माणसाला प्रेम करायला आकर्षित व्हायला दर वेळी रूपच लागते असे नाही काही वेळा तुमचा स्वभाव, तुमचे वागणे ही पुरेसे असते . याचा अनुभव पावलो पावली येतो प्रवीण एका मुलाचा बाप झाल्यावर ही कैक मुली त्याच्याकडे आकर्षित होवून flirt करतात पण  प्रत्येक वेळी प्रविणचे  या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण भले आपले काम भले असा स्थिर राहतो यासाठी मी स्वताला खूप नशीबवान समजते की आपली निवड योग्यच होती.

तसे तर प्रविण बद्दल लिहायला खूप साऱ्या गोष्टी आहेत पण आता
आई वडील आणि समस्त हमीदवाडकर जोश्यांचा लाडका तू
आजोळीचा बुंदी लाडू तू?
भावंडांचा प्रिय तू
सासू सासऱ्यांचा खास तू
सहकाऱ्यांच्या विश्वास तू
मित्रांसाठी सदा तत्पर तू
आपल्या कमी आणि मोजके बोलण्याच्या स्वभावाने शांत असे बिरूद तू
तरीही सर्वांना हवाहवासं तू
आयुष्यातील प्रत्येक वळणावर उभा खंबीर तू बाबा या नात्याचा आधार तू
कणू च्या आयुष्याचा मुख्य गाभा तू
त्याच्या घडण्याचा पाया तू
कणुचे अस्तित्व तू सावलीही तू
कर्तव्यदक्ष तू
कर्तव्यपूर्तीचा आनंद ही तू
एक ना अनेक गोष्टींचा अथ पासून इती पर्यंतचा प्रवास तू
अपार कष्टाचे कौतुक तू
स्वावलंबी जीवनाचे उदाहरण तू
कौतुकास पात्र असूनही नामानिराळे राहणारा तू
कष्ट करून ही फळाची अपेक्षा न करणारा तू
नशिबापेक्षा स्वतः वर विश्वास तू
माझं सर्वस्व तू
माझा अंधारातील प्रकाश तू
माझ्या अखंड बोलण्याच्या श्रोता तू
प्रत्येक वेळी भावनांना शब्दाची गरज नसते याचे प्रात्यक्षिक तू
खडतर प्रवासातील आधाराची काठी तू
असा एक ना अनेक गोष्टींचा मौल्यवान ठेवा
तू तू आणि फक्त तू
शब्द मर्यादेत इतकेच , पुन्हा केंव्हा तरी त्याचे अजून किस्से अनुभव शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीन.
©अमृता जोशी
9535997174

आत्या
आत्या आणि भाचीच नात हे अस नात आहे आत्या भाचीत आपल बालपण बघते आणि भाची आपले मोठेपण आत्यात शोधत असते.
एक माझी आत्या आणि दुसरी माझ्या नवऱ्याची आत्या. दोघीही सासुरवाशीण म्हणून एक उत्तम उदाहरण आहेत. सासरची कर्तव्ये निभावताना कुठेही आपल्या आईवडिलांना कमीपणा येणार नाही याचे सर्वोत्परी काळजी दोघींनी ही घेतली.
बिंदू आत्या
माझ्या आतेसासुबाई एक सदाहरित व्यक्तीमत्व आहे. माहेरी सात भावंडात एकटीच बहीण त्यामुळे लाडाकोडात वाढलेली तरीही सासरी आल्यावर सर्व जबाबदारी घेवून नेटाने पूर्णत्वाकडे नेणारी बिंदू आत्या आमचा सहवास या वर्षभरातील म्हणजे पूर्वी ओळख होती पण आता आत्या कळायला ही लागली. प्रत्येकच स्त्री ला दिल्या घरचा अभिमान कसा असावा याचे उत्तम उदाहरण आत्या आहे. मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली एक मुख्य गोष्ट म्हणजे अमृता माहेरचे किती ही नाराज झाले तरी चालेल पण सासरच्यांना बिलकुल दुखवायचे नाही . पण आजची पिढी नेमकी उलटी वागती. आत्यांचा अजून एक गुण मला खूप आवडला जे आपल्याला येत नाही ते शिकायला लाजयचे नाही
त्यांची एक छोटीशी वही आहे आपल्याला जे येत नाही ते काय कसे करायचे याची नोंद त्या करून ठेवतात. बिंदू आत्यांसारखी च माझी धोंडन आत्या आहे .
तसा माझा आणि आत्याचा सहवास खूपच कमी आहे जसे मला समजायला लागले तसे काका गेले दादाचे लग्न झाले आणि आत्या पुण्याला शिफ्ट झाली तरी एक दोनदा पुण्याला सुट्टीला येणं झाल तोच  काय तो आमचा सहवास . पण काका काकांचे वडली  असे पर्यंत आत्याने काटकसरीने स्वतःचे अस्तित्व बाजूला सारून घरासाठी थेंबे थेंबे तळे साचे उक्तीप्रमाणे केलेले पाहिलं आहे . सासरच्या रीतिरिवाज परंपराना सांभाळताना आपले आईवडील गेलेले दुःख ही तिने मागे टाकलेलं पाहिलं आहे. कालच्या लेखात म्हंटल्याप्रमाणे पाशांकुषा एकदशीला आजी गेली आणि आजीच्या तिसऱ्या दिवशी  म्हणजे कोजागिरीला आत्याकडे कुलाचार असतो तिच्या सासऱ्यानी तिला सर्व कुलाचार कुलधर्म पंच पक्वांन बनवून जसा इतर वेळी केली जातो तसाच करायला लावला तिनेही आपली आई गेली म्हणून दुःख न कवटाळता तिने सर्व काही केले सासरचा मान राखण्यासाठी.
आत्याची शिस्त आणि काटकसर याची सर कुणाला ही येणे अवघडच . अगदी तिच्याही मुलांच्यात ती काटकसर आणि शिस्त दिसून नाही येतं. तिच्या लग्नातील साड्यांपासून सर्व आजही तिच्याकडे तसेच्या तसे आहे .
या दोनही ही आत्याकडे आपल्याला घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत त्या अगदी तश्याच जरी नाही जमला तरी काही अंशी तरी आपण अंगिकरल्या हव्यातच.

🎭 Series Post

View all