Feb 24, 2024
वैचारिक

नाते तुझे नि माझे

Read Later
नाते तुझे नि माझे
आजचा सुधा मूर्ती यांचा एक प्रोग्राम पहिला , त्यांना त्यात एका मुलीने प्रश्न विचारला, आजकालच्या युगात नवरा बायकोच नात कस जपावं?त्यांनी जे उत्तर दिलं ते खरंच आजच्या आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी उपयुक्त आहे , " Accept your husband as he is " किती छान ना! त्या पुढे बोलतात अश्या व्यक्ती सोबत माझ लग्न झालं ज्याच्यासाठी infosys पहिलं बाळ आहे ,तर मी त्यांना माझ्यासोबत साडी घ्यायला चला , म्हणून हट्ट नाही केला , प्रत्येक नवरा शाहरुख सारखा नसतो , पण अमोल पालेकर तरी कुठे वाईट असतो ..
मला त्याचं म्हणणं खूप पटल , नवऱ्याच्या पहिल्या कप्प्यात त्याची आई , बहीण असते आणि ते बरोबर आणि साहजिकच आहे , ती जागा आपल्याला मिळावी अशी आशा बाळगणे मूर्खपणा आहे , लग्नाच्या पाच सहा वर्षांनी , प्रत्येक मनुष्याला त्याचा त्याचा असा वेळ हवा असतो ,आणि तो आपण बायकांनी द्यावा , नवऱ्याला जस राहायचं तस राहू द्या , नाहीतर एकत्र असलेल्या थोड्या वेळासाठी सुद्धा आपण कटकट ,भांडण ,टोमणे मारणार असू तर तो व्यक्ती अजूनच दूर जाईल, एकमेकांची स्वप्न ,ध्येय कशी पूर्ण होतील याचा विचार करा ?? जर तुम्ही त्याची स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतय तर तो देखील नक्की तुमच्या स्वप्नाचा ध्यास घेईल , आणि शेवटी सुधा मुर्तीनी एक वाक्य सांगितलं " Behind every succesful women their is understandin husband"
अगदी खर तुम्हीच स्वतःला मुल आणि संसार ह्यातून बाहेर नाही काढत आहात , सतत त्या मालिका पाहून तुमचं पण डोकं तसाच होतंय , तर तुम्ही नक्कीच चुकताय एका typical मानसिकतेने तुम्ही स्वतःला बाहेर काढा , छान रहा , नवीन नवीन तंत्रज्ञान शिका , आयुष्यात तुमचं विश्व बनवा आणि सर्वात महत्वाचे आनंदी रहा ,कारण बाई हिच संसाराचा पाय असते ती खुश तर अख्खं घर खुश ...
@अवंती कुलकर्णी
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Avanti Kulkarni

Content Writer

As a Writer It's My Permittivity To Write For Women's

//