एकमेकांना भेटायला उत्सुक होते... कधी भेटतो असे त्यांना झाले होते....
इथे येऊन आपण थांबलो होतो आता बघूया पुढे....
खरच एकमेकांच्या प्रेमात तें बुडून गेले होते... एकमेकांसाठी वेडे झाले होते.... आता समीर यायला फ़क्त 2 दिवस होते... सोनम अगदी खूप अधीरतेने त्याची वाट पाहत होती... फोन तर होत होते... त्यात आता समीरला प्रमोशन मिळाले होते... सगळे खूप खुश होते.. आणि समीरला भेटायला उत्सुक सुद्धा...
आणि अखेर तो दिवस उजाडला... समीर चा फोन आला, अर्ध्या तासात घरी येतो, सगळे जण दारात त्याची वाट बघत उभे होते... १ तास झाला तरी आला नाही, फोन पण लागत नव्हता... सगळ्यांना काळजी वाटू लागली... नको नको तें विचार मनात येत होते....
तेवढ्यात रिंग वाजली... समीरच बोलत होता.. गाडीला अपघात झाल्यामुळे उशीर होतोय... मला काही लागले नाही...काळजी नको... सगळ्यांचा जीव भांड्यात पडला... पण त्याला बघे पर्यंत कोणाला चैन पडत नव्हते... बाबा सारखे येरझार्या घालत होते, आई देवाजवळ बसून होती... सोनम सुद्धा मनातून खूप घाबरली होती... पण तसे दाखवत नव्हती...
थोड्या वेळात दाराची बेल वाजली... लगेच सर्व हॉल मध्ये... समीर समोर उभा आहे हे बघून सर्वाना हायसे वाटले... आधीच खूप उशीर झाला होता, त्यामुळे जेवून सर्वानी आराम करायचे ठरवलं... समीर सांगत होता काय झाले, कसे झाले.. पण आई बाबा दोघेही बोलले, तू आता आराम कर.. आम्ही सुद्धा आराम करतो... खरे कारण तर सर्वाना भरून येतं होते आणि समीर समोर हे सर्व नको म्हणून सगळे तो विषय टाळत होते इतकंच...
रात्र खूप झाली होती त्यामुळे समीरने सुद्धा जास्त न बोलता झोपायची तयारी केली... सोनम चिऊ ला झोपवत होती म्हणून थोडा वेळ हॉल मध्ये थांबला...
रूम मध्ये आल्यावर त्याला वाटलं, सोनम झोपले म्हणून तो ही काही न बोलता शांतपणे पडून राहिला... त्याला त्या अपघाताची वेळ आठवत होती आणि अंगावर काटा येत होता... सगळे आठवत असताना अचानक सोनम कुशीत शिरून खूप रडते... त्याला काही कळतच नाही... दोघे बराच वेळ निशब्द असतात.. त्यांचे मन मात्र जणू एकमेकांशी हितगुज करत असते...
दोघांना एकमेकांसाठी आपण किती महत्वाचे आहोत हे पटत असते... आणि नकळत हातात आलेले हात सांगत असतात की हि साथ आता कधीच सुटणार नाही...
दोघांनी आता एकमेकांचे अवगुण स्विकारायचे ठरवले... कारण ते स्विकारता आल्याशिवाय दोन व्यक्ती एकत्र राहू शकत नाहीत हे त्यांना आता पटत होते....
भांडण कमी होत चालली होती... दोघांना एकमेकांना सोडून अजिबात करमत नव्हते.... खऱ्या अर्थाने एकमेकांचे गुण- अवगुण समजले होते... आणि एकमेकांना त्यांच्या गुण- दोषासकट त्यांनी स्विकारले होते...
मुलगी मोठी झाली तशी, सोनम सुद्धा जवळच असलेल्या इंजिनीरिंग कॉलेज वर प्राध्यापिका म्हणून जाऊ लागली होती... दोघेही बिज़ी झाले होते आणि एकमेकांना सांभाळून संसार सुरु होता...
चिऊ सुद्धा दिवसभर बाहेर असल्यामुळे घरी आल्यावर थोडा वेळ खेळुन झोपून जात असे... अधून मधून आई- बाबा आले की त्यांच्या जवळ चिऊ ला ठेवून एखाद्या मूवी ला जाणे, फिरायला जाणे असे त्यांचे सुरू होते... सासू सासरे पण मन लावुन करत होते चिऊ चे... आणि ह्यांना अधून मधून हवा तसा एकांत मिळत होता त्यामुळे अगदी भांडण होण्याचा प्रश्नच नव्हता... आणि झाले तरी आता तें किती ताणायचे हे दोघांना समजले होते...
अशातच दुसरी गोड बातमी आली.. सोनम ला एवढ्या लवकर परत बाळ नको होते... समीर सुद्धा तयार नव्हता.. पण आता जर मूल अॅबाॅर्ट करायचे तर घरात कोणीतरी हवे... आईला कसे सांगायचं?? ह्या विचारात दोघेही अडकले होते...
शेवटी न राहून दोघांनी आपआपल्या घरी फोन केला... दोन्ही आई खूप चिडल्या होत्या... पण बाबा लोकं शांत होते त्यांनी ह्या दोघीना समजावून सांगितलं आणि त्या शहरात यायला तयार झाल्या... पण त्या येई पर्यंत ह्या दोघांनी डॉक्टर कडे जाऊन कोणताही निर्णय घ्यायचा नाही अशी अट घातली गेली...
पुढच्या भागात बघू काय निर्णय होतो ते...??
अरेंज मॅरीज झाल्यावर प्रत्येक जण यातून जात असतो,हे दाखवायचा प्रयत्न मी या कथेमधुन केला आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे, आजु बाजूला जे बघायला मिळते त्यावरून सुचली आहे...माझ्या वैयक्तीक जीवनाशी त्याचा काही संबंध नाही....
हल्ली ची पिढी ही सतत वाद घालून नाही पटत म्हणून वेगळी होते... पण 'मेड फॉर इंच अॉदर' होण्या आधी ' मॅड फॉर इंच अॉदर' व्हायला लागतें...तेव्हाच ते नाते टिकते...
समीर आणि सोनम सुद्धा या चुकांमधुन कसे शिकत जातात आणि त्यांचे नाते कस फुलत जाते... ते आपण पुढे बघणार आहोत....
कशी वाट्त आहे कथा?? नक्की सांगा अर्थात तुमच्या कंमेंट मधून...खूप प्रोत्साहन मिळते... असेच प्रेम राहू दे... रोज एक भाग पोस्ट होईल...
साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.
© अनुजा धारिया शेठ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा