मागच्या भागात आपण पाहिले की सोनम आणि समीर यांचे लग्न झाले....
दोन्ही कडच्या पूजा झाल्या.... फिरायला जायची तयारी सुरू होती... बुकिंग 8 दिवसानंतरचे होते... म्हणुन जवळ एक थंड हवेचे ठिकाण होते तिथे गेले तें फिरायला.. मिनी हनिमून काय?? म्हणून सर्व मित्र मैत्रिणी चेष्टा करत होते...सोनम मात्र लाजेने चूर होत होती... खूप छान दिवस असतात सुरवातीचे... दोघेही एकमेकांच्या प्रेमात अगदी चुर झाले होते.... नंतर हनिमून ला जाऊन आले.... आणि मग् दोघेही त्यांच्या फ्लॅट वर शहरात आले...
नवीन संसार मांडत होते...आपले नवीन घर सजवत होते... हळूहळू महिना झाला..दोघेही आपला जॉब, घर सांभाळत होते... सोनम ची खूपच कसरत होत होती... आधी पण ती घरीच डबा बनवत असली तरी तयारी आई देत होती.... आता मात्र सर्व नियोजन करणे, भाजी आणणे, किराणा, दळणं... तिच्या नाकी नऊ येत होते... हे सर्व करता करता ती दमून जायची... रात्री लवकर झोपायची... समीर जवळ आला तरी तिला उत्साह नसे... याचा परिणाम असा झाला की भांडण होऊ लागली... अबोला वाढला... आणि एका वीक एन्ड ला समीरला न सांगता सोनमने आई कडे जायचे ठरवले...
शुक्रवारी रात्री समीर तिला म्हणाला उद्यां मस्त मूवीला जाऊ....पण हि भांडण करायच्या मूड मध्ये... ती म्हणाली.. मी आईकडे जाणार आहे... समीर रागवला... झाले हिला निमित्तच हवे होते....
शेवटी दोघेही गावी आले, तिला तिच्या आईकडे सोडून हा जवळच असलेल्या त्याच्या गावी गेला.... एकटेच कसे आलात या प्रश्नाचे उत्तर दोघांनी दिलेच नाही..
पण दोघांच्या आई मात्र काय समजायचे ते समजल्या.... आणि त्या दोघींनी मिळून ह्यांची बट्टी करायची ठरवली....
दोन्ही आईंनी आपल्या मुलांकडून गोड बोलुन काढून घेतले की काय प्रॉब्लेम आहे??
सोनमच्या बोलण्यातून आले की, समीर तिला मदत करत नाही... तिने काही केले तर ते आई सारखे झाले नाही असे बोलतो, आईला विचार...असेच कर आणि तसेच कर....
समीरच्या बोलण्यातून समजले, की सोनम त्याचे ऐकत नाही, त्याने कुठे बाहेर जायचं ठरवलं तर मी दमले असे सांगतें....
दोन्ही आई अगदी बरोबर समजल्या....त्यांनी त्या दोघांना घेऊन एका देवीची ओटी भरायला जायचे ठरवले, जोडीने जावे लागतें म्हणून दोघेही तयार झाले....
बघूया पुढच्या भागात...काय होते?? ते तयार झाले आहेत.. पण जातील का?? आणि दोन आई मिळून काय करतात??
साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.
© अनुजा धारिया शेठ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा