Login

नाते तुझे नी माझे.....९

Love after marriage

सर्व प्रथम समस्त वाचक वर्गाची माफी मागते की हा पार्ट टाकायला थोडा उशीर झाला....


खरच लग्न माणसाच आयुष्य बदलून टाकत, कुणाला तें मानवते तर काहीना नाही... माझे पण असेच झालंय... मी काय करू?? सर्व सुख आहे पण मानसिक सुख त्याचे काय?? मला चुल आणि मूल यात नाही अडकून राहायचं...  कसा मार्ग काढू?? समीर ला कसे समजावून सांगूं?? कि वेगळे होऊ त्याच्या पासून??

सोनम काय निर्णय घेते इथे येऊन आपण थांबलो होतो...
आता बघूया पुढे....

ह्या सर्व विचारात असताना सासूबाईंचा फोन आला की तें आणि सासरे राहायला येत आहेत... तिला आनंद झाला... आणि त्या आनंदात ह्या साऱ्याचा विसर पडला तिला....

ती मनातून म्हणाली, आई-बाबा आले की समीर च्या वागण्याला पण काही दिवस का होईना लगाम बसेल... चिऊ झोपली होती तोपर्यंत तिने सर्व आवरून घेतले... बाहेरून काय सामान आणायला हवे याची यादी केली... 

तेवढ्यात समीर घरी यायची वेळ झाली... त्याच्या साठी नाश्ता, चहा आणि रात्रीचे जेवण याची तयारी सुद्धा तिने थोडी फार करून ठेवली... कारण चिऊ जागी असली की तिला दुसरे काही काम करता येत नसे... 

आल्यावर समीर ला सांगितलं सर्व, आई-बाबा येतायत... त्याला पण आनंद झाला कारण त्याला कंपनी मधून काही दिवस बाहेर जावे लागणार होते... कधी ते सांगितलं नव्हते...पण येणार्या १०-१२ दिवसात कधीही.... त्याने तिला सांगितलं आणि लगेच गावी आई - बाबांना फोन करून त्या तयारीत यायला सांगितल...

आई- बाबा आले... आईच्या मनात काही वेगळं होते... त्यांचे भांडण झाल्यावर मात्र त्याचं सर्व व्यवस्थित झाल्यावर पूजा घालेन असा नवस बोलली होती ती देवाला... आणि त्या साठी तर तें येणार होते... पण आधी सांगितलं असते तर समीर ला पटले नसते... म्हणूनच त्याच्या आईने बरोबर नाटक रचून सांगितलं आणि तो पूजा करायला तयार झाला...

गावावरून आई बाबा आले आणि लगेच रविवारी पूजा केली... सोनम मनात म्हणाली, खरच असे सासू सासरे मिळायला भाग्य लागतें... ती मनो मन देवाचे आभार मानत होती...

पूजा झाल्यावर दोन दिवसांनी समीर कंपनी कडून बाहेर जाणार होता ते ही चांगले १० दिवस... सर्व तयारी झाली... आई असल्यामुळे सोनम ला तसे काही टेन्शन नव्हते.... 

समीर गेल्यावर हे तिघे त्यात आई मदतीला असल्या मुळे आणि बाबा चिऊ ला फिरायला घेऊन जात असल्यामुळे सोनम ला खूप मोकळा वेळ मिळत होता...त्यामुळे ती खूप फ्रेश दिसत होती... आणि तिला तिच्या वहीची आठवण झाली... मागच्या वेळेस ती नसताना समीर ने वाचली होती... 

तिने वही उघडून बघितल तर काय समीर ने लिहुन ठेवले होते तिच्या साठी....

तिच्या बद्दल बरेच काही लिहिले होते... ज्या गोष्टी तो बोलुन व्यक्त होत नाही म्हणून सोनम चिडचिड करायची त्या साऱ्या त्याने वहीत लिहिल्या होत्या... तिच्या बद्दल जे जे त्याने बोलावें असे वाट्त होते तिला तें सर्व त्याने लिहून काढले... अन खाली लिहिले मला नाही ग व्यक्त होता येत... पण तू आयुष्य आहेस माझे... परत अशी सोडून कधी जाऊ नकोस ग... तू नसली की हे घर खायला उठत मला.... सोनमचे डोळे भरून आले... तिला लग्न व्हायच्या आधीचे दिवस आठवले... 

तेवढ्यात आई बाबा आले, चिऊ खूप खुश होती, मस्त फिरून आली होती ना आजी आणि आजोबांसोबत... जेवण झाले... चिऊ झोपली... आणि सोनम खूप रडायला लागली.. तिला सुद्धा समीरची खूप आठवण येतं होती... अगदी लहान मुला सारखे रडायला येतं होते...  तेवढ्यात समीर चा फोन आला... आवाज ऐकून तिला रडायला आले... समीर म्हणाला आग वेडा बाई का रडतेस?? 
ती म्हणाली खूप आठवण येते, मग् समीर ने समजावून सांगितलं तिला हे बघ, मला पण आठवत येते तुम्हा सर्वांची.. पण तू अशी रडलीस तर माझे लक्ष लागेल का कामांत? सांग मला... तसे सोनम ला पटतं... मग् बराच वेळ दोघे गप्पा मारतात... अगदी लग्न व्हायच्या आधी बोलायचे तसे बोलत होते... 

दुसऱ्या दिवशी सुद्धा सोनम चे कशात लक्ष नव्हते... सासूबाई नि ओळखले... त्या म्हणाल्या समीर ची आठवण येते ना... ती काहीच बोलली नाही फक्त हसली... दिवस जायचा पण रात्री तिला रडायला यायचे... ती स्वतःशीच बोलत होती...  माझे मलाच कळलं नाही की एवढी गुंतून गेले मी समीरच्यात... अगदी लहान मुलासारख रडायला येतंय मला...!!! 

एवढे गुंतून जाणे चांगले की वाईट?? दोन दिवस झालेत त्याला जाऊन पण दोन वर्षे झाल्या सारखी वाटत आहे.... किती बोलले तरी मी राहुच शकत नाही त्याच्या शिवाय....फोन केला तर अजून रडायला येतंय मला.... 


लांब राहिले की प्रेम वाढतं म्हणतात तें काही खोटे नाही... हे तिला अगदी मनोमन पटत होते... दोन माणसे म्हणजे मतभेद हे असणारच...पण मनभेद होणाऱ नाही याची काळजी घ्यायला हवी हे मात्र नक्की.... तिने मनाशी पक्कं ठरवलं आणि झोपी गेली... स्वप्नात सुद्धा समीर होताच त्रास द्यायला... कारण तिचे आयुष्य खर्या अर्थाने 'समीरमय' झाले होते... 

समीर ची अवस्था काही वेगळी नव्हती... एकूण काय दोघानाही एकमेकांचे महत्व नव्याने उमगत जात होते... अन प्रत्येक टप्प्यावर तें दोघे परत परत नव्याने प्रेमात पडत होते...

आणि एकमेकांना भेटायला उत्‍सुक होते... कधी भेटतो असे त्यांना झाले होते....

बघूया पुढच्या भागात,कधी भेट होते?? आणि त्यांच्या नात्याला कसे नवीन वळण मिळत जाते...

अरेंज मॅरीज झाल्यावर प्रत्येक जण यातून जात असतो,हे दाखवायचा प्रयत्न मी या कथेमधुन केला आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे, आजु बाजूला जे बघायला मिळते त्यावरून सुचली आहे...माझ्या वैयक्तीक जीवनाशी त्याचा काही संबंध नाही....

हल्ली ची पिढी ही सतत वाद घालून नाही पटत म्हणून वेगळी होते... पण 'मेड फॉर इंच अॉदर' होण्या आधी ' मॅड फॉर इंच अॉदर' व्हायला लागतें...तेव्हाच ते नाते टिकते...
समीर आणि सोनम सुद्धा या चुकांमधुन कसे शिकत जातात आणि त्यांचे नाते कस फुलत जाते... ते आपण पुढे बघणार आहोत....

कशी वाट्त आहे कथा?? नक्की सांगा अर्थात तुमच्या कंमेंट मधून...खूप प्रोत्साहन मिळते... असेच प्रेम राहू दे... रोज एक भाग पोस्ट होईल...

साहित्य चोरी हा गुन्हा आहे. 
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी. 
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ

🎭 Series Post

View all