A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session619474567a0af6289339e24314c82e577b8a362cd64d0e18dede3918c3de659e332e70ef): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Nate tuze n maze eleven
Oct 22, 2020
स्पर्धा

नाते तुझे नी माझे....११

Read Later
नाते तुझे नी माझे....११

सर्व वाचक वर्गाची माफी मागते, तब्येत बरी नसल्यामुळे उशीर झाला आहे

दुसरी गोड बातमी आली..  जर मूल अॅबाॅर्ट करायचे तर घरात कोणीतरी हवे... आईला कसे सांगायचं?? ह्या विचारात दोघेही अडकले होते...

शेवटी न राहून दोघांनी  आपआपल्या घरी फोन केला... दोन्ही आई खूप चिडल्या होत्या... पण बाबा लोकं शांत होते त्यांनी ह्या दोघीना समजावून सांगितलं आणि त्या शहरात यायला तयार झाल्या... पण त्या येई पर्यंत ह्या दोघांनी डॉक्टर कडे जाऊन कोणताही निर्णय घ्यायचा नाही अशी अट घातली गेली...

इथे येऊन आपण थांबलो होतो आता बघू पुढे

नेहमी प्रमाणे आई बाबा यांनीं त्यांची भुमिका अगदी चोख पार पाडली... त्या दोघांना खूप छान समजावले, जर तुम्हाला भविष्यातही दुसरे मूल नको असेल तर आम्ही तुमच्या या निर्णयाचे स्वागत करू... आणि जर दोन वर्षानी हवे आता नको असे विचार करत असाल तर हे खूप चुकीचं आहे... मुळात का करायच असे काही? का त्या निष्पाप जीवाशी खेळायचे?  आपण आपली चूक म्हणून एका एवढ्याश्या जीवाशी खेळायचे?

दोघांना त्यांचे म्हणणे पटले, त्यांनी या मुलाला जन्म द्यायचा ठरवले, तसे सगळ्यांना आनंद झाला... योग्य त्या सुचना देऊन दोन्ही आई- बाबा गावी गेले... आता तें तिघेच... सोनमला टेन्शन आले होते कारण चिऊ च्या वेळेस असलेले समीरचे वागणे तिला आठवत होते... या सर्व विचारात असताना तिला हॉल मधुन चिऊ आणि समीर चा आवाज आला...

ती लांब उभी राहून ऐकत होती... समीर चिऊला समजावून सांगत होता... आईला त्रास द्यायचा नाही, उचलून घ्यायला सांगायचं नाही... आईच्या पोटात बाळ आहे... मी आणि आईने बाप्पाला सांगितलं की आमची चिऊ एकटीच आहे तिच्या सोबत खेळायला एक छानसे बाळ दे... मग् बाप्पा आला आणि आईच्या पोटात ठेवून गेला... हे ऐकून चिऊला खूप आनंद झाला... 

सोनम समीरचे हे बदललेले रूप बघतच बसली.... खरच समीर बदलला होता की त्यांचे नाते आता घट्ट झाले होते...

पुढच्या सर्व महिन्यात समीर सोनमची खूप काळजी घेत होता... तें एवढे जवळ आले होते की, न सांगता समीरला सर्व समजत होते... तिची औषधं, ट्रीटमेंट, अपॉइंटमेंट सर्व जबाबदारीने करत होता... त्यासोबतच चिऊ चे पण सर्व करत होता... सोनमला बरे नसले की चिऊला भरवणे, झोपवणे, खुप् त्रास द्यायला लागली की बाहेर घेऊन जाणे... 

चिऊ लहान होती... त्यात सोनोग्राफी केल्यावर समजले की नाळ खाली आहे... मग काय आई येईपर्यंत तिला पूर्ण आराम दिला... आता मात्र सोनम मनात म्हणाली, खरच किती काळजी आहे याला माझी.. पहिल्या वेळेस माझ्या प्रमाणेच त्यालाही हे सर्व नवीन होते फक्त माझ्या पोटात बाळ असल्यामुळे मला जबाबदारी लवकर समजली..आणि त्याने तें समजाव म्हणून मी अपेक्षा केली... खरच किती चूकीची होते मी...

आई आल्यावर आई चिऊचे काही करायला गेली की थांब आई, सोनम असे करते... सोनमने तिला असे शिकवलय असेच बोलत होता... सोनम फ़क्त आणि फक्त ऐकत होती... पण तिला मनातून वाट्त होते की आईंना काय वाटत असेल?? कसे बोलू त्यांच्याशी? सासूबाई खूप हुशार होत्या त्यांनी बरोबर ओळखले, एक दिवस समीर ऑफिसला गेल्यावर त्यांनीच विषय काढला...

सोनम, अजिबात वाईट वाटुन घेऊ नकोस...

आई कशाबद्दल बोलताय तुम्ही?? सोनम म्हणाली...

आग समीर सारखे बोलतो ना सोनम असे करते, तसे करते.. मला अजिबात वाईट वाटत नाही उलट खूप छान वाटत आहे... जे कधी त्याच्या बाबांना किंवा तुझ्या बाबांना म्हणजे आमच्या पिढीतल्या नवऱ्यांना जमले नाही ते आताची पिढी करते, बदलते आणि हा बदल चांगला आहे खरंच... तुमचे खूप छान पटते हे यातून दिसले... सुरुवातीला तुमची भांडणं व्हायची तेव्हा मला खरच खूप भीती वाटायची... पण तू बदलवलस त्याला... खुप् छान वाटतंय मला...

सोनमला मनातून खरच स्वतःची लाज वाटली... मी कसा विचार करत होते नवीन असताना खरच किती छान सासर आणि नवरा मिळालाय मला... 

शेवटचा एक महिना होता डिलिव्हरीला, तो खूप छान गेला, समीरने तिला छान सरप्राईज देऊन फोटो शूटचा प्लॅन केला... सोनमचे डोळे अगदी आनंदाने भरून येतात...

खरच तें दोघे आता एवढे जवळ आलेले असतात की न बोलता एकमेकांना एकमेकांच्या मनातले भाव अगदी सहज समजत असतात...

नववा महिना सुरू असतो त्यामुळे डॉक्टर सोनोग्राफी करायला सांगतात... आणि ती सुद्धा एवढी थकलेली असते की डॉक्टर दोन दिवसात डिलिव्हरी करायचा निर्णय घेतात... सिझर करावे लागणार असते... दवाखान्यात गेल्यावर तयारी करताना तिला होणारा त्रास बघून त्याचे डोळे ओले होतात समीरचे हे नवीनच रूप ती बघत असते एवढे हळवे....


डिलिव्हरी होते दुसरी सुद्धा मुलगी असते... अगदी नाजूक आणि थोडा त्रास असतो बाळाला श्वास घेण्याचा... तिला NICU मध्ये ठेवावं लागणार होते... समीरची खूप धावपळ होत होती... सोनमला अजून शुद्ध नव्हती... तिला काय सांगायचं?? समीर खूप काळजीत होता...

सोनम ने शुद्धीत आल्यावर विचारलं बाळ कसे आहे आपले?? तेव्हा तिला धीर देताना मात्र तो खचून जात होता... 


चिऊ, सोनम, बाळ आणि दोन्ही आई याना सांभाळत त्याची कसरत होत होती... बाबा नेमके गावी होते काही कामामुळे... त्यामुळे त्याला खूप एकटेपणा जाणवत होता... पण तसे तो दाखवत नव्हता...

बाळ आणि सोनम दोघींना डिस्चार्ज मिळाला पण ह्या सगळ्या मध्ये ८ दिवस गेले...

समीरची खूप आेढाताण झाली ह्या सगळ्यात आणि मनाने ते अजून जवळ आले...

बघूया पुढे कसे हसरे होते त्यांचे चौकौनी कुटुंब....


अरेंज मॅरीज झाल्यावर प्रत्येक जण यातून जात असतो,हे दाखवायचा प्रयत्न मी या कथेमधुन केला आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे, आजु बाजूला जे बघायला मिळते त्यावरून सुचली आहे...माझ्या वैयक्तीक जीवनाशी त्याचा काही संबंध नाही....

हल्ली ची पिढी ही सतत वाद घालून नाही पटत म्हणून वेगळी होते... पण 'मेड फॉर इंच अॉदर' होण्या आधी ' मॅड फॉर इंच अॉदर' व्हायला लागतें...तेव्हाच ते नाते टिकते...
समीर आणि सोनम सुद्धा या चुकांमधुन कसे शिकत जातात आणि त्यांचे नाते कस फुलत जाते... ते आपण पुढे बघणार आहोत....

कशी वाट्त आहे कथा?? नक्की सांगा अर्थात तुमच्या कंमेंट मधून...खूप प्रोत्साहन मिळते... असेच प्रेम राहू दे... रोज एक भाग पोस्ट होईल...

साहित्य चोरी हा गुन्हा आहे. 
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी. 
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ

Circle Image

Anuja Dhariya-Sheth

housewife n Phonics Teacher

लेखनाची आवड होतीच... पण आता खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला... आयुष्यात अनेक गोष्टी घडत गेल्या आणि लेखणी बनून कागदावर उतरत गेल्या...