नाते तुझे नी माझे....५

life after marriage

मागच्या भागात आपण पाहिले की, सोनम आणि समीर यांच्या मध्ये असलेला अबोला दोन्ही आई दूर करतात....

घरी आल्यावर सर्वाना गोड बातमी समजते... अन लगेच ऑफिस असल्यामुळे दोघे जायची तयारी करतात... सासूबाई आणि आई सोनम ला सगळे समजावून सांगत असतात, धावपळ करू नको, असे करू नको, तसे करू नको... सर्व ऐकत असते ती....

समीर ची आई पण त्यांच्या सोबत येते, सगळे थोड्या वेळात फ्लॅट वर येतात, येताना सोनम ला खूप त्रास होतो...मळमळ... उलटी, चक्कर..त्यामुळे आल्यापासून ती झोपून असते...

समीर ची आई तिला आराम करू देते, म्हणते सुरवातीला असे होतेच.... आणि सर्व आवरून मस्त खिचडी करते....

सोनम पण फ्रेश होते...अन थोडे खावून घेते....आई म्हणतात, सोनम उद्यां सुट्टी टाक, समीर हाल्फ डे घेऊन येईल जवळच एक चांगले डॉक्टर आहेत, त्यांच्या कडे जाऊन ट्रीटमेंट सुरु करू....

समीर म्हणतो, आग आई काका असतंना, त्याचे बोलणे मधे तोडत त्या म्हणतात, अरे काकाना सोनम कसे सांगेल काय होते काय नाही, सासरे म्हटल्यावर तिला संकोच वाटेल, आणि तुम्ही इथे असताना काही लागले तर...

समीर हो म्हणतो... आणि तें झोपायला जातात...

तसे बघायला गेले तर समीर आणि सोनम दोघेही तसे आळशी होते म्हणजे सुरुवात होती संसाराची आणि ही जबाबदारी तशी अनपेक्षित पणे आली होती....

सोनम ला आधीच ह्या घरच्या कामाची एवढी सवय नव्हती अन समीर ला वेळ पाळायची सवय नसते....
दोन्ही आई ह्या दोघांना अगदी छान ओळखून असतात पण त्यांना आपण  दिलेल्या संस्कारांवर तेवढाच विश्वास असतो,त्यामुळे जबाबदारी आली की तें बदलतील असा विश्वास होता त्यांना...

सासूबाई नि डॉक्टर मॅडम ना सांगितले की हे दोघेच असतात इथे त्यामुळे तुम्ही समजावून सांगा ह्यांना... काय काळजी घ्यायची? कशी घ्यायची??

मॅडम खूप छान होत्या, त्यांनी दोघांना नीट सर्व वेळा पत्रक सांगून दिले, गोळ्या घ्यायला हव्या... मंथली ट्रीटमेंट च्या डेटस् पण लिहून दिल्या...

घरी आल्यावर आई परत परत सगळे सांगत होत्या...पण समीर आणि सोनम दोघांना त्या सुचनांचा कंटाळा आला होता...

सोनमला आधीच घर कामाचा कंटाळा त्यात सासूबाई आहेत म्हणून ती जरा दुर्लक्ष करत होती, त्या पण तिला लेकी प्रमाणे समजून घेत होत्या... चार दिवसात त्या निघाल्या.... परत हे दोघे...

सोनम ला त्रास होत होताच... त्यात आता काम पण कराव लागणार होता... समीर आई समोर सगळे हो हो म्हणत होता...पण तो काही करणार नाही हे सोनम ला चांगलेच माहिती होते...

ती तिला जेवढे शक्य होईल तेवढे करत होते... अधून मधून छोटी छोटी भांडण होतच होती...

तिला काही खावं वाटलं तर ती समीर ला सांगायची... समीर हो म्हणायचा पण आणायला मात्र विसरून जायचा... तिला राग यायचा, एकदा तिने तिच्या आईला सांगितलं सर्व...
आईने समीर ला फोन करून सांगितलं लगेच डोहाळे असतात, पुरवायचे असतात...

घरी आल्यावर सोनम ला खूप बोलला तो, कसल्या अंधश्रद्धा पाळता म्हणून... तिला खूप वाईट वाटले...पण ती त्याच्या वर डिपेंड होती ना... कारण अधून मधून चक्कर येतं असल्यामुळे तिला सोबत कॊणी असल्या शिवाय बाहेर जाता येत नव्हते... त्यामुळे तिने जॉब सुद्धा सोडला होता...

प्रत्येक गोष्टी साठी समीर वर अवलंबून राहायला लागत असल्यामुळे काम काही होत नव्हते... पण चिडचिड मात्र होत होती....

त्यात तिला मदत करायची सोडून तो सारखा तिला बडबड करत असे... तिचे डोहाळे कडक होते तिला पाणी सुद्धा पचत नव्हते... शेवटी डॉक्टर मॅडम नि दोन दिवस अॅडमिट करून घेतले...  मग दोन्ही आई आल्या... त्यांनी समीर ला समझुन सांगितल.... खूप नाजूक अवस्था असते...असा त्रास होतोच आपण समजून घ्यायला पाहिजे... मग् दोघी नि ठरवले... आपणच येऊन जाऊन राहायचं..

हळू हळू दिवस पुढे जात होते...दोन आई येऊन जाऊन रहात होत्या...

एकदा सोनम ची आई असतंना तर दोघे भांडले, रागाच्या भरात सोनमला म्हणाला, जा मग् मला सोडून...

शेवटी समीर च्या बाबांनी समजावून सांगितलं कितीही राग आला तरी आपण काय बोलतोय?? याचे भान माणसाने ठेवायला हवे...

सोनम च्या आई- बाबांना थोडे टेन्शन आले होते... मुलीची बाजू... त्यात आता बाळ येईल... हे जर असे वागत राहीले तर काय होईल??

दोघेही तसे अल्लड, म्हणजे सोनम तशी वयाने लहान होती... आणि समीर तापट...

७ वा लागला डोहाळे जेवण झाले...आणि सोनम माहेरी आली...  तिकडे समीर तिच्या आठवणीत अगदी व्याकुळ झाला होता... दर आठवडय़ाला तो तिला भेटायला यायचा.... लांब राहिल्यावर भांडण पण कमी झाली..

सोनम च्या आईने सर्व तयारी केली... उद्या ९ वा लागणार होता... गावात डॉक्टर कडे जायचे होते... समीर सुट्टी काढून आला होता... त्याला वाटले उद्या होईल बाळ लगेच... पण डॉक्टर म्हणाले सगळे व्यवस्थित आहे आपण अजून ४-५ दिवस थांबु... तो जातच नव्हता..पण सगळ्यांनी त्याला समजून पाठवले...


बाळ पण असे खोटे होते ना... समीर आज गेला शहरात... आणि रात्रीच सोनम ला त्रास होऊ लागला... लगेच दवाखान्यात घेऊन गेले सर्व... 

समीर ला, त्याच्या आई बाबांना फोन करण्यात आला... आणि ते येईपर्यंत इकडे सोनम ने छान मुलीला जन्म दिला... समीरच्या आनंदाला तर पारावर उरला नाही...रातोरात तो गाडी घेऊन निघाला... सगळेच खूप खुश होते....

सोनम ची आई लगेच नारळ घेऊन आली.. बाळा वरून काढला... समीरला ह्या गोष्टी काही पटत नव्हत्या... पण तो काही बोलला नाही... डिस्चार्ज मिळे पर्यंत समीर ने सुट्टी काढली होती... बाळ रडले की लोटी काढणं, किंवा बरेच घरगुती उपाय समीर च्या मनाला पटत नव्हते...

त्यांनी कोणी नसताना सोनम शी विषय काढला, तर ती भांडायला लागली.. ह्या अवस्थेत तिला त्रास नको म्हणून तो गप्प बसला.... पण दोघेही मनाने एकमेकां पासून खूप लांब गेले होते....

आता बघू पुढच्या भागात काय होतंय? दोघे कसे परत एकत्र येतिल की भांडंण वाढत जातील??

अरेंज मॅरीज झाल्यावर प्रत्येक जण यातून जात असतो,हे दाखवायचा प्रयत्न मी या कथेमधुन केला आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे, आजु बाजूला जे बघायला मिळते त्यावरून सुचली आहे...माझ्या वैयक्तीक जीवनाशी त्याचा काही संबंध नाही....

हल्ली ची पिढी ही सतत वाद घालून नाही पटत म्हणून वेगळी होते... पण 'मेड फॉर इंच अॉदर' होण्या आधी ' मॅड फॉर इंच अॉदर' व्हायला लागतें...तेव्हाच ते नाते टिकते...
समीर आणि सोनम सुद्धा या चुकांमधुन कसे शिकत जातात आणि त्यांचे नाते कस फुलत जाते... ते आपण पुढे बघणार आहोत....

कशी वाट्त आहे कथा?? नक्की सांगा अर्थात तुमच्या कंमेंट मधून...खूप प्रोत्साहन मिळते... असेच प्रेम राहू दे... रोज एक भाग पोस्ट होईल...

साहित्य चोरी हा गुन्हा आहे. 
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी. 
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ

🎭 Series Post

View all