A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session6018e8d5182071d6e899c97f37907defe3a4d46f3a1d16b5d371d0795da05dfaadb98676): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Nate tuz ni maze...7
Oct 27, 2020
स्पर्धा

नाते तुझे नी माझे....७

Read Later
नाते तुझे नी माझे....७

मागच्या भागात आपण सोनम फोन करेल का? समीर काय करेल? असे काय वाचले त्याने कि त्याने सॉरी म्हणून मेसेज केला.... इथे येऊन थांबलो होतो आता बघूया पुढे....

वही उघडताच तिचे सुंदर अक्षर त्याला दिसले आणि त्याने वाचायला सुरुवात केली...

आज खूप दिवसांनी मला लिहायची इच्छा झाले... मन मोकळे करायची इच्छा झाले... "आपले मन हे फुलपाखरासारखे असते, दिसत तर सगळ्यांना पण हातात लागू नये असे वाटते... कारण फुलपाखरू वर जशा विविध रंगाच्या छटा असतात त्या प्रमाणे आपल्या मनावर सुद्धा आयुष्यात घडणार्या वेग वेगळ्या घटनांचे रंग उमटलेले असतात... जसे सुंदर फुलपाखरू व्हायला त्या सुरवंटाला त्रास सहन करावा लगतो तसेच काहीस मनाचे असते नाही का...???" तसेच माझे मन मी या कुपित बंद करून ठेवते...

लग्न म्हणजे नेमके काय असते?? हा प्रश्न मला हल्ली पडतोय, संसार रूपी ओझे म्हणजे लग्न?? कि दोन माणसांचे प्रेम म्हणजे लग्न, कि नुसते शरीरसंबध म्हणजे प्रेम??  का करायचे लग्न? कशासाठी?? हे सर्व लिहिताना सोनम च्या डोळ्यातून पडलेले पाणी सुकले होते... समीर ला पण भरून आले, तो पुढे वाचत होता....

लग्ना आधी वाटायचं, कि खरंच कोणीतरी येईल राज कुमार बनून आणि माझ्या सर्व स्वप्नांची पुर्तता करेल, पण हे खरच असे असते का?? हा विचार मी आधी कधीच केला नाही...तेव्हा मला वाटायचं सर्व सिनेमात दाखवतात तसेच असते, पण आता कळतंय पडद्यावरच प्रेम आणि खर्या जीवनात असलेले प्रेम यात खूप फरक आहे....

समीरला हसु आले, आणि म्हणाला खरच वेडा बाई आहे...
परत पुढे वाचू लागला...

प्रत्येक मुलगी खूप स्वप्न बघत असते, माझे लग्न झाले की असे करायचे, तसे करायचे...पण प्रत्यक्षात मात्र वेगळच असते, तरी सुद्धा हे वेड मन मात्र उगाच आशा करते... स्वप्न बघते... त्याला काय हवे तें तिला कुठे माहित असते... तिच्या आपल्या साध्या अपेक्षा असतात, दोघांनी फिरायला जावे, कधीतरी छानसे एकांतात जेवायला जावे अगदी कॅन्डल लाईट डिनर वगैरे नाही... पण मन मोकळ्या गप्पा माराव्या... कधीतरी नाटक, सिनेमा... कधी तरी सरप्राईज गिफ्ट...फार काही दागदागिने यांची अपेक्षा नाही... पण छानसे गुलाबाचे फुल...पण त्याला ते कधी कळतच नाही...

त्याला हे समजेल कधीतरी म्हणून ती स्वतःची समजूत घालत असते...अगदी त्याच्या आणि तिच्या स्वतःच्याही नकळत...
तिला काही समजत नव्हते... काय चालु आहे? जे चालले आहे तें चूक की बरोबर...??? जिथ आमचे नातेच अजून स्थिर नाही...तिथे आता अजून एक नवीन नाते जन्माला येऊ पाहत आहे...पण दोघानाही हे नाते हवे होते...

दिवसा मागून दिवस जात होते... माझे हट्ट, डोहाळे तो पुरवत नव्हता त्याचा ह्यावर विश्वासच नाही  हे ऐकल्यावर खूप रडू आले, मन मारुन पुन्हा कामाला लागले... आईकडे गेल्यावर सर्व हट्ट पुरवून घेतले...प्रत्येक गोष्टी मध्ये त्याचे माझे खटके उडत होते... माझे अश्रू आणि त्याचे शब्द मात्र दिसत होते...

त्याला मात्र त्याचे मित्र आणि त्याच्या घरचे यातच स्वतःचे जग दिसत होते...पण माझे जग तू झालायस हे कळेल का तूला???

हे असे असतंना नवीन जीव जन्माला आला त्याला घडवताना थोडा काळ तरी ती सर्व विसरून गेली... ह्या सगळ्यात तुझी साथ हवी आहे रे... पण तू मात्र तुझ्या विश्वात मग्न.... तूला माझे मन कधी कळले नाही... माझ्या डोळ्यात असलेल्या वेदना तूला कधी वाचता आल्याच नाहीत....
खरंच असेच असतात का सारे सगळे ती आणि तो...

तिला वाटत दोघेच कुठे तरी लांब जावं....
त्याला वाट्त एखाद्या मित्राला सोबत घ्यावं....

तिला वाटत सुट्टीच्या वारी संध्याकाळी छान फेरफटका मारावा....
त्याला वाटत मित्रां सोबत दंगा मस्ती करावा

तिला वाटत चिऊ आजारी असताना त्याची साथ मिळावी...
तो म्हणतो साथ काय करायचे?? ती झोपले तो पर्यन्त मॅच बघावी...

तिला वाट्त लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांना एखाद फुल तरी द्याव...
त्याला वाट्त हीच उगाच असते काही तरी....

तिला वाटत चीउ सोबत बागेत खेळायला बाबा पण हवा...
तो म्हणतो काहीतरी fad काढू नको नवा...

तिला वाट्त पाडव्याला म्हणून सरप्राईज आणावे साडीचे...
पण त्याला कधी मन कळतच नाही या वेडीचे....

रात्रीचे 1वाजून गेले, त्याला नाही राहवले आता मात्र समीरने फोन केला...त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली... तिला म्हणाला...तू खरच वेडी आहेस...मी आता अगदी या क्षणापासुन बदलेन... तुझ्या साठी... मी प्रयत्न करेन... तुझ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा...हे ऐकून सोनम ला भरून आले... तिचे डोळे भरून आले... पण उशीर झाला होता... बाकी कोणाची झोप मोड नको म्हणून तिने जास्त न बोलता फोन ठेवला... उद्यां तिला समीर न्यायला येणार होता....

कधी नव्हे ती खूप शांत झोपणार होती... कारण उद्याची सकाळ ही तिच्या साठी नवीन आशेचा किरण घेऊन येणार होती... तिच्या मनात त्याच्या बद्दल प्रेमाची एक नवीन पालवी फुटली होती... त्यावर आता परत एकदा प्रेम, विश्वास, अपेक्षा आणि आदर हि फुले नव्याने उमलणार होते... अशीच हि पालवी वाढत जाऊ दे अशी प्रार्थना करत ती झोपली....


अरेंज मॅरीज झाल्यावर प्रत्येक जण यातून जात असतो,हे दाखवायचा प्रयत्न मी या कथेमधुन केला आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे, आजु बाजूला जे बघायला मिळते त्यावरून सुचली आहे...माझ्या वैयक्तीक जीवनाशी त्याचा काही संबंध नाही....

हल्ली ची पिढी ही सतत वाद घालून नाही पटत म्हणून वेगळी होते... पण 'मेड फॉर इंच अॉदर' होण्या आधी ' मॅड फॉर इंच अॉदर' व्हायला लागतें...तेव्हाच ते नाते टिकते...
समीर आणि सोनम सुद्धा या चुकांमधुन कसे शिकत जातात आणि त्यांचे नाते कस फुलत जाते... ते आपण पुढे बघणार आहोत....

कशी वाट्त आहे कथा?? नक्की सांगा अर्थात तुमच्या कंमेंट मधून...खूप प्रोत्साहन मिळते... असेच प्रेम राहू दे... रोज एक भाग पोस्ट होईल...

साहित्य चोरी हा गुन्हा आहे. 
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी. 
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ

Circle Image

Anuja Dhariya-Sheth

housewife n Phonics Teacher

लेखनाची आवड होतीच... पण आता खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला... आयुष्यात अनेक गोष्टी घडत गेल्या आणि लेखणी बनून कागदावर उतरत गेल्या...