Oct 30, 2020
स्पर्धा

नाते तुझे नी माझे.....६

Read Later
नाते तुझे नी माझे.....६

मागच्या भागात आपण पाहिले की मुलगी झाली,सोनम आणि समीर यांच्या मध्ये आता त्या लहान बाळा वरून कुरबुर होत होती....

एक लहान मूल आले की साधारण हि कुरबुर आपल्याला सर्वच ठिकाणी बघायला मिळते, दोन घर वेगळी म्हणजे पद्धत वेगळी याचा मेळ हा नवरा आणि बायकोलाच घालायला लागतो पण त्या साठी त्यांच नाते तेवढे पुरक असाव लागतें.... अन त्यासाठी काही वर्षे जावी लागतात... आणि हीच वर्षे म्हणजे संसार रूपी वृक्षाचा पाया असतात... बघू आता पुढे.... आपल्या कथेत काय होतंय??

दवाखान्यातून घरी येई पर्यंत बऱ्याच गोष्टी समीरला खटकत असतात... त्याच्या आईला तो हक्काने बोलू शकत होता आता कसे बोलणार?? त्याची चिडचिड होत होती... 
तो परत शहारात जायला निघाला तर सोनम ची आई म्हणाली, पाचवी,सहावी पूजा असताना बाळा च्या बाबांनी पाठ करून जाऊ नये...

खर तर त्याला पटत नव्हते, पण काय बोलणार?? म्हणून गप्प बसला... पण सारखी सोनमच्या मागे चिडचिड करत होता....

सोनम ने त्याला शांतपणे सांगितलं की, हे बघ समीर ती पण आजी आहे बाळाची, ती जे करेल तें चांगल्या साठीच करेल ना?? भले पद्धत वेगळी आहे तिची पण हेतू तर चांगला आहे ना....

समीर गप्प बसला... काहीच बोलला नाही..पण पुढे बारसे होईपर्यंत प्रत्येक गोष्ट त्याला खटकत होती... "व्यक्ती तितक्या प्रकृती" सोनम अगदी शांतपणे उत्तर देत होती...

सोनम मध्ये काहीतरी बदल आहे त्याला जाणवत होते... पण कसा झाला? का झाला? हे तो शोधून काढत होता....

सोनम माहेरी आल्यावर तिच्या आईने तिला काही गोष्टी समजावून सांगितल्या होत्या, जसे की आता बाळ होईल तें थोडे  मोठे होईपर्यंत स्वताला शांत ठेवायचे, दूध पाजताना मन शांत हवे, तेच भाव बाळा मध्ये येतात... जशी आई झाली सोनम तशी खूप बदलून गेली... अल्लड, अवखळ वागणारी ती खूप शांत झाली होती.... प्रत्येक गोष्टीत बाळाची काळजी घेणे... आधी विचार बाळाचा करणे म्हणतात आई झाले की अख्खं जग बदलून जाते तसेच झाले होते....

समीर उगाच हायपर होत होता, घाई घाई ने बारसे करून त्याने तिला आणले, सोनम आणि तिची आई दोघी म्हणतं होत्या की थोड्या दिवसांनी येतो, पण ऐकेल तो समीर कसला??

आणि लगेच 31 डिसेंबर आला... सोनम ला माहीती होते की सासरी सर्व सेलेब्रेट करायला बाहेर जातात दरवर्षी ... म्हणुन ती उशीरा येणार होती... पण समीर हट्टाला पेटला म्हणून ती आली... आणि समीर नेहमी प्रमाणे जबाबदारी झटकून मित्रां सोबत गेला... 30 डिसेंबरलाच.... सासरे, सासू हे सुद्धा दरवर्षी बाहेर जायचे... चुलत सासरे घरातले मोठे सर्व यांनीं आधीच ठरवले होते... आणि हि आल्या मुळे सासूबाईंना जायला जमणार नव्हते... त्यामुळे त्यांची चिडचिड होत होती... त्या तसे दाखवत नव्हत्या...पण त्यांना लपवून सुद्धा ठेवता येतं नव्हते...

सोनम ला खूप राग आला होता समीरचा.... स्वताला जायचे होते तर मला का आणले??

एवढे दिवस गप्प असलेली सोनम आता खूप चिडली होती... त्यात आतेसासुबाई मधेच बोलल्या तिच्या सासूबाईंना... अहो वहिनी चला की तुम्ही, माझी साक्षी नाही का राहते तिकडे अमेरिकेत... तिचे बाळ पण एवढेच आहे.... सोनम चा राग आता अनावर झाला होता... सासूबाई नि ओळखले आणि त्याच म्हणाल्या अहो ताई तीचा नवरा सागर पण आहे तिच्या बरोबर... इथे समीर असता तर मी आले असते....

सोनम तें ऐकून शांत झाली.... पण तिला समीरचा खूप राग आला होता... आल्यावर तिने भांडण केले...पण त्याला काही फरक पडत नव्हता....

तिची नुसती तडफड होत होती... चिऊ कडे बघून ती गप्प व्हायची.... हळू हळू चिऊ मोठी होत होती... पण समीर च्या वागण्यात काही बदल नव्हता... मित्रांना घेऊन वीक एन्ड... मूवी, डिनर सर्व चालु होते... सोनम कंटाळत असेल तिला कुठ घेऊन जायचं की काय काहीच नाही.... शेवटी समीर ची आई बोलली त्याला... काय चालु आहे तुझे... तिला पण कंटाळा येतो... तिला कुठे तरी घेऊन जा....

सोनम ला ह्याच गोष्टीचा राग होता... प्रत्येक गोष्ट आई-बाबा यांनीं कशाला सांगायला हवी? स्वताला काही वाट्त नाही का?? कशाला केले लग्न? समीर मात्र तिला उडवून लावायचा... उलट उत्तर द्यायचा... तूला एवढंच वाटत असेल तर जा चल निघून....

सोनम मात्र भूतकाळात हरवून जायची, हाच तो समीर का? असा प्रश्न तिला पडायचा...

एकदा समीर ने तिला सरप्राईज दिले, 2दिवस मस्त दोघे फिरायला गेले... सगळे छान सुरू होते... दोघांना मस्त एकांत मिळाला होता...पिल्लू लहान त्यामुळे तीचा तसा काही त्रास नव्हता.... 

झाले ऑफिस मधून फोन आला मग् काय हा बिज़ी... दोघांची परत भांडण... आता मात्र सोनम खूप चिडली... रागाने आईकडे गेली... समीर ला वाटले जाऊ दे येईल परत... पण १० दिवस झाले तरी ना फोन ना ती परत आली... आता मात्र समीर ला जाणवू लागले... चिऊ ची पण आठवण येत होती... पण इगो अडवा येत होता...!! आता काय करायचे??

तेवढ्यात त्याला ड्रॉवर मध्ये एक वही दिसते... सोनम ने लिहून ठेवले असते बरेच काही... ते वाचता वाचता त्याला रडू येते... चूक समजते... तो फोन हातांत घेतो पण फोन लावायचे धाडस नाही होत... फक्त 'माझे चुकले' एवढेच मेसेज करतो... सोनम चा काही रिप्लाय नाही येतं.....

तो रात्रभर जागा राहतो.... वाट बघत... पण नाही फोन येत ना मेसेज...
बघूया पुढच्या भागात...काय होतय? सोनम फोन करेल का? समीर काय करेल? असे काय वाचले त्याने कि त्याने सॉरी म्हणून मेसेज केला.... मला फॉलो करायला विसरू नका....

अरेंज मॅरीज झाल्यावर प्रत्येक जण यातून जात असतो,हे दाखवायचा प्रयत्न मी या कथेमधुन केला आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे, आजु बाजूला जे बघायला मिळते त्यावरून सुचली आहे...माझ्या वैयक्तीक जीवनाशी त्याचा काही संबंध नाही....

हल्ली ची पिढी ही सतत वाद घालून नाही पटत म्हणून वेगळी होते... पण 'मेड फॉर इंच अॉदर' होण्या आधी ' मॅड फॉर इंच अॉदर' व्हायला लागतें...तेव्हाच ते नाते टिकते...
समीर आणि सोनम सुद्धा या चुकांमधुन कसे शिकत जातात आणि त्यांचे नाते कस फुलत जाते... ते आपण पुढे बघणार आहोत....

कशी वाट्त आहे कथा?? नक्की सांगा अर्थात तुमच्या कंमेंट मधून...खूप प्रोत्साहन मिळते... असेच प्रेम राहू दे... रोज एक भाग पोस्ट होईल...

साहित्य चोरी हा गुन्हा आहे. 
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी. 
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ

Circle Image

Anuja Dhariya-Sheth

housewife n Phonics Teacher

लेखनाची आवड होतीच... पण आता खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला... आयुष्यात अनेक गोष्टी घडत गेल्या आणि लेखणी बनून कागदावर उतरत गेल्या...