नाते तुझे नी माझे...४

love after marriage

दोघेही तयार झाले देवीला जायला मग् काय दोघांचे आई बाबा यांनीं लगेच तयारी केली...आणि ते निघाले..एकाच गाडीतुन....


गाडीत सोनमला समीरच्या ज्या गोष्टी पटत नव्हत्या, त्याचा विषय समीरच्या आईनं काढला, तुम्हाला सांगतें सोनमची आई, आमचे नविन लग्न झाले ना तेव्हा हे मला सारखे त्रास द्यायचे, तूला हे जमत नाही, तूला तें जमत नाही... आई माझी मस्त करते... मला एवढा राग यायचा ह्यांचा.. सोनम हसत होती..समीरकडे बघून... मग् तेव्हा माझ्या आईने मला समजावले ते मी तुम्हाला सांगतें...त्या दोघी मुद्दामून चर्चा करत होत्या...

नवरा आणि बायको यांचे नाते टॉम आणि जेरी सारखं असते....

सुरवातीला नवीन असताना सगळं अगदी परफेक्ट वाट्त असते..जसे कि हाच तो किंवा हीच ती वगैरे....????????

लग्न होते आणि मग् काय थोडे दिवस अगदीच गुलाबी असतात.... ????❤सगळे हवेत विरून जातात हळू हळू आणि मग् संसार सुरू होतो....


प्रत्येक माणूस कधी कधी चुकत असतो, चिडत असतो, भांडत असतो कधी चिडुन बोलतो पण त्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असते,पण आपण मात्र ते समजून न घेता त्या व्यक्तीला दोष देत बसतो आणि नात्यात असलेला आपलेपणा त्यामुळे संपून जातो म्हणूनच प्रत्येकवेळी प्रत्येकाला प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे...कारण चिडुन ओरडून एकमेकांना दोष देऊन नातं बिघडत आणि तें सोपं असते हो अवघड असते ते एकमेकांना समजून घेऊन नात्यात गोडवा ठेवण अवघड असते..

समजून घेण्या ने नाते फुलत जाते...ओपन राहते काहि ही लपवून ठेवायची गरज रहात नाही....

म्हणूनच मी म्हणते समजून घेणे हि एक कला आहे जी सगळ्यांना जमत नाहि आणि ज्याला जमते त्याचे आयुष्य खूप सुंदर होते....

प्रत्येक जणं हा चांगलाच असतो परिस्थिती प्रमाणे तो वागत असतो... त्यामुळे कोणाला दोष न देता समजून घेणे हाच उपाय असतो. माणूस म्हंटलं कि सगळे भाव आलेच हो पण त्याला समजूतीची जोड असली तरंच अर्थ आहे...

तसे लगेच सोनमची आई म्हणते, शेवटी काय हो संसार म्हणजे तडजोडच...पण कोणा एका ने ती करायची नसते..तर दोघांनीही एकमेकांना आनंद देण्यासाठी खुश ठेवण्यासाठी एकमेकांच्या प्रेमाखातर ती करायची असते....

भांडण होतात अगदी एकमेकांना बोलतो,लायकी काढतो, एकमेकांच्या घराण्यांचा अगदी उद्धार केला जातो... आणि शेवटी सगळे विसरून परत एक होतो असं नातं फ़क्त नवरा आणि बायको यांचंच असेल नाही....

भांडण झाले की नाहीशी हो मला नाही बघायचं तोंड असे नवरा रागात बोलतो आणि बाहेरून आला कि पहिली हाक बायकोलाच मारतो.....

जातेच मी माहेरी येणार नाही आता ८ दिवस असे ती बोलली कि तो म्हणतो जा खुशाल....आणि लगेच मित्रांना फोन करतो तिच्या समोरच... ८ दिवस मोकळा आहे रे मी....

पण खरच जेव्हा ती जाते...तेव्हा संदीप खरे यांचे गाणे आठवते त्याला

नसतेस घरी तू जेव्हा..

जीव तुटका तुटका होतो...

जगण्याचे विरती धागे....

संसार फाटका होतो....


तिकडे तिची अवस्था काही वेगळी नसते...दोन दिवस नाही होतायत तर तिला घरची ओढ लागतें....

शेवटी काय हो किती भांडलो तरी एकमेकां शिवाय अपूर्ण असतो नाही का??

एकाने पसारा केला तर दुसऱ्याने तो आवरायचा असतो,

एक रडला तर दुसऱ्याने त्याचे अश्रू पुसून त्याला हसवायचे असते,

एक पडला तर दुसऱ्यांन त्याला सावरायच असते...

कारण शेवटी आयुष्य आपल्याला सोबत काढायच असते,पण हे सर्व दोन्ही बाजूने व्हायला हवे तर तें नाते खुलत जाते आणि घट्ट होते...नाहीतर मग् तुटत जाते किंवा मना विरुद्ध जपले जाते पण त्या नात्याला अर्थ नसतो

शेवटी सगळे पाश सोडून जातात उरतो फ़क्त आपण, तू आणि मी....

म्हणूनच म्हणतात ना तूझं माझं पटेना अन तुझ्या शिवाय करमेना????????


खरेच आहे हो म्हणून दोघी हसतात.... तेवढ्यात मागे बसलेले दोघांच्या बाबांचा आवाज येतो... एवढ्या वेळ हे सगळं आम्ही पण ऐकतोय... असे तें पण हसत हसत म्हणतात... आणि एवढे तुम्हाला पटतय तरी म्हणालच " मी म्हणून टिकले हो..." परत जोरात हशा पिकतो...

शेवटी काय ह्याचेच नाव संसार.... "अरे संसार संसार" दोघी गाणे म्हणतात, आणि लगेच बाबा लोकं त्यांची टेर खेचतात....

पण त्या चौघांचा निशाणा बरोबर लागलेला असतो, समीर आणि सोनम दोघांना चूक समजते...दोघे एकमेकांना बघून हसत असतात आणि अबोला दूर होतो....

ट्रिप खूप छान होते... सगळे एन्जॉय करतात...

घरी आल्यावर सोनम म्हणते, की इथेच राहते म्हणून...सगळे मस्त हसतात आणि सोनम लाजुन आत निघून जाते...समीर हि जातो मागोमाग... 

तोवर समीर ची आई चहा ठेवते सगळ्यांना... दोघांना चूक समजली असतेच.. समीर हळूच जाऊन सोनम ला मिठी मारतो... दोघे थोडा वेळ हरवून जातात...

तेवढ्यात सोनम ची आई आवाज देते, निघतो म्हणून...ते दोघे बाहेर येतात...आणि सोनम चक्कर येऊन पडते, सर्वांना वाट्त प्रवासाच्या दगदगीने त्रास झाला की काय?? समीर चा  काकाच डॉक्टर असतो, तो येऊन सांगतो गोड बातमी आहे.... सगळ्यांना आनंद होतो... सोनम परत लाजते, आणि आत जाते... 

देवीला जाऊन आलो आणि हि बातमी...लगेच दोन्ही आई देवा पुढे दिवा लावतात आणि साखर देऊन तोंड गोड करतात.... आणि सोनम चे आई बाबा त्यांच्या घरी निघून जातात...

सगळे आवरल्यावर दोघ गप्पा मारत बसतात, खूप खुश असतात... त्यांना त्यांची चूक समजते... एवढ्या छोट्या गोष्टी साठी आपण भांडणे करत होतो म्हणून त्यांचेच त्यांना हसु येते... दोघे बऱ्याच दिवसांनी असा निवांतपणा अनुभवत असतात...
आणि आता सोनम आणि समीर आता होणारे आई- बाबा म्हणून एकमेकांच्या प्रेमात नव्याने पडतात....

आणि त्यांचे नाते परत एकदा  कसे बहरत जाते, तें आपण पुढे बघूया....

अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका......

तुमच्या सुचना आणि अभिप्राय नक्की सांगा....

साहित्य चोरी हा गुन्हा आहे. 
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी. 
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ

🎭 Series Post

View all