Login

नाते तुझे नी माझे....८

love after marrige

मागच्या भागात आपण इथे येऊन थांबलो होतो...
उद्यां तिला समीर न्यायला येणार होता....
कधी नव्हे ती खूप शांत झोपणार होती... कारण उद्याची सकाळ ही तिच्या साठी नवीन आशेचा किरण घेऊन येणार होती... तिच्या मनात त्याच्या बद्दल प्रेमाची एक नवीन पालवी फुटली होती... त्यावर आता परत एकदा प्रेम, विश्वास, अपेक्षा आणि आदर हि फुले नव्याने उमलणार होते... अशीच हि पालवी वाढत जाऊ दे अशी प्रार्थना करत ती झोपली....

आता बघूया पुढे काय होतंय??? 

सकाळ कधी होते आणि समीर कधी येतो असे तिला झाले होते.... ती लवकर उठली सर्व आवरून तयार झाली आणि वाटच बघत होती... सोनम च्या आईला एकदम आश्चर्य वाटलं... पण जे आहे तें चांगल आहे ना मग् बस... तिने समीर च्या आईला फोन करून सांगितलं...त्यांना पण आनंद झाला... ह्या वेळेस आपण मोठ्यांनी पडायच नाही असे त्यांनी ठरवलं होते... त्यामुळे तें सर्व गप्प होते... समीर आला... छान जेवण केले होते सासूबाईंनी जावई येणार म्हणून... सर्व आटपल... आणि पहिलाच आनंदाचा धक्का सोनमला दिला... घरी फोन लावुन सांगितलं की सोनम ला न्यायला आलोय पण आता पुढे आपल्या घरी येतं नाही... आम्ही इथून जातो... आतापर्यंत असे कधीच झाले नव्हते... पाच मिनिटे तरी तो त्याच्या गावी जायचाच.. कारण तसे जवळ होते...

सोनम च्या आई बाबांना खूप आनंद झाला... सोनम आणि समीर खुश होते... पूर्ण प्रवासात दोघे गप्प होते... काय बोलायचे, कोठून सुरुवात करायची काहीच कळत नव्हते, त्यात सोनम च्या मनात खूप प्रश्न?? हा कसा बदलला ... न्यायला कसा आला?? कारण तिला काहीच माहिती नव्हते ह्यानी वही वाचले म्हणून...

शेवटी समीर बोलला, मला माहीतच नव्हते माझी बायको एवढी छान लिहिते, सोनम ने जोरात जीभ चावली... कळून न कळंल असे दाखवत म्हणाली, काय बोलतोयस तू समीर मला काहीच कळत नाही आहे...

सोनम सगळे वाचलं आहे मी... बोलत जा ग अशी गप्प रहात जाऊ नको... ती काहीच बोलली नाही, लाजुन हसली....

लगेच समीर ने गाणे लावले... लाजुन हसणे अन हसुन ते पाहणे... मी ओळखून आहे सारं तुझे बहाणे....

त्याने तिचा हात हातांत घेतला, तेवढ्यात चिऊ बाई रडायला लागल्या... दोघे फ़क्त हसले... आणि मग् तीच्या बाळलीला सुरू झाल्या... भूक लागली... झोप झाल्या मुळे खेळायचे होते... तिला चिऊ काऊ च्या गोष्टी सांगे पर्यंत त्यांचे घर आले... समीर तिला घेऊन मस्त खेळत होता... घर सुद्धा छान आवरून ठेवले होते त्याने येताना... जवळच एक काकू होत्या त्यांना रात्री जेवणाचा डब्बा द्यायला सांगितल होते... जेणेकरून सोनमला त्रास नको... तिला खरच सगळं वेगळे वाट्त होते... आणि छान सुद्धा.. तिने चिऊ ला भरवून झोपवले, आणि बऱ्याच दिवसांनी ते दोघे असे निवांत बसले होते...

समीरने हळूच सोनम चा हात हातांत घेतला, आणि म्हणाला माझ्या डोळ्यात बघ... पण तीचा धीर होत नव्हता... शेवटी त्यानेच तिची मान वर केली... दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात बघितलं... आणि दोघेही सार काही विसरून  एकमेकांच्या मिठीत ‌विसावले.... तू मला काहीच कधीच का सांगितलं नाहीस?? ती काहीच बोलली नाही, डोळ्यातून पाणी मात्र बरेच काही बोलत नव्हते...त्याने पाणी अलगद ओठांनी टिपले... आणि बऱ्याच दिवसांनी ते असे जवळ आले...

आता बऱ्याच गोष्टी अगदी छान चालु होत्या... समीर च्या वागण्यात सुधारणा होती... सगळे मस्त चालले होते... त्यामुळे घरात वातावरण पण हसते - खेळते होते... तिच्या सासरी पण ते जाऊन आले... सगळ्यांना त्यांना असे बघून खूप बरे वाट्त होते....

पण म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस... परत पहिले पाढे पंचावन्न... 
पण सोनम ह्या वेळेस खूप शांत होती... आज बऱ्याच दिवसांनी चिऊ लवकर झोपली, त्याचा फोन आला की तो उशीरा येणार आहे... जेवण कॅन्टीन मध्ये घेतो... ती पण छान आवरून तयार झाली... त्याला आवडते म्हणून साडी नेसून छान सरप्राईज देण्यासाठी... 

समीर आला... तिला असे बघूनच त्याने ओळखल, आज मॅडम भलत्याच ख़ुशीत दिसतात... तो फ्रेश होऊन तिला जवळ घेतच तिला सिगारेट चा वास येतो... ती म्हणते समीर, हे कधी पासून सुरू केलेस... तो म्हणतो काय आता मूड घालवू नको हा... ती काही न बोलता बाजूला होते.. सगळा साज तीच उतरून ठेवते आणि चिऊ च्या बाजूला जाऊन झोपते, तिला वाट्त तो येईल मनवायला... माफी मागेल पण तसे काहीच घडत नाही.... साधे सॉरी सुद्धा बोलत नाही.

त्याचे म्हणणे एकच, मी काही लपवून करतो का?? पण सांगून केली काय आणि न सांगता केली तरी चोरी ती चोरीच असते ना... असे सोनम मनातच म्हणाली....

तिची तळमळ काही संपत नव्हती... मानसिक इच्छा त्या वासाने गेली... पण शारीरीक इच्छा तिचे काय?? तिने बघितलं तर समीर झोपून सुद्धा गेला होता त्याला काही फरक पडत नव्हता...

दिवसा मागून दिवस जात होते, पण तिची चिडचिड वाढत होती... त्याचे वागणे म्हणजे... काही अर्थच लागायचा नाही... पण तीच्या चिऊ साठी ती गप्प होती... मनात म्हणायची की खरच "बाईच आयुष्य हे  पेटत्या निखाराप्रमाणे असते नाही का?? त्यावरून चालताना पाय अगदी पोळून निघतात... मला आता या बंधनात नाही राहायचं, मला मोकळीक हवे... माझी स्वतःची ओळख हवे...

खरच लग्न माणसाच आयुष्य बदलून टाकत, कुणाला तें मानवते तर काहीना नाही... माझे पण असेच झालंय... मी काय करू?? सर्व सुख आहे पण मानसिक सुख त्याचे काय?? मला चुल आणि मूल यात नाही अडकून राहायचं...  कसा मार्ग काढू?? समीर ला कसे समजावून सांगूं?? कि वेगळे होऊ त्याच्या पासून??

सोनम काय निर्णय घेते बघूया पुढच्या भागात....


अरेंज मॅरीज झाल्यावर प्रत्येक जण यातून जात असतो,हे दाखवायचा प्रयत्न मी या कथेमधुन केला आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे, आजु बाजूला जे बघायला मिळते त्यावरून सुचली आहे...माझ्या वैयक्तीक जीवनाशी त्याचा काही संबंध नाही....

हल्ली ची पिढी ही सतत वाद घालून नाही पटत म्हणून वेगळी होते... पण 'मेड फॉर इंच अॉदर' होण्या आधी ' मॅड फॉर इंच अॉदर' व्हायला लागतें...तेव्हाच ते नाते टिकते...
समीर आणि सोनम सुद्धा या चुकांमधुन कसे शिकत जातात आणि त्यांचे नाते कस फुलत जाते... ते आपण पुढे बघणार आहोत....

कशी वाट्त आहे कथा?? नक्की सांगा अर्थात तुमच्या कंमेंट मधून...खूप प्रोत्साहन मिळते... असेच प्रेम राहू दे... रोज एक भाग पोस्ट होईल...

साहित्य चोरी हा गुन्हा आहे. 
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी. 
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ

🎭 Series Post

View all