नाते प्रेमाचे भाग चौथा

Love Story


(भाग ४)


तो तर तिथून निघाला पण मनात मात्र विचार अनेक प्रकारे थैमान घालत होते.. कारण असं कधीही झालं नाही की तो आईला असे काही सोडून तिथून निघून जाईल वगैरे.. पण आजची परिस्थिती वेगळी होती आई एकतर फोन विसरुन गेली गाडीतच.. तो ही लक्ष दिला नाही.. आणि त्याला ही मिटिंगसाठी खूप उशीर होत होता म्हणून.. तो ही आईला सोडून गाईगडबडीत आईला मंदिरला सोडून आँफिसला गेला...


???

तो गाडीत मागे टेकून विचार करत होता.. एव्हाना घरी ही सगळयांना ही समजलचं होतं ..त्यामुळे घरी सगळे टेंशनमधे होते.. आईची वाट पाहत होते..

थोडयाच वेळात इकडे विरेनला एक अनोन नंबर वरुन काँल येतो.. तो क्षणाचा ही विलंब न करता पटकन काँल रिसीव करतो.. आजची परिस्थिती वेगळी असेल तर तो साधा अनोन नंबरकडे ढुंकून ही पाहत नसे.. पण आता आईचा शोध घेणे आवश्यक होते म्हणून तर तो पटकन समोरुन आलेला काँल रिसीव केला..



हँलो.. (त्याचा आवाजात काळजी दिसत होती..)

हँलो कोण..?? समोरुन एक मुलीचा गोड आवाज..

तिचा आवाज ऐकून कानात हळूच काहीतरी घुमत असेल.. आणि दुसऱ्या क्षणी ते थेट त्याचा हृदया पर्यत ती मधूर गोड आवाज पोहोचली असेल.. तो तिचा आवाज फिल करत होता.. तेच समोरुन आवाज येताच तो भानावर आला..

हँलो कोण आहे..?? तुमचे दोन तीन मिस काँल्स आले सो मी काँल बँक केला..?? आपण

(ती म्हणाली तसा तो पटकन म्हणाला उत्तरादाखल...)
मी विरेन देशमुख.... सकाळी मला तुमचा काँल आला होता सो मी काँल केला...

तसे तिच्या लक्षात येतं की सकाळी काकु त्याचा मुलाला काँल करणार होतै... बहुदा तोच हा असावा..
हा एक मिनिट... असे म्हणत ती फोन तिथे बसलेल्या काकुला फोन देते..

कोण आहे बेटा...

हम्म कोणी तर विरेन देशमुख आहे... मे बी तुमचा मुलगा असेल..

हा हो.. असे म्हणत त्या फोन कानाला लावून बोलतात..
हँलो विरु....

माँम.. वेअर आर यू नाऊ.. मला न सांगता कुठे गेली आहेस तू ...तू जिथै आहे तेथील पत्ता सांग मी आताच येतो.. तो चिडून थोडा रागातच म्हणाला...

चिडू नको ना विरु.. सांगते मी ये तू.. असे म्हणत त्या विरेनला पत्ता सांगतात... तसा तो गाडी टर्न घेऊन आई जिथे आहे तिथे जातो..
गाडीचा स्पीड एवढा जास्त असतो की अर्धा तासाचा रस्ता तो फक्त पाच मिनिटे पार करुन तिथे पोहोचला...

गाडी थांबताच तो आत जातो.. बेल वाजतो तसे ती पटकन धावून जाते या वेळेस कोण असेल विचार करतच ती दार उघडते..
तिला पाहून तर तो काही वेळ पाहतच राहतो.. कारण ती खूप साधी सिंपल व सुंदर दिसत होती..

आपण कोण...???
तिच्या आवाजाने तोच भानावर आला..



माझी आई.. तो असे म्हणता ती विचारात पडते..
तेच तिच्या लक्षात काही येताच ती त्याला आत घेते..

अहो.. आत या तुम्ही.. तुमची आई आय मीन काकू आत आहेत.. त्या आता तुमच्या विषयीच बोलत होते..

हम्म.. तिच्या तोंडून शेवटचे वाक्य ऐकून त्याचा कपाळावर आठ्या पडल्या..
ती गेली तोच तिच्या मागे आत गेला.. समोरचा दृश्य पाहून तर तो ???

त्याची आई खाली जमिनीवर बसली होती... काही तरी काम करत.. तो तर ते बघून चिडून तिला म्हणाला..
हे यू.. दोन्ही हात खिशात ठेवून तिच्या समोर उभे राहून.. चेहर्‍यावर निर्विकार भाव ठेवत..
तु माझी आईला इथे का घेऊन आलीस.. आणि हे काय या इथे खाली जमिनीवर बसले आहे..



त्याचा आवाज ऐकून आई तर घाबरल्याच.. कारण त्याना माहित होत की याचा राग कसा आहे ते..
तसे ते हळूच उठून तो उभारला तिथे जात म्हणाली..
विरू ते..

तसा तो रागाचा कटाक्ष आईवर टाकताच आई शांत झाली..
आणि तू काय आहे हे सगळं कळेल का मला..

त्याचा टोन ऐकून आधी तर ती दचकली.. पण मात्र नंतर तेच ती भानावर येताच त्याला म्हणाली..

हे पहा.. तुम्हाला माहीत नाही की..
ती पुढे काही बोलणार त्याआधीच तो म्हणाला..

मला काही ऐकून घ्यायचा नाही.. आणि थँक्स माझी आईची मदत केल्याबद्दल.. आणि लक्षात ठेव पुन्हा एकदा मला न सांगता यांना इथेच नाही तर कुठेच घेऊन जायचं नाही..
शेवटी तो जवळ जवळ तिला धमकीच दिला..

तिला मात्र त्याचा बोलण्याचा अर्थ काहीच कळेना..

चल आई असे म्हणत तो आईचा हात पकडून बाहेर निघून गेला  ...

ती जाणार्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत होती...


???

इकडे घरी आई येताच सगळे घराडा घातले तिच्या भोवती..
आई कुठे होतीस तू.. सांगून जाता येत नाही का..??
अक्षय काळजीने म्हणाला..

आई आता तरी बोल ना.. अजय पण..

अरे अरे तिला बसू तरी द्या.. मग तुमचा चालू राहु दे..
वीरेन म्हणाला.. तसे सगळे शांत झाले व सोफ्यावर बसले..

आई ही यांची सगळयाची काळजी पाहून मन भरून आलं..
ती ही सोफ्यावर बसली..
रामु काका (कामवाला नोकर) त्यांना पाणी आणून दिले..
आई ही पाणी पिली व थोडा वेळ शांतेत गेले तेव्हा आई बोलायला सुरुवात केली.. काय झालं सकाळपासून सगळं काही.. तिथे काय घडलं.. नेत्रा कशी मदत केली ते ही..
तिच्या घरी पाहूणचार कशा पद्धतीने झाला.. गरीब असूनही तिचा मन मोठा होता.. तिचा प्रेमळ स्वभाव सगळयाना ही आवडलं होतं.. आईच्या बोलण्यातून तर सगळयाना तिला भेटण्याची इच्छा झाली..

पण आपल्या वीरला मात्र काहीच इंटरेस्ट नव्हता.. तो तर कधीच वरती रुममध्ये निघून गेला..
सोफ्यावर बसून तो आँफिसचा काम करण्यात बिझी झाला..

???

दुसर्‍या दिवशी तो सकाळी रेडी होत होता...आणि त्याला तर आईच्या मनात काय चाललंय ते काहीही माहित नव्हतं..
तो तर त्याचा आवरून आँफिसला जायला रेडी होत होता..
आई त्याचा रुममध्ये येत म्हणाली..

विरु मला तुझ्या सोबत खूप महत्त्वाचा मुद्दा बोलायचं आहे..??

आईचं बोलणं ऐकून तो ही विचारात पडला..
हम्म ओके सीट.. असे म्हणत तो सोफ्यावर बसला व आई समोर बसली...

हं बोल आई.. असं काय बोलायचं आहे तुला.. की तुला माझ्या रूममधे येऊन माझी परमिशन घ्यावी लागते आहे..

हम्म.. आहे आई घाबरुन त्याचा अंदाज घेत म्हणाली..

हम्म बोल.. तो  हातातील घड्याळाकडे पाहत म्हणाला ...

ते मी तुझा लग्नाविषयी बोलण्यासाठी इथे आले आहे..



वाँट... ???
आई तुला माहित आहे का तु काय बोलते आहेस ते..??? सिरियसली माझं लग्न..

हो.. आणि आता तिला विसरुन जा.. आणि मी ज्या मुलीला दाखवते आहे त्या मुलीसोबत तुझा लग्न होणार आहे..
नाही तर तु माझं मेलेलं तोंड बघणार..
आणि मला तुझा निर्णय काय ते संध्याकाळी पर्यत सांग.. येते मी
आई शेवटी शस्त्र बाहेर काढलं.. व तिथून बाहेर निघून गेले..

तो तर शाँक्ड होऊन पाहत होता.. आज आईचं नवं रुप..
तो तर स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता...
आणि तिच्या शिवाय तो दुसर्‍या कुठल्या मुलीचा विचार ही मनात येऊ देत नव्हता..
ती इथे नाही.. शिकण्यासाठी लंडनला गेली.. तिचं शिक्षण पूर्ण झालं की तो बोलणारच होता की.. आज आईने याला न विचारताच याचा लग्न ठरवलं होतं.. तेही स्वतःच्या पसंतीची मुलगी...

???

(To be continued...)