Oct 18, 2021
कथामालिका

नाते प्रेमाचे..

Read Later
नाते प्रेमाचे..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

(भाग -1)
नाते प्रेमाचे...???


(तिने सकाळी लवकर आवरुन नेहमी प्रमाणे मंदिराला जाऊन तिथून आँफिसला जाणे हा तिचा दिनक्रम.. महादेवाची खूप भक्ती करायची.. )


ती अनाथ आहे.. लहानपणापासून अनाथश्रम वाढली.. तिथे राहून तेथील संस्कार शिकून.. तिचा छान पद्दतीने संगोपन केले होते.. व वय वर्षे २१ पूर्ण झाले असता स्वतः च्या पायावर उभे राहून आपण आपल्या साठी काही तरी केले पाहिजे.. 


  त्यासाठी योग्य वेळी ते अश्राम सोडणे आवश्यक होते.. ती आणि तिची मैत्रिण स्वरा दोघेही एका छोटासा रुम भाडयाने घेऊन त्यात रेंट देऊन राहत होते.. दोघांनीही आई वडील नव्हते.. तसे ते कधी दुःखी नव्हते..


जीवनात प्रत्येक गोष्टीत सामोरे जाण्याची तयारी करुन ठेवली होती.. जीवनात सुख.. दुःख.. प्रोब्लेम येत असतात.. त्याना फेस करत पुढे जाणे गरजेचे आहे.. 


म्हणुन ते दोघीही हसत खेळत जीवनात प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत होते.. कुठलीही गोष्टीचा कधी आपल्या जीवनात मिळाला नाही म्हणुन रडत बसले नाही.. 

  (असो स्टोरी कडे वळूया ..)


तर ही आहे आपल्या कथेची नायिका नेत्रा पाटील.. दिसायला सुंदर..  गोरा रंग.. मनमिळाऊ स्वभाव..लांब सुंदर केस.. हसताना गालावर पडणारी खळी.. जे समोरच्या माणसाच्या हृदयाचा ठाव घेणारं..पंखुडी मखमल गुलाबी ओठ.. पाहताक्षणी कोणालाही आवडेल अशी  ती होती 


ती आज नेहमी प्रमाणे आवरुन नाश्ता करून तयार होऊन ती आँफिसला निघाली ..आज आँफिसला जाताना मधे रस्त्यावर तिला एका ठिकाणी गर्दी दिसली होती.. तसे ती आँटोतुन उतरुन बाहेर आली.. 


आणि समोर चालत गेली.. आणि पुढे जाऊन पाहते तर काय एक बाई चक्कर येऊन पडली होती.. तिच्या दिसण्यावरुन तर वाटत होते की ती बाई खूप श्रीमंत असेल.. असो 

ती वाट करुन थोडे पुढे आली..

व ती बाईला स्वतःच्या 

मांडीवर घेत बँगेतील पाण्याची बाटली काढली व थोडे पाणी हातात घेऊन त्या बाईच्या चेहर्‍यावर मारली तसे ते हळूहळू करत डोळे उघडले.. तर समोर ती.. 


अहो काकू तुम्हाला बरं वाटतयं ना.. हे घ्या पाणी प्या तुम्ही.. 

असे म्हणत ती त्याना बाटलीतले पाणी दिले व हळू उठवले.. 

तेही तिच्या हातून घेत थोडे पाणी पिल्यावर त्यांना बरं वाटलं.. 


हम्म हो बेटा मी ठीक आहे.. धन्यवाद बेटा तु आज माझी मदत केली आहेस.. 
अहो काकू त्यात काय धन्यवाद बोलता तुम्ही.. 

आपलं कर्तव्य आहे की दुसरे जेव्हा संकटात असतात तेव्हा त्याचे मदत करण आवश्यक आहे.. आणि आपल्यात कसले धन्यवाद आलं आहे.. तुम्ही पण ना चला आता तुमचा घर कुठे आहे आणि तुम्ही कसे जाणार आहात ते सांगा..


तिला पाहून त्याचा मनात विचार आला सहजच.. 

किती चांगली पोरगी आहे.. हिचा मन ही किती साफ आहे.. जर ही माझ्या घरात आली तर माझं मुलाच लाइफ पुर्णपणे बदलून जाईल.. हिच्या येण्याने तो नक्कीच बदलेल मला आशा आहे.. मला माहीत आहे तो सध्या कसा राहतो आहे ते.. 

मी ही त्याची आई आहे.. मला ही त्याला आनंदात बघायचं आहे.. मला वाटते हिच्या येण्याने ते अवश्य पुर्ण होणार.. (एकीकडे हळूहळू  गर्दी कमी होत गेली.. यांना दोघांना असे पाहुन थोडे लोक कूजबूज करत निघून गेले.. ती ही सगळ्यावर एक कटाक्ष टाकून त्याचा मदतीला धावून पुढे आली होती..) 


काय झालं काकू.. काय विचार करतायं तुम्ही.. चला

असे म्हणत ती त्याना हळूच उठवली.. व हळूहळू चालत ते समोर त्याबाई आलेल्या गाडीजवळ गेले.. 

अहो दादा कुठे होता तुम्ही.. या काकू चक्कर येऊन पडल्या आणि तुम्ही मात्र गायब.. ती आता थोडी रागातच बोलते.. त्या कार ड्रायवरला.. 


साँरी मँम.. ते छोटे मालकाचा फोन होता.. म्हणुन मी असा बाजूला गेलो.. आणि एवढयातच हे घडलं.. 


 तो खाली मान घालून म्हणतो.. 


ठीक आहे दादा.. चालेल होतो असे कधी कधी.. 

यांना नीट घेऊन जा घरी.. यांची काळजी घ्या.. 


हो मँम.. बसा मँम तुम्ही आत.. (त्या काकूला श्रीमंत बाई.. )

तसे ते आत बसतात.. 


येते काकू मी आता.. काळजी घ्या तुम्ही.. 


हो बेटा तु ही.. त्या म्हणाल्या 

गाडी निघून गेली.. 


ती जाणार्‍या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत होती.. 


???


मला असे का वाटते यांना पाहून की.. काही तरी यांचा सोबत खूप जवळचा संबंध आहे माझा.. 

नेत्रा तु पण ना काहीही विचार करतेच.. 

(असे म्हणत ती तिच्या डोक्यावर टपली मारते.. )

हसत मागे वळून तिथे जाते जिथे तिची रिक्शा थांबली होती.. तिथे जाते व रिक्शात बसून ती तिच्या आँफिसला जायला निघाली.. 


???


(To be continued.....)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now