नाते जपलेले जिवापाड... भाग 4 अंतिम

माई एकदम लाजल्या, सगळे हसायला लागले, दोघांनी मिळून केक कापला, जेवण झाले आलेले पाहुणे गेले


नाते जपलेले जिवापाड... भाग 4 अंतिम

©️®️शिल्पा सुतार
.......

लगेच सतीश आणि परेशने गाद्या टाकल्या पेटी तबला सगळे रेडी ठेवलं एक ग्रुप गायनाच्या कार्यक्रमासाठी आले होते, नानाची गाण्याची आवड बघुन हा कार्यक्रम ठेवला होता, दुपारचं जेवण होईपर्यंत सुरेख गाण्याचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला फक्त घरचीच मंडळी उपस्थित होती, एक से एक गाणी म्हटली जात होती, विशेष म्हणजे नानांनी ही माईंनसाठी एक गाणं म्हटलं, खूप मज्जा आली

दुपारचा स्वयंपाक झाला प्रिया आणि सायली ने मिळून ताट केले, नाना आणि माईंना टेबलावर बसवलं, ताटाभोवती सुरेख रांगोळी उदबत्ती पंचपक्वान्नांनी ताट सजलं होतं, हसत-खेळत जेवणं झाली,

"आता काय सरप्राईज आहे"?,..नाना माई विचारत होते

आता काही नाही, आता दोन तास आराम करा, मग संध्याकाळी पाहुणे येतील,

सगळ्यांचा आराम झाला, चहा पाणी झालं, संध्याकाळी जेवण बाहेरून येणार होत, चार नंतर पाहूणे यायला सुरुवात झाली, मावशी, काका काकू, जवळची आत्या सगळे आले, गप्पा गोष्टींना उधाण आलं, माई तर गप्पांमध्ये अगदी बुडून गेली होती, इतक्या वर्षात तिला असं निवांत बसायला मिळालं नाही, कोणी आले की स्वयंपाक पाण्यातच बिझी असायची ती,

जरा वेळाने केक कापला सतीश आणि सायली उठले बोलायला,..... "आजचा दिवस खुप भाग्याचा आहे, पन्नास वर्षापूर्वी नाना माई एकमेकांना भेटले, तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुमच्या दोघांकडून खूप शिकायला मिळाले, जोडीदाराशी कसं वागावं, एकमेकांची काळजी कशी घ्यावी, घर कसं चालवावं, थोड्या पैशातच सगळं नीट कसं करावं", किती बोलू आणि किती नाही असे सतीश आणि सायलीला झाले होते

नानांनी उठले त्यांनी बोलायला सुरुवात केली, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचा उत्साह वाढवला, ते माईंन जवळ गेले, "तू आहेस म्हणून हे सगळ आहे, सगळे श्रेय तुलाच जात, माझा संसार बसवला, नीट सांभाळला, काहीही नव्हतं सुरुवातीला आपल्याकडे, तरी कसली तक्रार केली नाही, होतं नव्हतं त्यात एकदम नीट संसार केला, तुझे खूप आभार आणि आज सगळ्यांसमोर मी तुला सांगतो आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे",

माई एकदम लाजल्या, सगळे हसायला लागले, दोघांनी मिळून केक कापला, जेवण झाले आलेले पाहुणे गेले, सगळे बाहेर बसून मस्त गप्पा करत होते, छान झाला नाही आजचा कार्यक्रम,.....

सगळे झोपायला गेले

नाना खोलीत आले, ते मागे काहीतरी लपवत होते ,

" काय आहे हातात ",.. माई

नानांनी उठून माईंच्या केसात गजरा माळला...

"काय हो हे" ,. माई लाजल्या होत्या

"माझ्याकडून तुला गिफ्ट",... नाना

"सकाळी तर द्यायचा ना गजरा, खूप छान आहे हो",... माई

"नाही मला एकांतात द्यायचा होता, मी काही आणल नाही गिफ्ट तुला " ,...नाना

"मी ही कुठे आणल काही " ,..माई

" बर झालं नाही आणल, एक गोष्ट मागू का"?,.. नाना

" हो बोला",. माई

"माझ्या सोबत असच कायम रहा, अशीच साथ दे ",. नाना

दोघांच्या डोळ्यात पाणी होत , एकमेकांची साथ हेच मोठ गिफ्ट आहे हे समजून चुकले होते ते, एकमेकांचा हात हातात घेवून बरच वेळ ते बसले होते...... निशब्द होवुन........

🎭 Series Post

View all